pradhan mantri jeevan jyoti bima yojana information in marathi प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना माहिती आज आपण या लेखामध्ये प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) या विषयावर माहिती घेणार आहोत. सध्याच्या काळामध्ये म्हणजेच रोगराईच्या काळामध्ये तसेच या प्रदूषित वातावरणामध्ये आपले आरोग्य कधी बिघडेल हे सांगता येत नाही आणि आपल्याला दवाखान्याची पायरी केंव्हा चढवी लागले हे सांगता येत नाही म्हणून आपण आपल्या आरोग्या विषयक खर्च करण्यासाठी जर काही पैश्याची तरतूद किंवा कोणता तरी आरोग्य बिमा आपल्या नावावर उतरवून ठेवला तर काहीच चिंतेची बाब नाही आणि हेच लक्षात घेवून आपल्या देशाच्या सरकारने रुपये ३३० चा वार्षिक प्रीमियम भरून २ लाख रुपये रक्कम ( कव्हर ) देण्याची योजना सुरु केली.
या योजनेला प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) असे म्हणतात. प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना ( PMJJBY ) हि योजना केंद्र सरकारने सर्व स्थरावरील नागरीकांच्यासाठी ९ मे २०१५ मध्ये सुरु केलेली योजना आहे. हि योजना इतर विमादारांच्याकडून कडून लोकांना सुचवली जाते आणि या योजनेचा काळ १ जून ते ३१ मे इतका असतो आणि या योजनेतील विमाधारकाला वर्षाला ३३० रुपयांचा विमा भरावा लागतो आणि या विम्याच्या कव्हर हा २ लाख रुपये इतका आहे.
या प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेच लाभ घेण्यासाठी आपल्याकडे बँक खाते असणे खूप गरजेचे असते. एकूणच प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना हि सरकारने सुरु केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे आणि हि योजना आपल्याला भविष्य काळामध्ये आपले कुटुंब सुरक्षित करण्यासाठी मदत करते तसेच या योजनेच कव्हर हा त्या संबधित व्यक्तीचे अचानक अपघाती मृत्यू झाल्यानंतर मिळते.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Information in Marathi
योजनेचे नाव | प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना ( PMJJBY ) |
कोणी सुरु केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरु केली |
केंव्हा सुरु केली | ९ मे २०१५ |
कव्हर रक्कम | २ लाख रुपये |
प्रीमियम | वार्षिक ३३० रुपये |
लाभार्थ्यांचे वय | १८ ते ५५ वर्ष |
प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY) म्हणजे काय ?
प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना हि सरकारने सुरु केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी सर्व स्थरावरील नागरीकांच्यासाठी उपलब्ध आहे आणि या योजनेतील विमाधारकाला वर्षाला ३३० रुपयांचा विमा भरावा लागतो आणि या विम्याच्या कव्हर हा २ लाख रुपये इतका आहे.
प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY) केंव्हा व कोणी सुरु केली ?
प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना ( PMJJBY ) हि केंद्र सरकार ( मोदी सरकार ) यांनी ९ मे २०१५ या वर्षामध्ये सर्व स्थरावरील नागरीकांच्यासाठी सुरु केली.
प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेचे (PMJJBY) योजनेचे फायदे – benefits of PMJJBY
सरकारने सुरु केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ हा त्या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना असतोच अश्याच प्रकारे सरकारने प्रधन मंत्री जीवन ज्योती बिमा योजना देखील सुरु केली आणि या योजनेचा फायदा हा सर्व स्थरावरील नागरिकांना झाला. चला तर मग आता आपण या योजनेचे काही फायदे पाहूयात.
- प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा मुख्य फायदा म्हणजे या योजनेमध्ये वार्षिक ३३० रुपयाच्या प्रीमियम मध्ये आपल्याला २ लाख कव्हर विमा दिला जातो.
- अनेक विमा कंपनींचे प्रीमियम हे खूप जास्ती असतात म्हणजेच ते परवडणारे नसतात परंतु प्रधान मंत्री जीवन ज्योती विम्याचा प्रीमियम हा आपल्याला परवडणारा असतो आणि खूप कमी देखील असतो त्यामुळे आपल्याला हा विमा उतरवण्यासाठी काहीच हरकत नाही.
- ज्या व्यक्तींची म्हणजेच १८ ते ५५ या वयोगटातील व्यक्तींचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत खाते आहे अश्या सर्व बँक खातेधारकांना हि विमा योजना उपलब्ध आहे.
- तसेच हि योजना १०० टक्के पेपरलेस आहे.
- जर तुम्हाला प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेला नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही या योजनेमध्ये सुलभ प्रक्रियेमध्ये आपण नाव नोंदणी करू शकतो.
- आपल्याला या योजनेमार्फत एक वर्षामध्ये आयुष्य विमा कव्हर मिळतो तसेच हि योजना सर्व स्तरावरील लोकांच्यासाठी ५५ वर्षापर्यंत उपलब्ध आहे.
प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठी पात्र होण्यासाठी असणारे पात्रता निकष – eligibility
सरकारने प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही नियम किंवा निकष दिले आहेत ते आता आपण खाली पाहणात आहोत.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ ते ५५ वर्ष असले पाहिजे.
- प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा लाभ घेणारे सर्व स्थरावरील नागरिक असले तरी ते भरततील रहिवासी असले पाहिजेत.
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी एखाद्या ग्राहकाचे बँकेमध्ये एकाधिक बचत खाते असले पाहिजे.
- हि योजना सर्व स्तरावरील नागरिकांच्यासाठी आहे.
प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचे नियम – rules
- जर एखाद्या ग्राहकाने १ जून ला नाव नोंदणी केली तर ग्राहकाच्या नाव नोंदणी तारखेपासून ३० दिवसांनी हि योजना सुरु केली जाईल.
- या योजनेच्या आवश्यकतेनुसार ग्राहकाला प्रीमियम भरावा लागतो.
- जर तुमच्या बँक बचत खात्यामध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केला नसेल तर योजना जरी केली जाणार नाही.
- ग्राहकाने त्यांच्या नोंदणी केलेल्या क्रमांकाद्वारे प्राप्त केलेला प्रतिसाद त्याच्या बचत बँक खात्यातून स्वयं डेबिट साठी त्याची संमती मनाला जातो.
- जर एकाद्या ग्राहकाने दिलेली कोणतीही माहिती जर खोटी किंवा चुकीची असल्यास त्या ग्राहकाचे सदस्यत्व रद्द केले जाते.
- वस्तू आणि सेवा कर सोबत दरवर्षी ३३० रुपयांचा नूतनीकरण प्रीमियम स्वता बचत खात्यातून डेबिट केला जातो
प्रीमियम संरचना
योजनेमध्ये खातेधारकाने विनंती केलेल्या तारखेनुसार तिमाही आधारावर प्रीमियम पेमेंट संरचना सुधारित केली आहे.
- जून, जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये ३३० रुपये प्रीमियम रक्कम आहे.
- सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीमध्ये २५८ रुपये रक्कम आहे.
- डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधी मध्ये १७२ रुपये रक्कम आहे.
- मार्च, एप्रिल आणि मे या कालावधी मध्ये ८६ रुपये रक्कम आहे.
आम्ही दिलेल्या pradhan mantri jeevan jyoti bima yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jeevan jyoti yojana in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of jeevan bima yojana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट