वैयक्तिक कर्ज माहिती Personal Loan Information in Marathi

personal loan information in marathi वैयक्तिक कर्ज म्हणजे काय? सध्या लोक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी बँकेकडून किंवा सावकारांच्या कडून कर्ज घेतात त्यामध्ये होम लोन प्रकारचे कर्ज असते, शिक्षण कर्ज घेतात, सोने तारण कर्ज घेतात तसेच पर्सनल कर्ज देखील घेतात आणि त्याचा वापर हा आपली महत्वाची कामे करण्यासाठी केला जातो. आज आपण या लेखामध्ये पर्सनल लोन विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत.

वैयक्तिक कर्ज किंवा ज्याला इंग्रजी मध्ये पर्सनल लोन म्हणतात जे आपल्याला बँकेकडून कर्ज स्वरूपामध्ये मिळते आणि या लोन मधून मिळालेली रक्कम हि तुम्ही वेगवेगळ्या करणांच्यासाठी वापरली जाऊ शकते जसे कि लग्न खर्चासाठी, घराची डागडुजी किंवा घराची दुरुस्ती करून घेण्यासाठी किंवा घराच्या नूतनीकरणासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी असे अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वैयक्तिक कर्जाचा उपयोग होऊ शकतो.

वैयक्तिक कर्ज हे वैयक्तिक कर्ज बँका, क्रेडीट युनियन किंवा ऑनलाईन कर्जाद्वारे देऊ केले जाऊ शकते आणि तुम्ही या कर्जामार्फत घेतलेले पैसे हे ठरवलेल्या काळ संपल्यानंतर व्याजासह परत करणे आवश्यक असते. चला तर खाली आपण वैयक्तिक कर्जाविषयी सविस्तर माहिती घेवूया.

personal loan information in marathi
personal loan information in marathi

वैयक्तिक कर्ज माहिती मराठी – Personal Loan Information in Marathi

वैयक्तिक कर्ज म्हणजे काय ?

वैयक्तिक कर्ज हे एक प्रकारचे असुरक्षित कर्ज आहे. जे कर्जदाराला कर्ज घेतलेल्या रकमेवर कोणताही तारण ना देता दिले जाते. प्रत्येक कर्जदार ज्यासाठी पात्र आहे त्या कर्जाची रक्कम त्यांच्या उत्पन्नावर आणि परतफेडीच्या क्षमतेनुसार बदलते.

वैयक्तिक कर्जाविषयी महत्वाची माहिती – personal loan in marathi

 • वैयक्तिक कर्ज हे अशे कर्ज आहे जे अनेक वैयक्तिक खर्च देखील कव्हर करू शकतात आणि या प्रकारचे कर्ज तुम्ही बँका, क्रेडीट युनियन किंवा ऑनलाईन कर्जाद्वारे घेऊ शकता.
 • वैयक्तिक कर्जे हे त्यांच्या व्याजदर, शुल्क, रक्कम आणि परतफेडीच्या अटींच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
 • वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे बँकेवर किंवा सावकारावर अवलंबून असतात आणि वैयक्तिक कर्जाचा कालावधी देखील त्या संबधित बँकेवर आधारित असतो.
 • कर्ज घेण्यसा पात्र असलेली कर्जाची रक्कम हि त्यांच्या मासिक उत्पन्नावर आधारित असते. कर्जाच्या रकमेची गणना करताना बहुतेक बँका किमान ५०००० रुपये कर्जाची रक्कम देतात.

वैयक्तिक कर्जाची वैशिष्ठ्ये आणि फायदे – features and benefits

 • वैयक्तिक कर्ज प्रकारामध्ये कर्जाची रक्कम हि ४० लाख रुपये इतकी असते जी बँकेनुसार बदलू शकते.
 • वैयक्तिक कर्ज हे आपण कमी कागदपत्रांमध्ये मिळवू शकतो म्हणजेच याला जास्त कागदपत्रे लागत नाहीत.
 • वैयक्तिक कर्जामधून मधून मिळालेली रक्कम हि तुम्ही वेगवेगळ्या कारनांच्यासाठी वापरली जाऊ शकते जसे कि लग्न खर्चासाठी, घराची डागडुजी किंवा घराची दुरुस्ती करून घेण्यासाठी किंवा घराच्या नूतनीकरणासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी असे अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वैयक्तिक कर्जाचा उपयोग होऊ शकतो.
 • उत्कृष्ट क्रेडीट प्रोफाईल असलेले अर्जदार तत्काळ वितरणासह पूर्व मंजूर किंवा पूर्व पात्र वैयक्तिक कर्जासाठी देखील पात्र होऊ शकतात.
 • या कर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे अंतिम वापराचे प्रतिबंध नाहीत.  

वैयक्तिक कर्ज पात्रता – eligibility

कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी आपल्याला त्या संबधित बँकेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तरच आपल्याला कर्ज मिळू शकते आणि वैयक्तिक कर्ज घेताना देखील संबधित व्यक्तीला काहीतरी पात्रता निकष पार पाडावे लागतात ते आपण आता खाली पाहणार आहोत. जोपर्यंत तुम्ही खाली दिलेले पात्रता निकष पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकत नाही.

पात्रता निकष

 • जो व्यक्ती वैयक्तिक कर्ज घेणार आहे तो भारतीय नागरिक असला पाहिजे.
 • तसेच त्या संबधित व्यक्तीचा मासिक पगार हा २२००० रुपये इतका असला पाहिजे हे तप राहणाऱ्या शहरावर देखील आधारित असू शकते.
 • वैयक्तिक कर्ज घेणारा संबधित व्यक्ती हा कमीत कमी २१ वर्षाचा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त तो ६७ वर्षाचा असला पाहिजे.
 • तसेच तो व्यक्ती सार्वजनिक, खाजगी किंवा नियोजित संस्थेमध्ये कामाला असणे आवश्यक आहे.

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – documents

कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे बँकेमध्ये किंवा सावकाराकडे जमा करावी लागतात तसेच आपल्याला वैयक्तिक कर्ज घेताना देखील काही कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावी लागतात आणि ती कोणकोणती आहेत ते आपण खाली पाहूया.

 • ओळखीचा पुरावा  किंवा केवायसी कागदपत्रे ( आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड ).
 • रहिवासी पुरावा ( ड्रायव्हर परवाना किंवा लाईट बिल ).
 • कर्मचारी ओळखपत्र.
 • मागील तीन महिन्याच्या पगाराची स्लीप.
 • मागील तीन महिन्याचे बँक खाते विवरण.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा / प्रक्रिया – how to apply / process

 • वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रथम त्या संबधित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि मग अर्ज करा वर क्लिक करा.
 • आता त्यानंतर तुमचा १० अंकी मोबईल नंबर एंटर करा आणि तुमच्या फोनवर पाठवलेला ओटीपी (OTP) सत्यापित करा.
 • आता तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, पॅन आणि पिनकोड या सारखी सर्व मुलभूत तपशील भरा.
 • नंतर कर्ज निवड पृष्ठाला भेट देण्यासाठी प्रोसीडवर क्लिक करा.
 • आता तुम्हाला आवश्यक असलेली कर्जाची रक्कम प्रविष्ट करा तसेच नंतर परतफेड कालावधी निवडा आणि हा कालावधी बँकेनुसार बदलू शकतो.
 • आता तुमचा सर्व केवायसी पूर्ण करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

आम्ही दिलेल्या personal loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वैयक्तिक कर्ज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या personal loan in marathi या मध्ये update करू, मित्रांनो हि information about personal loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!