nitin tomar information in marathi नितिन तोमर माहिती, भारतामध्ये अनेक प्राचीन खेळ खेळले जातात आणि कब्बडी हा खेळ देखील त्यामधील आहे म्हणजेच हा खेळ चार हजार वर्षापसून भारतामध्ये खेळला जातो. पूर्वीच्या काळामध्ये हा खेळ खेडेगावांमध्ये मनोरंजनासाठी हा खेळ खेळला जायचा पण आता हा खेळ पूर्ण भारतभर खेळला जातो आणि या खेळाच्या राज्यस्तरीय आणि प्रो कबड्डी नावाच्या स्पर्धा हि आयोजित केल्या जातात. या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय प्रो कब्बडी स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू भाग घेतात.
आणि सध्या या खेळाची प्रसिध्दी इतकी वाढली आहे कि यामध्ये खेळणारे खेळाडू देखील तितकेच लोकप्रिय झाले आहेत आणि त्यामधील एक ‘नितीन तोमर’ हा खेळाडू आहे आणि आज आपण या लेखामध्ये नितीन तोमर या खेळाडू विषयी माहिती घेणार आहोत.
सध्या कब्बडी या खेळाचे खूप महत्व आणि प्रसिध्दी वाढली आहे आणि नितीन तोमर हा एक व्यवसायिक कबड्डी खेळाडू आहे. याने २०१६ मध्ये बेंगाल वॉरीयर्स (bengal warriors) या टीममधून प्रो कबड्डी या स्पर्धेमध्ये प्रदर्शन केले होते आणि पुढे त्याने पुणेरी पलटण (puneri paltan) या टीममधून आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या टीममधून प्रदर्शन केले.
नितिन तोमर माहिती – Nitin Tomar Information in Marathi
नाव | नितीन तोमर |
ओळख | कब्बडी खेळाडू |
जन्म | ३० एप्रिल १९९५ |
जन्म ठिकाण | मलकपूर, उत्तर प्रदेश, भारत. |
नितीन तोमर यांचे वैयक्तिक जीवन – personal information
नितीन तोमर याचा जन्म भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामधील मलकपूर या ठिकाणी ३० एप्रिल १९९५ मध्ये झाला आणि त्याचे सध्याचे वय २८ वर्ष (२०२३) आहे. नितीन तोमर हा एक मध्यम कुटुंबामध्ये जन्माला आला होता आणि त्याने त्याचे शालेय शिक्षण महर्षी दयानंद पब्लिक शाळेमधून केले.
आणि कॉलेजचे शिक्षण शामल स्मार्क इंटर कॉलेज बिजारोल या ठिकाणी केले. नितीन तोमर याने कब्बडी या खेळामध्ये करियर करण्याअगोदर त्याची निवड भारतीय नौदल आंग्रे गटामध्ये क्षुद्र अधिकारी म्हणून झाले होते.
पुढे त्याची निवड २०१७ साली कबड्डी विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय कबड्डी संघामध्ये झाली आणि सध्या हा खेळाड पुणेरी पलटण या टीममधून खेळत असून त्याला सर्वाधिक मानधन दिले जाते.
नितीन तोमरची कबड्डीमधील कामगिरी – career
- त्याच्या चांगल्या सरावामुळे २०१६ मध्ये त्याची कब्बडी विश्वचषक राष्ट्रीय संघामध्ये निवड आणि या स्पर्धेमध्ये भारतीय टीमने अंतिम फेरीमध्ये इराणचा पराभव करून देशासाठी सुवर्णपदक जिंकले.
- २०१७ तो परत कब्बडी विश्वचषक राष्ट्रीय संघामध्ये खेळला आणि परत या टीमने देशासाठी सुवर्णपदक मिळवली.
- प्रो कबड्डी या खेळामध्ये त्याने सीजन ३ मधून पदार्पण केले आणि पुढे ४ था सीजन पुणेरी पलटण आणि ५ वा सीजन यु. पी. योध्दा आणि पुढे पुन्हा त्याने ६ आणि ७ सीजन त्याने पुणेरी पलटण या संघामधून केले.
नितीन तोमर विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- नितीन तोमर हा कब्बडी खेळाडू असून हा एक चांगला रेडर आहे आणि यामुळे त्याला टीममध्ये खेळण्यासाठी चांगला परतावा दिला जातो.
- कुस्ती (wrestling) हा खेळ नितीन तोमरचा छंद आहे.
- नितीन तोमर या खेळाडूने प्रो कबड्डी या खेळामध्ये प्रो कबड्डी सीजन ३ पासून प्रवेश केला आहे.
- तोमर याच्या वडिलांचे नाव जितेंद्र तोमर असे आहे आणि त्याला एक बहिण (आरजू तोमर) आणि एक भाऊ (निखील तोमर) आहे.
- तो सर्वप्रथम प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी तो बंगाल वॉरीयर्स मधून खेळला होता आणि तो प्रो कब्बडीचा ३ रा सीजन होता आणि पुढे त्याने ४ था सीजन पुणेरी पलटण या टीममधून खेळला होता आणि ५ वा सीजन यु. पी. योध्दा या टीममधून आणि ६ वा आणि ७ वा सीजन पुणेरी पलटण या टीममधून खेळला होता.
- जे उदय सिंग हे त्याचे कबड्डी प्रशिक्षण होते आणि त्याने कबड्डी खेळाचे शिक्षण त्यांच्याकडून घेतले.
- नितीन तोमर याच्या जर्सीचा क्रमांक #७७ हा आहे.
- नितीन तोमर याने सीजन ६ हा पुणेरी पलटण या टीममधून खेळला होता आणि या टीमने त्याला खेळण्यासाठी १.१५ कोटी रुपये दिले होते.
- ४ थ्या सीजन मध्ये यु. पी. योध्दा या टीमने ९० ते ९३ लाख रुपयाला विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू आहे.
- त्याच्या प्रो कबड्डीच्या पाच हंगामध्ये त्याने ४४२ रेड पॉंइंट बनवले आहेत आणि २५ टॅकल पॉंइंट्स केले आहेत.
- नितीन तोमर याने २०१६ आणि २०१७ मध्ये कबड्डी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
- नितीन तोमर हे कुस्तीपटू कुटुंबामध्ये जन्माला आले होते आणि कुटुंबामध्ये खेळाचा वारसा असल्यामुळे त्याने सर्वप्रथम कुस्तीचा सराव करत होते आणि त्यांना कुस्तीमधेच करियर करायचे होते पण तो कब्बडी हा खेळ देखील छंद म्हणून खेळत होता आणि या खेळातील चांगल्या कामगिरीमुळे त्याने कबड्डी खेळावर लक्ष केंद्रित केले.
- नितीन तोमर या कबड्डी खेळाडूला खेळ विषयक चित्रपट पाहायला मिळतात.
पुरस्कार – awards
- नितीन तोमर याने २०१६ आणि २०१७ मध्ये विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
- त्याला २०१९ मध्ये लक्ष्मण पुरस्कार मिळाला होता.
आम्ही दिलेल्या nitin tomar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नितिन तोमर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nitin tomar wikipedia in marathi या nitin tomar information in Marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nitin tomar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट