प्रफुल्ल चंद्र राय माहिती Prafulla Chandra Ray Information in Marathi

prafulla chandra ray information in marathi प्रफुल्ल चंद्र राय माहिती, प्रफुल्ल चंद्र राय हे भारतातील एक उद्योगपती आणि रसायनशास्त्रज्ञ होते आणि आज आपण या लेखामध्ये प्रफुल्ल चंद्र राय विषयी माहिती पाहणार आहोत. प्रफुल्ल चंद्र राय हे उद्योगपती आणि रसायनशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते होते आणि त्यांनी केमिकल अँड फार्मास्युटिकल या संस्थेची स्थापना केली आणि हि भारतातील पहिली फार्मास्युटिकल कंपनी होती तसेच त्यांनी रसायनशास्त्रातील पहिली भारतीय संशोधन शाळा देखील सुरु केली.

त्याचबरोबर त्यांनी बंगालच्या कानाकोपऱ्यामध्ये खादीचा प्रचार करण्याची मोहीम सुरु केली तसेच ते खरे देशभक्त होते आणि त्यांनी देशाच्या क्रांतिकारांना मदत करण्यासाठी देखील कधीच कसूर सोडली नाही.

prafulla chandra ray information in marathi
prafulla chandra ray information in marathi

प्रफुल्ल चंद्र राय माहिती – Prafulla Chandra Ray Information in Marathi

नावप्रफुल्ल चंद्र राय
पालकवडील हरीशचंद्र राय आणि आई भुवनमोहिनी देवी
जन्म२ ऑगस्ट १८६१
जन्म ठिकाणखुलना (जे सध्या बांगलादेश म्हणून ओळखले जाते) जिल्ह्यातील रारुली कटीपारा गावामध्ये
शिक्षणबी. एस्सी आणि डी. एस्सी पदवी

प्रफुल्ल चंद्र राय यांची वैयक्तिक माहिती – information about prafulla chandra ray in marathi

प्रफुल्ल चंद्र राय यांचा जन्म २ ऑगस्ट १८६१ मध्ये खुलना (जे सध्या बांगलादेश म्हणून ओळखले जाते) जिल्ह्यातील रारुली कटीपारा गावामध्ये झाला आणि त्यांचे वडील हरिशचंद्र राय ही उदारमतवादी मताचे जमीनदार होते त्याचबरोबर त्यांची आई भुवनमोहिनी देवी हि गावातील एक सुशिक्षित स्त्री होती. प्रफुल्ल चंद्र राय हे वर सांगितल्याप्रमाणे एक चांगले रसायनशास्त्रज्ञ आणि उद्योगपती होते आणि त्यांना रसायनशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जात होते.

प्रफुल्ल चंद्र राय शिक्षण – education

त्यांनी १८६६ मध्ये त्यांच्या वडिलांच्यामार्फत चालवल्या जाणार्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि आपले अशालेचे शिक्षण सुरु केले त्यानंतर त्यांनी १८७० मध्ये कुटुंबासोबत कलकत्त्याला गेले त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अधिक केंद्रे निर्माण झाले आणि त्यांनी कलकत्त्यामध्ये हरे या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुढचे शालेय शिक्षण घेवू लागले.

१८७४ मध्ये त्यांना आमांशाचा तीव्र झटका आला होता त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय आला होता ते १८७६ मध्ये त्यांच्या आजारातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा कोलकत्त्याला पोहचले आणि त्यांनी अल्बर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी शाळेची प्रवेश परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढे विद्यासागर कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला ज्याला पूर्वी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट म्हणून ओळखले जाते. त्यांनी पुढे प्रेसिडन्सी कॉलेज मधून त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रचा अभ्यास केला.

पुढे त्यांनी १८८२ मध्ये त्यांनी युनायटेड किंग्डमच्या एडिनबर्ग विद्यापीठामधून शिष्यवृत्ती मिळवली १८८५ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी. एस्सी पदवी मिळवली तसेच त्यांनी १८८७ मध्ये डी. एस्सी पदवी मिळवली.

प्रफुल्ल चंद्र राय यांच्याविषयी मनोरंजक तथ्ये – facts

  • ते रसायनशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, इतिहासकार आणि उद्योगपती म्हणून ओळखले जात होते.
  • प्रफुल्ल चंद्र राय यांना प्राचीन ग्रंथांची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी संस्कृत, बंगाली आणि इतर भाषेमधील काही प्राचीन ग्रंथ आणि पुस्तके वापरली आहेत.
  • प्रफुल्ल चंद्र यांनी १९३२ मध्ये त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड बंगाली रसायनशास्त्रज्ञाचे जीवन आणि अनुभव प्रकाशित केले जो भारतामधील तरुणांच्यावर समर्पित होता.
  • त्यांनी १९१६ या काळामध्ये प्रेसिडन्सी या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून देखील काम केले आणि या कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठामध्ये २० वर्षापेक्षा अधिक काळ काम केले.
  • ते विद्यापीठामध्ये काम करत असताना त्यांना मिळणारे वेतन हे त्यांनी रसायनशास्त्र विभागाचा विकास करण्यासाठी दान केले होते.
  • १९२० च्या सुरुवातीला बंगालमध्ये असलेल्या दुष्काळामध्ये त्यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता आणि पुरामध्ये अडकलेल्या लोकांना मदत केली होती.
  • प्रफुल्ल चंद्र राय यांनी १८९५ मध्ये मर्क्युरस नायट्रेट हे स्थिर संयुग शोधून काढले.
  • १९२० मध्ये प्रफुल्ल चंद्र राय यांची इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या महाअध्यक्षपदी निवड झाली.
  • हे भारतीय रसायन शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल चंद्र राय हे एक सुप्रासिध्द भारतीय शास्त्रज्ञ आणि शिक्षक होते आणि पहिल्या आधुनिक भारतीय रासायनिक संशोधनापैकी एक होते.
  • प्रफुल्ल चंद्र राय हे युनायटेड किंग्डम मधून १८८८ मध्ये परतले आणि त्यांनी भारतामध्ये वैज्ञानिक प्रगती करण्याचे स्वप्न ठेवून कामाला सुरुवात केली.
  • १८८८ मध्ये प्रफुल्ल चंद्र राय हे भारतात परतले आणि सुरुवातीला त्यांनी त्यांचे प्रसिध्द मित्र जगदीशचंद्र बोस यांच्यासोबत प्रयोग शाळेमध्ये एक वर्ष काम केले आणि १८८९ मध्ये त्यांनी प्रेसिडन्सी कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
  • त्यांनी अमोनिया नायट्रेट हे खरोखर स्थिर आहे हे सिध्द केले आणि स्पष्ट केले कि ते विघटन न होता ६० डिग्री सेल्सियस तापमानामध्ये देखील उदात्तीकरण केले जाऊ शकते.
  • राय यांच्या आईला आणि वडिलांना दोघांनाहि शिक्षणाची आवड होती त्यामुळे त्यांना देखील शिक्षणाची आवड हि लहानपणी पासूनच लागली. त्यांच्या वडिलांना अभ्यासाचा मोठा आनंद होता आणि त्यामुळे त्यांच्या घरी एक मोठी लायब्ररी देखील होती.
  • प्रफुल्ल चंद्र राय यांनी आयुष्यभर लग्न केले नाही आणि आपले संपूरणे आयुष्य हे रसायनशास्त्रज्ञ, शिक्षक, समाज सेवक म्हणून आयुष्य घालवले.

निधन – death

प्रफुल्ल चंद्र राय यांचे निधन वयाच्या ८२ व्या वर्षी १६ जून १९४४ मध्ये कलकत्ता या शहरामध्ये झाले.

आम्ही दिलेल्या prafulla chandra ray information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रफुल्ल चंद्र राय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या prafulla chandra ray information in marathi PDF या prafulla chandra ray information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about prafulla chandra ray in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!