साने गुरुजी माहिती मराठी Sane Guruji Information in Marathi

Sane Guruji Information in Marathi साने गुरुजी माहिती मराठी, साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक,समाजवादी विचारवंत,सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजी. यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. तर पुण्याच्या शाळेतून 1918 साली ते मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाल्यावर ते न्यू पुना कॉलेजचे विद्यार्थी झाले आणि बी.ए आणि एम.ए उत्तीर्ण झाले. पुढे ते अमळनेर येथे तत्त्वज्ञान मंदिरामध्ये फेलो म्हणून आले. पण लवकरच तत्वज्ञान मंदिर सोडून ते अमळनेरच्या इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. थोड्याच दिवसात ते तिथे वस्ती ग्रहाचे मुख्य झाले.

तेथील विद्यार्थ्यांच्या जीवनाची ते समरस झाले. स्वावलंबन आणि सेवावृत्ती त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कृतीद्वारे शिकवली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले. आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वापरली. गुरुजी या अभीधानाला ते सार्थ ठरले. ते कायमचे सानेगुरुजी झाले. छात्रालयात त्यांनी एक हस्तलिखित दैनिक चालवले. नंतर त्यांनी 1928 साली ‘विद्यार्थी’ नावाचे मासिकही सुरू केले. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

sane guruji information in marathi
sane guruji information in marathi

साने गुरुजी माहिती मराठी – Sane Guruji Information in Marathi

नाव (Name)पांडुरंग सदाशिव साने
जन्म (Birthday)24 डिसेंबर 1899
जन्मस्थान (sane guruji birthplace)कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड
वडील (Father Name)सदाशिव साने
आई (Mother Name)यशोदाबाई
मृत्यू (Death)11 जून 1950
लोकांनी दिलेली पदवीसाने गुरुजी

सानेगुरुजींचे पूर्ण नाव काय होते – full name of sane guruji

पांडुरंग सदाशिव साने

श्यामची आई 

‘श्यामची आई’  हे पुस्तक सानेगुरुजींचे आत्मकथा आहे. हे पुस्तक यांनी नाशिकच्या कारागृहात स्वातंत्र्याच्या लढ्यात असताना लिहिले. हे पुस्तक लिहायला त्यांनी 9 फेब्रुवारी 1933 ला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 ला संपवले. साने गुरूजींना घडवण्यात यांच्या आईचा किती मोठा वाटा आहे हे त्यांनी या पुस्तकात सांगितले. या पुस्तकावर आधारित प्र. के.अत्रे यांनी चित्रपट काढला.

आईस देव माना,वंदा गुरूजनांना,

थोर हीच तुमची शिकवण रुजे मना

मातृ प्रीतिची अमर कहानी

 

श्यामची आई, अमृताचा सागर

किती हे आईचे थोर उपकार

देशभक्ती आणि समाज सेवा

 

थोर तुमचे संस्कार, लढाऊ बाणा

शेतकऱ्यांचा कैवारी तूम्ही जाण

स्वातंत्र्याच्या व्यक्तीवर ती पेटती मशाल

 

मुलाप्रति अपार तुमचे प्रेम

अस्पृश्यांसाठी तुम्ही झाला खांब.

श्याम म्हणजेच लहानपणीचे सानेगुरुजी. त्यांना जे सुसंस्कार दिले ते त्यांच्या आईने.  श्यामच्या आईने श्यामला माणसावर नाहीतर गुरेढोरे, फुल झाडे यावरही प्रेम करायला शिकवले. एकदा श्यामने गुलबार्शीच्या कळ्या तोडून आणल्या तर श्यामची आई त्याला म्हणाली, श्याम झाडाच्या कळ्या कधी तोडू नये. जसा आपल्याला त्रास होतो, तसाच झाडांनाही त्रास होतो.एकदा श्यामच्या आईने वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा तीन दिवस मारण्याचे व्रत करण्याचे ठरवले. पण आईची तब्येत ठीक नसल्याने तिला वडाला प्रदक्षिणा मारणे शक्य नव्हते.

त्यामुळे ति श्यामला म्हणाली, श्याम मी वडाला तीन प्रदक्षिणा मारीत बाकी तू मार.श्याम म्हणाला, आई मी कशा मारू सर्व लोक मला वडाला प्रदक्षिणा मारल्या तर हसतील. मला लाज वाटेल. त्यावर त्याची आई म्हणाली, अरे आईचे काम करायला कसली लाज. आईचा विचार करायचा की लोकांचा. आईच्या सांगण्यावरून श्यामने प्रदक्षिणा मारून पूर्ण केल्या.

कोकणात पावसाळ्यात विहीर पाण्याने तुडुंब भरत. सर्व मुलं तेव्हाच कमरेला भोपळा बांधून पोहायला शिकतात पण श्याम पोहने शिकायला घाबरत होता. आपला मुलगा भित्रा बनु नये असे श्यामच्या आईला वाटे.एकदा शामची आई त्यांच्या मित्रांना म्हणाली श्यामला रविवारी तुम्ही तुमच्या सोबत पोहायला घेऊन जा. तिने श्यामला विचारले, जाशील ना रे श्याम? त्यावर शाम काही बोलला नाही.

रविवारचा दिवस उजळला. श्याम पोहायला जाण्याच्या भीतीने लपून बसला. श्यामच्या आईने श्यामला शोधून काढले व काठीने पाठीवर मारत विहिरीवर नेले व श्यामच्या कमरेला भोपळा बांधून त्याला विहिरीत ढकळले.त्याचे मित्र त्याला पाण्यात हात पाय मारणे शिकवू लागले.

हळूहळू आत्मविश्वास वाढला त्याची पाण्याची भीती गेली आणि श्याम भोपळा काढुन पोहू लागला. त्याला जवळ घेऊन शाबासकी देऊन श्यामची आई म्हणाली, तुला कुणी भित्रा म्हटलेलं मला आवडणार नाही आणि त्याच्या पाठीवरच्या जखमांना तेल लावून दिले. आईच्या संस्कारांमुळे श्याम म्हणजे साने गुरुजी शिक्षक स्वातंत्र्यसेनानी लेखक अशा वेगवेगळ्या भूमिकेतून नावलौकिक मिळवले.

स्वातंत्र्यसंग्रामात गुरुजी:

महात्मा गांधींच्या राजकीय आंदोलनाचा प्रभाव गुरुजी यांच्यावर 1921 पासूनच पडू लागला. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. 1930 साली गांधीजींची सत्याग्रह चळवळ सुरू होताच गुरुजींनी शाळा सोडली.

“काँग्रेस” नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, 1942 च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. “पत्री” या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील “बलसागर भारत होवो ” या सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

बलसागर भारत होवो! विश्वात शोभुनी राहो

राष्ट्रार्थ प्राण हे उरले! मी सिद्ध मरा या हो

1945 पर्यंत झपाटल्यासारखे स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. आता गुरुजींच्या कार्याचे स्वरूप बदलले. नंतर त्यांनी पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेऊन यशस्वी केली. पुढे महात्मा गांधींच्या निर्वाणानंतर देशातील परिस्थिती फारच चमत्कारिक झाली. 1948 आली साने गुरुजी यांनी आपले कार्यक्षेत्र बदलले. 15 ऑगस्ट 1948 रोजी गुरुजींनी “साधना “साप्ताहिक सुरू केले व अखेरपर्यंत समाजवादी विचारांचा प्रचार केला.

सानेगुरुजी महान साहित्यिक:

या जगामध्ये असुरांच्या सृष्टीसुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, त्यात गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही,

न मी एक पंथाचा

तेच पतित की

आखडीती जे प्रदेश साकल्यांचा

साकल्याच्या प्रदेशात फार थोर प्रवासी.जीवनाच्या किती निरनिराळ्या रंगात रमले होते.साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू येत असत व मी तर म्हणतो की असले अश्रू येण्याचे भाग्य एकदा तरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खऱ्या अर्थाने आपण जगलो असे म्हणा.साने गुरुजी नुसते रडले नाही प्रचंड चिडले.ते रडणे आणि चिडणे सुंदर होते.

त्या चिडल्या मागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणाऱ्यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक  सुंदर करण्यासाठी आहे अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते.साने गुरुजींनी स्वतःला साहित्यिक म्हणून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरे पण ते खरोखर चांगले साहित्यिक होते.

श्यामची आई, श्याम जीवन कलह अर्थात शाम खंड दोन आणि तीन आणि त्यानंतर कादंबरी, कथा, गोड गोष्टी, आवडत्या गोष्टी, कविता, वैचारिक लेख, निबंध, चरित्रे, संपादन, अनुवाद इत्यादी साहित्य प्रकार साने गुरुजींनी लिहिले. जवळपास शंभरहून अधिक पुस्तके साने गुरुजींच्या विचारमंथनातून लिहिलेली प्रसिद्ध झालेली आहे.

साने गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे – Sane Guruji Book information in Marathi

साने गुरुजींनी मराठी साहित्यात भरपूर मोलाचे योगदान केले आहे. त्यांनी ७३ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. त्यातील काही पुस्तकाची नावे खालील प्रमाणे आहेत.

चरित्रे-

महात्मा गौतम बुद्ध, नामदार गोखले, भगवान श्रीकृष्ण, आपले नेहरू, महात्मा गांधीचे दर्शन, ईश्वरचंद्र विद्यासागर.

कादंबरी-

श्यामची आई, मोलकरीण

बालसाहित्य व कथा-

आपण सारे भाऊ, धडपडणारी मुलें, मुलांसाठी फुले, मानवजातीची कथा, हिमालयाची शिखरे, जीवनाचे शिल्पकार, भारतीय नारी, सोनसाखळी, मोरी गाय, दुर्दैवी, माझी दैवते.

निबंध-

खरा मित्र, करुणादेवी, घामाची फुले, दुःखी, गोड निबंध, बेबी सरोजा, अमोल गोष्टी. धर्म आणि संस्कृती- संस्कृती चे भवितव्य, राष्ट्रीय हिंदू धर्म, समाज धर्म, भारतीय संस्कृती, इस्लामी संस्कृती.

इतर-

नवा प्रयोग, स्री जीवन, साधना, तीन मुले, क्रांती, सती, संध्या, भारताचा शोध.

मृत्यू – Sane Guruji Death information in Marathi

1899 ते 1950 उणेपुरे पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना लाभले. त्यापैकी 25 वर्षाचा काळ बालपण व विद्यार्थी दशेत गेला.त्यानंतरची सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. ते अवघ्याचे गुरुजी बनले. वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. सुमारे आठ वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.जेमतेम बारा वर्षे ते मैदानात होते. एवढ्या अल्प काळातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची डोंगर उभे केले. हजारो कार्यकर्त्यांना आपले अवघे जीवन झोकून द्यावे अशी वादाची प्रेरणा त्यांनी दिली.

स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी कार्यक्षेत्रे बदलली. समाजवादाचा प्रचार आणि त्यासाठी उभे केलेले साधना साप्ताहिक त्यांचे सर्वस्व ठरले. बदलती परिस्थितीअसह्य झाली आणि त्यांनी या जगाचा निरोप घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी केले 11 जून 1950 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे आचार्य अत्रे यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

आम्ही दिलेल्या sane guruji information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर साने गुरुजी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sane guruji information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sane guruji in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!