Newton Essay in Marathi आयझॅक न्यूटन मराठी निबंध विश्वामध्ये अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ जन्माला आले आणि त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये मोलाची भर घातली. वेगवेगळे शोध लावणे वेगवेगळे संशोधन करून संपूर्ण विश्वाला वैज्ञानिक जगाची ओळख करून दिली आणि वैज्ञानिक संशोधनामुळे होणाऱ्या फायद्याची देखील जाणीव करून दिली. याच महान शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे आपण आज आधुनिक जगामध्ये अगदी सुखात जीवन जगत आहोत आणि त्यासोबतच अजून प्रगती करू शकलो आहोत. जगातील सर्वात महत्वपूर्ण शोध म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे. पृथ्वीवर असणारी प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते.
आणि पृथ्वीच्या याच वस्तू आकर्षित करण्याच्या प्रक्रियेला गुरूत्वाकर्षण म्हटलं जातं. या आकर्षक बलाचा शोध घेऊन व अभ्यास करून सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम तयार केला. गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला. आयझॅक न्यूटन हे ब्रिटिश वैज्ञानिक होती.
आयझॅक न्यूटन मराठी निबंध – Newton Essay in Marathi
Essay on My Favourite Scientist Newton in Marathi
आयझॅक न्यूटन हे १७ व्या शतकातील एक प्रसिद्ध गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ व त्यासोबतच उत्तम लेखक देखील होते. सतराव्या शतकामध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली आणि त्यामध्ये लागलेला अतिशय महत्त्वपूर्ण शोध म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध. इंग्लंड येथील लिंकन शायर शहराच्या वुलस्टोप ऐका खेड्यामध्ये आयझॅक न्यूटन यांचा जन्म व ४ जानेवारी १९६३ मध्ये झाला. आपल्या शहरातील शाळेमध्ये आयझॅक न्यूटन यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
न्यूटन हे अभ्यासामध्ये अतिशय हुशार होते सोबतच ते मेहनती देखील होते. त्यांच्या घरची परिस्थिती थोडी हालाखीची होती म्हणूनच शिक्षण घेत असतानाच त्यांनी मिळेल ते काम करायला देखील सुरुवात केली होती. असं कष्टमय जीवन सर आयझॅक न्यूटन यांच्या वाटेला आलं. न्यूटन यांच्या आईला असं वाटायचं की न्यूटन यांनी एक शेतकरी व्हावं. म्हणूनच त्यांनी न्यूटन यांचे शैक्षणिक शिक्षण थांबवल आणि त्यांना शेती करण्यास सांगितले.
शिवाय सर आयझॅक न्यूटन जन्माला येण्याच्या दोन महिने आधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि सर आयझॅक न्यूटन यांच्या आईने न्यूटन यांना त्यांच्या आजीकडे पाठवलं पुढे न्यूटन यांच्या आज्जीने सर न्यूटन यांच पालन-पोषण केलं. त्यामुळे सर आयझॅक न्यूटन यांच सुरुवातीचे जीवन थोडं खडतर व अनेक प्रसंगांवर मात करण्यात गेलं. परंतु न्यूटन अभ्यासामध्ये हुशार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना अभ्यासाची आवड होती म्हणून त्यांनी आपलं राहिलेल शिक्षण पूर्ण केलं.
सर आयझॅक न्यूटन हे अभ्यासात उत्तम होते परंतु परिस्थिती हलाखीची असल्यामुळे वेगवेगळ्या शिक्षवृत्ती मिळवत त्यांनी आपलं एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. बीएची पदवी घेतली आणि त्यासोबतच पुढे त्यांनी १६६७ मध्ये मास्टर डिग्री देखील मिळवली. पुढे आयझॅक न्यूटन इतके यशस्वी झाले की ते सुप्रसिद्ध गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाऊ लागले. शिवाय सतराव्या शतकातील वैज्ञानिक क्रांतीतील ते शेवटचे शास्त्रज्ञ होते व त्यांचा वैज्ञानिक क्रांती मध्ये महत्त्वाचं योगदान देखील आहे.
आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण ही महत्त्वपूर्ण संकल्पणा संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवली संपूर्ण विश्वाला या महत्वपूर्ण शोधाची जाणीव करून दिली. गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकाकडे आकर्षिल जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्याच्या आधी देखील बऱ्याच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ही संकल्पना जगापुढे ठेवली होती. परंतु या संकल्पनेत काहींना काही कमतरता होती.
तिचं कमतरता सर आयझॅक न्यूटन यांनी भरून काढली सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण ही परिकल्पना जगासमोर मांडत गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रांमध्ये बसवण्यात सर आयझॅक न्यूटन यशस्वी ठरले. आणि ही गोष्ट करून दाखवणारे सर आयझॅक न्यूटन हे प्रथम शास्त्रज्ञ होते. दूरदूरवर ठेवलेल्या दोन गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षण का असतं याचं अचूक व योग्य उत्तर सर आयझॅक न्यूटन यांनी जगाला दिलं.
सर आयझॅक न्यूटन यांनी न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम जगासमोर ठेवला. गुरुत्वाकर्षण ही संकल्पना याआधी तिघे महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ, कोपर्निकस व केपलर या शास्त्रज्ञांनी देखील मांडली होती. परंतु योग्यरीत्या सत्यात उतरवणं फक्त सर आयझॅक न्यूटन यांनाच जमलं. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने अभ्यास केला होता. गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संघटित होऊन अखंड राहतात.
