पोहा चिवडा कसा बनवतात ? Poha Chivda Recipe in Marathi

Poha Chivda Recipe in Marathi पोहा चिवडा रेसिपी पोहा चिवडा हा एक फराळाचा प्रकार आहे जो दिवाळीमध्ये किंवा आपल्याला जेंव्हा खावेसे वाटते तेंव्हा आपण बनवू शकतो. चिवडा हा पदार्थ आपण संध्याकाळच्या चहा सोबत स्नॅक्स महणून देखील खावू शकतो. चिवडा हि अशी एक फराळी डिश आहे जी लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते आणि हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनू शकतो. पोहा चिवडा हे भारतातील एक लोकप्रिय स्नॅक्स आहे जे भारतामध्ये कित्येक ठिकाणी बनवले जाते.

पोहा चिवडा हि रेसिपी पातळ पोहे वापरून बनवली जाते आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे हि रेसिपी बनवताना पोहे उन्हामध्ये वाळवून ते चांगले निवडून घेतले जातात आणि मग बनवतेवेळी ते एक भांड्यामध्ये घेतले जाते आणि त्यामध्ये सर्व साहित्य तळून टाकले जाते आणि मग ते सर्व साहित्य मिक्स करून चिवडा गॅसवर गरम केला जातो. चला तर मग झटपट म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनणारा पोहा चिवडा कसा बनवायचा ते आता आपण या लेखामध्ये पाहूयात.

poha chivda recipe in marathi
poha chivda recipe in marathi

पोहा चिवडा कसा बनवतात – Poha Chivda Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पोहा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients

  • पातळ पोहे : आपल्याला बाजारामध्ये पोहा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे मिळतात आणि हा घटक चिवडा बनवण्यासाठी महत्वाचा घटक असतो. चिवड्याच्या पोह्यामध्ये सर्व साहित्य घालून ते मिक्स करून तो चिवडा गरम केला जातो.
  • चिवडा मसाला : चिवड्यामध्ये जर आपण चिवडा मसाला घातला तर आपण चिवड्याला चांगली टेस्ट येते आणि चिवडा खमंग लागतो.
  • हिरवी मिरची : चिवड्यामध्ये हिरव्या मिरच्या घालण्याचे कारण म्हणजे त्यामुळे चिवड्याला तिखटपणा येतो.

पातळ पोहा चिवडा रेसिपी – patal poha chivda recipe

पातळ पोहा चिवडा हि एक फराळी रेसिपी आहे जी आपण केंव्हाही बनवू शकतो आणि स्नॅक्स म्हणून खावू शकतो. हा चिवडा आपण दिवाळीच्या फराळामध्ये देखील बनवू शकतो. पोहा चिवडा हा एक भारतीय प्रकार असून हा पदार्थ भारतीय लोक दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात बनवतात आणि हा पदार्थ दिवाळीच्या पदार्थातील एक महत्वाचा पदार्थ असतो.

कारण या पदार्थाशिवाय फराळाचे ताट पूर्ण होत नाही. पोहा चिवडा हा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा चिवडा खूप झटपट बनतो. चला तर आता आपण पोहा चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आणि तो कसा बनवतात ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पातळ पोह्याचा चिवडा बनवताना लागणारे साहित्य – ingredients needed to make patal pohe chivda 

पोहा चिवडा बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण पोहा चिवडा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ किलो पातळ पोहे.
  • २ चमचे चिवडा मसाला ( कोणताही वापरा ).
  • १ मोठी वाटी खोबरे तुकडे.
  • १ मोठी वाटी शेंगदाणे.
  • १ वाटी फुटाणा डाळ.
  • १ चमचा हळद.
  • २ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
  • ७ ते ७ कडीपत्ता पाने.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chivda recipe 

पोहो चिवडा हा बनवण्यासाठी खुप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये बनतो आणि तो आपण कधीही स्नॅक्स म्हणून खावू शकतो. मग वर दिलेले साहित्य वापरून पोहा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम पोहे चांगले निवडून घ्या आणि ते तासभर उन्हामध्ये घाला त्यामुळे ते चांगले तापतील आणि त्यामध्ये थोडा मऊ पणा असेल तर तो निघून जाईल.
  • मग ते पोहे एक भांड्यामध्ये काढून घ्या.
  • आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले कि त्यामध्ये शेंगदाणे, फुटाने आणि खोबरे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि ते पोह्यामध्ये टाका. आता १ मोठा चमचा तेलामध्ये हिरवी मिरची आणि हळद घालून ते पोह्यामध्ये घाला आणि ते हलवून घ्या.
  • मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि २ चमचे चिवडा मसाला घालून ते चांगले हलवा आणि ते ५ मिनिटे गॅसवर गरम करा.
  • तुमचा पातळ पोह्याचा चिवडा तयार झाला.

टिप्स (Tips) 

  • आपण चिवड्यामध्ये जे शेंगदाणे वापरतो ते शेंगदाणे अक्खे वापरले तरी चालतील किंवा शेंगदाण्याच्या पाकळ्या देखील वापरल्या तरी चालतात.
  • पोहा चिवड्यामध्ये काजु, बेदाणे यासारखे ड्रायफ्रुट्स देखील वापरले तरी चालतील.
  • चिवड्यामध्ये आमचूर पावडर देखील घातली तरी चालते त्यामुळे चिवड्याला थोडा आंबट पणा येतो.
  • पोहा चिवडा आपण हवाबंद डब्यामध्ये घालून २० ते २५ दिवस ठेवू शकतो.
  • पोहे उन्हामध्ये चांगले वाळवले तर ते कुरकुरीत बनतात त्यामुळे आपल्याला पोहे जास्त गरम करावे लागत नाहीत.

आम्ही दिलेल्या poha chivda recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पोहा चिवडा कसा बनवतात माहिती मराठी thick poha chivda recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या patal poha chivda recipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chivda recipe maharashtrian माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये diwali chivda recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!