ramoji film city information in marathi रामोजी फिल्म सिटी माहिती, भारतामधील आपल्यातील अनेकांना रामोजी फिल्म सिटी विषयी माहिती आहे कारण हि एक सर्वात मोठी इंटीग्रेटेड फिल्म सिटी आहे जी जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडीओ म्हणून प्रसिध्द आहे आणि याची गिनीज बुक मध्ये देखील नोंद आहे आणि आज आपण या लेखामध्ये जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटी विषयी माहिती घेणार आहोत. रामोजी फिल्म सिटी हि जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी आहे आणि हि १६६६ एकराच्या परिसरामध्ये वसलेली आहे.
आणि या फिल्म सिटीची स्थापना १९९६ मध्ये रामोजी राव यांनी केली आणि हे हैदराबाद या ठिकाणावरील सर्वात लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटन ठिकाण असून या ठिकाणी देशभरातील आणि परदेशातील लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात.
अनेकांना असा प्रश्न पडतो कि रामोजी फिल्म सिटी मध्ये पर्यटकांना पाहण्यासारखे काय आहे, तर या ठिकाणी चित्रपटांच्या सेट पासून आकर्षक तलाव, सुंदर आणि सुशोभित बागा, अॅडव्हेन्चर पार्क, साउंड स्टेज, स्वच्छ आणि छान रस्ते आणि इतर अनेक गोष्टी या ठिकाणी करण्यासारख्या आहेत.
तसेच या ठिकाणी अभ्यंगतांना फिल्म निर्मितीचा जवळून आनंद घेण्याचा अनुभे या ठिकाणी मिळतो. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांचे शुटींग या ठिकाणी केले जाते आणि येथे हिंदी, कन्नड, मल्याळम, तेलगु, गुजराती, भोजपुरी, तमिळ अबी इंग्रजी भाषेतील सिनेमे या ठिकाणी चित्रित केले जातात.
रामोजी फिल्म सिटी माहिती – Ramoji Film City Information in Marathi
ठिकाणाचे नाव | रामोजी फिल्म सिटी |
ठिकाण | रंगा रेड्डी या जिल्ह्यामधील हयाथनगर (हैदराबाद) |
स्थापना | १९९६ |
संस्थापक | रामोजी राव |
रामोजी फिल्म सिटी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- रामोजी टॉवर हे संपूर्ण फिल्म सिटीचे एक विहंगमय दृष्य आहे म्हणजेच हे रामोजी फिल्म सिटी मधील एक महत्वाचे आकर्षण आहे.
- रामोजी फिल्म सिटी मध्ये अभ्यंगतांना रामोजी साहसी अनुभव, रामोजी डे टूर आणि रामोजी स्टार अनुभव घेता येतात आणि यासाठी या ठिकाणी पॅकेजीस देखील आहेत.
- रामोजी फिल्म सिटी हे हैदराबाद या शहरापासून ३३ किलो मीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी या शहरातीन येण्यासाठी १ तास लागतो.
- रामोजी फिल्म सिटी हि रामोजी राव आणि चेरूकुरी रामाराव यांच्या नावाने ओळखली जाते.
- फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना २०१६ मध्ये भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
- क्रिश आणि चेन्नई एक्सप्रेस हे लोकप्रिय झालेले चित्रपट रामोजी फिल्म सिटी मध्ये चित्रित केले आहेत आणि या ठिकाणी २००० पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे.
- वर्षभरामध्ये कोणत्याही वेळी फिल्म सिटी पाहण्यासाठी पर्यटक जाऊ शकतात.
- रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी कमीत कमी १ दिवस लागतो आणि तुम्हाला संपूर्ण पाहायचे असल्यास २ दिवस पण लागू शकतात.
- रामोजी फिल्म सिटी या संस्थेला रामोजी ग्रुप म्हणून ओळखले जाते आणि हे त्याचे मूळ नाव आहे.
- रामोजी फिल्म सिटी हि पर्यटकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पाहण्यासाठी खुली असते.
रामोजी फिल्म सिटी मध्ये पाहण्यासारखी ठिकाणे – places to see
- युरेका ही एक सांस्कृतिक थीम पार्क आहे ज्या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या कलाकृतींच्याद्वारे मौर्य आणि मुघल काळातील कलाकृती पाहता येतात आणि त्यांचा इतिहास डोकावता येतो.
- स्टुडीओ टूर मध्ये भागवतम सेट, नॉर्थ टाऊन, प्रिन्सेस स्ट्रीट, सन फाऊंटन गार्डन, अभयारण्य गार्डन, जपानी गार्डन, अस्करी गार्डन सेट, कृपाळू लेणी या सारखी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात.
- स्पिरीट ऑफ रोमोजी मध्ये वाइल्ड वेस्ट स्टंट शो, लाइव्ह स्ट्रीट शो आणि उद्घाटन आणि समारोप समारंभ पाहण्याचा आनंद घेता येतो.
- या ठिकाणी साहसी खेळ देखील खेळता येतात जसे कि नेमबाजी, तिरंदाजी, माउंटेन बायकिंग, पेंटबॉल, नेट कोर्स आणि इतर अनेक साहसी खेळ खेळता येतात.
- त्याचबरोबर इको झोन मध्ये बोन्साय गार्डन, बटरफ्लाय पार्क आणि टेरेस गार्डन या सारखी ठिकाणे पाहायला मिळतात.
- तसेच मुव्ही मॅजिक पार्कमध्ये अभ्यंगतांना शुटींगचा खरा आनंद घेता येतो.
- तसेच या ठिकाणी बर्ड पार्क आणि धबधब्यांच्यासह हिरवेगार वातावरण आपल्याला पहायला मिळते.
रामोजी फिल्म सिटीला कसे पोहचायचे – how to reach
रामोजी फिल्म सिटी हे ठिकाण हैदराबाद या शहराजवळ असणाऱ्या रंगा रेड्डी या जिल्ह्यामधील हयाथनगर आणि पेडमंबरपेट जवळ आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबाद मध्ये पोहचू शकता. किंवा विमानाने देखील हैदराबाद मध्ये पोहचू शकतो आणि तेथून मग बस किंवा टॅक्सीने फिल्म सिटी पर्यंत पोहचू शकतो कारण हैदराबाद मधून फिल्म सिटीला पोहचण्यासाठी तासभर लागतो.
रामोजी फिल्म सिटी पॅकेजीस रेट – rates
रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी पर्यटकांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे शुल्क आकारला जातो जो प्रौढांच्यासाठी वेगळा आणि मुलांच्यासाठी वेगळा असतो. चला तर खाली आपण रामोजी फिल्म सिटी पॅकेजीस पाहूयात.
- रामोजी डे टूरसाठी या ठिकाणी प्रौढांच्यासाठी ११५० रुपये आणि मुलांच्यासाठी ९५० रुपये आकारले जातात.
- साहस पॅकेज मध्ये प्रौढ लोकांच्यासाठी ९९९ रुपये शुल्क आकाराला जातो आणि मुलांच्यासाठी ७९९ रुपये शुल्क आकारला जातो.
- चित्रपट सृष्टीचा आनंद घेण्यासाठी प्रौढ लोकांच्यासाठी २३४९ रुपये आकारले जातात आणि मुलांच्यासाठी २१४९ रुपये आकारले जातात.
आम्ही दिलेल्या ramoji film city information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रामोजी फिल्म सिटी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ramoji film city hyderabad information in marathi या ramoji film city wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ramoji film city in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट