Old Age Home Essay in Marathi वृद्धाश्रम मराठी निबंध आयुष्यामध्ये जीवनचक्रातील बालपण व म्हातारपण हे दोन टप्पे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. ज्याप्रमाणे एखाद्या लहान बाळाचं आपल्याला व्यवस्थित संगोपन कराव लागत, त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते त्याच प्रमाणे आपल्याला वृद्ध लोकांना देखील तितकंच जपावं लागतं. त्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागते, त्यांना वेळेवर जेवण देणे, त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे व त्यांना कधीही एकटेपणाची भावना जाणवून न देता नेहमी त्यांच्या सोबत राहणे त्यांचं मनोरंजन करत राहणे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात.
वृद्ध वयातील लोकांचे म्हातारपणामध्ये आयुष्याचे काही मोजके व शेवटचे दिवस राहिलेले असतात आणि ह्या दिवसांमध्ये त्यांची आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढू लागते. त्यांना नेहमी असं वाटतं की आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यातील त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्यासोबत आनंदाने घालवावेत, त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, त्यांना योग्य तो वेळ द्यावा, अशा काही अपेक्षा वृद्ध लोकांच्या त्यांच्या मुलांकडून असतात. परंतु हल्लीच जग फार बदललेलं आहे.
वृद्धाश्रम मराठी निबंध – Old Age Home Essay in Marathi
Essay on Old Age Home in Marathi
पूर्वी वडीलधार्या माणसां समोर तोंडातून ‘अ’ काढायची देखील हिंमत व्हायची नाही तर, हल्ली बरीच मुलं मुली आपल्या आई-वडिलांना उलट बोलतात, त्यांचा अपमान करतात. आपण त्यांना बोललेले वाईट शब्द तर विसरून जातो परंतु हे शब्द त्यांच्या मनामध्ये कायम घर करून बसतात. आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. पूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला जायचा वडीलधाऱ्यांना मान दिला जायचा त्यांचा निर्णय अंतिम असायचा परंतु आता यातलं काहीच शिल्लक राहिलेल नाही आहे. शिवाय पूर्वी संयुक्त घराची पद्धत होती तर आता विभक्त घराची पद्धत झाली आहे.
प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आणि छोटसं घर हवं आहे आणि ह्या छोट्याशा घराच्या कल्पने मध्ये बहुतांश लोक आपल्या आई-वडिलांचा समावेश करायला विसरतात. आणि म्हणूनच वृद्ध झालेल्या आई-वडिलांकडे फक्त एकच मार्ग उरतो तो म्हणजे वृद्धाश्रम. आई-वडिलांच्या आपल्या मुलांकडून फार अपेक्षा असतात आणि याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये मुलांची चिडचिड होते आणि त्यांचं जगणं अतिशय अवघड होत जातं आणि म्हणूनच ते आपल्या आयुष्यातील अपयशाला आई-वडिलांना जबाबदार ठरवतात. पूर्वी आई-वडिलांचे आशीर्वाद हे सर्वश्रेष्ठ मानले जायचे परंतु हल्ली बदलत्या काळाबरोबर समाजामध्ये अनेक बदल घडले आणि माणसांच्या भावना देखील बदलल्या.
हल्ली नोकरी व घर अशा दुहेरी जबाबदारी मुळे दडपणात आलेले व ताण तणाव आणि ग्रासलेले तरुण बहुतेकदा आपल्या आई-वडिलांना वेळ देण्यास विसरतात आणि त्यामुळे वृद्धांच्या मनामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते त्यांना असं वाटू लागतं की ते निरुपयोगी आहेत. म्हातारपणामुळे वृद्ध लोकांकडे काम करण्याचा पर्याय देखील नसतो त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक स्वातंत्र्यता नसते. रोजच्या दोन घासासाठी आणि औषध पानाच्या खर्चासाठी त्यांना आपल्या मुलांवर अवलंबून राहावं लागतं. आणि अशा वेळेला बरेच वृद्ध लोक वृद्धाश्रमाचा मार्ग निवडतात. वृद्धाश्रम म्हणजे एक असं ठिकाण जे फक्त वृद्ध लोकांसाठी बांधलं गेलं जातं.
हे एका प्रकारचे घरच असतं इथे वृद्धांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. अतिशय स्वच्छता असते तसेच, त्यांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली जाते. शिवाय वृद्धाश्रमांमध्ये वृद्ध लोक त्यांच्या वयाच्या लोकांसोबत बसून त्यांच्याशी बोलू शकतात, त्यांच्याशी गप्पा मारू शकतात, आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकतात, खेळ खेळू शकतात आणि सुखाची व दुःखाची देवाणघेवाण करू शकतात. वृद्धाश्रमांमध्ये येणारी प्रत्येक वृद्ध व्यक्ती आपल्या मनापासून कधीच वृद्धाश्रमाचा मार्ग निवडत नाही परंतु काही कारणास्तव त्यांना हा मार्ग निवडावा लागतो तर काही लोक स्वतःहून वृद्धाश्रमात येतात तर काहींचे मुलंच आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमांमध्ये पाठवतात.
काळ बदलला समाज बदलला आणि त्यासोबतच लोकांची विचारसरणी देखील बदलली. आधी आपले व आदरणीय वाटणारे आई-वडील आता ओझं वाटू लागले आहेत. म्हातारपणामध्ये वृद्ध लोकांची अतिशय काळजी घ्यावी लागते आणि काही तरुण लोकांना त्यांचे आईवडील त्यांच्या डोक्याला ताप किंवा कटकट होऊन बसतात आणि म्हणूनच असे तरुण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमांमध्ये पाठवतात.
परंतु ज्या आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्या साठी खस्ता खाल्ल्या आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याचं सर्व श्रेय आपल्या आई-वडिलांना जातं हे लक्षात घेऊन त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नये. तर त्यांच्या म्हातारपणातील त्यांचे हे दिवस अधिक अविस्मरणीय बनवा, त्यांच्यासोबत वेळ वाया घालवा, त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, त्यांना योग्य तो आहार द्या म्हणजे त्यांना वृद्धाश्रमाचा मार्ग निवडायची वेळ येणार नाही. असं म्हणतात “स्वामी तिन्ही जगाचा पण आईविना भिकारी”.
आयुष्यामध्ये आपल्याकडे पैसे, बंगला, गाडी, मालमत्ता, जमीन अशा सगळ्या गोष्टी येतील परंतु आपले आई-वडील आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाहीत. ज्या आई-वडिलांनी चंदनाची काया झीजवून आपल्या डोक्यावर सुखाचा छप्पर दिलं त्या आई-वडिलांना आपण वृद्धाश्रमांमध्ये कसं काय पाठवू शकतो? आई-वडिलांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय. म्हणूनच जोपर्यंत आपले आई-वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या अस्तित्वाची व त्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांची योग्य ती काळजी आणि सेवा करणं गरजेचे आहे.
सरकारने वृद्ध वर्गासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या आहेत परंतु सरकारने प्रत्येक शहरांमध्ये एक तरी वृद्धाश्रम बांधलं पाहिजे. ज्या वृद्ध लोकांकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आहे अशा लोकांसाठी सरकारच्या योजना पुरेशा नाही आहेत. सरकारने विनाशुल्क वृद्धाश्रमांची बांधणी करावी. पक्षी आपल्या पिल्लांना जन्म देतात दिवस-रात्र त्यांची काळजी घेतात त्यांना उडायला शिकवतात आणि पिल्लं एकदा आकाशात झेप घ्यायला शिकले की आपल्या आई वडीलांना विसरून जातात तसंच काहीसं आपल्या आजूबाजूला देखील पाहायला मिळत आहे.
जर प्रत्येक तरुण व्यक्तीने आपले वृद्ध म्हातारे आई-वडील आपल्या डोक्यावरचं ओझं नसून आपली जबाबदारी व त्यांना सांभाळणे आपलं कर्तव्य आहे असा दृष्टिकोन ठेवून आपल्या आईवडिलांची त्यांच्या म्हातारपणामध्ये काळजी घेतली पाहिजे जेणेकरून वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. हल्ली अनेक लोक आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमांमध्ये सोडून येत आहेत. आयुष्यामध्ये नवीन नाती, नवीन माणसे आली की मुलं आपल्या आई-वडीलांना विसरून जातात.
भगवंता समान असणारे आपले आई-वडील ज्यांची आपण पुंडलिक समजून सेवा केली पाहिजे त्यांना वृद्धाश्रमात सोडून येणं ही आपली संस्कृती नव्हे. कुठे तो त्रेतायुग जेव्हा श्रावण बाळाने आपल्या अंध आई-वडिलांची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कावडी मध्ये बसवून ती कावड खांद्यावर घेऊन संपूर्ण प्रवास केला आणि कुठे हे हल्ली च युग जिथे मुलं आपल्या आईवडिलांची निंदा, चेष्टा करतात, त्यांचा अपमान करतात शिवाय मुलांसाठी आई वडील म्हणजे ओझं बनलंय.
समाजातील बदलामुळे वृद्धाश्रम आता काळाची गरज बनू लागली आहे. कुठल्या आई-वडिलांना आपल्या मुलांपासून आपल्या कुटुंबापासून दूर होऊन स्वखुशीने वृद्धाश्रमात जायला आवडेल. काही वृद्ध लोक स्वखुशीने वृद्धाश्रमांमध्ये जातात देखील कारण त्यांच्याकडे कोणताही दुसरा पर्याय उरलेला नसतो आज कालची तरुण मुलं आपल्या आई-वडिलांना घरात ठेवतच नाहीत असं नाही परंतु त्यांना तुच्छ अशी वागणूक देणे, त्यांना उलट बोलणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांची नीट काळजी न घेणे या सगळ्या समस्यांमुळे आई-वडील स्वतः वृद्धाश्रमाचा आधार घेतात.
काही वृद्धाश्रमांमध्ये राहण्यासाठी देणगी द्यावी लागते तर काही वृद्धाश्रम चारीटेबल ट्रस्ट कडून चालवली जातात त्यामुळे तिथे विनाशुल्क राहता येते. परंतु वृद्धांच्या वयोमानानुसार विचार केला तर त्यांच्याकडे स्वतःचं असं आर्थिक पाठबळ काहीच नसतं त्यामुळे सरकारने विनाशुल्क वृद्धाश्रम बांधण्यावर जोर दिला पाहिजे. आपल्या तरुण मुला-मुलींना आपले आई-वडील नकोशी झाले आहेत आणि म्हणूनच वृद्धाश्रम ही कल्पना ज्येष्ठ नागरिकांनी देखील स्वीकारली आहे.
वृद्धाश्रम ही समस्या आता सातत्याने वर येऊ लागली आहे अनेक लेखकांनी लेखिकांनी आपल्या पुस्तकांच्या कवितांच्या माध्यमातून आई वडिलांचे महत्व सांगितले आहे तसेच आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात का पाठवू नये किंवा वृद्धाश्रम एक समस्या यावर देखील भाष्य केल आहे.
आम्ही दिलेल्या old age home essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वृद्धाश्रम मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on old age home in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on a visit to old age home in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Mi Pahilele Vruddhashram Marathi Nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट