नरक चतुर्दशी मराठी माहिती Narak Chaturdashi Information in Marathi

narak chaturdashi information in marathi नरक चतुर्दशी मराठी माहिती, आपल्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सन साजरे केले जातात आणि त्यामधील दिवाळी हा सन एक सर्वात मोठा सन आहे, परंतु दिवाळीच्या अगोदर छोटी दिवाळी साजरी केली जाते आणि ह्या छोट्या दिवाळीला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये नरक चतुर्दशी विषयी माहिती पाहणार आहोत. नरक चतुर्दशी हा हिंदू धर्मातील एक मोठ्या दिवाळीच्या अगोदर साजरा केला जाणारा सन आहे.

आणि या एकाच दिवशी भगवान श्री कृष्ण आणि सत्यभामा यांनी राक्षस नरकासुर याचा वाढ केला होता आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता आणि म्हणून नरक चतुर्दशी हि दिवाळीच्या अगोदर प्रेम, आनंद, कौटुंबिक एकत्र येणे आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.

नरक चतुर्दशी हा सण ५ दिवसांच्या दिवाळीमध्ये बहुतेक दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी झाल्यानंतर असतो आणि हा कार्तिक महिन्यात कृष्ण पक्ष्याच्या चौदाव्या दिवशी असतो आणि हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये असते. नरक चतुर्दशी हा सण देशाच्या संपूर्ण भागामध्ये आनंदाने साजरा केला जातो.

narak chaturdashi information in marathi
narak chaturdashi information in marathi

नरक चतुर्दशी मराठी माहिती – Narak Chaturdashi Information in Marathi

भारतामध्ये विविध भागांच्यामध्ये या सणाची वेगवेगळी नावे – names

या सणाला नरक चतुर्दशी, भूत चतुर्दशी, छोटी दिवाळी, काळी चौदस, नरक निवारण चतुर्दशी, रूप चौदस आणि नरक चौदस अश्या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

नरक चतुर्दशीविषयी पौराणिक कथा – story

राक्षस नरकासुराने त्याच्याकडे असणाऱ्या शक्तीचा वापर करून देव, ऋषिमुनी आणि सोळा हजार सुंदर दासींना बंदी बनवले होते आणि या सर्वांना त्याच्या बंधनातून मुक्त करणे आवश्यक होते. नरकासुर या राक्षसाला एका स्त्रीच्या हातून मारण्याचा शाप मिळाला होता.

आणि त्यावेळी भगवान श्री कृष्णांनी या गोष्टीचा वापर करून पत्नी सत्यभामा यांच्या मदतीने कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष्यातील चतुर्दशीला नरकासुर या राक्षसाचा वध केला आणि देव, ऋषिमुनी आणि सोळा हजार सुंदर दासींची मुक्तता केली.

नरक चतुर्दशी कशी साजरी केली जाते – how to celebrate

 • मुख्य दिवाळी किंवा मोठ्या दिवाळीच्या आदल्या दिवसाला नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणून ओळखतात आणि या दिवशी सर्व लोक आपली घरे स्वच्छ करतात तसेच सजवतात तसेच या दिवशी दिवे लावले जातात आणि हे दिवे नकारात्मक उर्जा काढून टाकण्यासाठी लावले जातात असे म्हणतात.
 • तसेच या दिवशी सुंगधीत तेल आणि उटणे लाऊन स्नान केले जाते आणि स्वच्छ कपडे घालून आवरले जाते आणि दिवे लाऊन त्याची पूजा करतात.
 • तसेच या दिवशी घरातील सर्वजन मिळून लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात त्याचबरोबर देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवैद्य दाखवले जातात.
 • त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी मृत्यूच्या देवतेची म्हणजेच यमराजाची पूजा केली जाते.
 • नरक चतुर्दशी दिवशी दारामध्ये आकाशकंदील लावले जातात, पणत्या लावल्या जातात, सुंदर अशी रांगोळी काढली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचा फराळ नैवैद्य म्हणून दाखवला जातो.
 •  तसेच काही ठिकाणी या दिवशी संध्याकाळी दीपोत्सव साजरे केले जातात.

नरक चतुर्दशी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • नरक चतुर्दशी दिवशी आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी आणि आपल्यामधील आळशीपणा दूर करण्यासाठी साजरा केला जातो.
 • नरक चतुर्दशी सण म्हणजे हा एक आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
 • या दिवशी काही ठिकाणी दीप दान देखील केले जाते.
 • या दिवशी लक्ष्मीची तसेच श्री कृष्णाची पूजा केली जाते आणि आपल्या घराच्या प्रवेश दरवाज्यापाशी दीप लावला जातो.
 • नरक चतुर्दशीला अनेक दिवे लावले जातात आणि यामध्ये यमराज देवांच्या नावाने देखील दिवा लावला जातो आणि या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.
 • या दिवशी जे व्यक्ती लवकर किंवा ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंग स्नान करतात अश्या व्यक्ती स्वर्गाला जाण्यासाठी प्राप्त होतात असे म्हटले जाते.
 • या दिवशी मृत्यूची देवता यमराज यांची तिन्हीसांजेला पूजा केल्यानंतर त्या संबधित व्यक्तीला अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते.

नरक चतुर्दशी विषयी काही महत्वाची माहिती – narak chaturdashi in marathi

नरक चतुर्दशी का साजरा केला जातो ?

नरक चतुर्दशी हा एक अनोखा आणि वेगळा उत्सव आहे आणि हा पौराणिक कथांच्यानुसार श्री कृष्णाने ज्या दिवशी नरकासुराला मारले होते त्या दिवशी साजरा केला जातो आणि हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

नरक चतुर्दशीला लवकर अंघोळ का केली जाते ?

नरक चतुर्दशीला लवकर अंघोळ केली जाते कारण या दिवशी भगवान श्री कृष्णनाने वध केल्यानंतर ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे तेल आणि उटणे लाऊन स्वच्छ अंघोळ केली होती आणि म्हणून या दिवशी भारतातील अनेक लोक ब्रह्म मुहूर्तावर अंघोळ करतात.

नरकासुराचे पिता कोण होते ?

नरकासुर हा भूमी म्हणजेच पृथ्वीची देवी आणि वराह म्हणजेच विष्णूचा अवतार यांचा तो पुत्र होता आणि हा प्राचीन राज्याचा राजा होता.

नरक चतुर्दशी दिवशी कोणत्या रंगाची कपडे परिधान केली जातात ?

नरक चतुर्दशी म्हणजे हि छोटी दिवाळी असते आणि या दिवशी बहुतेक लोक हे पांढरा रंग किंवा हलकी लाल वस्त्रे परिधान करतात तसेच या दिवशी मुलांना पारंपारिक कपडे घालतात.

आम्ही दिलेल्या narak chaturdashi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नरक चतुर्दशी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या narak chaturdashi images in marathi या narak chaturdashi wishes in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about narak chaturdashi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!