एनएमएमएस परिक्षा म्हणजे काय? NMMS Full Form in Marathi

nmms full form in marathi – nmms exam information in marathi एन एम एम एस परिक्षा काय असते ? आज आपण या लेखामध्ये एनएमएमएस (NMMS) याचे पूर्ण स्वरूप पाहणार आहोत तसेच एनएमएमएस (NMMS) काय आहे या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. एनएमएमएस (NMMS) चे पूर्ण रूप म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (national means cum merit scholarship) असे आहे. एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप हि एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी इयत्ता ८ वी नंतर पात्र विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाते.

या योजनेच्या अंतर्गत बरेच विद्यार्थी या प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि त्यामधील पात्र विद्यार्थ्यांना वर्षाला १२००० रुपये पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळतात. नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिपने मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम केले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अधिकार प्रदान करणे हे या योजने मार्फत सरकारचे उद्दिष्ट आहे.

वर सांगितल्याप्रमाणे दरवर्षी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याला रू. १२००० शिष्यवृत्ती मिळते म्हणजेच त्या संबधित विद्यार्थ्याला दर महिन्याला १००० रुपये शिक्षण खर्चाला मिळतात आणि हा विद्यार्थी आपले ९ पासून १२ पर्यंतचे शिक्षण अगदी सहजपणे पार पडू शकतो पण जो व्यक्ती शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज करत आहे त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख ५० हजार पेक्षा कमी असावे. एनएमएमएस (NMMS) परीक्षेची पात्रता सर्व राज्यांसाठी समान आहे. याशिवाय, प्रत्येक राज्यासाठी प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात.

nmms full form in marathi
nmms full form in marathi

एनएमएमएस परिक्षा म्हणजे नेमक काय – NMMS Full Form in Marathi

एनएमएमएस (NMMS) चे पूर्ण स्वरूपनॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (national means cum merit scholarship)
प्रकारपरीक्षा
पात्र विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीदरवर्षी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याला रू. १२००० शिष्यवृत्ती मिळते.
परीक्षा पातळीराज्य
परीक्षेची वारंवारतावर्षातून एकदा
परीक्षेचा कालावधी९० मिनिटे

एनएमएमएस म्हणजे काय – nmms exam information in marathi

  • एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप हि एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी इयत्ता ८ वी नंतर पात्र विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाते. या योजनेच्या अंतर्गत बरेच विद्यार्थी या प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि त्यामधील पात्र विद्यार्थ्यांना वर्षाला १२००० रुपये पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळतात.
  • काही विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या हलाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण मधेच सोडतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून बालकामगार बनून काम करतात आणि सरकारने हेच लक्षात घेवून त्यांना बाल्काम्गार्र बनवण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना पुढील अभ्यास चांगला करता येण्यासाठी एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप हि शिष्यवृत्ती सुरु केली.
  • आणि या शिष्यवृत्ती मार्फत त्या संबधित विद्यार्थ्याला वर्षाला १२००० रुपये शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते आणि हि शिष्यवृत्ती ९ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी मिळते.

एनएमएमएस पूर्ण स्वरूप – nmms long form in marathi

हि एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी इयत्ता ८ वी नंतर पात्र विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाते. एनएमएमएस (NMMS) चे पूर्ण रूप म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ( national means cum merit scholarship ) असे आहे.

एनएमएमएस पात्रता निकष – eiligibility 

एनएमएमएस (NMMS) हि एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे आणि हि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी संबधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात. जर एखादा विद्यार्थी खाली दिलेल्या एका जरी पात्रता निकषासाठीपात्र ठरला नाही तर तो एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्तीसाठी देखील पात्र ठरू शकत नाही. चला तर मग एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकष काय आहेत ते पाहूया.

  • शिष्यवृत्ती घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याची इयत्ता ८ वी चे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे.
  • एससी / एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५% गुणांची सूट देण्यात आली आहे.
  • शिष्यवृत्ती साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला इयत्ता ८ वी मध्ये त्यांना किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे जेणेकरून ते नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप अर्ज करू शकतील.
  • काही वेळेला इयत्ता ७ वी मध्ये ५५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी देखील निवड चाचणीत बसू शकतात.
  • त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख ५० हजार पेक्षा कमी असावे.
  • निवड प्रक्रिया राज्य स्तरावर केंद्र सरकारच्या एजन्सीद्वारे केली जाते.
  • शिष्यवृत्ती सुरू ठेवण्यासाठी त्या विद्यार्थ्‍यांनी इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेमध्ये ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजेत.
  • विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण आवश्यकतेनुसार सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळांमधून घेणे आवश्यक आहे.
  • इयत्ता १२ वी शिष्यवृत्तीसाठी, विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह ११ वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि हे पहिल्या प्रयत्नात केले पाहिजे.
  • केव्हीएस ( KVS ) सैनिक शाळा आणि इतर खाजगी शाळांमधील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • अर्जदारांनी वर्गातही नियमित असणे आवश्यक आहे.
  • कार्यक्रमांतर्गत केलेले आरक्षण पूर्णपणे राज्य सरकारच्या नियमांवर आधारित आहे.

एनएमएमएस शिष्यवृत्ती ऑनलाइन अर्ज – How to apply online for NMMS 

  • प्रथम, अर्जदाराने राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या अधिकृत लिंकला भेट देणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नवीन नोंदणी दुव्यावर जावे लागेल.
  • आता, आपण पाहू शकता, आपल्या सिस्टमवर एक नवीन पृष्ठ उघडलेले असेल.
  • आता तुम्ही नवीन वापरकर्ता वर क्लिक करा आणि त्या ठिकाणी नोंदणीचा ​​पर्यायही दिलेला असेल.
  • त्यानंतर टिक मार्कसाठी दिलेला पर्याय निवडा आणि सर्व सूचना वाचा आणि मग कंटिन्यू वर क्लिक करून काही क्षण थांबा.
  • यानंतर पुन्हा नवीन फॉर्मसह एक नवीन पृष्ठ दिसेल.
  • या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करा.
  • शेवटी लॉगिन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
  • आता, वेब पोर्टलवर नोंदणी करताना या दिलेल्या युजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करा.
  • आणि तुमच्या गरजेनुसार एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत अर्ज करा.

एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे – documents 

आता खाली आपण एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती साठी आवश्यक असणारी कागदपत्रे काय काय आहेत ते पाहूयात.

  • विद्यार्थ्याच्या वयाचा पुरावा.
  • बँक खाते तपशील.
  • शैक्षणिक कागदपत्रे.
  • ८ वी ची गुणपत्रिका.
  • अधार कार्ड.
  • शाळेकडून बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र.
  • अधिवासी किंवा कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा.

आम्ही दिलेल्या nmms full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एनएमएमएस परिक्षा म्हणजे नेमक काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या NMMS meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि nmms exam information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!