नेल्सन मंडेला माहिती Nelson Mandela Biography in Marathi

Nelson Mandela Biography in Marathi – Nelson Mandela Information in Marathi नेल्सन मंडेला माहिती मित्रांनो स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आपल्या भारतासाठी फारच कठीण राहिला आहे. भारतातील प्रत्येक क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचे पाणी केलं आणि वेळ आलीच तर आपला जीवही भारतमातेसाठी अर्पण केला. ब्रिटिशांनी आपल्या जनतेवर बरेच अत्याचार केले अतिशय हीन अशी वागणूक दिली भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपल्या भारतातील शूरविरांनी बऱ्याच खस्ता खाल्ल्यात. परंतु फक्त आपला भारतच असा देश नव्हता जो ब्रिटिशांच्या कचाट्यात अडकला होता.

दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील अशीच काही परिस्थिती सुरू होती आणि दक्षिण आफ्रिकेला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी एक नवीन आशेचा किरण होता तो म्हणजे नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष ठरले ज्यांनी आपल्या देशासाठी बऱ्याच खस्ता खाल्ल्या. आजच्या ब्लॉग मध्ये आपण नेल्सन मंडेला यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वा विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

nelson mandela biography in marathi
nelson mandela biography in marathi

नेल्सन मंडेला माहिती – Nelson Mandela Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)नेल्सन मंडेला
जन्म (Birthday)१८ जुलै १९१८
जन्म गाव (Birth Place)मवेझो, दक्षिण आफ्रिका
ओळख (Identity)दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष

जन्म

नेल्सन मंडेला यांचा जन्म १८ जुलै १९१८ साली मवेझो, दक्षिण आफ्रिका येथे झाला. नेल्सन यांच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांचे वडील गॅडला हेन्री गावाचे प्रमुख होते.‌ परंतु कालांतराने त्यांच्या वडिलांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला गेला आणि त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गावातून बाहेर काढण्यात आलं.

लहानपणापासूनच नेल्सन मंडेला यांच्यावर अत्याचार होत होता. या प्रसंगानंतर नेल्सन मंडेला यांचे संपूर्ण कुटुंब दक्षिण आफ्रिकेतील कुनू‌ या गावी स्थायिक झाले. नेल्सन यांचा लहानपणीच नाव रोहिलाला असं होतं. म्हणजेच मस्तीखोर. नेल्सन यांचा स्वभाव मस्तीखोर होता म्हणूनच त्यांना हे नाव पडलं होतं. नेल्सन बारा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांच आजारामुळे दुःखद निधन झालं.

त्यानंतर नेल्सन यांचा सांभाळ गावाचे प्रमुख जोगिनाताबा यांनी केला. क्लार्क बरी या इन्स्टिट्यूशन मधून नेल्सन मंडेला यांनी त्यांचे शिक्षण घेतलं. ब्रिटिशांचा‌ दक्षिण आफ्रिकेच्या जनतेवर वाढत जाणारा अत्याचार नेल्सन मंडेला यांना सहन होत नव्हता त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण हेल्थ डाऊन या विद्यापीठातून घेण्यास सुरुवात केली.

परंतु तिकडे जाऊन तरुण मुलांना ब्रिटिशांच्या वागणुकीबद्दल जाणीव करून दिली आपल्या मूलभूत हक्कांबाबत ते तरुणांना जागृत करू लागले, महाविद्यालयात असताना त्यांनी ब्रिटीश सरकार विरोधात भाषणे देण्यास सुरुवात केली. संपूर्ण दक्षिण आफ्रिके वरती ब्रिटिश सरकारचा ताबा होता. त्यामुळे महाविद्यालयातून नेल्सन मंडेला यांना ब्रिटिश सरकार विरुद्ध तरुणांना भडकवल्यामुळे बेदखल करण्यात आलं.

नेल्सन मंडेला यांचा खडतर प्रवास

नेल्सन मंडेला हे एका अशा देशांमध्ये राहत होते जिथे लोकांना त्यांच्या रंगावरून वागणूक दिली जायची. नेल्सन यांनी लहानपणापासूनच त्यांच्यावर होणारा अत्याचार बघितला होता शिवाय ब्रिटिश सरकार जनतेला जी वागणूक देत होती ती नेल्सन मंडेला यांना देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी जागृत करत होती.

संपूर्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिश सरकार चालायचं जरी दक्षिण आफ्रिकेत ८० टक्के रहिवासी मूळ कृष्णवर्णीय निवासी होते. कृष्णवर्णीय असल्यामुळे ब्रिटिश सरकार दक्षिण आफ्रिकेतील लोकांना अगदी हिन वागणूक देत होते.‌ म्हणूनच नेल्सन मंडेला यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.

नेल्सन यांना चांगलाच माहीत होतं की ब्रिटिश सरकारमुळे आपल्याला मूलभूत सोयी सुविधा देखील मिळत नाही आहेत. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नेल्सन मंडेला यांचे आदर्श होते.‌ ब्रिटिशांकडून कृष्णवर्णीय लोकांवर होणारे अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी Youth league तयार केली.

ज्या मधून त्यांनी इसवी सन ११९४ मध्ये ब्रिटिश सरकारच्या मालावर बहिष्कार टाकण्यासाठी संपूर्ण समाजाला प्रोत्साहित केले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष वॉल्टर सीसुल‌ यांच्याशी मंडेला यांचा परिचय झाला यांच्या कडून प्रेरित होऊन कृष्णवर्णीय लोकांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न नेल्सन मंडेला यांनी केला.

कृष्णवर्णीयांना त्यांच्या रंगामुळे मतदान करण्याचा हक्क नव्हता त्यामुळे प्रत्येक वेळी ब्रिटिश सरकार सत्तेवर यायचं आणि ते जनतेवर वेगवेगळे कठोर नियम कायदे लागू करायचे, जनतेला अगदी हीनतेची वागणूक मिळायची खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. आपल्या देशात चालणारा वर्णद्वेष वर्णभेद नेल्सन मंडेला यांना अजिबात मान्य नव्हता.

त्यामुळे त्यांना एक गोष्ट कळून चुकली होती ब्रिटिश सरकारशी चांगला वागून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणूनच नेल्सन मंडेला यांनी ब्रिटिश सरकारवर छिपे हल्ले, गोरिला वाॅरफेअर सुरु केले. ब्रिटिश सरकारने १९५० मध्ये सर्व कम्युनिस्ट पक्षांवर बंदी घालण्याचा कायदा काढला ज्यामध्ये सर्व कम्युनिस्ट लोकांना अटक केली जात होती.

यामध्ये नेल्सन मंडेला यांचा देखील सहभाग होता. नेल्सन मंडेला यांच्यावर देशद्रोही म्हणून तब्बल सहा वर्ष खटला सुरू होता. परंतु या काळामध्ये जनतेकडून नेल्सन मंडेला यांना भरपूर प्रतिसाद मिळाला. १९६२ साली नेल्सन मंडेला यांना वर्णद्वेष यासंबंधी त्यांच्या मोहिमेमुळे पाच वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.

नेल्सन मंडेला यांच्या ‌भाषणाचा प्रभाव दक्षिण आफ्रिकेच्या जनतेवर होऊ लागला होता. आता संपूर्ण जनता नेल्सन मंडेला यांना देवता म्हणायला लागली होती आणि हीच गोष्ट ब्रिटिश सरकारला खुपत होती. पुढे जाऊन नेल्सन मंडेला हे ब्रिटिश सरकार साठी धोका निर्माण करू शकतात या अनुषंगाने ब्रिटिश सरकारने नेल्सन मंडेला यांना १२ जून १९६४ रोजी हिंसा, देशद्रोही, ब्रिटीश सरकारविरुद्ध जनतेला भडकवण्यासाठी अटक करण्यात आली.

त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु संपूर्ण जनता नेल्सन मंडेला यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती हे बघून ब्रिटिश सरकारने ती शिक्षा पाठी घेतली. आणि त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. केपटाउन शहरातील रोबेन आयलँड येथे एका बंद खोलीत नेल्सन मंडेला यांना कैद करून ठेवण्यात आले.

तिकडे नेल्सन मंडेला यांना सोन्याच्या खाणीत कंबर मोडेस्त काम करावं लागायचं. एका बंद खोलीमध्ये त्यांना राहावं लागायचं जिथे अतिशय अस्वच्छता होती त्यांच्यावरती बरेच अत्याचार करण्यात आले त्यांना मारहाण देखील केली इतकं सगळं होऊन देखील नेल्सन मंडेला यांनी कधीच हार मानली नाही या काळामध्ये त्यांना क्षयरोगाने ग्रासले.

तब्बल १८ वर्ष नेल्सन मंडेला यांनी हा वनवास भोगला. इतकं सगळं होऊन देखील गोष्टी इथंवरच थांबल्या नाहीत तर कालांतराने त्यांचे स्थलांतर पोल्स मोवर प्रिजन याठिकाणी करण्यात आले. या अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये मंडेला यांनी भविष्यामध्ये ब्रिटीश सरकारविरुद्ध कोणती पावले उचलायची या सगळ्या गोष्टींचा विचार केला.

दुसरीकडे ब्रिटिश सरकार अतिशय कठोर नियम लादत होते. जनतेवर अत्याचार चालू होता आणि लोक देखील मंडेला यांना सोडण्याची मागणी करत होते. आंदोलन करत होती. या अठरा वर्षाच्या कारावासा मध्ये नेल्सन मंडेला यांना अजून दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली अशी एकूण २७ वर्ष नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेषाच्या मोहिमेसाठी अर्पण केली.

आपल्या देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ तुरुंगवासात घालवला. ११ फेब्रुवारी १९९० मध्ये नेल्सन मंडेला यांची सुटका करण्यात आली. नेल्सन मंडेला यांची ही सुटका आफ्रिकेचे नवीन पंतप्रधान फ्रेड्रिक विल्यम् दि क्लर्क यांनी केली. तेव्हा तुरुंगातून बाहेर आले त्याच वेळी लगेचच आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद त्यांच्या हाती दिलं.

आणि बघताक्षणी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षावर असलेला बंद देखील उठवला. आफ्रिकेतील लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्या संपूर्ण काळामध्ये आफ्रिकेतील लोकांना नेल्सन मंडेला यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव होती आणि त्याच मुळे वयाच्या ७७ व्या वर्षी १० मे १९९४ रोजी नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले.

आणि त्यावेळी त्यांनी ब्रिटिश सरकारने‌ सुरू केलेल्या कृष्णवर्णीय किंवा रंगभेद वर्णभेद या सर्व गोष्टी संपुष्टात आणल्या आणि नवीन कायदे नियम लागू केले ज्यामध्ये सर्वांना समान वागणूक मिळेल. नेल्सन मंडेला यांनी १९९३ मध्ये त्यांच्या देशासाठी दिलेल्या योगदानासाठी संपूर्ण जागतिक दृष्टीवर सर्वश्रेष्ठ मानला जाणारा “नोबेल पुरस्कार” त्यांना प्रदान करण्यात आला.

नेल्सन मंडेला हे महान व्यक्तिमत्व होतं अतिशय प्रेरणादायी. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतके खडतर प्रसंग अनुभवले पण हार कधीच मानले नाही या महान व्यक्तिमत्वाचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. जगातील सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे असे २४० पुरस्कार मंडेला यांना प्रदान करण्यात आले होते. त्यामध्ये भारतातील सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार देखील नेल्सन मंडेला यांना प्रदान करण्यात आला होता.

आम्ही दिलेल्या nelson mandela biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नेल्सन मंडेला माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nelson mandela information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of nelson mandela in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nelson mandela information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!