Myna Bird Information in Marathi साळुंकी पक्षी माहिती मैना हा पक्षी स्टर्निडा कुटुंबातील आहे आणि मैना हा शब्द मीना ह्या हिंदी शब्दापासून तयार झाला आहे जो संस्कृत शब्द मदानापासून आला आहे तसेच मैना या पक्ष्याला डोंगराळ मैना सुध्दा म्हणतात. हे पक्षी जंगले, झुडुपे आणि शहरी व उपनगरी भागात राहतात आणि हा पक्षी मध्यम आकाराचे एक बळकट पक्षी आहे आणि या पक्ष्याला एक मजबूत चोच, पाय आणि लहान शेपटी आहेत. या पक्ष्याची विशेषता म्हणजे या पक्ष्यांच्या गाण्यामध्ये नाविन्यपूर्णटा असते हे पक्षी गाणी ,शिट्ट्या आणि वैविध्यपूर्ण, नक्कल, वेगवेगळे आवाज काढतात जसे पोपट हा पक्षी नक्कल करतो, गाणे गातो, वेगवेगळे आवाज काढतो अगदी तसेच आवाज, नक्कल, गाणी मैना काढते.
मैना हा पक्षी मुळचा आशियाई देशातील आहे आणि हा पक्षी न्यूझीलंड, ऑस्ट्रोलीया, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि फिजी या देशांमध्ये सुध्दा आढळतात. मैना हा पक्षी जगभरामध्ये सगळीकडे आढळतात आणि या पक्ष्याला साळुंकी या नावानेही ओळखले जाते. नर आणि मादी हे दिसायला एकसारखेच असतात पण मादी मैना साधारण आकाराने मोठी असते.
मैना (साळुंकी) पक्षी माहिती Myna Bird Information in Marathi
मैना पक्ष्याचे वर्णन ( description )
मैना ह्या पक्ष्यचा आकार हा चिमणीपेक्षा थोडा मोठा आणि कबुतर पक्ष्यापेक्षा लहान असतो म्हणजेच या पक्ष्याची लांबी २१ ते २३ सेंटी मीटर असते. मैना या पक्ष्याचा शरीराचा मधला भाग हा तपकिरी रंगाचा असतो आणि मानेपासून वरती डोके काळ्या रंगाचे असते. तसेच या पक्ष्याची शेपूट आणि पंखांचा खालचा भाग काळ्या रंगाचा असतो म्हणजेच या पक्ष्याचे अर्धे पंख तपकिरी रंगाचे आणि अर्धे काळ्या रंगाचे असतात त्याचबरोबर पंखांवर साधारण पांढरा शेड असतो. डोळे काळ्या रंगाचे आणि डोळ्याभोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ आहे आणि चोच लहान, मजबूत आणि पिवळ्या रंगाची असते. या पक्ष्याचे पाय थोडे लांब आणि पिवळ्या रंगाचे असतात. नर पक्ष्याचे वजन १०० ते ११० ग्रॅम पर्यंत असते तर मादी पक्ष्याचे वजन १२० ते १४० ग्रॅम पर्यंत असते.
नाव | मैना, साळुंकी |
प्रकार | पक्षी |
कुळ | स्टर्निडा |
शास्त्रीय नाव | अॅक्रीडोथिरीस ट्रायस्टिस |
आकार / लांबी | २१ ते २३ सेंटी मीटर |
वजन | नर – १०० ते ११० ग्रॅम मादी – १२० ते १४० |
आयुष्य | ४ ते १२ वर्ष |
मैना पक्ष्याचा आहार ( food )
मैंना हा सर्वभक्षी पक्षी आहे आणि हे पक्षी मुख्यता धान्य, फळे, बिया, कीटक, अळ्या, बेडकाची पिल्ले, सरडे या प्रकारचा आहार खातात. मैना हे पक्षी आपल्याला मानवी वस्तीजवळही खूप वेळा पाहायला मिळतात या कारण असे आहे कि हे पक्षी मानवांनी टाकून दिलेले शिजवलेले अन्न देखील खातात त्याच बरोबर हे पक्षी चारणाऱ्या जन्वारांच्या अंगावरील किडे देखील खातात.
- नक्की वाचा: सुगरण पक्षाची माहिती
मैना पक्षी कसे व कुठे राहतात ( habitat ) | myna nest information in marathi
मैना या पक्ष्याची मूळ प्रजाती हि आशियातील आहे आणि हे पक्षी भारत, इराण, नेपाळ, श्रीलंका, भूतान, मलेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रोलीया, उत्तर अमेरिका, आफ्रिका सिंगापूर, जपान आणि पाकिस्तान या देशामध्ये आढळतात. मैना या जातीचे काही पक्षी कळपाने राहतात आणि वावरतात तर काही पक्षी नर आणि मादी या जोडीने दिसतात. शक्यतो हे पक्षी चिमण्यांसारखे इमारतीच्या भिंतींमध्ये छिद्र पाडून घरटे बनवतात किवा झाडाच्या दोन फांद्यांच्या मधी आपले घरटे तयार करतात आणि हे घरटे काट्या किवा वाळलेल्या गवतापासून बनवतात.
विणीचा हंगाम आणि सवयी ( mating season and habits )
पिल्लांचे नाव | चिक |
अंडी | ४ ते ६ अंडी |
पिल्लांचा स्वतंत्र्य कालावधी | ६ ते ७ आठवडे |
अंडी उबवण्याचा कालावधी | १७ ते १८ दिवस |
सामान्य मैना हे पक्षी आयुष्यासाठी जोडी बनवतात आणि हे पक्षी विणीच्या हंगामाच्या अगोदर एकाच जागी वर्षातून एकदा झाडावर किवा भिंतीमध्ये घरटे बनवतात आणि हे पक्षी आपले घरटे काड्या, वाळलेले गवत, डहाळे, वाळलेला पाला या सामानापासून घरटे बनवतात. प्रजनन दरम्यान मैना हे पक्षी अत्यंत प्रांतीय बनतात त्याचबरोबर बऱ्याचदा जोड्या तीव्रपणे भांडतात. या पक्ष्याचा प्रजनन काळ ठरलेला नसतो या पक्ष्यांचे प्रजनन वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकते. मादी पक्षी एका वेळी ४ ते ६ अंडी देवू शकते आणि हि अंडी उबवण्याचा कालावधी हा १७ ते १८ दिवसाचा असतो.
या कालावधी नंतर हि पिल्ले बाहेर येतात आणि मैना या पक्ष्याच्या पिलांना चिक म्हंटले जाते. या पक्ष्यांचे डोळे जन्मल्यानंतरहि झाकलेले असतात आणि या पिल्लांचा रंग तपकिरी असतो. मैना पक्ष्याचे पिल्लू ६ ते ७ आठवड्यानंतर स्वतंत्र्य होते. घरटे बनवणे, अंडी उबवने, पिल्लांचे संगोपन, अन्न गोळा करणे हे काम नर आणि मादी दोघे मिळून करतात.
- नक्की वाचा: चिमणी बद्दल माहिती
भारतीय सांस्कृतिक साहित्यात सामान्य मैनेला बरीच नावे दिली आहेत. हि नावे या पक्ष्याचा स्वभाव, स्वरूप, वागणे आणि शरीराचे वर्णन करतात.
नाव | अर्थ |
कलहप्रिया | असे नाव वादविवादाची आठवण करून देते. कलहप्रिया हे नाव या पक्ष्याचा भांडण स्वभावाचा संदर्भ देते. |
चीत्रनेत्र | चीत्रनेत्र याचा अर्थ सुरम्य डोळे असणारा असा होतो. |
सारिका | सारिका हे नाव पक्ष्याचे सवरून आणि वागण्याचे वर्णन करते. |
पीटपड | ( पिवळे पाय असणारा ) या पक्ष्याचे पाय पिवळे असतात म्हणून या पक्ष्याला पीटपड या नावानेही ओळखले जाते. |
पीटनेत्र | पिवळे डोळे असणारा पक्षी म्हणून या पक्ष्याला पिटनेत्र म्हणतात. |
हे तुम्हाला माहित आहे का ?
- मैना हे पक्षी तासाला ३० किलो मीटर अंतर अगदी सहजपणे पार करू शकतात.
- सामान्य मैना ह्या पक्ष्याची श्रेणी इतक्या वेगाने वाढत आहे कि २०० मध्ये हि प्रजाती जगातील सर्वात आक्रमक प्रजाती म्हणून घोषित केली गेली आणि जैवविविधता, शेती आणि मानवी हितसबंधावर प्रभाव पडणारे पक्षी बनले.
- भारतामध्ये आढळणारी मैना हि बोलण्यासाठी आणि गाणे गाण्यासाठी प्रसिध्द आहे आणि म्हणून या मैनेला बोलणारी मैना म्हणतात.
- या पक्ष्यांच्या कितीतरी प्रजाती आहेत आणि त्यामधील प्रमुख प्रजाती म्हणजे पहाडी मैना, ब्राह्मणी मैना, भारतीय मैना आणि गुलाबी मैना.
- पहाडी मैना छतीसगड आणि मेघालय या राज्यांच्या राज्य पक्षी आहे.
- मैना हे पक्ष्यांना गटामध्ये राहायला आवडते आणि एका गटामध्ये १० पक्षी असतात.
- नक्की वाचा: कोकिळा पक्षाची माहिती
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा मैना (साळुंकी) पक्षी myna bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. myna bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information on myna bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही मैना (साळुंकी) पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या myna bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट