nss information in marathi राष्ट्रीय सेवा योजना माहिती, एनएसएस (NSS) हि एक सेवा योजना आहे. ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडवण्यासाठी या योजनेद्वारे शिक्षण दिली जाते आणि आज आपण या लेखामध्ये एनएसएस विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. एनएसएस म्हणजेच याचे पूर्ण स्वरूप नॅशनल सर्विस स्कीम (national service scheme) असे आहे आणि याला मराठीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना असे म्हणतात आणि या योजनेची सुरुवात डॉ. व्ही. के. आर. व्ही राव यांनी २४ सप्टेंबर १९६९ मध्ये सुरु केली.
आणि हि योजना सुरु करण्याचा मुख्य हेतू हा भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेतील उपक्रमांना एक चांगली जोड देऊन त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडवण्यासाठी या योजनेद्वारे शिक्षण दिले जात होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) मुख्य उदिष्ट म्हणजे विद्यार्थ्याना समाजसेवेद्वारे शिक्षण देणे आणि शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्याकडून समुदाय सेवा करून घेणे.
या योजनेमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेची जाणीव होऊन त्यांना समाजाविषयाचे आपले कर्तव्य काय आहे ते समजू लागले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिक हे ओडीशातील कोणार्क या ठिकाणी असणाऱ्या सूर्य मंदिरामध्ये असणाऱ्या रथ चाकावर आधारित आहे.
आणि यामध्ये निळा आणि लाल रंग आहे आणि त्यामधील निळा रंग हा हे सांगतो कि एनएसएस हे मानवजातीच्या कल्याणासाठी आपला वाटा उचलेले आणि आणि लाल रंग सांगतो कि एनएसएस चे स्वयंसेवक हे उत्साही, चैतन्यशील आणि सक्रीय आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना माहिती – NSS Information in Marathi
संघटने नाव | एनएसएस |
पूर्ण स्वरूप – NSS Full Form in Marathi | नॅशनल सर्विस स्कीम (National Service Scheme) |
मराठी नाव | राष्ट्रीय सेवा योजना |
स्थापना | २४ सप्टेंबर १९६९ |
संस्थापक | डॉ.व्ही.के.आर.व्ही राव |
मुख्यालय | नवी दिल्ली |
राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम – activities
राष्ट्रीय सेवा योजना हि एक सेवा योजना आहे आणि यामध्ये विद्यर्थ्यांना समाजसेवेद्वारे शिक्षण दिले जाते आणि या शिक्षणाच्याद्वारे विद्यार्थ्यांच्याकडून समुदाय सेवा करून घेतली जाते. या योजनेमार्फत अनेक प्रकारचे उपक्रम केले जातात त्यामधील काही मुख्य उपक्रम खाली पाहूया.
- राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जातो.
- त्याचबरोबर रक्तदान शिबीर राबवली जातात.
- काही वेळा काही ठिकाणी आपत्ती जनक परिस्थिती निर्माण होते आणि त्यावली त्या ठिकाणी अनेक लोक त्यामध्ये अडकलेल असतात त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील या संघटनेचे सदस्य सहभागी होतात.
- तसेच या योजनेद्वारे अनेक असे साहसी कार्यक्रम सुध्दा राबवले जातात.
- या संघटने मार्फत राष्ट्रीय एकात्मता शिबीर देखील राबवली जातात.
- लसीकरण आणि श्रमदान असे अनेक उपक्रम हे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबवले जातात.
राष्ट्रीय सेवा योजनेची उदिष्ठ्ये आणि हेतू – objectives
कोणतीही संस्था सुरु करताना ती संस्था सामोर काही तारू उद्देश ठेऊन स्थापन केली जाते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात करताना देखील समोर काही उद्देश आणि हेतू समोर ठेवले होते.
- राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) मुख्य उदिष्ट म्हणजे विद्यार्थ्याना समाजसेवेद्वारे शिक्षण देणे आणि शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्याकडून समुदाय सेवा करून घेणे.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये नागरी आणि सामाजिक जबाबदरी विकसित होण्यास मदत झाली.
- त्याचबरोबर व्यवहारिक उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा उपयोग करण्यास मदत झाली.
- राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये नेतृत्वगुण तर निर्माण झालेच परंतु त्यांच्यामध्ये लोकशाहीची वृत्ती देखील निर्माण होण्यास मदत होते.
- त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांना मदत करण्याची आणि आपत्ती हाताळण्याची क्षमता मिळते.
- विद्यार्थ्यांच्यामध्ये लोकांना मदत करण्याची भावना निर्माण होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेची जाणीव होऊन त्यांना समाजाविषयाचे आपले कर्तव्य काय आहे ते समजू शकते.
राष्ट्रीय सेवा योजनेची महत्वाची माहिती – information about nss in marathi
- या योजनेची सुरुवात डॉ.व्ही.के.आर. व्ही राव यांनी २४ सप्टेंबर १९६९ मध्ये सुरु केली .
- राष्ट्रीय सेवा योजना ( एनएसएस ) या संघटनेचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
- या योजनेचे प्रतिक हे निळ्या आणि लाल रंगाचे आहे आणि यामध्ये निळा रंग दर्शवतो कि एनएसएस हे मानवजातीच्या कल्याणासाठी आपला वाटा उचलेले आणि आणि लाल रंग सांगतो कि एनएसएस चे स्वयंसेवक हे उत्साही, चैतन्यशील आणि सक्रीय आहेत.
- एनएसएस मुलांना त्यांचे समाजिक कर्तव्य काय आहे ते समजू लागले.
राष्ट्रीय सेवा योजनेची प्रशासकीय रचना – structure
राष्ट्रीय सेवा योजनेची प्रशासकीय योजना हि वेगवेगळ्या स्थरावर वेगवेगळ्या प्रकारे असते. खाली आपण या योजनेचे वेगवेगळे प्रशासकीय स्तर पाहणार आहोत.
- प्रादेशिक स्तर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठे आणि राज्य सरकारच्या मदतीने भारतामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची अनेक प्रादेशिक केंद्रे स्थापन केली आहेत. प्रादेशिक क्षेत्राचे प्रमुख हे सहाय्यक कार्यक्रम सल्लागार किंवा कार्यक्रम सल्लागार म्हणून काम करतात.
- महाविद्यालयीन आणि शालेय स्तर : यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार या एनएसएस संस्थाना युनिटची नियुक्ती करण्यात आलेली असते आणि या एनएसएसच्या युनिटमध्ये एकूण १०० विद्यर्थी असतात आणि या युनिटचा प्रभारी व्यक्ती हा युनिसाठी आणि संघटनेच्या कार्यक्रमांच्यासाठी जबादार असतो.
- विद्यापीठ स्तरावर : जर एखाद्या विद्यापीठामध्ये १०००० पेक्षा धअधिक संख्या असेल तर त्या विद्यापीठामध्ये संघटनेचे पूर्णवेळ कार्यक्रम राबवले जातात आणि जर १०००० पेक्षा कमी असेल तर अर्धवेळ कार्यक्रम राबवले जातात.
आम्ही दिलेल्या nss information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रीय सेवा योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nss all information in marathi या nss camp information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nss in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nss full form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट