सर आयझॅक न्यूटन माहिती Sir Isaac newton Information In Marathi

Sir Isaac newton information in Marathi आयझॅक न्युटन यांची माहिती या शास्त्रज्ञाचे नाव घेतले कि डोळ्यासमोर येते सफरचंदाचे झाड कारण सफरचंदाच्या झाडाने गुरूत्वाकर्षनाचा शोध लावण्याची प्रेरणा न्युटन यांना दिली आणि म्हणूनच त्यांनी शोधून काढले कि कोणतीही वरती टाकलेली वस्तू खाली परत येते.

चला तर मग या महान शास्त्रज्ञाबद्दल जाणून घेवूया काही गोष्टी. आयझॅक न्युटन हे एक प्रसिध्द गणिततज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि एक चांगले लेखक होते तसेच हे १७ व्या शतकातील वैज्ञानीक क्रांतीतील शेवटचे शास्त्रज्ञ होते. आयझॅक न्युटन हे विशेषता एक प्रभावशाली शास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ म्हणून ओळखले जातात. न्युटन यांनी गतीशिलतेचे तीन नियम, सार्वभौमिक गुरुत्वाकर्षणाचा नियम तसेच आधुनिक भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्वे यासारखे अनेक शोध त्यांनी लावले आणि वैज्ञानीक क्षेत्रामध्ये मोलाचे काम केले.

sir-isaac-newton-information-in-marathi
Sir Isaac newton information in Marathi

सर आयझॅक न्यूटन माहिती – Sir Isaac newton Information In Marathi

आयझॅक न्युटन यांचा जन्म आणि त्यांची जीवनशैली 

आयझॅक न्युटन यांचा जन्म ४ जानेवारी १९४३ मध्ये इंग्लंड मधील लिंकनशायर शहरातील वूलस्टोर्प या खेड्या गावामध्ये झाला. आयझॅक न्युटन यांच्या वडिलांचे नाव इसहाक होते. वडिलांचा मृत्यू न्युटन यांच्या जन्माच्या ३ महिन्यानंतर झाले. वडिलांचा मूत्यू झाल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केले आणि त्यांना त्यांच्या आजीजवळ ठेवले.

नावआयझॅक न्युटन
जन्म४ जानेवारी १६४३
जन्मस्थानलिंकनशायर शहरातील वूलस्टोर्प गावामध्ये झाला
वडिलांचे नावइसहाक
आईचे नावहन्ना

आयझॅक न्युटन यांचे शिक्षण – Education Of Isaac Newton

आयझॅक न्युटन यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात लिंकनशायर शहरातील एका शाळेमध्ये केली. पण त्यांच्या आईने १२ वर्षाच्या वयात त्यांना शाळेतून काढून शेती पाहण्यासाठी सांगितले कारण त्यांच्या आईला आपला मुलगा एक प्रगतशील शेतकरी व्हावा असे वाटायचे पण न्युटन यांचे मन काय शेतीमध्ये रमले नाही त्यांनी आपले अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.

त्यांनी इंग्लंड ग्रंथम च्या किंग्ज शाळेमध्ये प्रवेश घेतला आपले शालेय शिक्षण पूर्ण केले वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी ट्रीनीटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. ११ व १२ बारावीचे शिक्षण हि पूर्ण केले आणि त्याच कॉलेज मधून बीए ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी १६६७ मध्ये मास्टर डिग्री हि मिळवली.(newton information in marathi)

आयझॅक न्युटन यांचे शोध – newton’s law in marathi

गुरुत्वाकर्षण नियम – gurutvakarshan information in marathi

आपण लहानपणा पासून शाळेमध्ये शिकत आलो आहे कि न्युटन हे शेतामध्ये एका सफरचंदाच्या झाडाखाली विश्रांती घेत होते आणि अचानक त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद पडले त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला कि हे सफरचंद खालीच का पडले ते वरती का नाही गेले आणि इथून गुरुत्वाकर्षणाच्या शोधाची सुरुवात झाली.

गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ?

न्युटन यांनी असे सांगितले आहे जेव्हा दोन वस्तूमधील किवा घटकामधील एकमेकाला आकर्षित करण्याचे बल म्हणजे गुरुत्वाकर्षण होय म्हणजेच पृथ्वीमध्ये वस्तूला आकर्षित करायचे बल असते, त्यामुळे कोणतीही वस्तू खाली पडते वरती नाही जात.

उदाहरण 

  • झाडावरची फळे, फुले आणि पाने जमिनिवरतीच पडतात.
  • तसेच आपण कोणतीही वस्तू हवेमध्ये सोडली तर ती जमिनीवरच पडते.

गुरुत्वाकर्षण सिद्धांत

न्युटन यांनी असे म्हंटले आहे कि एक वस्तू दुसऱ्या वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते.

हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असतो तर त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तनुपाती असतो.

