हळद्या पक्षाची माहिती Oriole Bird Information in Marathi

Oriole Bird Information in Marathi हळद्या पक्षाची माहिती Oriole या पक्ष्याला मराठीमध्ये हळद्या पक्षी म्हणतात आणि हा पक्षी भारतामध्ये संपूर्ण देशभर आढळतो. नर हळद्या पक्षी हा गडद पिवळ्या रंगाचा असतो या पक्ष्याचे पंख काळ्या रंगाचे असतात. चोच थोडी लांब आणि तांबड्या रंगाची असते आणि पाय आखूड असतात, या पक्ष्याच्या डोळ्याभोवती काळ्या रंगाचे पट्टे असतात आणि हे पट्टे डोळ्यामध्ये जसे काजळ घातलेले दिसते अगदी तसेच दिसतात. नर आणि मादी पक्षी दिसायला एकसारखेच असतात पण मादी थोड्या फिकट रंगामध्ये असते. या पक्ष्याला मराठीमध्ये अनेक नावे आहे टी म्हणजे हळदुल्या, अम्रपक्षी, पिलक, हळदोई या नावांनीहि ओळखले जाते.

हळद्या हा पक्षी ओरीओलीडे (oriolidae) कुटुंबातील असून या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ओरिओलस (oriolus) असे आहे. हा पक्षी मध्यम आकाराचा असतो म्हणजेच मैना पक्षापेक्षा थोडा मोठा या पक्ष्याची लांबी २४ ते २५ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याचे पंख ४४ ते ४७ सेंटी मीटर लांब पसरतात. या पक्ष्याचे वजन ६५ ते ७० ग्रॅम इतके असते आणि हे लाजाळू गाणारे पक्षी आहेत हे पक्षी सहसा दिसत नाहीत पण आपण या पक्ष्याच्या आवाजावरून त्यांना ओळखू शकतो.

oriole bird information in marathi
oriole bird information in marathi

हळद्या पक्षाची माहिती – Oriole Bird Information in Marathi

नावहळद्या, हळदुल्या, अम्रपक्षी, पिलक, हळदोई
प्रकारपक्षी
इंग्रजीgolden oriole
कुळ किवा कुटुंबओरीओलीडे ( oriolidae )
शास्त्रीय नावओरिओलस ( oriolus )
आकार / लांबी२४ ते २५ सेंटी मीटर
वजन६५ ते ७० ग्रॅम
आयुष्य८ ते १० वर्ष

हळद्या पक्ष्याची जीवनशैली (lifestyle)

हळद्या हा एक दैनंदिन पक्षी आहे हे पक्षी शक्यतो रात्रीचे स्थलांतर करतात आणि या पक्ष्यांना लहान गटामध्ये, जोडीने किवा एकटे राहणे आवडते त्याचबरोबर हे पक्षी वसंत ऋतूमध्ये दिवसा प्रवास करू शकतात. हळद्या हे पक्षी विविध कॉलच्या माध्यमातून संपर्क साधतात. हे पक्षी उत्तम प्रकारे गाणे गाऊ शकतात . संवर्धन जोडपे ज्या ज्या वेळी संगीतामध्ये गातात तेव्हा मादी हळद्या पक्षी नर हळद्या पक्ष्याच्या गाण्याला शॉर्ट स्कीअरसह उत्तर देतात.

हळद्या हे पक्षी कुठे आढळतात (distribution) 

पश्चिम युरोप, पूर्व स्कॅंडीनाविया ते चीनपर्यंत हळद्या या पक्ष्याच्या जाती आढळतात हळद्या हा पक्षी स्थलांतरित पक्षी आहे त्यामुळे हे पक्षी हिवाळ्यामध्ये मध्य आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात. हे पक्षी मोठी जंगले, फळबागा, नदीची जंगले आणि मोठ मोठ्या बागांना प्राधान्य देतात. हे पक्षी लाजाळू असल्यामुळे वृक्ष नसलेली वस्ती किवा मनुष्य वस्तीत राहणे आवडत नाही. हे पक्षी हिवाळ्यामध्ये अर्ध शुष्क, उंच जंगले, नदीकाठची जंगले किवा सवाना यासारखी जंगले निवडतात.

हळद्या पक्ष्याचा आहार (food)

हळद्या हा पक्षी सर्वहारी पक्षी आहे हे पक्षी कीटक, फळे, फुले, बिया, लहान सस्तन प्राणी, सरडे आणि फुलांमधील मध या प्रकारचा आहार खातात.

हळद्या पक्ष्याचे घरटे (Oriole bird nest information in Marathi)

या पक्ष्याचे घरटे घनदाट झाडांच्या फांद्यांवर असते आणि हे घरटे लहान कपच्या आकाराचे असते आणि हे वाळलेल्या गवतापासून आणि कोळ्यांच्या जाळ्यापासून विणलेले असते. या पक्ष्याच्या घरट्याचा आकार ३५ ते ४० सेंटी मीटर असते.

विणीचा हंगाम आणि सवयी ( mating season and habits )

विणीचा कालवधीएप्रिल ते जुलै
अंडी उबवण्याचा कालावधी१६ ते १७ दिवस
पिल्लांचा स्वतंत्र्य दिवस१६ ते २० दिवस
पिल्लाचे नावचिक
अंडीमादी हळद्या पक्षी एका वेळी ३ ते ५ अंडी देतात

हळद्या हे पक्षीगोळा दीर्घकाळ टिकणारे जोडीचा बंध तयार करतात या पक्ष्यांचा प्रजनन काळ हा एप्रिल ते जुलै असतो. घरटे शक्यतो नर पक्षी बनवतो आणि नर पक्षी घरटे बनवण्यासाठीचे सामान गोळा करून देतो. मादी हळद्या पक्षी एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात आणि हि अंडी उबवण्याचा कालवधी १६ ते १७ दिवस असतो आणि या पक्ष्यांची पिल्ले १६ ते २० दिवसांनी स्वतंत्र्यपणे फिरू शकतात. उंडी उबवण्याचे काम, घरटे बनवणे, पक्ष्यांसाठी अन्न गोळा करणे हि कामे नर आणि मादी दोघे मिळून करतात. हि पिल्ले २ ते ३ वर्षामध्ये प्रजनन सुरु करतात.

5 हळद्या पक्ष्याचे प्रकार ( types of oriole bird )

हळद्या पक्ष्याचे प्रकार म्हणजे गोल्डन हळद्या पक्षी ( golden oriole ), बॉल्टीमोर हळद्या पक्षी (baltimore oriole), ऑरचार्ड हळद्या पक्षी (orchard oriole), यल्लो हळद्या पक्षी (yellow oriole) आणि ऑरंगे हळद्या पक्षी (orange oriole).

1.गोल्डन हळद्या पक्षी ( golden oriole )

गोल्डन हळद्या हा पक्षी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो नर हळद्या पक्षी हा गडद पिवळ्या रंगाचा असतो या पक्ष्याचे पंख काळ्या रंगाचे असतात. चोच थोडी लांब आणि तांबड्या रंगाची असते आणि पाय आखूड असतात, या पक्ष्याच्या डोळ्याभोवती काळ्या रंगाचे पट्टे असतात. या पक्ष्याचा आकार २४ ते २५ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याचे वजन ६५ ते ७० ग्रॅम असते. हे पक्षी फळे, बिया, कीटक आणि सरडे या प्रकारचे अन्न खातात.

2.बॉल्टीमोर हळद्या पक्षी ( baltimore oriole )

बॉल्टीमोर हळद्या पक्षी हा उत्तर अमेरिकेतील प्रवासी प्रजनन पक्षी आहे. या पक्ष्याचा अंडरपार्ट्स पिवळ्या रंगाचे असतात आणि पंख काळ्या आणि पांढऱ्या शेडचे असतात आणि डोक्याचा रंग काळ्या रंगाचे असते. चोच सरळ आणि थोडी लांब असते आणि राखाडी रंगाची असते. या पक्ष्याची लांबी १६ ते २२ सेंटी मीटर असते तर या पक्ष्याच्या वजन ३५ ते ४५ ग्रॅम असते आणि हे पक्षी उडताना या पक्ष्याच्या पंखांची लांबी २५ ते ३२ सेंटी मीटर पसरतात. बॉल्टीमोर हळद्या मादी पक्षी एका वेळी ५ ते ७ अंडी घालते आणि अंडी उबवण्याचा काळ १० ते १४ दिवस असतो.

3.ऑरचार्ड हळद्या पक्षी ( orchard oriole )

ऑरचार्ड हळद्या पक्षी हा तपकिरी रंगाचा असतो आणि या पक्ष्याचे डोके, मान आणि मानेखालचा थोडासा भाग हा काळ्या रंगाचा असतो आणि पंखावर काळ्या पांढऱ्या रंगाचा शेड असतात आणि शेपूट काळ्या रंगाची असते. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ईक्टरस स्पुरीअस आहे. हा एक लहान आकाराचा पक्षी आहे या पक्ष्याची लांबी १५ ते १९ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याचे वजन १५ ते २८ ग्रॅम इतके असते. हे पक्षी फळे, कीटक, बिया या प्रकारचे अन्न खातात.

4.यल्लो हळद्या पक्षी ( yellow oriole )

यल्लो हळद्या पक्ष्याचे शरीर हे पूर्णपणे पिवळ्या रंगाचे असते आणि मानेची खालची बाजू काळ्या रंगाची असते आणि पंख काळ्या पांढऱ्या शेडचे असतात. या पक्ष्याला प्लान्टेन किवा स्मॉल कॉर्ण या नावांनीही ओळखले जाते. हे पक्षी २० ते २१ सेंटी मीटर लांब असतात आणि या पक्ष्यांचे वजन ३५ ते ३८ ग्रॅम असते.

5.ऑरंगे हळद्या पक्षी ( orange oriole )

ऑरंगे हळद्या पक्षी हा जवळ जवळ यल्लो हळद्या पक्ष्यासारखाच दिसतो पण या पक्ष्याचा रंग नारंगी असतो. ऑरंगे हळद्या हा नाव ईक्टरीडे कुळातील असून या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ईक्टरस ऑराटस आहे.

हळद्या पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of oriole bird )

  • या पक्ष्याला संस्कृतमध्ये कांचन या नावाने संबोधले जाते.
  • हळद्या पक्षी एकमेकाशी संवाद साधण्यासाठी शिट्टीचा वापर करतात.
  • हळद्या पक्षी शरद ऋतूमध्ये स्थलांतर करतात.
  • फळे आणि बेरी खाताना बाल्टिमोर हे पक्षी एक असामान्य गॅपिंग नावाची खाण्याची पध्दत वापरतात.
  • स्कॉट्स हळद्या पक्षी योक्काच्या झाडाच्या पानांच्या तंतूपासून आपले घरटे विणतात.
  • हळद्या पक्ष्याला इंग्रजीमध्ये golden oriole bird म्हणतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा हळद्या पक्षी oriole bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. oriole bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about oriole in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही हळद्या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या oriole bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “हळद्या पक्षाची माहिती Oriole Bird Information in Marathi”

  1. आज अचानक हळद्या चे दर्शन घरा शेजारील कऊटा च्या झाडावर झाले व कॅमेरा बद्ध केले,
    आपण दिलेली माहिती Google search वर वाचली व माझे या पक्षा बद्दल चे न्यानात भर पडली,
    आपले आभार व धन्यवाद…..

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!