रमेश देव मराठी माहिती Ramesh Deo Information in Marathi

Ramesh Deo Information in Marathi – Ramesh Deo Biography in Marathi रमेश देव मराठी माहिती चित्रपट सृष्टी मधील एक दिग्गज नाव म्हणजे रमेश देव. ज्यांच्या शिवाय मराठी चित्रपट सृष्टी अपूर्ण आहे असे रमेश देव यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजबिंडा, उत्कृष्ट अभिनय, महान व जेष्ठ कलाकार म्हणून रमेश देव यांची ओळख आहे. रमेश देव यांची मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कारकीर्द फार मोठी आहे. त्यांनी २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट तर तीस नाटकं आणि त्यामध्ये दोनशेहून अधिक शो अशी रमेश देव यांची चित्रपट सृष्टीत दीर्घ कारकीर्द आहे. आजच्या लेखामध्ये आपण रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आयुष्याविषयी व त्यांनी चित्रपट सृष्टीत दिलेल्या योगदानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ramesh deo information in marathi
ramesh deo information in marathi

रमेश देव मराठी माहिती – Ramesh Deo Information in Marathi

पूर्ण नाव (Name)रमेश देव
जन्म (Birthday)३० जानेवारी १९२९
जन्म गाव (Birth Place)राजस्थानातील जोधपूर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)जेष्ठ कलाकार
मृत्यू२ फेब्रुवारी २०२२

जन्म व‌ वैयक्तिक आयुष्य

रमेश देव यांचा जन्म स्वातंत्र्य पूर्वीचा ( ३० जानेवारी १९२९). रमेश देव यांच मूळ आडनाव ठाकूर असं होतं परंतु त्यांचे वडील कोल्हापूर मध्ये‌ न्यायाधीश होते. रमेश देव हे खरे मूळचे राजस्थानातील जोधपूरच्या इथले परंतु त्यांचं बालपण कोल्हापूर मध्ये गेलं. देव यांच्या वडिलांनी एका न्यायालयीन कामकाजात शाहू महाराजांना मदत केल्यामुळे शाहू महाराज म्हणाले ठाकूर तुम्ही देवासारखे धावून आला तर तुम्ही ठाकूर नाहीत देवच आहात आणि तेव्हापासून रमेश यांचं आडनाव देव झाले.

इसवी सन १९५३ मध्ये रमेश देव यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री नलिनी सराफ म्हणजे सीमा देव यांच्याशी विवाह केला. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटाच्या सेटवर रमेश देव यांची सीमा देव यांच्याशी ओळख झाली. त्याकाळी रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी फारच चर्चेत होती अजूनही जेव्हा जेव्हा रमेश देव यांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा त्या दोघांच्या प्रेम विवाह बद्दल चर्चा होते.

रमेश देव आणि सीमा देव यांनी बराच काळ सोबत रुपेरी पडद्यावर घालवला आहे म्हणूनच त्यांची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री सुपरहिट आहे. दोघांनी अनेक चित्रपट सोबत केली आहेत जी सुपरहिट झाली. या दाम्पत्यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी दोन मुले देखील आहेत अजिंक्य देव मराठी चित्रपट सृष्टी मधील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत तर अभिनय देव हे दिग्दर्शक आहेत

कारकीर्द

रमेश देव हे चित्रपट सृष्टीतील देखणे कलाकार होते. रमेश देव यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं पाऊल १९५० च्या सुमारास ठेवलं रमेश देव यांना सुरुवातीला छोटी-मोठी कामं मिळायची. सुरुवातीला ते सहकलाकार किवा छोट्या भूमिकांमध्ये काम करायचे त्याची सुरुवात मराठी चित्रपटांपासून झाली. मराठी चित्रपटांमध्ये काम करत करत पुढे जाऊन त्यांना नायकाची भूमिका मिळायला लागली. रमेश देव हे एक अष्टपैलू कलाकार होते. त्यांनी नायक, खलनायक, सहकलाकार अशा अनेक भूमिका अत्यंत उत्तम रित्या पार पाडल्या.

रमेश देव सुरुवातीला ‘पाटलाची पोर’ या चित्रपटांमध्ये दिसून आले. रमेश देव यांचे या क्षेत्रामध्ये असणारे गुण व कौशल्य त्यांना त्यांच्या यशाचा मार्ग दाखवत होती. कामाची चर्चा सर्वत्र होऊ लागली व हळूहळू त्यांना अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली कधी छोटी भूमिका मिळायची तर कधी नायकाची मुख्य भूमिका मिळायची.

इसवी सन १९५६ मध्ये रमेश देव यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली “आंधळा मागतो एक डोळा” या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली या चित्रपटाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर झळकले आणि बघताक्षणी चाहत्यांच्या मनामध्ये घर करून बसले. अभिनयाचा दांडगा अनुभव असणारे रमेश देव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपटसृष्टीमध्ये समर्पित केलं संपूर्ण आयुष्यभर दशकानुदशके त्यांनी चित्रपट सृष्टी मध्ये मोलाचं योगदान दिल आहे.

अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका बजावल्या आहेत. रमेश देव यांनी आपल्या सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या. रमेश देव हे राजबिंडा नट असल्यामुळे त्यांचा चाहतावर्ग फारच मोठा आहे. त्या काळातच नव्हे तर आताही अनेक तरुणी त्यांच्यावर फिदा आहेत.

रमेश देव हे उत्कृष्ट अष्टपैलू कलाकार आहेत.‌ त्यांनी गाजवलेली प्रत्येक भूमिका रसिकांच्या हृदयात स्थान करून बसली आहे रमेश देव यांना नायक व खलनायक अशा दोन्ही भूमिका मिळायच्या परंतु खलनायकाच्या भूमिके मध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. खलनायक देखील इतका देखणा आणि रुबाबदार असू शकतो हे त्यांनी इण्डस्ट्रीला पटवून दिलं आणि खलनायक या भूमिकेला त्यांनी एक नवा ग्लॅमर मिळवून दिला.

अगदी नायका पासून ते खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता अशा अनेक भूमिका त्यांनी उत्तम रित्या पार पाडल्या एकेकाळी तर मराठी चित्रपट सृष्टी मध्ये रमेश देव चित्रपटात असतील तर चित्रपट सुपरहिट होईल असा विश्वास निर्माण झाला होता. रमेश देव यांच मराठी चित्रपट सृष्टीतील योगदान अमूल्य आहे मराठी चित्रपट सृष्टीची प्रगती किंवा इतिहास रमेश देव यांच्याशिवाय अपूर्ण आहे.

ते इथवरच थांबले नाहीत तर त्यांची ख्याती बॉलीवूडमध्ये देखील पोचली हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील २०० हून अधिक चित्रपटां मध्ये रमेश देव यांनी आपले गुण कौशल्य दाखवले. आनंद या चित्रपटातील राजेश खन्ना यांचा डॉक्टर मित्र म्हणून साकारलेली रमेश देव यांची भूमिका अत्यंत अजरामर ठरली. रमेश देव हे एक अभिनेता एक निर्माता एक दिग्दर्शक म्हणून देखील प्रसिद्ध झाले.

आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि आनंद या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी ते फार प्रसिद्ध झाले. आरती हा हिंदी चित्रपट रमेश देव यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे तसेच अनेक नाटकांची निर्मिती केली.

दोनशेहून अधिक जाहीरातांची निर्मिती त्यांनी केली आहे. नायकाच्या भूमिकेसाठी जसे ते प्रसिद्ध होते तसेच त्यांनी खलनायकाची भूमिका देखील उत्कृष्टरित्या पार पडली भिंगरी चित्रपटातील रमेश देव यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका अगदी अविस्मरणीय ठरली आहे. एक उत्कृष्ट नट बनायला जे काही लागतं ते सर्व रमेश देव यांच्याकडे होतं. रमेश देव देखणे, रूबाबदार अभिनयामध्ये पारंगत, सर्वगुणसंपन्न, शिस्तबद्ध आणि कामावर निष्ठा असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

रमेश देव यांचे गाजलेले चित्रपट – ramesh deo marathi movies list

रमेश देव यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द फार मोठी आहे त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका रसिकांच्या मनामध्ये खोलवर रुजल्या. देवघर, भिंगरी, आधी कळस मग पाया, भैरवी, बाप माझा ब्रह्मचारी, एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा, प्रेम आंधळ असतं, सोनियाची पाऊले, आंधळा मागतो एक डोळा, ये रे माझ्या मागल्या, आलिया भोगासी, आई मला क्षमा कर, राम राम पाहुणे.

अवघाची संसार, यंदा कर्तव्य आहे, पसंत आहे मुलगी, सात जन्माचे सोबती, जगाच्या पाठीवर, आलय दर्याला तुफान, दोस्त असावा असा, सुवासिनी, माझी आई, वरदक्षिणा, प्रेम आणि खून, गुरुकिल्ली, दसलाख, जीवन मृत्यू, आनंद, भाग्यलक्ष्मी, माझा होशील का?, शेवटचा मालुसरा, खीलोना, मस्ताना, लाखो मे एक, मेरे अपने, कोरा कागज, प्रेम नगर या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका अजरामर आहेत.

मृत्यू

रमेश देव हे दिग्गज व ज्येष्ठ कलाकार होते मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी दिलेल योगदान अमूल्य आहे. जवळपास ५०० हून अधिक चित्रपटां मध्ये रमेश देव यांनी काम केलं आहे. अत्यंत देखणे व रुबाबदार असल्याने त्यांचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा होता. रमेश देव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये आपलं नाव सोनेरी पानावर कोरलं आहे.

त्यांनी इतक्या चित्रपटां मध्ये काम केल आहे की मोजण्यासाठी बोटही कमी पडतील. ते एक उत्कृष्ट नट होते. हल्लीच त्यांनी त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा केला. गेले बरेच दिवस रमेश देव यांची प्रकृती बिघडली होती. २ फेब्रुवारी २०२२ रोजी रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बऱ्याच दिग्गज मान्यवरांनी रमेश देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केल आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. वृद्धापकाळाने ते आजारी असल्यामुळे मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते उपचारादरम्यान त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा देखील होत होत्या परंतु अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल.

रमेश देव यांच्या जाण्याने एक उत्कृष्ट कलाकार हरपला आहे. शिवाय चाहत्यांनी देखील रमेश देव यांच्या विषयी असणारे प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं आहे. रमेश देव यांचा स्वभाव, रुबाबदारपणा त्यांनी गाजवलेल्या भूमिका कायमच आपल्या सर्वांच्या स्मरणात राहतील. गेले पाच हून अधिक दशक त्यांनी आपलं आयुष्य चित्रपट सृष्टीमध्ये समर्पित केलं.

आम्ही दिलेल्या ramesh deo information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रमेश देव मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ramesh deo biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ramesh deo in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ramesh deo wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!