कोल्हापूर जिल्ह्याची माहिती Kolhapur District Information in Marathi

Kolhapur District Information in Marathi कोल्हापूर जिल्ह्याची माहिती मित्रहो, कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्याआधी आपण कोल्हापूरच्या गादीचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर मित्रांनो, कोल्हापूरच्या गादीचा इतिहास माहिती करून घेऊया; इसवी सन १६८० मध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला, त्यावेळी त्यांचे राजपुत्र छत्रपती संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर स्थायिक होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती  संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून स्वराज्य चालवण्याचा पहिल्यांदाच प्रयास केला होता.

परंतू, नंतर त्यांनी काही कारणास्तव रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे राजपुत्र राजाराम महाराज यांनी इसवी सन १६९८ मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण, नंतरच्या काळात राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सौदामिनी  ताराबाई यांनी राज्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरमध्ये केली.

kolhapur district information in marathi
kolhapur district information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याची माहिती – Kolhapur District Information in Marathi

ऐतिहासिक महत्त्व

महाराणी ताराबाई यांनी पन्हाळ्यावर इसवी सन १७१० साली स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली होती. अशा रीतीने, कोल्हापूरजवळील करवीर गादीची स्थापना करणार्‍या सरदार राणी ताराबाई यांची कारकीर्द इसवी सन १७०० ते इसवी सन १७६१ अशी प्रदीर्घ होती. पण मित्रहो, या कालखंडामध्ये मराठी राज्यात ताराबाई आणि संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये दुही निर्माण झाली होती.

त्यामुळे, महाराणी ताराबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये कित्येक वर्षे ही दुही आणि संघर्ष चालूच होता. खरंतर, या दोहोंच्या संघर्षाचे केंद्र हे करवीरची गादी आणि कोल्हापूरचा परिसर हेच होते. राजाराम महाराजांच्या दुसर्‍या पत्‍नीचा मुलगा दुसरा संभाजी आणि छत्रपती शाहू यांच्यामध्ये देखील हा संघर्ष कित्येक वर्षे चालूच होता. इसवी सन १७३१ मध्ये याच परिसरामध्ये कोल्हापूरच्या वारणा नदीच्या काठी शाहू आणि दुसरा संभाजी यांच्यामध्ये एक तह झाला.

खरंतर, या तहामुळे आपल्या महाराष्ट्रातील दुर्दैवी संघर्षाची सांगता झाली. यानंतरच्या काळात इसवी सन १७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला हलवण्यात आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन १८१२ पर्यंत अर्थात वयाची ५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द असेपर्यंत आपल्या कोल्हापूरच्या गादीवर वर्चस्व होते.

इसवी सन १८१८ च्या दरम्यान बऱ्यापैकी महाराष्ट्र ब्रिटिशांच्या सत्तेत विलीन झाला होता. परंतू, इंग्रजांनी कोल्हापूर संस्थान अजिबात खालसा केले नाही, त्यांनी कोल्हापूर संस्थानाचे अस्तित्त्व कायम ठेवले. यानंतर, इसवी सन  १९४९ साली कोल्हापूर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.

कोल्हापूर जिल्हा ज्या मुख्य गावापासून विस्तारीत झाला, त्या गावचे नाव ब्रह्मपुरी असे होते. इतिहासकारांच्या मते, कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरावर आंध्रभ्रुत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव आणि बहमनी अशा कित्येक राजवटींचा शेवटपर्यंत अंमल होता.

कोल्हापूर परिसराच्या आजूबाजूच्या भागांत केलेल्या उत्खननामध्ये तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन तसेच, बौद्ध धर्माच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. याखेरीज, कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची देखील अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च १६७३ रोजी पन्हाळा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात आणला.

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची नावे

इसवी सन १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून कायमस्वरूपी आपल्या ताब्यात घेतला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या नद्या आहेत. या नद्यांमध्ये पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी तसेच, घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत.

मित्रहो, या सर्व नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि पूर्वेकडील दिशेने वाहतात. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील पंचगंगा नदी ही मुख्य नदी  असून ती कासारी, कुंभी, तुळशी, सरस्वती अथवा गुप्त नदी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनलेली  आहे. या नद्यांशिवाय कृष्णा नदी ही कोल्हापूरच्या पूर्व सीमेवरुन वाहत जाते आणि तिल्लारी नदी ही पश्चिम सीमेवरून वाहत जाते.

कोल्हापूर पाहाण्यासारखी ठिकाणे

मित्रहो, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा  ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ अशा अनेक अनोख्या आणि विलक्षणीय गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यामधील मसालेदार पाककृती या तिखटपणासाठी अख्या भारतभर प्रसिद्ध आहेत.

कोल्हापूरमध्ये अनेक विस्तृत नद्या आणि सुपीक जमीन असल्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा मुख्यत: शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांच्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो. कोल्हापूरमधील जमीन सुपीक असल्याने याठिकाणी अनेक कडधान्ये पिकवली जातात.

त्याचबरोबर, कोल्हापूर हा जिल्हा साखर उत्पादनासाठी देखील विशेष प्रसिध्द आहे. याखेरीज, कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. याशिवाय, पुणे-कोल्हापूर हा कोल्हापुरातून जाणारा महामार्ग चौपदरी आहे.

दळणवळण

कोल्हापूर जिल्हा आणि कोकणाकडील रत्‍नागिरी जिल्हा यांना जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ आणि फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे सर्व घाट पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहेत.

खरंतर, या सर्व घाटांचा केवळ घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूरचे अजुन एक विशेष म्हणजे कोल्हापूर-मिरज हा एकमेव लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. त्याचबरोबर, पुणे आणि मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूर जिल्ह्याला जोडली गेली आहेत.

मित्रहो, कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील अगदी शेवटचा जिल्हा आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा आणि दक्षिणेकडच्या बाजूला कर्नाटक राज्यामधील बेळगाव जिल्हा स्थित आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला सह्याद्रीची पर्वतरांग असून या परिसरातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे.

भौगोलिक स्थान

भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्याचे पश्चिम रांग, मध्य रांग आणि पूर्व रांग असे मुख्य तीन विभाग पाडलेले आहेत. या तीन विभागांतील मध्य आणि पूर्व भागातील माती ही अग्निजन्य खडकापासून बनलेली असल्याने, या मातीचा रंग काळा आहे; तर पश्चिम भागात असलेल्या घाटातील आणि डोंगराळ भागातील जमीन ही जांभ्या खडकापासून बनलेली असल्याने, येथील मातीचा रंग लाल आहे.

शिवाय, या सर्व भागांमधील बहुतांश जमीन ही दाट जंगलाने व्यापली गेलेली आहे. वरील माहितीमध्ये आपण पाहिले की, कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे प्रमुख घाट कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. तर, हे सर्व घाट नागमोडी वळणाचे असल्याने या घाटावरून जाताना दरीत पडल्यासारखा भास सातत्याने पर्यटकांना होत असतो.

कोल्हापूरमधील उद्योग आणि व्यवसाय

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा दूध उत्पादनासाठी प्रचलित आहे. दूध उत्पादक सहकारी संघ ही कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण दुधसंस्था गोकुळ या नावाने महाराष्ट्रभर ओळखली जाते. गोकुळ संस्थेमार्फत गोकुळ दुधाचा पुरवठा संपूर्ण महाराष्ट्रात आणि खासकरून मोठ्या प्रमाणात मुख्यतः मुंबईमध्ये केला जातो.

साधारणतः जवळपास २५०० सहकारी दूध सोसायट्या अथवा डेअर्‍या या संघाच्या सभासद आहेत. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे विविध आणि चविष्ट पदार्थ तयार करण्याचा एक उद्योग देखील आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध आणि या दुधावर प्रक्रिया करून बनवलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये देखील पाठवले जातात.

याखेरीज, पूर्वीपासूनच्या ऊसाच्या भरघोस उत्पादनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उद्योगाला जवळजवळ दीडशे वर्षांची जुनी परंपरा आहे. कोल्हापुरातील गूळ हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही प्रसिद्ध आहे. तसेच, येथील साखर देखील सगळीकडे खूप प्रचलित असल्याने अगदी पूर्वीपासूनच कोल्हापूरमधून साखरेची निर्यात केली जाते.

जिल्ह्यातील कागल, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांत तंबाखूचे उत्पादन भरपूर प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या kolhapur district information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोल्हापूर जिल्ह्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kolhapur district all information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kolhapur district dam information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये district court kolhapur information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!