आपण हे सूत्राच्या सहाय्याने समजून घेवूया,

f=(G〖 m〗_1 m_2)/d^2 

f = दोन वस्तुमधील आकर्षण बल.

G = गुरुत्वीय स्थिरांक.

m1 = पहिल्या वस्तूमधील वस्तुमान.

m2 = दुसऱ्या वस्तूमधील वस्तुमान.

d = दोन वस्तुमधील असणारे अंतर.

वस्तुमान आणि अंतर कसे ठरवतात ?

वस्तू जर गोलाकार असेल तर त्यामधील बल हे त्या वस्तूच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते तसेच त्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाची लांबी त्यामधील अंतर असते.

आयझॅक न्युटन यांचे गतीविषयक नियम – law of motion in marathi

आयझॅक न्युटन यांनी १६८६ मध्ये वस्तूंच्या गतीविषयी नियम बनवले आणि हे नियम खगोल शास्त्राचा मुलभूत पाया आहे. न्युटन यांनी गतीविषयक तीन नियम बनवले आहेत जे वस्तूची गती आणि त्यावर कार्य करणारी शक्ती यांच्यामधील संबध दर्शवितात. न्युटनचे गतीविषयक तीन नियम खाली दिले आहेत.

नियम पहिला 

न्युटनचा पहिला नियम असे सांगतो कि जर एखाद्या वस्तूवर कोणतीही बाह्य शक्ती किवा बल कार्यरत नसेल आणि वस्तू थांबलेली असेल किवा एका विशिष्ठ गतीने पुढे जात असेल आणि जोपर्यंत त्या वस्तूला कोणतेही बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू एका ठिकाणी स्थिर राहते किवा त्याच गतीने पुढे जात असते. तुम्ही जर त्याला बाह्य बल दिले तर त्या वस्तूचा वेग बदलतो.

नियम दुसरा 

न्युटनचा दुसरा नियम असे सांगतो कि संवेग परिवर्तन दर हा बलावर अधारित असतो जर संवेग परिवर्तन वाढले तर बलही वाढते आणि संवेग परिवर्तन कमी झाले तर बल हि कमी होते आणि संवेग परिवर्तन बाळाच्या दिशेने होते.

नियम तिसरा 

न्युटनचा तिसरा नियम असे सांगतो कि एखाद्या वस्तूला आपण बल लावले तर त्याच वेळी त्या वस्तूकडून आपल्यावरही तेवढेच बल कार्यरत होते पण ते विरुद्ध दिशेने होते.

न्युटनचा शीतलन नियम – newton’s law of cooling 

न्युटन यांच्या इतर शोधांपैकी हा एक शोध त्यांनी हा एक अविभाज्य सिद्धांत मांडला ज्यामध्ये गरम कॉफीचा कप कोणत्या दराने थंड होतो याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी शोधून काढलेल्या नियमामध्ये त्यांनी असे मांडले आहे कि शरीरात थंड होण्याचे प्रमाण हे शरीर आणि आसपासच्या तापमानाशी आधारित असते.

सूत्र : DT/dt = – k ( T – Ts )

T = शरीराचे तापमान दर्शवते.

DT/dt = वेळ व्युत्पन्न किवा साधित वेळ जे तापमानातील बदल दर्शवते.

Ts = आसपासचे तापमान

K = के हे स्थिर असते.

न्युटनचे परिवर्तीत दुर्बीण – reflecting telescope

“परावर्तित दुर्बिणी एक दुर्बिणी आहे जी एकल किंवा वक्र आरशांचे एकत्रीकरण आहे जे प्रकाश प्रतिबिंबित करतात आणि प्रतिमा बनवतात.”

ऑप्टिक्समधील त्याच्या तपासणीच्या काळात त्यांनी एक वैकल्पिक दुर्बिण विकसित केली तसेच त्यांनी प्रचलित अपवर्तन-आधारित दुर्बिणीमधील काही दोष शोधून काढून ते बाजूला केले म्हणून  आणि या दुर्बिणीला न्युटोनियम दुर्बीण म्हणतात. आयझॅक न्युटन यांनी अपवर्तक दुर्बिणीस पर्याय म्हणून १७ व्या शतकात प्रतिबिंबित करणाऱ्या दुर्बिणीचा शोध लावला.

न्युटन यांचा मृत्यु 

आयझॅक न्युटन यांचा मृत्यु २० मार्च १७२७ मध्ये झाला. हे १७ व्या शतकातील वैज्ञानीक क्रांतीतील शेवटचे शास्त्रज्ञ होते.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि सर आयझॅक न्युटन कोण होते त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. sir isaac newton information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच gurutvakarshan information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही आयझॅक न्युटन या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “सर आयझॅक न्यूटन माहिती Sir Isaac newton Information In Marathi”

  1. सर तुम्ही काही ठिकाणी बल लिहायचे तर बाल लिहीले आहे तर कृपया ही चुक आपण त्वरित दुरुस्त करा.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!