पतपेढी विषयी माहिती Patpedhi Information in Marathi

patpedhi information in marathi पतपेढी विषयी माहिती, भारतामध्ये अनेक बँका कार्यरत आहेत आणि त्यामधील पतपेढी हि एक बँक आहे आणि आज आपण या लेखामध्ये पतपेढी विषयी माहिती पाहणार आहोत. जश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करते त्या प्रकारची कामे करण्याची परवानगी पतपेढीला नसते म्हणजेच या प्रकारची संस्था हि कोणत्याही प्रकारच्या सेवा (डिमांड ड्राफ्ट, लॉकर) देऊ शकत नाही, तसेच परदेशातील चालनाविषयी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही तर ती सामान्यपणे ठेव जमा करून घेणे आणि लोकांना कर्ज देणे या प्रकारची कामे करते.

ज्या लोकांच्याकडे कमी प्रमाणात पैसा आहे किंवा ते आर्थिकदृष्ट्या कमी आहेत किंवा गरीब आहेत अश्या प्रकारचे लोक हे पतपेढी या संस्थेमध्ये व्यवहार करतात आणि आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पतपेढ्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात.

जसे कि यामध्ये कंपनीमधील, बँकेमधील आणि उद्योगामधील अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या पतपेढ्या असतात ज्या आर्थिक दृष्ट्या दिबले असणाऱ्या व्यक्तींना मदत करतात.

इतर बँका जसे कोणालाही कर्ज देऊ शकतात म्हणजेच तो संबधित व्यक्ती बँकेचा सदस्य जरी नसला तरी त्याला कर्ज देऊ शकतात, परंतु पतपेढ्या असे करू शकत नाहीत तर त्या फक्त आपल्या सदस्यांना कर्ज देऊ शकतात.

patpedhi information in marathi
patpedhi information in marathi

पतपेढी विषयी माहिती – Patpedhi Information in Marathi

पतपेढी संस्थेची कार्य – functions

पतपेढी संस्था हि आर्थिक दुष्ट्या दुबळे आणि गरीब असणाऱ्या व्यक्तीला आर्थिक पुरवठा करण्यास मदत करते आणि त्याचबरोबर हि संस्था वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते आणि ती संस्था कश्या प्रकारे कार्य करते ते खाली आपण पाहूया.

 • या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे लोकांच्या ठेवी जमा करून देणे आणि गरजू लोकांना योग्य दरामध्ये कर्ज देणे.
 • त्याचबरोबर या प्रकारच्या संस्था ह्या गरजू लोकांना थेट वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून मध्यस्थांना दूर ठेवतात आणि त्यामुळे मध्यस्थांचा खर्च वाचतो.
 • या संस्था आपल्या सदस्यांना परवडणाऱ्या दारामध्ये कर्जाची पुरवणी करतात.
 • पतपेढी संस्था किंवा पतसंस्था ह्या ग्राहकांच्या किंमतीचा मागोवा घेऊन ग्राहकांचे आणि उत्पादकांच्या हक्काचे संरक्षण करतात.
 • या संस्थांना ठेवी जमा करून घेणे आणि सदस्यांना कर्जे देणे इतकेच अधिकार असल्यामुळे त्या संस्था सभासदांच्या छोट्या मोठ्या ठेवी देखील स्वीकारणे आणि त्या ठेवीवर त्यांना योग्य व्याजदर देखील देते.

पतपेढी किंवा पतसंस्थांचे प्रकार – types

पतसंस्था ह्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी काम करतात म्हणजेच त्या कंपन्यांच्यासाठी, उद्योगांच्यासाठी आणि अनेक इतर क्षेत्राच्यासाठी काम करतात.

उत्पादक सहकारी पतसंस्था

या संस्था उत्पादाकांच्यासाठी कार्य करतात आणि या प्रकारच्या संस्था ह्या उतपादाकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बनलेल्या असतात आणि जे लोक शेती किंवा मासेमारी, कुकुटपालन या सारखा व्यवसाय करतात अश्या लोकांच्यासाठी काम करतात.

पणन सहकारी संस्था

पणन ह्या सहकारी संस्था लहान आणि किरकोळ उत्पादकांना मदत करतात आणि या संस्था उत्पादकांना त्यांच्या वस्तू किंवा त्यांची उत्पादने बाजारामध्ये विकण्यासाठी देखील मदत करतात.

ग्राहक सहकारी संस्था

ग्राहक सहकारी संस्था हि त्यांच्या फायद्यासाठी विशिष्ट क्षेत्रातील ग्राहकांच्याद्वारे नियंत्रित केली जाते. आणि यामध्ये आपण स्वता जास्त किंमत घेण्यापेक्षा किंवा नफा कमवण्यापेक्षा ते ग्राहकांना आवश्यक वस्तू ह्या वाजवी दरामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतात.

क्रेडीट युनियन

क्रेडीट युनियनचा मुख्य उद्देश हा लोकांना मदत करणे हा असतो आणि ते सभासदांना क्रेडिड सेवा आणि आर्थिक सेवा प्रधान करतात.

पतपेढी किंवा पतसंस्था विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • जसे देशातील इतर बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणा खाली येतात त्याचप्रमाणे पतपेढी देखील रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येते.
 • तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी हि पहिल्या क्रमांकाची पतपेढी संस्था आहे.
 • सहकारी संस्था सुरु करणे खूप सोपे असते आणि त्यामध्ये अनेक किचकट प्रक्रिया नसतात.
 • पतसंस्था ह्या खेड्यामध्ये, निमशहरी भागामध्ये किंवा शहरामध्ये कार्यरत असू शकतात आणि या संस्था छोटा मोठा आर्थिक पुरवठा करण्याचे काम करत असतात.
 • पतपेढी ह्या संस्था भारतीय सहकारी कायदा १९१२ नुसार ४३ व्या कलमानुसार सहकारी तत्वावर अवलंबून आहे आणि हि संस्था सदस्यांच्या आर्थिक हितासाठी काम करते.
 • पतपेढी ह्या संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एक लाख चाळीस हजारपेक्षा अधिक संस्था आहेत.
 • पतपेढी हा एक वर्गातील लोकांचा स्वतंत्र्य गट आहे जो अशा लोकांच्या संयुक्त मालकीच्या आणि लोकशाही पद्धतीने नियंत्रित आहे.
 • उत्पादक आणि विक्रेते समाजाचे सदस्य असल्यामुळे बुडीत कर्जाचा धोका खूप कमी असतो.
 • सहकारी संस्थांना त्यांच्या सर्व सभासदांना त्यांचे भांडवल योगदान विचारात ना घेता प्रत्येक सदस्याला मंडळासाठी मतदान करण्याचा समान हक्क असतो.
 • यामध्ये अनेक सभासद असल्यामुळे आणि प्रतिभांचा अभाव असल्याने मतांच्यामधील मतभेदांच्यामुळे सदस्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शकता असते.
 • जर तुम्हाला सहकारी पतसंस्थेची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या सहकारी पतसंस्थेची नोंदणी सहकारी संस्था कायदा १९६० नुसार करावी लागते.

पतपेढी किंवा पतसंस्थेची नोंदणी साठी आवश्यक पात्रता निकष आणि पुरावे

जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची संस्था सुरु करायची असल्यास त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात, तसेच पतपेढी किंवा पतसंस्था सुरु करायचे असल्यास काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात आणि पुरावे देखील पुरवावे लागतात.

 • या प्रकारची कोणतीही संस्था सुरु करताना यामध्ये कमीत कमी ५० सदस्य असणे आवश्यक असते.
 • पत शिल्लक आहे हे सिध्द करण्यासाठी बँकेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • पतपेढी या संस्थेच्या मंडळामध्ये कमीत कमी ७ ते ८ आणि जास्तीत जास्त २१ सदस्य असावे लागतात.
 • पूर्व नोंदणीची तपशील आणि प्रत असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सदस्य, भांडवल आणि मंडळ या सर्व गोष्टीची माहित असणे आवश्यक असते.
 • कोणत्याही नोंदणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र हे गरजेचे असते आणि तसेच पतपेढी किंवा पतसंस्थेच्या नोंदणीसाठी देखील ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक असते.

आम्ही दिलेल्या patpedhi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पतपेढी विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या patpedhi rules in marathi या patpedhi rules and regulations in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि Sahakari patpedhi information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Patpedhi information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!