Rabindranath Tagore Information in Marathi नमस्कार मित्रांनो,आपल्या देशात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या त्यापैकीच एक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. आज आपण त्याच महार थोर व्यक्ती बद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. आजच्या या सदरात आपण त्यांचे बालपण, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचे साहित्य याबद्दल माहिती पाहणार आहोत.
रवींद्रनाथ टागोर माहिती – Gurudev Rabindranath Tagore Information in Marathi
नाव (Name) | रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर |
जन्म (Birthday) | ७ मे १८६१ |
जन्मस्थान (Birthplace) | कोलकाता शहर |
वडील (Father Name) | देवेंद्रनाथ टागोर |
आई (Mother Name) | सरलादेवी |
पत्नी (Wife Name) | मृणालिनी देवी |
मुले (Children Name) | माधुरीलाता देवी, रेणुका देवी, मीरा देवी, शमिन्द्रनाथ, दिनेन्द्रनाथ |
बालपण
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ मध्ये कोलकाता येथे झाला. देवेंद्रनाथ टागोर व सरलादेवी या आई वडीलांच्या छत्राखाली रवींद्रनाथांचे बालपण गेले. कलकत्त्याच्या पीराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली व वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिंह ह्या टोपण नावाने कविता लिहिल्या. अकराव्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारत भ्रमण आर्थ कोलकत्ता सोडले. रवींद्रनाथांनी इतिहास, खगोल शास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.
जीवनप्रवास
कलकत्ता सोडल्यानंतर त्यांच्या भ्रमंतीमध्ये त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. अमृत्सर व डलहौसी या ठिकाणी अनेक व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. १८७० साली प्रकाशित रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम प्रसिद्ध झाले. त्यांनी बंगाली भाषेतील पहिली लघुकथा ‘भिकारिनी’ प्रसिद्ध केली. बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात प्रवेश घेतला. परंतु १८८० मध्ये पदवी न घेताच मायदेशी परतले. पुढील ९ नोव्हेंबर १८८३ रोजी मृणालिनी देवी यांच्याशी विवाह झाला. त्यांना झालेल्या पाच मुलांपैकी दोघांचा बालमृत्यू झाला. पुढे गलगुच्छ म्हणजेच कथा गुच्छ नावाचा ८४ कथांचा तीन खंड असलेले पुस्तक प्रकाशित केले.
जेव्हा १९०१ साली रवींद्रनाथ शांतिनिकेतनमध्ये आले तेव्हा त्यांनी येथेच स्थापन केलेल्या आश्रमात प्रार्थना गृहाची, प्रयोगशाळेची बाग बगीचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवींद्रनाथांच्या पत्नीचे व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. 1905 ला वडिलांचे देहावसान झाल्यानंतर रवींद्रनाथ वारसदार झाले. कौटुंबिक दाग दागिने, पुरी व ओडिशा मधील बंगले विकून काही धन प्राप्ती झाली.
साहित्य
1905 नंतर त्यांच्या साहित्याची ओढ बंगाली व विदेशी वाचकांना लागली. ‘नैवेद्य’, ‘खेया या रचना त्या काळात प्रसिद्ध झाल्या. 14 नोव्हेंबर 1913 रोजी त्यांना स्वीडिश अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पुढे ‘गीतांजली’ या रचनेबद्दल मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा नोबेल पुरस्कारही लाभला. त्यातूनच आपल्या देशाचे राष्ट्रगीत ,जनगणमन ही घेतली गेली. गीतांजली या काव्यसंग्रहात रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कविता या सरळ-सरळ परमेश्वराला उद्देशून लिहिलेल्या आढळतात.
रविंद्रजी यांच्या साहित्याचा विचार करून ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली होती. परंतु 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड याने रवींद्रनाथ फारच व्यक्तीत झाले आणि मिळालेली ‘सर ‘ ही पदवी ब्रिटिशांना परत केली. शांतिनिकेतन जवळ सुरूल येथे रवींद्रनाथांनी स्थापन केलेल्या ग्रामीण संस्थेचे पुढे श्रिनिकेतन हे नामकरण केले होते. ज्ञान संवर्धनातून अज्ञानी व सहाय्यक ग्रामीण भागाची सुटका करून घेण्यासाठी विविध देशातील विद्वान जाती व अधिकाऱ्यास या उपक्रमात सहभागी करून घेतले नाट्य कविता या माध्यमातून त्यांनी जनजागृती निर्माण करण्याचाही प्रयत्न केला गुरुदेवांनी केरळच्या गुरु वायर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी आणि देशातील जातीयते विरुद्ध प्रचार करण्याचाही प्रयत्न केला.
उल्लेखनीय कार्य
भारतामध्ये सामाजिक राजकीय व सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभावही रवींद्रनाथांन वर पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा ही त्यांनी अभ्यास करून संतांची काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले. शिवाजी महाराजांचे जीवन ही त्यांच्यासाठी प्रेरणादायी होते. रवींद्रनाथ यांनी शिवाजी महाराजांवरील खंडकाव्य लिहिले आहेत. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाने काही महाराष्ट्र लोक ही प्रभावित झाले होते. रवींद्रनाथांची बंगाली साहित्याचा अभ्यास करण्याचा प्रेरणेतूनच महाराष्ट्र भूषण व पु ल देशपांडे बंगाली शिकले. गीतांजलीचे इंग्रजी भाषांतरही रवींद्रनाथांनी केले.
पुढे जगातील अनेक भाषात गीतांजलीचे भाषांतर झाले. संगीत ,साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला, नृत्य, शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. रवींद्रनाथांना बंगाली भाषेतील आद्य लघु कथाकार समजले जातात. सामान्य माणसांच्या जीवनाचे वर्णन त्यांच्या कथेतून दिसून येते. रवींद्रनाथांना निसर्गत लाभलेल्या रूप सुंदर या इतकीच मधुर आवाजाची ही उपजत देणगी होती. “मला कधी गाता येत नाही असे आठवत नाही”, असे त्यांनी म्हटले आहे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. परंतु संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत स्वतःला बांधून घेतले नाही. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायच्या शिक्षकांकडून रवींद्रनाथांना विज्ञानाची गोडी निर्माण झाली, ती आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकली होती. बंगालमध्ये बरी भूम जिल्ह्यात एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीन धारण करून विकत घेऊन तेथेच एक कुटीर बांधले, पुढे त्याची दुमजली इमारत झाली आणि त्याचे शांतिनिकेतन नाव झाले.
शांतिनिकेतन शेजारी असलेल्या सप्तपरणी च्या विशाल वृक्षा खाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानस्थ बसत रवींद्रनाथांच्या संस्कृत आणि इंग्रजी चा अभ्यास स्वतः देवेंद्र नाथांनी शांतिनिकेतनच्या वास्तव्यात करून घेतला. त्यामुळे रवींद्रनाथांची काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते वयाच्या बाराव्या वर्षी तत्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात या ची पहिली कविता अभिलाष ही प्रसिद्ध झाली होती 1930 साली ऑक्सफर्डला मानवाचा धर्म या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. 1931 साली कलकत्त्यातील अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. 1932 आली त्यांनी इराण व इराक च्या दौरा केला, तिथून परतल्या नंतर कोलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक पदावर ही काम केले. देशातील अल्पसंख्यांक व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघावरून गांधीजींनी ब्रिटिश अन्वर येरवडा तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले होते. गांधीजी या उपोषणाला रवींद्रनाथ जाहीर पाठिंबा दिला होता.
डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळे पुणे कारावासात गांधीजींनी उपोषण सोडले, तेव्हा रवींद्रनाथ तेथेच होती दुसऱ्या दिवशी तिथी प्रमाणे गांधीजींचा जन्म दिन होता. पुण्याच्या शिवाजी मंदिरात पंडित मालदीव यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभिनंदन पर प्रचंड सभेत रवींद्रनाथांची जातीयता व अस्पृश्यतेचे निर्मूलन या विषयावर भाषण झाले.
1940 आली दुसऱ्या महायुद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले होते. विश्वशांतीचा आणि मानवतेच्या कल्पनांचा वृद्ध रवींद्रनाथांनी त्यांच्या डोळ्यांपुढे विध्वंस दिसत होता. याच वर्षी गांधीजींनी शांतिनिकेतन ला भेट दिली गांधीजींना निरोप देताना रवींद्रनाथांनी त्यांच्या हातात एक पत्र दिले होते. त्यात लिहिले होते, माझ्या आयुष्यातील अमोल धनाचा साठा वाहून नेणाऱ्या जहाजासारखी असणाऱ्या विश्वभारती च्या भार माझ्या मागून आपण सांभाळा, हे पत्र गांधीजींनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना दिले.
स्वतंत्र भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर विश्वभारतीचा आर्थिक भार भारत सरकारने स्वीकारला. वयाच्या साठाव्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढायला सुरुवात केली त्यांनी जवळजवळ वीस हजार चित्रे बनवली होती, त्यांनी 1930 मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पॅरिसमध्ये ठेवले होते. भारतात मुंबई व बंगालमध्येही चित्रप्रदर्शन लावली होती, त्यांच्या चित्रांचा विषय भारतीय नारी हाच असायचा. रवींद्रनाथ टागोर आणि चिखली मध्ये पारंगत होते पूर्ण शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर हे ना तर मात्र फारच उल्लेखनीय असं होतं त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. परिनीता काबुलीवाला हे काही चित्रपट .
अखेरची वर्ष
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी बाजारांनी व्यापली होती. 1937 सली शुद्ध हरपून बराच काळ कुमार होते. सात आगस्ट 1941 रोजी कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जागेत त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते सतत लिहीत राहिले शेवटचा श्वास घेतानाही त्यांनी एक कविता लिहिली जरी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तरी गीतांजली जनगणमन शांतिनिकेतनच्या रूपात अजूनही ते आपल्यातच आहेत याचा प्रत्यय येतो.
आम्ही दिलेल्या gurudev rabindranath tagore information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रवींद्रनाथ टागोर information about rabindranath tagore in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rabindranath tagore punyatithi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rabindranath tagore in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Good information thanks असेच add करा thanks sir
प्रतिसादाबद्दल धन्यवाद