कबुतर पक्षाबद्दल माहिती Pigeon Information In Marathi

pigeon information in marathi नमस्कार मित्रांनो, तंत्रज्ञान आणि इंटरनेट च्या जाळ्याने वेढलेल्या या युगात आपण जर मोबाईल फोन थोडा वेळ बाजूला ठेऊन पाहिले तर आपल्याला आजूबाजूचा निसर्ग ,प्राणी पक्षी दिसतील. त्या पक्षांमध्ये तुम्हाला गुटर गुं असा आवाज कानी पडेल. त्यालाच कबुतर म्हणून आपण सर्व जण ओळखतो. कबुतराला पारवा म्हणूनही संबोधले जाते. पण कबुतर आणि पारव्या मधे फरक आहे. जर हा सफेद रंगाचा असेल तर त्याला कबुतर म्हणतात नाहीतर पारवा.
या जगात तशा ३४४ कबुतरांच्या प्रजाती आहेत. त्यातील ५० उपप्रजाती आहेत. मुख्य प्रजाती पैकी १३ प्रजाती लोप पावल्या आहेत.

pigeon-information-in-marathi
कबूतर या पक्षाबद्द्ल संपूर्ण माहिती

कबुतरांची रचना व माहिती !  (Pigeon information in Marathi)

कबुतर हे साधारणतः ३२ सेंटिमीटर चे असते वा त्याचे वजन हे जास्तीत जास्त ९०० ग्रॅम पर्यंत असू शकते. परंतु काही कबुतरं १५ ते ७५ सेंटिमीटर या दरम्यान देखील असते व वजन ३० ते २००० ग्रॅम पर्यंत असू शकते. आतापर्यंत न्यू गिनी नावाचे कबुतर हे सर्वात मोठे कबुतर म्हणून नोंदले गेले आहे. याचे वजन हे २-४ किलोग्रम असून ते टर्की पक्षासारखे दिसते. त्याचबरोबर सर्वात लहान कबुतर हे अगदी चिमणीच्या आकाराचे असून २२ ग्रॅम वजनाचे असते. कबुतर हे निळ्या राखाडी रंगाचे असते. त्याच्या पखांवर दोन काळया पट्ट्या असून पंखाखाली सफेद रंग असतो. शेपटाचा भाग ही काळा असतो. चोच काळी असते. मानेवर हिरवी जांभळी चमकदार २-४ छोटी छोट वर्तुळे दिसून येतात. कबुतराचे डोळे आणि पाय हे लाल रंगाचे असतात. हा पक्षी दिसायला अगदीं सुंदर व कापसा सारखा मऊ असतो. कबुतराची पिसे ही खूप घनदाट असतात. आणि ती त्वचेला अगदी अलगद रुतलेली असतात. जास्त पिसांच्या घनतेमुळे कबुतरांचे शिकारी भक्षकांकडून संरक्षण होते. जेव्हा इतर शिकारी कबुतरांची शिकार करण्यासाठी येतो तेंव्हा त्याच्या तोंडा मोठ्या प्रमाणात फक्त पिसे राहतात आणि कबुतराला आपली सुटका करून घेणे सोपे जाते. कबुतराला ४० पित्ताशय असतात. आणि ११ प्राथमिक पिसे असतात. कबुतरांच्या स्नायूंचे वजन हे शरीराच्या संपूर्ण वजनाच्या ३१-४४% असते. अशा रचनेमुळे कबुतराला उड्डाण अगदी नीट करता येते. कबुतरांच्या धीर गंभीर गुटर गु बरोबरच पंखांच्या फळफडण्याचा आवाज ही त्याच्या असण्याचा पुरावा देऊन जातो.

कबुतराचे आढळस्थान! (Pigeons Spot)

सर्वप्रथम चार्ल्स डार्विन या जीव शास्त्रज्ञाने कबुतर या पक्षावर अध्ययन केले आहे. हा पक्षी माणसाळलेला पक्षी आहे. तसेच हा शाकाहारी असून मानवी वस्त्यांच्या आसपास घरांच्या कपारीत किंवा इतर पक्षांच्या घरट्यात राहतो. कबुतराचे शास्त्रीय नाव कोलंबा लिव्हिया असते. संस्कृत मध्ये कबुतराला कपोत असे म्हणतात. कोलंबा लिव्हीया डोमेस्टिका ही कबुतरांची माणसाळलेली जात आहे. युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडात तसेच उष्ण प्रदेशात कबुतर आढळतात. याबरोबरच महासागरातील बेटे, पूर्विय पोलीनेशिया, अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात कबुतर हा पक्षी आढळतो. पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर कबुतरांची एकही प्रजाती पाहायला मिळत नाही. बहुधा कबुतर ज्वारी, हरभरे, शेंगदाणे असे पदार्थ खाते. अटलांटिक महासागराकडील बेटांवर राहणारा पफ्फिन पक्षी सुद्धा पहिला असेलच.

कबुतराचे विशेष वैशिष्ट्य! (A Feature of the Pigeon)

कबुतरांचा प्रजननाचा काळ हा वर्षभर चालतो. आणि कबुतर हे एकावेळी दोनच अंडी देते. कबुतरांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पिलांना मोठे करताना किंवा त्यांचे संगोपन करताना नर आणि मादी दोघेही आपल्या पोटात तयार झालेला पातळ स्त्राव पिल्लांना भरवतात. तेच पिलांसाठी प्रथम अन्न असते. जसे आई आपल्या बाळाला स्तनपान करते अगदी तसेच काहीसे हे आहे. अशाप्रकारे कबुतरांची पिल्ले १०-१४ दिवसात मोठी होतात. व ५ आठवड्यात उडू ही लागतात. कबुतर आपले घरटे बनवण्यासाठी काड्या, झाडांच्या छोट्या फांद्या, यांचा वापर करते. आणि प्रजाती अनुसार कबुतर आपले घरटे हे जमिनीवर, झाडांवर, इमारतींच्या कोपऱ्यात बनवते.

कबुतराचे महत्व! (The importance of Pigeons)

कबुतर हे शांतीच प्रतीक मानलं जातं. कबुतरांमध्ये एक विशिष्ठ क्षमता असते. कबुतर दिशा ओळखण्यात अगदी तरबेज असतात. अगदी कबुतरांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून एका अज्ञात स्थळी सोडले तरी न चुकता पूर्वीच्या योग्य ठिकाणी परत येऊ शकते. कबुतरांच्या या क्षमतेचा मोठ्या प्रमाणात वापर पूर्वीच्या काळापासून करण्यात आला आहे. तसेच संदेश वहनासाठी सुद्धा कबुतरांचा उपयोग केला जायचा. पूर्वीच्या काळी सैनिक आपल्या दूरवर असलेल्या टोळीला संदेश पोहचवण्यासाठी कबुतरांचा वापर करत असे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात कबुतरांचा खूप उपयोग झाला. अमेरिकन सैन्य व पोलीस यांना संदेश पोहचवण्यासाठी , गुप्त माहितीचे अदान प्रदान करण्यासाठी कबुतरांनी बरीच मदत केली. घोड्यावरून ही माणसे संदेश पोहचवण्यासाठी काम करत असत पण कबुतरांद्वारे केले जाणारे संदेश वहन अगदी जलद गतीने होत होते. त्यामुळे महायुध्दाच्या काळात कित्येक जणाचे प्राणही वाचले आहेत. अशा कामगिरी मुळे त्या काळात काही कबुतरांना विशेष सन्मानाने पुरस्कार ही दिले गेले आहेत. त्यापैकीच लेव्ही नावाच्या अमेरिकन सैनिकांचं कबुतर होत ज्याला अशाच एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जे ६ वर्षे जगले. कबुतरे ही पाळली देखील जातात. त्यांच्या निरनिराळ्या स्पर्धा होत असतात. त्यामुळे अशा कबुतरांचा व्यापार ही मोठ्या प्रमाणात होतो. अशाप्रकारे असा हा गोंडस आणि सुंदर असा पक्षी माणसाची खूप युगांपासून जवळचे नाते ठेऊन आहे. 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा कबुतर पक्षी कसा आहे त्याची रचना व त्याचे जीवन कसे आहे. pigeon information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही कबुतर या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
information about pigeon in marathi आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “कबुतर पक्षाबद्दल माहिती Pigeon Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!