Priyanka Chopra Biography in Marathi – Priyanka Chopra Information in Marathi प्रियंका चोप्रा जीवन परिचय. प्रियंका चोप्रा ही एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री व मॉडेल आणि गायिका आहे. प्रियंका चोप्रा ही भारतातील सर्वाधिक कमाई करणार्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते प्रियंकाने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे व तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणारी प्रियंका पाच भारतीय महिलांपैकी एक आहे. या लेखामध्ये आपण प्रियंका चोप्रा यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
प्रियांका चोप्रा माहिती – Priyanka Chopra Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | प्रियंका चोप्रा |
जन्म (Birthday) | १८ जुलै १९८२ |
जन्म गाव (Birth Place) | जमशेदपूर, बिहार |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री व मॉडेल आणि गायिका |
Priyanka Chopra Information in Marathi
जन्म
प्रियंका चोप्रा यांचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूर, बिहार येथे झाला. त्यांचे वडील अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्रा हे भारतीय लष्करातील डॉक्टर होते. प्रियंकाचे वडील लष्करामध्ये असल्यामुळे त्यांच्या सारख्या बदली होत असायची आणि त्यामुळे प्रियंकाने वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षण घेतलं आहे. या गोष्टीमुळे प्रियंकाला भारतीय संस्कृतीची देखील ओळख झाली. लखनौ येथील ला मार्टिनियर कन्या महाविद्यालय या शाळेतून प्रियंकाने शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
पुढे तिचे शिक्षण बेरली तील मारिया गोरटी महाविद्यालयांमध्ये झालं. अमेरिका येथील बोस्टन येथून प्रियंकाने दहावीचे शिक्षण पूर्ण केलं. लहानपणी प्रियंकाला सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ व्हायचं होतं परंतु बोस्टनवरून परतल्यानंतर प्रियंकाने फेमिना मिस इंडिया या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली देखील.
या घटनेनंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि तिच्या कारकिर्दीची पूर्ण दिशाच बदलून गेली. प्रियंकाने पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आणि समूह गायनाचा अभ्यास केला आहे. प्रियंका चोप्रा ही एक सुंदर अभिनेत्री आहे त्यासाठी तिला अनेक वेगवेगळे बहुमान मिळाले आहेत. तिच्या सुंदर रूपावर घायाळ होणारे तिचे बरेच चाहते आहेत.
वैयक्तिक आयुष्य
प्रियंका चोप्रा यांनी मे २०१८ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनस यांना डेट करायला सुरुवात केली आणि पुढे १९ जुलै २०१८ रोजी प्रियंका चोप्राच्या वाढदिवसाच्या दुसर्यादिवशी निक जोनास यांनी तिला प्रपोज केले आणि लग्नासाठी मागणी घातली. ऑगस्ट २०१८ मध्ये प्रियंका चोप्रा व निक जोनास यांनी साखरपुडा केला आणि डिसेंबर २०१८ मध्ये प्रियंका चोप्रा यांनी भवन पॅलेस जोधपुर येथे पारंपारिक हिंदू आणि ख्रिश्चन विधी करून विवाह केला.
प्रियंका चोप्राने लग्नानंतर कायदेशीररित्या तिचा पूर्ण नाव बदलल आहे ती आता प्रियंका चोप्रा जोनस असे नाव लावते. जानेवारी २०२२ मध्ये प्रियंका चोप्रा व निक जोनास या दोघांना सरोगसीद्वारे पहिल मूल झालं. प्रियंकाच लग्न नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
कारकीर्द
प्रियंका चोप्राने स्थानिक सौंदर्य स्पर्धा जिंकली. सन २००० मध्ये प्रियंका चोप्रा ने फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत भाग घेतला त्यामध्ये ती दुसरी आली प्रियंकाने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड किताब जिंकला. आणि पुढे प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड किताब देखील पटकावला. मिस वर्ल्ड किताब मिळवणारी प्रियंका चोप्रा पाचवी भारतीय स्पर्धक होती तिच्या या यशानंतर तिला चित्रपटात काम करण्यासाठी अनेक संधी चालून आल्या. फेमिना मिस इंडिया आणि विश्वसुंदरी हे किताब मिळवल्यावर प्रियंका चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात आली.
पुढे प्रियंका चोप्राने आपली वाटचाल चित्रपट क्षेत्रात सुरू केली तिला चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या संधी मिळाल्या होत्या. त्यातील थामिझान या तमिळ चित्रपटात तिने पहिल्यांदा काम केलं आणि तिच अभिनय क्षेत्रात पदार्पण झाल. पुढे २००३ मध्ये प्रियंकाने बॉलीवूड चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. द हिरो नावाच्या चित्रपटातून प्रियंकाने बॉलिवूड चित्रपट सृष्टी मध्ये पाऊल ठेवलं.
द हिरो: लव स्टोरी ऑफ द स्पाय या चित्रपटाच्या माध्यमातून. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला अंदाज आणि २००४ मध्ये प्रदर्शित झालेला मुझसे शादी करोगी यामध्ये प्रियंकाने मुख्य अभिनेत्री ची भूमिका बजावली होती हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पुढे प्रियंकाने क्रिश आणि डॉन या दोन सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांमध्ये सहभाग घेतला होता. २००८ मध्ये प्रियंका चोप्राने फॅशन नाटकात काम केलं ज्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला.
अंदाज, मुझसे शादी करोगी, ऐतराज, बरसात, ब्लफमास्टर, डॉन, सलाम ए इश्क, लव्ह स्टोरी २०५०, गॉड तुसी ग्रेट हो, फॅशन( राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार) दोस्ताना, कमीने, व्हॉट्स युवर राशी, प्यार इम्पॉसिबल, जाने कहा से आयी है, अंजाना अंजानी, ७ खून माफ( फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार) डॉन टू , अग्नीपथ, तेरी मेरी कहानी, बर्फी, जंजीर, गुंडे, मेरी कोम, बाजीराव मस्तानी (सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री साठी फिल्मफेअर पुरस्कार) हे प्रियंका चोप्रा यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. बॉलिवूड सोबतच त्यांनी हॉलीवूड मध्ये देखील काम केलं आहे.
अभिनय कारकीर्द व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा पर्यावरण आणि स्त्रियांचे हक्क सामाजिक गोष्टींमध्ये देखील सक्रिय असते. ती प्रामुख्याने लैंगिक समानता, लेंगिक वेतनातील तफावत आणि स्त्रीवादी या विषयांवर भाष्य करते. प्रियंका चोप्राने युनिसेफ मध्ये २००६ पासून काम केलं आहे. २०१० रोजी प्रियंका चोप्राची बालकांसाठी राष्ट्रीय युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रियंका चोप्राने सुरु केलेले प्रियंका चोप्रा फाउंडेशन फॉर हेल्थ अँड एज्युकेशन जे आरोग्य आणि शिक्षणासाठी भारतातील वंचित मुलांना साहाय्य करते.
प्रियंका चोप्रा आपल्या कमाईतील दहा टक्के भाग या फाउंडेशनच्या कामकाजासाठी निधी म्हणून देते. ती भारतातील अनेक मुलांसाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय खर्च देखील देते. प्रियंका चोप्रा अनेकदा स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींच्या शिक्षणाच्या समर्थनात अनेक वेळा भाष्य करते ती अनेक वेळा स्त्रियांचे प्रश्न लोकांसमोर मांडते. ती एक स्त्रीवादावर विश्वास ठेवणारी महिला आहे. प्रियंका चोप्रा एक गायिका सुद्धा आहे तिने रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून तीन एकेरी रिलीज केले आहेत.
तिच्या अनेक चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांनी गायन केले आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या कंपनीची प्रियंका संस्थापक आहे. ज्या अंतर्गत तिने मराठी चित्रपट व्हेंटिलेटर सह अनेक प्रादेशिक भारतीय चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियंका चोप्रा हिने नानावटी हॉस्पिटलला कॅन्सर वॉर्ड बांधण्यासाठी पाच मिलीयन डॉलर दान केले आहेत. समाजाबद्दल प्रियंकाला नेहमीच आपुलकी वाटत राहिली आहे म्हणूनच आपल्या कमाईतील थोडाफार तरी समाजाच्या हितासाठी ती दान करते.
हल्लीच एप्रिल २०१९ च्या उत्तरार्धात भारतातील covid-19 साथीच्या आजारांमुळे प्रियंका आणि तिचे पती निकी यांनी गिव्ह इन इंडिया हे एक एनजीओ उभारले आहे ज्यामध्ये भारतातील लोकांसाठी ऑक्सिजन पुरवठा, कोविड हेल्थ केअर सेंटर, लसीकरणाच्या साठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून हे उभारला आहे. यांच्याद्वारे बर्यापैकी निधी गोळा करण्यात आला होता.
पुरस्कार
प्रियंका चोप्रा हिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातीलच काही म्हणजे दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार, भारत सरकार तर्फे २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार. टाइम्स ने प्रियंका चोप्रा हिला जगातील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आहे. फोर्ब्स ने प्रियंका चोप्रा हिला जगातील शंभर सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये सूचीबद्ध केले आहे. प्रियंका चोप्रा यांचे ट्विटर वर सर्वात जास्त फॉलॉवर आहेत आणि त्या या प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक फोलो केलेल्या भारतीय अभिनेत्री पैकी एक आहेत.
सोशल मीडियावरील प्रियंका चोप्रा एक सर्वात प्रभावशाली भारतीय व्यक्ती आहे. प्रियंका चोप्रा ट्विटरवरील १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये झळकली आहे. ज्यामध्ये भारतीयांमध्ये तिला प्रथम क्रमांक मिळाला होता. प्रियंका चोप्रा ही सर्वात जास्त फॉलो केली जाणारी आशियाई महिला तसेच इंस्टाग्राम वर सर्वाधिक फॉलो केलेल्या लोकांपैकी एक आहे.
प्रियंका चोप्राही सध्या या क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियंका चोप्रा ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी पैकी एक आहे. स्टाईल आयकॉन म्हणून तिची ओळख आहे. प्रियंका चोप्रा ही अनेक महिलांसाठी आदर्श बनली आहे प्रियंका चोप्रा यांचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.
आम्ही दिलेल्या Priyanka Chopra Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर प्रियांका चोप्रा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Priyanka Chopra information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Priyanka Chopra in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट