पालक पुरी रेसिपी Palak Puri Recipe in Marathi

Palak Puri Recipe in Marathi पालक पुरी रेसिपी पालक पुरी हा एक भारतीय प्रकार आहे जो पालकचा रस, गव्हाचे पीठ आणि काही मसाला वापरून बनवली जाते. पालक हा तसाच भाजी बनवून आपण आपल्या घरातल्या लोकांना जेवणामध्ये वाढली तर ते कोणीही खात नाहीत आणि जर आपल त्यापासून टेस्टी आणि चमचमीत पदार्थ जसे कि कुरकुरीत पालक भजी, पालक पकोडे, पालक पनीर किंवा पालक पुरी बनवून दिली तर ते पदार्थ आवडीने खातात म्हणून आज आपण या लेखामध्ये पालक पुरी रेसिपी कशी बनवायची याबद्दल माहिती घेणार आहोत. पालक हि एक पौष्टिक भाजी आहे त्यामुळे पालकचा वापर आपण जितका जेवणामध्ये करू तितके चांगलेच.

पालक पुरी हि चवीला खूप छान लागते त्यामुळे हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत आवडीने खातात. आपण कोणत्याही सणामध्ये किंवा काही विशेष कार्यक्रमामध्ये पुरी बासुंदी आणि पुरी भाजीचा बेत घालतो आणि आपण साध्या पुरीच्या ऐवजी पालक पुरी बनवू शकतो.

कारण पालक मध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते आणि साध्या पुरी पेक्षा पालक पुरी पौष्टिक ठरू शकते. पालक पुरी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम प्रकारे बनते. चला तर मग पाहूयात पौष्टिक पालक पुरी कशी बनवायची.

palak puri recipe in marathi
palak puri recipe in marathi

पालक पुरी रेसिपी – Palak Puri Recipe in Marathi

तयारीसाठी लागलेला वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

पालक पुरी महणजे काय ?

पालक पुरी हा पदार्थ आपण एक पौष्टिक पदार्थ म्हणून खाल्ला तर चालतो कारण हा पदार्थ पालकचा रस, गव्हाचे पीठ आणि काही मसाला वापरून कणिक मळून घेतली जाते आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटून त्या तळल्या जातात.

पालक पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients 

  • पालकचा रस : पालक पुरी बनवताना पालकचा रस हा एक महत्वाचा घटक आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये पालकचा रस वापरून कणिक मळली जाते कारण त्यामध्ये पालकाचा फ्लेवर येतो.
  • तेल : तेल हे पुऱ्या बनवण्यासाठी आवश्यक असते कारण बनवलेल्या पुऱ्या तेलामध्ये तळून घेतो.
  • गव्हाचे पीठ : गव्हाच्या पिठामध्ये पालकचा रस, मीठ आणि इतर काही मसाले घालून पुऱ्या बनवण्यासाठी कणिक तयार करून घेतली जाते.

पालक पुरी रेसिपी – recipe of palak puri in marathi

पालक पुरी हा एक अगदी सोपा पदार्थ आहे जो भारतामध्ये काही ठिकाणी नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये बनवून खाल्ला जाणारा एक पौष्टिक पदार्थ आहे. पालक पुरी हि आपण पालकाचा रस, गव्हाचे पीठ, ओवा, हिरवी मिरची वापरून बनवली जाते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि विशेषता कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनणारा आणि लहानांपासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडणारा एक पौष्टिक पदार्थ आहे. चला तर मग पाहूयात पालक पुऱ्या कश्या बनवायच्या आणि त्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागलेला वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

पालक पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make palak puri recipe 

पालक पुरी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते परंतु काही साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग पाहूयात पालक पुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • २ वाटी गव्हाचे पीठ.
  • १ वाटी पालक रस किंवा पालक पेस्ट.
  • १/२ चमचा ओवा.
  • १ चमचा हिरवी मिरची पेस्ट.
  • १ चमचा तूप किंवा तेल.
  • १/२ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • तेल ( तळण्यासाठी ).

पालक पुरी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make palak puri recipe 

  • आता आपण वर दिलेले साहित्य वापरून पौष्टिक पालक पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
  • सर्वप्रथम पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि तो मिक्सरवर फिरवा आणि बारीक करून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण परत एकदा फिरवून घ्या आणि मग घालण्याच्या सहाय्याने त्यामधील रस काढून घ्या आणि तो एक वाटीमध्ये काढून बाजूला ठेवा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या त्यामध्ये गव्हाचे पीठ, एक चमच पातळ तूप, ओवा, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि पालकचा रस घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये लागेल तेवढे पाणी घालून ते चांगले घट्ट आणि मऊसर मळून घ्या आणि हे मळलेले पीठ झाकण लावून १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • त्यानंतर हाताला तेल लावा आणि ह्या पीठाचे छोटे छोटे ( पेढ्या एवढे ) गोळे करून ठेवा.
  • मग गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • आता आपण बनवून ठेवलेल्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटा आणि त्या तेलामध्ये एक एक करून दोन्ही बाजूनी चांगल्या तळून घ्या. ( टीप आपल्याला पुऱ्या तेलामध्ये खुपवेळ तळाव्या लागत नाहीत त्या थोड्या लालसर आणि फुगल्यानंतर तेलामधून काढाव्यात )
  • अश्या प्रकारे सर्व पुऱ्या बनवून तळून घ्या.
  • तुमच्या गरमागरम पालक पुऱ्या सर्व्ह करण्यासाठी तयार झाल्या.

पालक पुरी कश्यासोबत खाल्ली जाते – serving suggestion 

पालक पुरी हि पौष्टिक असल्यामुळे आपण हि तशी खावू शकतो त्याचबरोबर हि पुरी आपण आंब्याचे लोणचे, दही, टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही तिखट भाजी बरोबर खावू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • पालक पुरीमध्ये आपण पालकचा रस घालण्या ऐवजी पालकची मिक्सरवर बनवून घेतलेली पेस्ट देखील घालू शकतो.
  • पालकच्या पुरीमध्ये आपण चवीसाठी थोडीशी धने जिरे पावडर देखील टाकली तरी चालते.
  • पालक पुऱ्या बनवताना गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा देखील वापरला तरी चालतो.
  • पालक ओवा वापरल्यामुळे पचन चांगले होते.

आम्ही दिलेल्या palak puri recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पालक पुरी रेसिपी माहिती मराठी palak methi puri recipes in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या palak puri recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of palak puri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये palak puri recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!