गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा Pcpndt Act in Marathi

pcpndt act in marathi गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये पीसीपीएनडीटी कायदा (PC-PNDT act) म्हणजेच गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा म्हणजेच PC-PNDT चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप ही pre – conception and pre natal diagnostic techniques act असे म्हणतात. गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा हा १९९४ मध्ये भारतीय संसदेणे संपूर्ण भारतामध्ये लागू केला आणि हा कायदा लागू करण्याचा मुख्य उद्देश हा स्त्री भ्रुनहत्या थांबवण्यासाठी आणि देशातील घटत्या लिंग गुणवत्तेला रोखण्यासाठी हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला.

त्याचबरोबर हा कायदा लागू होताच या कायद्याची मदत घेवून कायद्याने जन्मपूर्व लिंग निर्धारावर बंदी घातली. गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा हा २० सप्टेंबर १९९४ मध्ये याला संमती मिळाली आणि मग हा कायदा १ जानेवारी १९९६ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला.

या कायद्यानुदार ज्या वेळी एखादे पालक आपल्या बाळाचे लिंग आईच्या पोटामध्ये असताना कोणते आहे हे तपासतात आणि अवच्छित लिंग असेल तर ते काढून टाकतात तसेच जे डॉक्टर कोणते लिंग आहे ते तपासतात आणि ते लिंग काढून टाकण्यास मदत करतात. अश्या प्रकारे संबधित पालक आणि डॉक्टर हे या कायद्यानुसार गुन्हेगार असू शकतात. चला तर आता आपण गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याविषयी माहिती खाली पाहूया.

pcpndt act in marathi
pcpndt act in marathi
अनुक्रमणिका hide
1 गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा – Pcpndt Act in Marathi

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा – Pcpndt Act in Marathi

कायद्याचे नावगर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा
केंव्हा मंजूर झाला२० सप्टेंबर १९९४
केंव्हा लागू केला१ जानेवारी १९९६
कोणी लागू केलाभारतीय संसदेने

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा म्हणजे काय ? – pcpndt act 1994 in marathi pdf free download

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र हा कायदा १९९४ मध्ये मंजूर झाला आणि हा कायदा १९९६ मध्ये लागू करण्यात आला आणि हा कायदा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्त्री भ्रुनहत्या थांबवण्यासाठी आणि देशातील घटत्या लिंग गुणवत्तेला रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.

पीसीपीएनडीटी चे पूर्ण स्वरूप – pcpndt full form in marathi

पीसीपीएनडीटी या कायद्याला मराठीमध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा म्हणून ओळखले जाते आणि या कायद्याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप – conception and pre natal diagnostic techniques act असे आहे.

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याची वैशिष्ठ्ये – features of PCPNDT act 

हा कायदा स्त्रियांच्या वरील भेदभाव आणि मुलांना प्राधान्य दिल्यामुळे स्त्री भ्रुनहत्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि हि समस्या समाजातून दूर करण्यासाठी हा कायदा लागू केला. या कायद्याची काही वैशिष्ठ्ये आता आपण खाली पाहूया.

  • गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र या कायद्यानुसार प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीसह कोणतीही व्यक्ती गरोदर स्त्रीला किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकांना कोणत्याही प्रकारे गर्भाच्या लिंगाची माहिती दिली नाही पाहिजे नाही तर तो कायद्याने गुन्हा असू शकतो.
  • जर एखादी व्यक्ती जी पूर्व म्हणजेच जन्मपूर्व आणि गर्भधारणा पूर्व लिंग निर्धारण सुविधांच्यासाठी परिपत्रक, लेबल, सूचना किंवा कोणत्याही कागदपत्राच्या स्वरुपात जाहिरात करते किंवा किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट स्वरुपात जाहिरात करते.
  • हा कायदा अल्ट्रासाऊंड आणि अम्निओसेन्टेसीस सारख्या प्री नॅटल डायग्नोस्टीक तंत्राच्या वापराचे नियंत्रण करते.
  • गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र या कायद्यानुसार गर्भधारणेपूर्वी आणि किंवा नंतर लिंग निवडीवर बंदी घालण्यात आली आहे.
  • या प्रकारचा गुन्हा जर केला तर त्या संबधित व्यक्तीला ३ वर्ष तुरुंगवास ची शिक्षा आणि १०००० रुपये दंड होऊ शकतो आणि काही वेळा त्या व्यक्तीला दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याचे उद्दिष्ठ

  • हा कायदा लागू करण्याचा मुख्य उद्देश हा स्त्री भ्रुनहत्या थांबवण्यासाठी आणि देशातील घटत्या लिंग गुणवत्तेला रोखण्यासाठी हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला.
  • पूर्वीच्या काळी मुलांना खूप महत्व होते आणि मुले हि वंशाचा दिवा म्हणून त्याला प्राधान्य दिले जायचे आणि मुलींच्यावर अन्याय केले जायचे आणि ह्या कारणामुळेच अनेक कुटुंबामध्ये मुलगा जन्माला येईपर्यंत मुले निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु असायची पण यामुळे लोकसंखेमध्ये वाढ होत होती आणि हि वाढती लोकसंख्या कमी करण्यासाठी ह्या कायद्याची निर्मिती झाली.
  • ज्यावेळी अल्ट्रासाऊंड तंत्राचा वापर होत होता त्यावेळी अनेक पालक आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बलाचा लिंग तपासत होते आणि अवच्छित लिंग असेल तर काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि हे थांबवण्यासाठी देखील या कायद्याचा जन्म झाला.
  • तसेच मुलगा आणि मुलगी यामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात भेदभाव होत होते आणि या मुळे स्त्री भ्रुनहत्या ह्या मोठ्या प्रमाणात होत होत्या त्या थांबवण्यासाठी हा कायदा लागू केला.

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न – questions 

  • गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्यानुसार गुन्हेगार कोण ?

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र या कायद्यानुसार ज्या वेळी एखादे पालक आपल्या बाळाचे लिंग आईच्या पोटामध्ये असताना कोणते आहे हे तपासतात आणि अवच्छित लिंग असेल तर ते काढून टाकतात तसेच जे डॉक्टर कोणते लिंग आहे ते तपासतात आणि ते लिंग काढून टाकण्यास मदत करतात असे लोक या कायद्यानुसार गुन्हेगार असतात. हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षासाठी तुरुंगवास होऊ शकतो तसेच त्या व्यक्तीला १०००० रुपये दंड होऊ शकतो किंवा मग काही वेळा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

  • गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा कोणी व केंव्हा लागू केला ?

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा ( PC-PNDT ) हा कायदा भारतीय संसदेने सप्टेंबर १९९४ मध्ये मंजूर केला आणि हा कायदा १ जानेवारी १९९६ मध्ये संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला.

  • पीसीपीएनडीटी ( PC-PNDT ) नोंदणी म्हणजे काय ?

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे आणि पीसीपीएनडीटी नोंदणी प्रमाणपत्र हे दवाखान्याचे रिसेप्शन एरियामध्ये आणि USG रुममध्ये प्रदर्शित करणे खूप आवश्यक असते.

आम्ही दिलेल्या pcpndt act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pcpndt act 1994 in marathi pdf free download या article मध्ये update करू, मित्रांनो हि pcpndt act 1994 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!