आणि ह्याच कारणामुळे ग्रह व तारे अशा दीर्घांकसारख्या स्थूल गोष्टी बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती व चंद्राची पृथ्वी भोवती अशा कक्षा सुद्धा गुरुत्वाकर्षणामुळे कायम असतात. इतकंच नव्हे तर आपल्या पृथ्वी वरील संवहन व भरती आहोटी व तारकांच्या आंतरिक भागातील उष्णते सारख्या घटना देखील गुरुत्वाकर्षणाशी जोडलेल्या असतात आणि यांचा गुरुत्वाकर्षणाशी खूप मोठा संबंध येतो. सर आयझॅक न्यूटन यांना विज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या शाखांमधील ज्ञान होतं.
शिवाय शाळेत असताना सर आयझॅक न्यूटन यांचा आवडता विषय गणित होता. गणितामधील सगळी प्रमये, सूत्रे त्यांना चांगलीच ठाऊक होती. याच क्षेत्रातून पुढे या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी आपलं भविष्य घडवलं. सर आयझॅक न्यूटन यांनी गणितज्ज्ञ म्हणून महान वैज्ञानिक पास्कल यांनी मांडलेल्या संकल्पनेच्या आधारावर सर्व कक्षा स्वरूपातील बायनॉमियल हा सिद्धांत मांडला.
या सिद्धांताच्या सहाय्याने सर आयझॅक न्यूटन यांनी दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग व घन आणि घातक यांचे मूल्य कसे काढता येईल हे या सिद्धांतामध्ये मांडलं होतं. गुरुत्वाकर्षणाचा शोध यासोबतच सर आयझॅक न्यूटन इतरही वेगवेगळे शोध लावले. सर आयझॅक न्यूटन यांनी द्रव्य स्थितीचा नियम असा शोध देखील लावला आहे. प्रकाश किरण हे सूक्ष्म कणांपासून तयार होत असतात असे प्रतिपादन सर आयझॅक न्यूटन यांनी केलं होतं.
यामुळे प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन असे दोन्ही स्पष्टीकरण मिळत. यासोबतच सर आयझॅक न्यूटन यांनी संवेग व कोनीय संवेग दोघांच्या संवर्धनाचे सिद्धार्थ यांत्रिकी क्षेत्रांमध्ये स्थापित केली. सर आयझॅक न्यूटन यांनी प्रथम पारदर्शक परावर्ती दुर्बीण तयार केली ही दुर्बीण न्यूटन यांनी प्रिझमच्या माध्यमातून तयार केली होती. या साहाय्याने न्यूटन यांनी रंगाचा सिद्धांत देखील मांडला. हा सिद्धांत सांगतो की एक प्रिझम प्रकाशाला अनेक रंगांमध्ये आच्छादून टाकतो.
उर्जा आणि उष्णता हे दोन्ही प्रकाशाचेच एक रूप आहे. सोळाव्या शतकामध्ये पृथ्वीचा आकार कसा आहे यावरून महान शास्त्रज्ञांनी आपली मते मांडली होती. काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचा आकार सपाट आहे परंतु सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीचा आकार हा मध्यभागी विषुववृत्तीय भागाजवळ थोडासा फुगीर आहे आणि दोन्ही ध्रुवा कडील भाग चपटा आहे. यासोबतच आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि गतीचा सिद्धांत यांचा शोध लावला आहे.
असे दोन महत्त्वपूर्ण शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावले ज्यामुळे विज्ञान क्षेत्राच्या क्रांतीमध्ये भर घातली गेली. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर असे अनेक सिद्धांत जगापुढे मांडले आहेत यातील बऱ्याच सिद्धांताच्या बळावर आज आपण अनेक शोध लावलेले. वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण ठरले व उपयोगाचे ठरले. प्रकाशित झालेली सर आयझॅक न्यूटन यांनी शोध लावलेली प्रसिद्ध शोध पत्रिका फिलोसोफी नेचुरेलीस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका या शोध पत्रिकेमध्ये गुरुत्वाकर्षण व गतीचे नियमन बद्दल व्याख्या केली आहे.
ही शोध पत्रिका अनेक भाषांमध्ये प्रसारित केली गेली. सर आयझॅक न्यूटन रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. शिवाय सर आयझॅक न्यूटन यांनी ब्रिटिश सरकार मध्ये वॉर्डन आणि रॉयल मिंट म्हणून सेवा दिली होती. सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेल्या शोधामुळे आज संपूर्ण जग वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीच्या दोन पाऊल पुढे गेलं आहेत सर आयझॅक न्यूटन हे आज असंख्य पिढीचे आदर्श आहेत तसेच आज जगातील महान शास्त्रज्ञांचे देखील ते आदर्श आहेत.
सर आयझॅक न्यूटन यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. न्यूटन यांनी लावलेले शोध जगासाठी महत्त्वपूर्ण ठरले आणि म्हणूनच इसवीसन सतराशे पाच मध्ये आयझॅक न्यूटन यांना सर ही पदवी देण्यात आली. सर आयझॅक न्यूटन यांच्या जीवनावर आधारित व त्यांनी लावलेल्या शोधावर आधारित अनेक लेखकांनी पुस्तके लिहली आहेत.
आम्ही दिलेल्या Newton Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आयझॅक न्यूटन मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite scientist newton in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि short essay on newton in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट