5 प्रकारच्या पाव भाजी रेसपी Pav Bhaji Recipe In Marathi

pav bhaji recipe in marathi भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे विविध भाषांचे, विविध संस्कृतींचे लोक आहेत. त्यामुळे इथली खाद्य संस्कृती पण जरा हटके आहे. भारतीय पाककृतीमध्ये विविध प्रकारचे प्रादेशिक आणि पारंपारिक पाककृती आहेत. “Foodies” साठी भारत ही एक पर्वणी म्हंटलं तरी चालेल. अनेक स्वादिष्ट पदार्थामधला एक पदार्थ म्हणजे “पाव भाजी”. pav bhaji in marathi पाव भाजी ही भारतामधली फेमस फास्ट फूड डिश आहे. असं म्हणतात कि पाव भाजी मुंबईची आहे, मुंबईतील कापड गिरणी कामगारांसाठी कमी वेळेत पौष्टिक जेवण मिळावं यासाठी पाव भाजीचा जन्म झाला.

pav-bhaji-recipe-in-marathi
pav bhaji kashi banavtat

5 पाव भाजी pav bhaji recipe in marathi

मुंबई सोबतच भारतातील इतर ठिकाणी हि पण भाजी खूप फेमस झाली आहे. आणि भारतातच काय तर भारता बाहेर हि अस्सल (Authentic) पाव भाजी फेमस आहे. अनेक Restaurant मध्ये नाष्ट्यासाठी आणि जेवण म्हणून पण पाव भाजी सर्व्ह केली जाते. आजकाल पाव भाजीचे विविध प्रकार मिळतात. जसे कि बटर पाव भाजी, चीझ पाव भाजी, पनीर पाव भाजी, जैन पाव भाजी, खडा पाव भाजी, काठियावाडी पाव भाजी आणि पंजाबी पाव भाजी.

राज्यमहाराष्ट्र
पर्यायी नाव
रंगलाल
नाश्ताहो (brunch)
जेवणहो
शाकाहारीशुद्ध शाकाहारी
मांसाहारीनाही
प्रसंग(रोज) मागणीनुसार..

1.पाव भाजी रेसिपी/ बटर पाव भाजी: (pav bhaji recipe in marathi)

साहित्य :

भाज्या उकडवण्यासाठी:

  • फ्लॉवर २०० ग्रॅम, गाजर १ कप, बीट १/२ कप, शिमला मिरची १, मटार १ कप, मीठ चवीप्रमाणे.

भाजी बनवण्यासाठी:

  • १ मोठा चमचा तेल, बटर १५० ग्रॅम, जिरे १ चमचा, १ मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, मध्यम कांदे बारीक कापून २, बारीक कापलेले टोमॅटो ४, उकडवलेले बटाटे ३, लाल तिखट १ मोठा चमचा, हळद १ चमचा, पाव भाजी मसाला ३ मोठे चमचे, एका लिंबूचा रस, कोथिंबीर.

पाव बनवण्यासाठी:

  • बटर  2 चमचे , ½ चमचा  पाव भाजी मसाला किंवा लाल तिखट , पाव

कृती: how to make pav bhaji recipe in marathi

  • भाज्या उकडवण्यासाठी:
  1. कुकरमध्ये फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची, बीट, मटार, मीठ (भाज्यांसाठी लागेल इतकंच) आणि फक्त भाज्या बुडतील इतकं पाणी घेऊन ५ शिट्ट्या येऊ द्या.
  2. भाज्या नीट शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडवलेले बटाटे घालून मॅशरने बारीक करून घ्या.
  • भाजी बनवण्यासाठी:
  1. एका कढई मधे तेल आणि बटर मध्यम आचेवर गरम करून घ्या.
  2. बारीक कापलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा, त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला.
  3. टोमॅटो घाला आणि सतत ३-४ मिनिटे परतवून घ्या.
  4. बटाटे आणि इतर भाज्यांचे मिश्रण घाला.
  5. त्यानंतर लाल तिखट आणि पाव भाजी मसाला घालून परतवून घ्या.
  6. त्यानंतर हळद आणि बटर घालून परतावा.
  7. गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून परतवून घ्या.
  8. बटर आणि चवीपुरतं मीठ घालून परतवून घ्या.
  9. अजून थोडे पाणी घालून ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या.
  10. त्यानंतर लिंबू रस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • पाव बनवण्यासाठी:
  1. एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यामध्ये थोडे लाल तिखट घाला.
  2. त्यावर पाव ठेवून चांगले टोस्ट करून घ्या.
  3. पाव भाजीवर बटर, कांदा आणि लिंबू घालून सर्व्ह करा गरम गरम पाव भाजी!!!

2.अमूल पाव भाजी रेसेपी: amul pav bhaji recipe in marathi

वरील सर्व कृती व साहित्य वापरून पावभाजी बनवा, व त्यामध्ये अमूल बटर टाका.

3.पनीर पाव भाजी: paneer pav bhaji recipe in marathi

साहित्य :

  • पनीर ४०० ग्रॅम, फ्लॉवर २०० ग्रॅम, गाजर १ कप, बीट १/२ कप, शिमला मिरची १, मटार १ कप, मीठ चवीप्रमाणे, १ मोठा चमचा तेल, बटर १५० ग्रॅम, जिरे १ चमचा, १ मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, मध्यम कांदे बारीक कापून २, बारीक कापलेले टोमॅटो ४, उकडवलेले बटाटे ३, लाल तिखट १ मोठा चमचा, हळद १ चमचा, पाव भाजी मसाला ३ मोठे चमचे, एका लिंबूचा रस, कोथिंबीर, पाव, बटर,पाव भाजी मसाला, गरम मसाला, कोथिंबीर.

कृती: pav bhaji kashi banavtat

  1. एका कढई मधे तेल आणि बटर मध्यम आचेवर गरम करून घ्या.
  2. बारीक कापलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा, त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला.
  3. टोमॅटो घाला आणि सतत ३-४ मिनिटे परतवून घ्या.
  4. त्यानंतर लाल तिखट आणि पाव भाजी मसाला घालून परतवून घ्या.
  5. उकडवलेल्या भाज्या आणि चवीनुसार मीठ, हळद, कोथिंबीर आणि पाव भाजी मसाला घालून मिक्स करा, आणि ४ ते ५ मिनिटे शिजवा.
  6. त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालून ३ ते ४ मिनिटे अजून शिजवून घ्या.
  7. पनीर किसून घ्या आणि अजून ४ ते ५ मिनिटापर्यंत परतवून घ्या.
  8. आता गरम मसाला, लिंबू रस, कोथिंबीर आणि बटर घालून सर्व्ह करा.
  • पाव बनवण्यासाठी:
  1. एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यामध्ये थोडे लाल तिखट घाला.
  2. त्यावर पाव ठेवून चांगले टोस्ट करून घ्या.
  3. आणि गरम पाव भाजी कांदा, बटर आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

4.चीझ पाव भाजी रेसिपी: cheese pav bhaji recipe in marathi

साहित्य:

  • फ्लॉवर २०० ग्रॅम, फरसबी १/२ कप, गाजर १ कप, बीट १/२ कप, शिमला मिरची १, मटार १ कप, मीठ चवीप्रमाणे, १ मोठा चमचा तेल, बटर १५० ग्रॅम, जिरे १ चमचा, १ मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, मध्यम कांदे बारीक कापून २, बारीक कापलेले टोमॅटो ४, उकडवलेले बटाटे ३, लाल तिखट १ मोठा चमचा, हळद १ चमचा, पाव भाजी मसाला ३ मोठे चमचे, एका लिंबूचा रस, कोथिंबीर, पाव, बटर,पाव भाजी मसाला, गरम मसाला, कोथिंबीर, चीझ क्यूब ३-४.

कृती: pav bhaji kashi banvaychi

  • १ कप पाण्यामध्ये बटाटे, फ्लॉवर, गाजर, मटार, शिमला मिरची, फरसबी आणि टोमॅटो शिजवा. मिठ घालावे.
  • एकदा भाज्या शिजल्या कि थंड होऊ द्या आणि चांगले मॅश करा.
  • एका पॅनमध्ये बटर आणि तेल गरम करा. बारीक कापलेले कांदे, हिरव्या मिरच्या घाला.
  • सर्वकाही व्यवस्थित होईपर्यंत परतवून घ्या. मध्यम आचेवर ५ मिनिटांसाठी ठेवा.
  • लाल तिखट, हळद, पाव भाजी मसाला घाला आणि तेल बाजूला होईपर्यंत शिजवून घ्या.
  • नंतर मॅश केलेल्या भाज्या आणि चवीपुरत मीठ घाला आणि सर्वकाही एकत्र करा.
  • त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालून ३ ते ४ मिनिटे अजून शिजवून घ्या.
  • पाव बनवण्यासाठी:
  1. एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यामध्ये थोडे लाल तिखट घाला.
  2. त्यावर पाव ठेवून चांगले टोस्ट करून घ्या.
  3. आणि गरम पाव भाजी कांदा, बटर, कोथिंबीर आणि त्यावर किसलेले चीज घालून सर्व्ह करा.

5.पाव भाजी मसाला रेसिपी: (pav bhaji masala recipe in marathi)

साहित्य:

  • मोठी वेलची १, तमालपत्र १, धणे ४ चमचे, जिरे २ चमचे, मिरी १ चमचा, बडीशेप ३/४ चमचे, सुक्या लाल मिरच्या १४-१५, हळद १ छोटा चमचा, दालचिनी १-२, लवंगा ५-६, आमचूर पावडर १ चमचा, मीठ आवश्यकतेनुसार.

कृती: pav bhaji kashi karaychi

  1. पॅन मध्यम आचेवर गरम करा.
  2. धणे , मोठी  वेलची, लवंगा, दालचिनीच्या काड्या, मिरी, जिरे, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या आणि बडीशेप घाला.
  3. मसाल्यांचा सुगंध येऊपर्यंत सुके परतवून घ्या.
  4. मसाल्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या.
  5. बारीक वाटून घ्या आणि वाटताना त्यामध्ये मीठ, हळद आणि आमचूर पावडर घाला.
  6. पाव भाजी मसाला तयार आहे.

आम्ही दिलेल्या पाव भाजी रेसेपी या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाव भाजी रेसेपी या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pav bhaji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pav bhaji in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर how to make pav bhaji recipe in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!