Palak Bhaji Recipe in Marathi पालक भजी रेसिपी भजी म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ तितकाच स्वादिष्ट असतो आणि अनेकांच्या तोंडाला जरी ह्या पदार्थाचे नाव ऐकले तरी पाणी सुटते कारण हा पदार्थ अनेकांचा आवडता पदार्थ असतो. आपण भजी हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो जसे कि कांदा भजी, कोबी भजी, मिरची भजी तसेच पालक भजी देखील बनवू शकतो आणि आज आपण या लेखामध्ये खामग आणि खुशखुशीत पालक भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.पालक भजी हा पदार्थ आपण नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही बनवून खावू शकतो. चला तर मग आपण पालक भजी कसे बनवायचे ते पाहूयात.

पालक भजी रेसिपी – Palak Bhaji Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारे साहित्य | १० मिनिटे |
टाळण्यासाठी लागणारे साहित्य | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
पालक भजी म्हणजे काय ?
पालक भजी हे डाळीचे पीठ, रवा, कांदा, तिखट – मीठ, ओवा या मिश्रणापासून बनवले जाते या सर्व साहित्याचे मिश्रण पाणी लावून ओले केले जाते आणि ते तेल गरम करून पीठाचे भजी तेलामध्ये सोडून ते लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि ते चांगले तळले कि तेलामधून बाहेर काढून घ्यावे लागतात.
- डाळीचे पीठ : हरभरा डाळीचे पीठ हे अनेक प्रकारचे पालक भजी बनवण्यासाठी लागणारे एक महत्वाचे साहित्य आहे. डाळीचे पीठ वापरून भजीचे २ ते ३ प्रकार बनवले जातात.
- पालक : पालक भजी बनवण्यासाठी पालक हा मुख्य घटक आहे कारण जर पालक नसेल तर पालक भजी बनूच शकत नाहीत. पालक हा चिरून बेसन पिठामध्ये वापरला जातो
- तिखट आणि मीठ : पालक भजी मध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची जर आपण घातली तर त्या भजीला चांगला तिखट पणा येतो तसेच मीठ घातल्यामुळे भजीला चव येते.
- तेल : कोणत्याही प्रकारचे भजी तळण्यासाठी तेल हे गरजेचे असते म्हणून तेल हा भजी बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे असे आम्ही मानतो.
पालक भजी रेसिपी – how to make palak bhaji recipe in marathi
पालक हा एक पौष्टिक भाजीचा प्रकार आहे हे जो आपण भजी बनवण्यासाठी देखील वापरू शकतो. पालकचे भजी बनवताना पालक चिरून तो बेसनच्या पिठामध्ये मिक्स केला जातो आणि त्याचे भजी बनवली जातात. घरच्या घरी पालक भजी बनवणे खूप सोपे आहे आणि हे भजी खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर मग पालक भजी कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: कुरकुरीत भज्जी रेसिपी
तयारीसाठी लागणारे साहित्य | १० मिनिटे |
टाळण्यासाठी लागणारे साहित्य | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
पालक भजी बनवण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ आणि पालक हे मुख्य साहित्य लागते आणि काही इतर साहित्य देखील लागते आणि ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते. खाली आपण पालक भजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ वाटी चिरलेला पालक.
- १ वाटी तांदळाचे पीठ.
- २ ते ३ चमचे रवा.
- १ ते २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- दीड चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १ चमचा ओवा.
- १/४ चमचा खायचा सोडा.
- २ चमचे लिंबू रस.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- आता आपण वर दिलेले साहित्य वापरून पालक भजी कसे बनवायचे ते पाहूयात.
- सर्वप्रथम पालकची पाने धुवून तो बारीक चिरून घ्या आणि तो एका भांड्यामध्ये काढून घ्या ( टीप : भांडे थोडे मोठे असू द्या त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर ते चांगले मिक्स करता येईल ).
- आता त्या चिरलेल्या पालक मध्ये तांदळाचे पीठ, रवा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, हळद, ओवा, लिंबू रस घाला आणि मिश्रण चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये थोडे मीठ घालून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते चांगले भिजवून घ्या आणि १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. ( टीप : पीठ असे भिजवून घ्या कि त्याचे भजी बनवता येतील.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
- आता त्या पिठामध्ये सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा.
- आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
- अश्या प्रकारे तुमचे पारंपारिक भजी खाण्यासाठी तयार झाले. हे भजी आपण तसेच किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.
पालक भजी कश्यासोबत खाल्ले जातात – serving suggestion
- कुरकुरीत आणि खमंग पालक भजी आपण चपाती, पुरी किंवा तसेच देखील खावू शकतो.
टिप्स ( Tips )
- लिंबू रस भजीच्या पिठामध्ये घातल्यामुळे भजीला आंबट गोड चव येते.
- भजी मध्यम आचेवरच तळा ते मोठ्या आचेवर तळले तर जास्त काळपट होतील आणि ते आतून चांगले तळले जाणार नाहीत.
- भजीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये थोडीशी चवीसाठी साखर देखील घातली तरी चालेल.
- भजी बनवण्यासाठी वापरलेला पालक हा ताजा असावा त्यामुळे आपले भजी खूप छान बनतील.
- जर तुम्हाला ओवा आवडत नसेल तर तुम्ही भाजीमध्ये ओवा घातला नाही तर चालेल.
आम्ही दिलेल्या palak bhaji recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पालक भजी रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या palak chi bhaji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि palak bhaji madhurasrecipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये palak bhaji recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट