प्रदीप नरवाल माहिती Pardeep Narwal Information in Marathi

pardeep narwal information in marathi प्रदीप नरवाल माहिती, सध्या भारतामध्ये कब्बडी हा खेळ खूपच लोकप्रिय होत चाललेला आहे आणि या खेळाच्या स्पर्धा ह्या राष्ट्रीय स्तरावर होत आहेत आणि यामध्ये अनेक खेळाडून चांगल्या प्रकारे कामगिरी करून आपले नाव बनवले आहे आणि त्यामधील एक लोकप्रिय खेळाडू म्हणजे प्रदीप नरवाल आणि आज आपण या लेखामध्ये प्रदीप नरवाल याच्याविषयी संपूर्ण माहिती खेणार आहोत. प्रदीप नरवाल हा एक भारतीय कब्बडीपटू आहे.

जो कब्बडीच्या राष्ट्रीय संघामध्ये खेळतो तसेच याने प्रो कब्बडी हे युपी (UP) संघाकडून खेळले आहे आणि कब्बडी खेळाच्या इतिहासामध्ये तो कब्बडी खेळामध्ये सर्वाधिक गुण बनवणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि आतापर्यंत त्याने या खेळामध्ये एक हजार हून अधिक गुण मिळवून आपले नाव बनवले आहे.

pardeep narwal information in marathi
pardeep narwal information in marathi

प्रदीप नरवाल माहिती – Pardeep Narwal Information in Marathi

नावप्रदीप नरवाल
ओळखकब्बडीपटू
वडील आणि आईधरमबीर नरवाल आणि बिरमती देवी
जन्म१६ फेब्रुवारी १९९७
जन्म ठिकाणहरियाना राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील रींधना गावामध्ये झाला
पत्नीचे नाव – pradeep narwal wifeस्वाती बेनिवाल
मुलाचे नावगर्वित

प्रदीप नरवाल याची वैयक्तिक माहिती – kabaddi player pardeep narwal information in marathi

प्रदीप नरवाल हा एक कब्बडीपटू म्हणून ओळखला जातो आणि या खेळाडूचा जन्म भारतातील हरियाना राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील रींधना गावामध्ये १६ फेब्रुवारी १९९७ मध्ये झाला. प्रदीप नरवाल यांच्या आईचे नाव बिरमती देवी असे आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव धरमबीर नरवाल असे आहे आणि त्याचे २०१९ मध्ये स्वाती बेनिवालशी लग्न झाले आणि त्यांना २०२१ मध्ये एक मुलगा देखील झाला आहे त्याचे नाव गर्वित असे आहे.

प्रदीप नरवाल याला कब्बडीची ओळख हि खूप कमी वयामध्ये झाली म्हणजेच वयाच्या सातव्या वर्षी त्याला कब्बडीची ओळख झाली आणि त्याचे काका रवींद्र नरवाल यांनी त्याला सर्वप्रथम कब्बडी खेळाची ओळख करून दिली आणि त्याच्या गावातील इतर मुलांना राष्ट्रीय स्थरावर खेळताना पाहून त्याच्यामध्ये देखील कब्बडी खेळाची आवड वाढली.

त्याने सर्वप्रथम शाळेचे प्रतिनिधित्व करणारी पहिली कब्बडी खेळली नंतर त्याने कब्बडी खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या अकादमी मध्ये प्रवेश घेतला आणि त्यांने नरेश हरवाल यांच्याकडून कब्बडी खेळाचे प्रशिक्षण घेतले.

प्रदीप नरवाल याची कब्बडी या खेळामधील कामगिरी – career

 • ज्यावेळी प्रदीप नरवालने प्रो कब्बडीच्या सीजन तीन मध्ये पटना या गटामध्ये प्रवेश केला आणि या गटामध्ये खेळत असताना त्यांने एकूण १६ सामान्यामध्ये  ११६ रेड पॉइंट बनले आणि त्याला त्यावेळी अव्वल रेदार म्हणून ओळख मिळाली.
 • २०१६ मध्ये प्रदीप नरवालला राष्ट्रीय संघामध्ये खेळण्यास संधी मिळाली आणि २०१६ मध्ये विश्वचषक झाला आणि त्यावेळी भारतीय टीम विश्वचषक विजयी ठरली आणि तो त्या विजयी संघाचा एक भाग होता तसेच त्याने आशियाई कब्बडी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक देखील जिंकले होते.
 • प्रदीप नरवाल याने बेंगळूर बुल्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि बेंगळूरू बुल्सचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने ६ सामने खेळले आणि सुपर रेडसह एकूण ९ रेड पॉइंट मिळवले होते.
 • त्याचबरोबर प्रदीप नरवाल याने दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये २०१९ मध्ये देखील सुवर्णपदक जिंकले होते आणि तो विजेत्या संघाचा एक भाग देखील बनला होता.
 • प्रदीप नरवाल हा प्रो कब्बडी मधील एक असा खेळाडू आहे ज्याने प्रो कब्बडी या स्पर्धेमध्ये २ वेळा सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार जिंकला आहे आणि हे पुरस्कार त्याने सीजन ४ आणि ५ मध्ये जिंकले आहेत.
 • प्रो कब्बडीच्या पाचव्या सीजनमध्ये त्याने ३६९ रेड पॉइंट मिळवले जे प्रो कब्बडीच्या इतिहासातील सर्वोच्च रेड पॉइंट होते. प्रदीप नरवालने गुजरात फॉर्च्यून जायंट्सविरुध्द १९ पॉइंट बनवले होते.
 • प्रदीप नरवाल याची सर्वोत्कृष्ट कामगिरी हि त्याने प्रो कब्बडी च्या ७ व्या हंगामामध्ये दिसून आली ज्यामध्ये त्याने प्रो कब्बडी इतिहासामध्ये एक हजार गुणांचा टप्पा बनवला आणि पहिला प्रो कब्बडी खेळाडू बनला.
 • त्याला पटना पायरेट्सचा कणा म्हणून ओळख मिळाली.

प्रदीप नरवाल याला मिळालेले पुरस्कार – awards

प्रदीप नरवाल हा एक चांगला कब्बडीपटू आहे आणि त्यांने अनेक कब्बडी सामन्यांच्यामध्ये आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आणि त्याला त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी काही पुरस्कार मिळाले आहेत.

 • प्रदीप नरवाल याला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट रेडर पुरस्कार मिळाला.
 • प्रदीप नरवाल याने प्रो कब्बडी या स्पर्धेमध्ये २ वेळा सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार जिंकला आहे.
 • २०१७ मध्ये त्याने आशियाई कब्बडी चॅम्पियनशिप देखील मिळवली होती.
 • २०१६ मध्ये त्याच्या संघाने कब्बडी विश्वचषक जिंकले होते.

प्रतीप नरवाल विषयी काही तथ्ये – facts

 • प्रदीप नरवाल या कब्बडीपटूला डबकी राजा या नावाने देखील ओळखले जात होते.
 • प्रदीप नरवालला वयाच्या सातव्या वर्षी कब्बडी या खेळाची ओळख झाली आणि त्याने त्याचे करियर कब्बडी या खेळामध्ये करायचे ठरवले आणि त्याने नरेश हरवाल यांच्याकडून कब्बडी खेळाचे प्रशिक्षण घेतले.
 • प्रदीप नरवाल हा एक भारतीय कब्बडीपटू आहे. जो कब्बडीच्या राष्ट्रीय संघामध्ये खेळतो तसेच याने प्रो कब्बडी हे युपी ( UP ) संघाकडून खेळले आहे.
 • त्याने प्रो कब्बडी संघामध्ये बेंगळूरू बुल्स आणि पटना या संघाच्याकडून खेळला.
 • २०१६ आणि २०१७ मध्ये प्रदीप नरवाल याने आपल्या नावावर एकूण तीन शीर्षके करून घेतली होती.
 • प्रदीप नरवाल याचा जन्म हा हिंदू जाट कुटुंबामध्ये झाला.

आम्ही दिलेल्या pardeep narwal information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रदीप नरवाल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या biography of pradeep narwal या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pardeep narwal in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!