Narendra Modi Information in Marathi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती स्वतंत्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्तापर्यंत एक साधारण ओळख “एक चहावाला पंतप्रधान” झाला अशीच आहे. परंतु एका देशाचे पंतप्रधान म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगती मध्ये दिलेलं योगदान खूप मोलाच आहे. स्वतंत्र भारताच्या पंधराव्या पंतप्रधान पदावर हक्क गाजवण्याचा बहुमान त्यांच्याकडे आहे. भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे ते नेते आहेत. आजच्या लेखामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती – Narendra Modi Information in Marathi
पूर्ण नाव (Name) | नरेंद्र मोदी |
जन्म (Birthday) | १७ सप्टेंबर १९५० |
जन्म गाव (Birth Place) | गुजरात राज्याच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावांमध्ये |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | भारताचे पंतप्रधान |
जन्म व वैयक्तिक आयुष्य
नरेंद्र मोदी यांचा जन्म स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झाला. सप्टेंबर १७ इसवी सन १९५० मध्ये गुजरात राज्याच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावांमध्ये मोदींचा जन्म झाला. आई हीराबेन व वडील दामोदर दास मुळचंद या दाम्पत्यांना झालेल्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत. नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी अस आहे. नरेंद्र मोदी यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती.
सुरुवातीला वडनगर रेल्वे स्थानकावर ते चहाच दुकान चालवायचे आपल्या घरच्यांना मदत व्हावी म्हणून काम करून शिक्षण घ्यायचे. इसवी सन १९६७ साली नरेंद्र मोदी यांच उच्च माध्यमिक शिक्षण वडनगर येथून पूर्ण झालं. गुजरात विद्यापीठांमधून नरेंद्र मोदी यांची मास्टर ऑफ सायन्स हि पदवी देखील पूर्ण झाली आहे. त्यावेळी बालविवाहाची प्रथा होती म्हणून नरेंद्र मोदी यांना त्यांच्या बालपणा मध्ये जशोदाबेन यांच्याशी विवाह करावा लागला. परंतु लग्नाच्या काही वेळानंतर मोदींनी घर सोडलं.
पुढील काही काळ नरेंद्र मोदींनी उत्तर व उत्तर पूर्व भारतामध्ये वास्तव्य केलं.
सलग चार वर्षं गुजरात राज्याचे मुख्यमंत्रीपद पटकावलं
नरेंद्र मोदी यांचे बालपण दारिद्र्यात गेलं. त्यामुळे त्यांना समाजातील शोषित वंचित असणाऱ्या इतर मागास वर्गीय गटाची होणारी हेळसांड त्यांना कळाली होती. या कारणास्तव मोदींनी पुढे जाऊन स्वतःला देशाच्या विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. शाळेत असल्यापासूनच मोदींना राजकारणामध्ये आवड निर्माण झाली होती.
शाळेय जीवनामध्ये नरेंद्रमोदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते पुढे जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं त्यांनी केलेल्या कामाचे फळ म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना सरचिटणीसची जागा दिली आणि दिल्लीला पाठवले पुढे मोदींची भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली. सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना केशुभाई पटेल यांचे उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती.
परंतु मोदींनी ती फेटाळून लावली. इसवी सन २००१ मध्ये भूज येथील भूकंप प्रकरणांमध्ये असं समोर आलं की राज्य सरकार सत्तेचा गैरवापर व भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे केशुभाई पटेल यांना पदावरून राजीनामा द्यावा लागला आणि ७ ऑक्टोंबर २००१ रोजी नरेंद्र मोदी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीवर विराजमान झाले.
नरेंद्र मोदी यांनी २००१ मध्ये जी गुजरात राज्याच्या कारभाराची किल्ली हाती घेतली ती २२ मे २०१४ पर्यंत. या वर्षांमध्ये गुजरात राज्याचा झालेला विकास आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. २००२ मध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर भरपूर राजकीय दबाव पडला ज्यामुळे त्यांनी स्वतःहून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला परंतु, देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना ते खरच आहे. त्याच वर्षी मोदींना जनतेकडून बहुसंख्य मताने विजयी घोषित केले आणि ते पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री पद मोदींना मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी – narendra modi work information in marathi
नरेंद्र मोदी यांचा भारताचा पंतप्रधान बन्या पर्यंतचा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे. कठोर परिश्रम करून त्यांनी इतकं मोठं पद गाठलं आहे. लहानपणापासूनच नरेंद्र मोदी यांना राजकारणातले पत्ते गवसले होते. नरेंद्र मोदी हे एक भारताचे असे पंतप्रधान ठरले आहेत ज्यांनी गेल्या सात वर्षांत मध्ये भारताची प्रगती एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवली आहे.
वेगवेगळे धोरणं, प्रकल्प आखून भारतामध्ये गतीशील प्रगती केली आहे. २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये भर घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेसाठी सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली. ज्येष्ठांना निवृत्ती वेतन मिळण्यास सुरुवात झाली, गरिबांना विमा मिळाला. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री योजना सुरू केली ज्या मुळे देशांमध्ये अमुलाग्र बदल झाला.
देशातील भ्रष्टाचारावर आळा आणण्याचा प्रयत्न केला देशातील व्यवहार सुरळीत चालावं म्हणून व्यापारी क्षेत्र मध्ये मेक इन इंडिया हे आवाहन गुंतवणूकदार व उद्योजकांन पुढे ठेवलं. इसवी सन २०१५ मध्ये भारताला डिजिटल इंडिया या नव्या कल्पनेची ओळख करून दिली. या कल्पनेमुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली. २०१४ मध्ये २ ऑक्टोंबर या महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पंतप्रधानांनी भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं.
देशामध्ये स्वच्छता कायम राहावी म्हणून हे एक आधुनिक अभियान आहे. त्यामध्ये संपूर्ण जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. भारत हा एक लोकशाही देश आहे त्यामुळे भारतातील लोकांच्या भावना समजून घेणे त्यांची दुःख जाणून घेणे हे खूप महत्वाचं काम आहे. आणि हेच काम पंतप्रधान मोदी आता गेले काही वर्ष करत आहेत. लोकांपर्यंत संवाद साधून त्यांच्या पर्यंत पोहोचू त्यांच्या अडचणी समजून घेऊन वेगवेगळे मार्ग उपक्रम काढण्याचा प्रयत्न मोदींनी केला.
भारत हा एक शक्तिशाली देश आहे परंतु जगाच्या विशाल आणि शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये भारताला समाविष्ट करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोलाचा वाटा आहे. प्रदेशांमध्ये मैत्रीचा हात पुढे करून मोदींनी भारताला महत्त्वपूर्ण देशांच्या यादीमध्ये समाविष्ट केलं. याचा भारताला खूपच फायदा झाला आहे.
नरेंद्र मोदी हे एक चांगले वक्ते आहेत. देशाची सेवा करणं हे मोदींचे लहानपणापासूनचे स्वप्न होतं. आपल्या देशातील गरीब लोकांना योग्य तो न्याय मिळावा त्यांना योग्य ते शिक्षण मिळावे व त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा मिळाव्या म्हणून भारत सरकारने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना सुरू केली. या योजने अंतर्गत गरीब लोकांना उपजीविकेसाठी लागणारं कौशल्य प्रशिक्षण देण्यात येतं ही भारत सरकारची योजना आहे या योजनेसाठी भारत सरकार कडून एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
बेटी बचाव बेटी पढाव हीसुद्धा एक भारत सरकार द्वारे काढण्यात आलेली एक उत्तम योजना आहे. भारतामध्ये पूर्वीपासूनच मुलींवर वेगवेगळ्या रूढी-परंपरा लादल्या जातात मुलींनी शिक्षण घेऊ नये, मुलींनी घराबाहेर पडू नये या सगळ्यामुळे कुठे ना कुठे आज भारताला प्रगत बनवायचा असेल तर भारतातील प्रत्येक माणसाला शिक्षणाचा हक्क आहे हेच सरकारने जानलं आणि २२ जानेवारी २०१५ मध्ये बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाला सुरुवात झाली.
हे अभियान मुलींच्या निभावासाठी, संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी राबवण्यात आलं आहे. समाजामध्ये महिला कल्याणा संबंधित जागरुकता निर्माण करण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जातं. प्रधानमंत्री आवास योजना या योजनेबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. ही योजना भारत सरकारने राबवली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे ग्रामीण व शहरी भागांमध्ये आर्थिक दृष्ट्या हतबल, गरीब व मागास वर्गीय यांच्यासाठी ही घरं बांधण्यात आली आहेत.
ही घरं अगदी स्वस्तात पडणारी आहेत या योजनेसाठी सरकारने २० करोड रुपये इतका सहभाग दिला आहे. मोदींचे सरकार भारतामध्ये आल्यापासून वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या. त्या मध्ये सुकन्या समृद्धी, डीएलपी, सुवर्ण चतुष्कोण, जीवन प्रमाण, पंतप्रधानमंत्री जनधन योजना, मिशन इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री मुद्रा योजना, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, आदर्श ग्राम योजना.
भारत सरकार द्वारे राबवलेले वेगवेगळे प्रकल्प म्हणजेच भारतमाला प्रकल्प, सागरमाला, सेतु भारतम यांसारखे उपयोगी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प देशात राबवण्यात आले आहेत. जे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे साक्षीदार आहेत. भारतामध्ये राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या मोहिमा डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत या मोहिमांमुळे भारतातील तरुणांना प्रोत्साहन मिळालं.
भारत सरकारतर्फे राबवण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला जनतेकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. भारतातील तरुणांसाठी राबविण्यात आलेल्या योजना ज्यांनी तरुणांना नवीन आशेचा किरण दाखवला. कृषी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपयोगी अशा योजना राबवण्यात आल्या. भारताला विकसित देश बनवण्यासाठी वेगवेगळी धोरणे आखली आणि आज भारत एक महान शक्तिशाली प्रगत देशाचे यादीमध्ये समाविष्ट आहे याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं.
आम्ही दिलेल्या narendra modi information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती मराठी narendra modi in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या prime minister narendra modi information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about narendra modi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये narendra modi wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट