राजा राममोहन रॉय यांची माहिती Raja Ram Mohan Roy Information in Marathi

Raja Ram Mohan Roy Information in Marathi राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 मध्ये झाला. आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्म सुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावात त्यांचा जन्म झाला होता. यांचे प्रतितामह कृष्णचंद्र बंदोपाध्याय बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने रॉय” सन्मान दर्शक पदवी त्यांना दिली होती. त्यांचे पिता ब्रजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली होती. वैष्णव संप्रदात रमाकांत रॉय यांच्या कुळात होते. राम मोहन रॉय यांची आई तारिणीदेरी यांचे माहेर राम मोहन रॉय यांचे पिता आणि पितामह हे परम धार्मिक होते.

raja ram mohan roy information in marathi
raja ram mohan roy information in marathi

राजा राममोहन रॉय यांची माहिती – Raja Ram Mohan Roy Information in Marathi

नाव(Name)राजा राम मोहन रॉय
जन्म (Birthday)22 मे 1772
जन्मस्थान (Birthplace)पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावात
वडील (Father Name)ब्रजविनोद रॉय
आई (Mother Name)तारिणीदेरी
पत्नी (Wife Name)देवी उमा
मुले (Children Name)राधाप्रसाद रॉय, रामप्रसाद रॉय
मृत्यू (Death)27 नोव्हेंबर 1833
लोकांनी दिलेली पदवीराजा

जीवन

घरात देव पूजा आणि भागवताचे पठण नित्य चालत असे. राम मोहन रॉय यांचे अध्ययन बंगाली, फार्सी, आणि संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले होते. बिहारमधील पाटणा येथे ते वयाच्या अठराव्या वर्षी अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले होते. मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी आणि फार्सी पांडित्याने विस्मित होत होते. इस्लाम धर्मातील आणि सुफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून मातापित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांना वाराणसी येथे रवाना केले होते. श्रुती स्मृती पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास राजा राम मोहन रॉय यांनी केला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले होते.

त्यावेळी तुलनात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले होते की, विविध देवदेवता आणि त्यांचे अवतार यांची आणि मूर्तींची पूजा करणे चुकीचे आहे. कारण परमेश्वर हा एकच आहे ते त्यांचे म्हणणे होते. आपले मूर्तिपूजा विरोधी विचार आपल्या पित्याला आणि  आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. माता पिता आणि राम मोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला होता. त्यांची माता पिता वर श्रद्धा होती. तसेच त्यांच्यावर विलक्षण भक्ती ही होती. मतभेदामुळे राम मोहन रॉय यांना घर सोडून जावे लागले होते.

राजकीय आयुष्य

हिंदू समाज रचनेतील उच्च नीच जातिभेद त्यांना मान्य नव्हते. राजा राम मोहन रॉय यांनी भारतभर प्रवास केला होता. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता बौद्ध धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला होता. आणि यासाठी ते तिबेटमध्ये जाऊन राहिले होते. तिबेटमध्ये त्यांना प्रतिमापूजन, धर्मगुरू पूजन, मंत्र तंत्र, कर्मकांड या ब्रम्ह अंगांचा पसारा त्यांना दिसायला लागला. त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरू वंशी राजा राम मोहन रॉय यांनी वाद केला होता. येथील बौद्ध लोक चिडले होते.

राजा राम मोहन रॉय यांना ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यावेळी सुदैवाने तेथील दयाळू स्त्रियांनी त्यांना प्राण संकटातून वाचविले होते. आणि स्वदेशी सुरक्षितपणे पोहोचविले होते. 1770 मध्ये स्वगृही परतल्यावर माता-पित्यांचा रागही निवडला होता पण मातापित्यांना त्यांनी निराश केले होते. त्यांची मूर्ती पूजा विरोधी आणि बहु देवता वाद विरोधी मस्ती अधिकच ताठर आणि कणखर बनली होती. भोवतालच्या समाज सनातनी आणि रूढी निष्ठ असल्याने यांचा द्वेष करु लागले होते. राजा राम मोहन रॉय यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढले होते.

राजा राम मोहन रॉय यांचे तत्कालीन रीतीला अनुसरून त्यांचे बालपणीच लग्न केले होते. प्रथम पत्नीच लवकरच निवर्तल्या मुळे वडिलांनी 1781 आणि 1782 साली त्यांची दोन लग्ने लावून दिली होती. त्यांना अठराशे साली पुत्रप्राप्ती झाली होती. राधा प्रधान असे मुलाचे नाव ठेवले होते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही सरकारी नोकरी पत्करावी लागली होती. डाका येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ड यांचे 1803 मध्ये  दिवान पद स्वीकारले होते. रमाकांत रॉय यांचे निधन झाले.

त्या सुमारास राजा राम मोहन रॉय यांनी  ग्रंथलेखनास सुरुवात केली होती. “ईश्वर भक्तास देणगी” या अर्थाच्या शिर्षकाखाली फार्सी भाषेत त्यांनी एक निबंध प्रसिद्ध केला होता. सृष्टिकर्ता व पालन करता एक निराकार आहे असा त्याचा सार होता. हा सिद्धांत सर्व धर्मांचा पाया आहे. निरनिराळ्या धर्मांच्या लोकांनी या धर्म तत्वावर चुकीच्या कल्पनांचा डोलारा चढवला यामुळे वेगवेगळ्या धर्म संप्रदाय अस्तित्वात आले आहेत. धर्माची खरी मूलभूत तत्व ठरविण्याकरिता खऱ्याखोट्याचा पाठपुरावा केला पाहिजे असे राजा राम मोहन रॉय यांचे म्हणणे होते.

1805 साली त्यांची मैत्री रामगड जिल्हा कोर्टाचे रजिस्टार डिग्बी यांच्याशी जमली होती. त्यावेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक गुलामासारखी वागत असत. राजाराम मोहनरॉय अनेक वरिष्ठ पदस्थ इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नोकरीत राहिले पण स्वतःच्या गुणांच्या बळावरच ते चढत गेले होते. डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले होते. इंग्रजीत लेखन, भाषण ते उत्कृष्टपणे करू लागले होते. अनेक विषयातील ग्रंथांचा आणि बायबलचा व्यासंग त्यांनी सुरु ठेवला होता.

1810 साली राजा राम मोहन रॉय यांनी सरकारी नोकरी सोडली आणि रंगपुरच्या जवळ माहीगंज येथे स्वताचे घर बांधून ते राहू लागले होते. तेथील लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून स्वतःच्या खर्चाने तळेही बांधून दिले. इथे सुशिक्षित  मंडळीबरोबर धर्म चर्चासत्र सुरू केले होते. या मंडळींमध्ये विविध धर्म पंथांचे लोक भाग घेत होते. मूर्ती पूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी  “ज्ञानचंद्रिका” हे पुस्तक लिहिले होते. राजा राम मोहन रॉय यांना ही सनातनी मंडळी मतभेदांमुळे विविध प्रकारे छळू होऊ लागली होती. पत्नी आणि मुले यांच्यासोबत गावात राहणे कठीण होऊ लागले होते. त्यानंतर राधानगराजवळ राघू नाथापूर येथे राजा राम मोहन रॉय यांनी नवीन घर बांधले.

1814 साली राजा राम मोहन रॉय कलकत्त्याला स्थायिक झाली होते. तेव्हा तिथे धार्मिक आणि सामाजिक आंदोलनात त्यांनी प्रारंभ केला होता. आरंभी ‘आत्मीय सभा’  सुरू करून तेथे वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुरू केल्या होत्या. वेदांत सूत्रे आणि उपनिषदे यांची इंग्रजी आणि बंगाली भाषांतरे छापून प्रस्तुती केली. येथे एखादी स्त्री सती जात असेल तिथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन त्या स्त्रीला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले होते. त्यामुळे समाज राजा राम मोहन रॉय यांना हिंदू धर्म विरोधी मानू लागला होता. सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून 1818 साली समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यासह  एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठविला होता.

त्यावेळेचे  गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी  राजा राम मोहन रॉय यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून  सती बंदीच्या कायद्याची निश्‍चिती केली होती. सतिबंदीचा कायदा 4 डिसेंबर 1829 रोजी जाहीर केला होता. 20 ऑगस्ट 1820 रोजी आपल्या धर्म विषयक आणि ईश्वर विषयक उदार तत्वज्ञानाचा व  उपासना पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून राजा राम मोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे रामचंद्र विद्यावागीश, उत्सव आनंद विद्यावागीश, ताराचंद्र चक्रवर्ती इत्यादी सहकार्‍यांसोबत ब्राह्मो समाजाच्या पद्धतीने उपासनेला प्रारंभ केला होता. या नवविचार प्रणालीची यथोचित कल्पना देणारे सार्वत्रिक धर्म नामक पुस्तक लिहिले होते.

स्थापना

 • 1815 – आत्मीय सभेची स्थापना आत्मीय सभेची स्थापना (सहभाग द्वारकानाथ टागोर, शंकर घोषाल आणि प्रसन्नकुमार टागोर)
 • 1817 – हिंदू कॉलेज ची स्थापना
 • 1822 – ख्रिस्ती मिशनरी च्या मदतीने मुलींसाठी पहिली शाळा कलकत्त्यामध्ये सुरू
 • 1825 – वेदांत कॉलेजची स्थापना

राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू :-

सतीबंदीचा कायदा विरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सती बंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून 19 नोव्हेंबर 1830 रोजी राजा राम मोहन रॉय इंग्लंडला रवाना झाले होते. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खुश होऊन राम मोहन रॉय यांना “राजा” हा किताब दिला होता. परदेशात राजा राम मोहन रॉय यांचे सत्कार होऊ लागले होते.

येथील प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटू लागला होता. सभा समारंभातील त्यांच्या भाषणांनी आणि चर्चा संवादांनी भारताची प्रतिमा राजा राम मोहन रॉय यांनी उजळून टाकली होती. त्यावेळी राजा राम मोहन रॉय आजारी पडले होते. आणि त्यांचे निधन बिटल येथे झाले. रविंद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर आणि इतर सहकाऱ्यांनी कारनोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली आहे. ब्राह्मो समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली होती. भाव्य, विद्वान, त्यागी, सुंदर, आणि तपस्वी असा हा पुरुष इंग्रजी राज्यांच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आला होता.

आम्ही दिलेल्या raja ram mohan roy information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या raja ram mohan roy information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about raja ram mohan roy in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करॉयला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “राजा राममोहन रॉय यांची माहिती Raja Ram Mohan Roy Information in Marathi”

 1. 1817 हिंदू कॉलेज ची स्थापना
  1822- ख्रिस्ती मिशनरी च्या मदतीने मुलींसाठी पहिली शाळा कलकत्त्यामध्ये सुरू
  1825- वेदांत कॉलेजची स्थापना
  1815- आत्मीय सभेची स्थापना आत्मीय सभेची स्थापना सहभाग द्वारकानाथ टागोर शंकर घोषाल प्रसन्नकुमार टागोर

  उत्तर
  • सर्वप्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
   आपल्या सांगण्यावरून लेखामध्ये सुधार करण्यात आला आहे.
   अशाच नवीन माहिती करिता भेट देत रहा धन्यवाद !!

   उत्तर
 2. आपला लेख हा सर्वोत्तम आहे, फक्त या लेखामधे वर्ष टाकताना चुका झालेल्या आहे. फक्त या चुका दुरुस्त करा.
  THANK YOU…

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!