एनटी स्कॅन माहिती NT Scan Sonography Information in Marathi

nt scan sonography information in marathi एनटी स्कॅन माहिती, सोनोग्राफी हि एक निदानात्मक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी शरीरातील अवयव, ऊती किंवा रक्त प्रवाहाच्या गतिशील दृष्य प्रतिमा तयार करण्यासाठी उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी वापरते. या प्रक्रियेमध्ये ट्रान्सड्यूसर नावाचे एक लहान आकाराचे उपकरण असते जे रुग्णाच्या शरीराच्या भागावर ठेवले जाते जेणे करून त्या भागाची प्रतिमा घेता येईल आणि मग संगणक अल्ट्रासाऊंड लहरींचे रुपांतर प्रतिमेमध्ये करतात. 

एनटी स्कॅन सोनोग्राफी (nt scan sonography) हा एक त्यामधील प्रकार आहे आणि आज आपण या लेखामध्ये एनटी स्कॅन सोनोग्राफी विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.एनटी स्कॅन सोनोग्राफी हे नुकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन हे अल्ट्रासाऊंड स्कॅन आहे.

जे बाळाचे नुकल ट्रान्सलुसेन्सीचे म्हणजेच बाळाच्या मानेमागील द्रवाने भरलेली जागेचे मापन करते आणि या प्रकारचे मापन हे क्रोमोसोमल विकृती आणि बाळाला डाऊन सिंड्रोम असण्याच्या शक्यता आहे कि नाही याचा अंदाज घेण्यासाठी केला जातो आणि ज्यावेळी गर्भवती स्त्रीचे वय जितके जास्त असले तितके त्या संबधित बाळाला क्रोमोसोमल विकृती होण्याची शक्यता असते.

आणि त्यामुळे अश्या प्रकरणांमध्ये बाळाला कोणत्याही प्रकारची विकृती नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी एनटी स्कॅन सोनोग्राफी केली जाते. चला तर खाली आपण एनटी स्कॅन सोनोग्राफी विषयी सविस्तर माहिती घेवूया.

nt scan sonography information in marathi
nt scan sonography information in marathi

एनटी स्कॅन माहिती – NT Scan Sonography Information in Marathi

एनटी स्कॅन सोनोग्राफी म्हणजे काय – nt scan meaning in marathi

  • एनटी स्कॅन सोनोग्राफी हि वर सांगितल्याप्रमाणे बाळाच्या मानेमागील द्रवाने भरलेली जागेचे मापन करण्यासाठी वापरलेली एक प्रक्रिया आहे आणि प्रक्रिया करण्यापाठीमागाचे कारण म्हणजेच बाळाला क्रोमोसोमल विकृती आणि डाऊन सिंड्रोम असण्याच्या शक्यता आहे, कि नाही याचा अंदाज घेण्यासाठी आणि जर असल्यास त्यावर लगेच उपचार करण्यासाठी केला जातो
  • हे जर गरज असेल तर बाळाच्या जन्मानंतर ११ ते १४ आठवड्यांच्या दरम्याने केली जाते आणि हे बाळाच्या मानेमागील द्रवपदार्थांची पारदर्शकता किंवा जाडी मोजण्यासाठी केले जाते आणि या स्कॅनची अचूकता हि ७० ते ७५ टक्के इतकी असते.
  • सोनोग्राफी प्रक्रियेला अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राम म्हणून देखील ओळखले जाते. सोनोग्राफी हि एक नॉन इनव्हेनसीव्ह इमेजिंग चाचणी आहे आणि अल्ट्रासाऊंड चित्राला सोनोग्राम म्हणतात.

एनटी स्कॅन सोनोग्राफी कोण करते ?

सोनोग्राफर हा एक अत्यंत कुशल व्यावसायिक आहे जो मानवी शरीराच्या आतील रचनांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी विशेष उपकरणे वापरण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते ज्याचा वापर वैद्यकीय निदान करण्यासाठी डॉक्टर करतात. सोनोग्राफर एनटी स्कॅन सोनोग्राफी करू शकतात त्याचबरोबर आरोग्य व्यावसायिक आणि त्या संबधित प्रशिक्षण असलेला डॉक्टर देखील ही काम करू शकतो.

एनटी स्कॅन सोनोग्राफी विषयी महत्वाची माहिती – nt scan in pregnancy in marathi

  • गर्भधारणेच्या काळामध्ये त्या संबधित महिलेने पहिल्या तीन महिन्यामध्ये एनटी स्कॅन सोनोग्राफी करून घेतली पाहिजे.
  • एनटी स्कॅन सोनोग्राफी हा जन्मपूर्व चाचणीचा एक भाग आहे जो बाळाच्या आरोग्याविषयी निदान करण्यासाठी डॉक्टरांना मदत करतो.
  • जर गर्भाच्या मानेच्या मागे जर द्रव किंवा मोकळी जागा असणे हे सामान्य नाही परंतु जर बाळाच्या मानेच्या पाठीमागे जास्त मोकळी जागा असेल तर डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता असते.
  • स्क्रीनिंगच्या दरम्यान डॉक्टर किंवा तंत्रज्ञ पोटाचा अल्ट्रासाऊंड घेतात.
  • एनटी स्कॅन सोनोग्राफी हे डाऊन सिंड्रोम किंवा कोणत्याही इतर गुणसूत्र विकृतीचे निदान करू शकत नाही आणि हि चाचणी केवळ भविष्यातील जोखिमांचा अंदाज लावण्यासाठी वापरली जाते.
  • एनटी स्कॅन सोनोग्राफी या प्रक्रियेचा वापर हा सामान्यता गर्भाच्या विकासाची तपासणी करण्यासाठी केला जातो. यामुळे गर्भाचे स्थान, वय आणि संख्या आणि संभाव्य जन्मदोषाचे देखील निदान करू शकते. या ध्वनी लहरी रक्त किंवा द्रव प्रवाहाच्या प्रतिमा देखील तयर करू शकतात.  
  • एनटी स्कॅन सोनोग्राफी हि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २० ते ४० मिनिटे लागतात आणि हे करण्याअगोदर त्या संबधित व्यक्तीला डॉक्टरांच्या काही सूचना पाळाव्या लागतात.
  • एनटी स्कॅन सोनोग्राफी हे जर गर्भधारणेच्या ११ व्या आठवड्यामध्ये केले तर नुकल पारदर्शक मोजमाप हे २.१ मिमी इतके असते.

एनटी स्कॅन सोनोग्राफीमध्ये निदान केले जाणारे रोग / धोके  ?

अल्ट्रासाऊंड एनटी स्कॅनबाळाच्या मानेमागील द्रवाचे प्रमाण मोजण्यासाठी केले आणि जर बाळाच्या मानेपाठीमागे जास्त प्रमाणात द्रव असेल तर त्याला खाली अनुवांशिक धोक्यांची संभावना असते.

  • डाऊन सिंड्रोम.
  • पटौ सिंड्रोम.
  • टर्नर सिंड्रोम.
  • जन्मजात सिंड्रोम.
  • एडवर्डस सिंड्रोम.

अल्ट्रासाऊंड एनटी स्कॅन का केले जाते ?

अल्ट्रासाऊंड एनटी स्कॅनबाळाच्या मानेमागील द्रवाने भरलेली जागेचे मापन करण्यासाठी तर केले जाते परंतु हे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे निदान करण्यासाठी केले जाते.

  • अल्ट्रासाऊंड एनटी स्कॅन हे एकाधिक गर्भधारणेचे निदान करण्यासाठी केले जाते.
  • गर्भधारणेची अचूक तारीख निश्चित करण्यासाठी देखील अल्ट्रासाऊंड एनटी स्कॅनचा वापर केला जातो.
  • जन्मजात हृदयरोग हा एक अनुवांशिक दोष आहे ज्यामध्ये गर्भधारणेच्या काळात मुलाचे हृदय योग्यरीत्या तयार होत नाही आणि त्यावेळी याचे निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • जन्मजात डायाफ्रामॅटिक हर्नियेशनचे निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो.

एनटी स्कॅन सोनोग्राफी करण्यासाठी येणारा खर्च ?

एनटी स्कॅन सोनोग्राफी करण्यासाठी येणारा खर्च हा त्या स्कॅन केंद्रावर आणि शहरावर अवलंबून असतो आणि सामान्यपणे एनटी स्कॅन सोनोग्राफी करण्यासाठी १५०० ते २५०० पर्यंत खर्च येवू शकतो.

आम्ही दिलेल्या nt scan sonography information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एनटी स्कॅन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nt scan meaning in marathi या nt scan in pregnancy in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nt scan sonography in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nt scan information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!