rani padmavati history in marathi – rani padmavati information in marathi राणी पद्मावती चा इतिहास, इतिहासात घडलेल्या घटना नेहमीच मनाला वेड लावणाऱ्या व मंत्रमुग्ध करणाऱ्या असतात. आणि त्यातील भारताच्या इतिहासात अशा असंख्य ऐतिहासिक घटना घडल्या आहेत ज्यांचा इतिहास आपण अभिमानाने वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्यांना देखील त्याबद्दल माहिती देत असतो. इतिहास घडवण्यासाठी कोणतेही कारण पुरेसं असतं आणि अशाच एका राणीच्या सौंदर्यामुळे एक चित्तथरारक इतिहास घडला. ही कथा आहे राणी पद्मिनी उर्फ राणी पद्मावती यांची. राणी पद्मावती यांच्या इतिहासाविषयी माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.
श्रीलंकेमध्ये जन्माला आलेली राणी पद्मावती एका राजा व राणीची मुलगी होती. राणी च्या वडिलांचे नाव राजा गंधर्वसेन व त्यांची पत्नी राणी चंपावती. आणि त्यांची कन्या म्हणजेच राजकन्या असणारी पद्मिनी. परंतु याचा उल्लेख इतिहासामध्ये खोटेही सापडत नाही. इसवी सन १५४० मध्ये मलिक मुहम्मद जायसी यांनी पद्मावत नावाचे एक महाकाव्य लिहिले होते आणि त्या महाकाव्यांमध्ये त्यांनी पद्मावती राणी हे काल्पनिक पात्र तयार केले होते.
त्यामुळे असंख्य इतिहासकारांचे असे मत आहे की राणी पद्मावती चा इतिहास हा फक्त काल्पनिक इतिहास आहे अशी घटना इतिहासात कधीही घडली नव्हती. परंतु या महाकाव्य प्रमाणे पद्मावती राणी चा इतिहास तिच्या सौंदर्यामुळे घडला.
राणी पद्मावती इतिहास मराठी – Rani Padmavati History in Marathi
Rani Padmavati Information in Marathi
पद्मिनी उर्फ पद्मावती राणी दिसायला इतकी सुंदर होती की तिच्या सौंदर्याची कीर्ती फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेली होती. मंत्रमुग्ध करणारे असे राणीचे सौंदर्य होते. राजकन्या पद्मिनी चे लग्नाचे वय झाले होते आणि म्हणूनच तिच्या पालकांनी राजकन्या पद्मिनी चा विवाह करण्याचा निर्णय घेतला. या साठी राजकन्या पदमिनी यांच्या वडिलांनी एक स्वयंवर आयोजित केले होते.
या स्वयंमवरा मध्ये राजकन्या पद्मिनी ने निवडून दिलेल्या एका सैनिकाशी आलेल्या राजांना लढाई करावी लागेल आणि जो राजा सैनिकाचा पराभव करेल त्याच्याशी राजकन्या पद्मिनी विवाह करेल. लहानपणापासून युद्धकौशल्य मध्ये पारंगत असणारी राजकन्या पदमिणी स्वतः सैनिकाच्या वेषात होती असं या महाकाव्यात सांगितले जाते. संपूर्ण विश्वामध्ये असे सौंदर्य कोणाकडे नव्हतं जे राजकन्या पद्मिनी उर्फ पद्मावती यांच्याकडे होतं आणि म्हणूनच त्यांच्या स्वयंवर मध्ये वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे राजे आले.
त्यामध्ये मेवाड येथील रावळ वंशाचा राणा रतनसिंह याचा देखील समावेश होता. अटी प्रमाणे राणा रतनसिंह यांनी त्या सैनिकाचा पराभव केला आणि राणा रतनसिंह व राजकन्या पद्मिनी उर्फ पद्मावती यांचा विवाह सोहळा पार पडला. राजा रतनसिंह याची राजधानी चित्तोडगड होती. लग्न सोहळा पार पडल्यानंतर राजा पद्मावती यांना घेऊन चितोडगड येथे हाजीर झाला आणि त्यावेळेपासून पद्मावती चित्तोडगड ची राणी बनली. राजा आणि राणी चा सुखाचा संसार सुरू होता.
एकदा राजाचा दरबार भरला होता तेव्हा राज्य दरबारामध्ये राजा राणा रतनसिंह याने राघव चेतन या कलाकाराचा कुठल्यातरी कारणास्तव अपमान केला होता त्यामुळे अपमानित झालेल्या राघव चेतन कलाकार राजाचे राज्य सोडून दिल्ली येथे निघून गेला. त्यावेळी दिल्ली वर राजा अल्लाउद्दिन खलजी याचे राज्य होते. खलजी वंशाचा दुसरा शासक अल्लाउद्दिन खलजी होता. अल्लाउद्दिन खलजी याच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर हा एक पराक्रमी व कर्तबगार राजा होता परंतु त्यासोबतच तो अत्यंत क्रूर, लंपट व जुलमी होता. गादीवर येण्यापूर्वीच त्याने आपल्या स्वतःच्या काका जल्ल्हाउद्दिन ची हत्या केली.
अतिशय क्रूरपणे व कपटाने त्याने जल्लाउद्दीन ची हत्या केली त्यासोबतच त्याने आपला सासरा, आपले भाऊ व त्याच्या मेव्हण्यांची कत्तल केली. २१ ऑक्टोंबर १२९५ रोजी अल्लाउद्दिन खलजी दिल्लीच्या गादीवर बसला. त्याने वेगवेगळ्या राज्यांवर आक्रमण सुरू केले. अनेक मोठमोठ्या राज्यांवर आक्रमण करून त्याने मोठमोठी साम्राज्य उद्ध्वस्त केली जवळपास संबंध हिंदुस्थानातील उत्तर व दक्षिण भाग त्याने आपल्या ताब्यात घेतला. या सगळ्यामध्ये त्याची क्रूरता व त्याचा कपटीपणा दिसून आला. त्याने हजारो लोकांचा नरसंहार केला.
अनेकांचे धर्मपरिवर्तन केली. खूप सारी लूटमार करून जमिनी लुटल्या, कोट्यवधींची संपत्ती, हत्ती घोडे इत्यादींची लूट केली. एकदा राज्यामध्ये फिरत असताना अल्लाउद्दीन ला एका वनात बसलेला राघव चेतन दिसला. ज्यावेळी अल्लाउद्दीन राघव चेतन याच्या समोर आला त्यावेळी राघव चेतन ने राणी पद्मिनी च्या सौंदर्याचे वर्णन अल्लाउद्दीन समोर केले आणि त्यावेळी राणी पद्मावती च्या सौंदर्याचे वर्णन एकूण अल्लाउद्दीनच्या मनामधे वेगवेगळे विचार येऊ लागले आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी याच्या मनामध्ये राणी पद्मिनी ला मिळवण्याची इच्छा प्राप्त झाली.
आणि म्हणूनच जानेवारी १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीवरुन चित्तोडगड येथे रवाना झाला. त्याने चितोडगड येथे येऊन आधी गडाला वेढा घातला. राणा रतनसिंह राजाच्या राजपूती सैनिकांनी देखील अल्लाउद्दीन खिलजी ला चांगलाच विरोध केला आणि त्याच मुळे आठ महिने होऊन गेले तरीही खीलजी गडाच्या आत मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला नाही. आणि म्हणून अल्लाउद्दिन खलजी याने राणा रतनसिंह या कडे एक निरोप पाठवला आणि त्यामध्ये असे लिहले गेले की जर मला राणी पद्मिनी चे दर्शन करविण्यात आले तर, मी दिल्लीला निघून जाईल.
परंतु अल्लाउद्दीन खिलजी इतक्या सहज ऐकणार नाही व यामागे त्याचा काहीतरी डाव आहे हे लक्षात घेऊन राणी पद्मिनी ने स्वतः च्या समोर न जाता आरशातून अल्लाउद्दीन खिलजी ला स्वतःचे प्रतिबिंब दाखवले. अल्लाउद्दीन खिलजी गडाच्या एका बाजूला उभा राहिला होता आणि गडाच्या वरच्या बाजूने राणी पद्मिनी ने आरशाच्या माध्यमातून प्रतिबिंब दाखवण्यात आले. स्वतःच्या डोळ्याने राणीचे मन मोहीत करणारे रूप जेव्हा अल्लाउद्दिन खलजी याने पाहिले तेव्हा तो अजूनच चेकाळला आणि त्याने राणीला जबरदस्ती मिळवण्याच ठरविले.
गडाच्या खाली उभा असणार्या अल्लाउद्दिन खलजी ला भेटण्यासाठी राणा रतनसिंह गडाच्या दरवाज्यापर्यंत गेला मात्र खलजी कपटी, लंपट होता आणि त्याने शेवटी आपला डाव साधला. त्याने व त्याच्या सैनिकाने राजाला कैद केले आणि आपल्या सोबत घेऊन गेले आणि त्यानंतर पद्मिनी राणी ला एक निरोप पाठवला की राजा जिवंत हवा असेल तर पद्मिनी राणीने स्वतःला आमच्या स्वाधीन करावे’.
राणी पद्मिनी अल्लाउद्दीन खिलजीच्या अशा कपटी चालींना व त्याचे डावपेज चांगलेच ओळखून होती. पद्मिनी राणी ने गडावरुन निरोप धाडला की राणी पद्मिनी तिच्या दासींसमवेत अल्लाउद्दीनच्या डेर्यात दाखल होईल पण त्या बदल्यात राणि रतनसिंह यांना सोडून देण्यात यावे’. हा निरोप ऐकताच अल्लाउद्दिन खलजी याच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या त्याला असे वाटले की काहीही न करता आपल्याला राणी पद्मिनी मिळाली आहे आणि म्हणूनच तो गाफील होता त्यावेळी ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका एका पालखीमध्ये बसून अल्लाउद्दिन खलजी च्या शामियान्या समोर आल्या.
समोर उभ्या असणार्या सातशे पालख्या बघून अल्लाउद्दिन खलजी याला वाटले की या पालख्यांच्या आत मध्ये राणी व तिच्या दासी आहेत परंतु तसे घडले नाही पालख्यांमधून पद्मिनी राणी चे सैनिक तलवार घेऊन उतरु लागले या पालख्या मध्ये राणीचे मामा व त्याचा पुतणा हा स्त्री वेष धारण करून खिलजीच्या डेर्यात घुसले. आणि खिलजी चे सैनिक व राजपूत सैनिक यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली आणि राजाची सुटका करून आणली. या प्रकरणानंतर अल्लाउद्दीन खिलजी अजूनच तापला आणि शेवटी त्याने चीतोडगड वर चालून जाण्याचे ठरविले.
शिवाय बरेच दिवस गड झुंज विल्यानंतर गडावरील सर्व रसद संपत आली होती आणि त्यामुळेच राणा रतनसिंह व त्याचा राजपूत सैनिकांना युद्ध करणे गरजेचे वाटले. शेवटी २५ ऑगस्ट १३०३ गडाचे दरवाजे उघडले गेले आणि राजपूत सैनिक अल्लाउद्दीन खिलजीच्या सैनिकांशी भिडले. राजपूत सैनिकांची संख्या अतिशय कमी होती त्यामुळे एक एक राजपूत मृत्युमुखी पडत गेला आणि लढाई देखील संपली आणि राजा सहित सर्व राजपूत मारले गेले.
आता अल्लाउद्दीन खिलजी व त्याचे सैनिक गडाच्या आत मध्ये असणाऱ्या स्त्रिया व पद्मिनी राणी यांना मिळवण्यासाठी गडाच्या आत मध्ये घुसले परंतु गडामध्ये त्यांना कुठेही एकही स्त्री दिसत नव्हती. संपूर्ण गड पालती घातल्यानंतर देखील एकही स्त्री दिसली नाही. कारण ज्यावेळी लढाई सुरू झाली त्याच वेळी खूप मोठा होम पेटवण्यात आला आणि राजपूत व राजा यांच्या पराभवाची वार्ता मिळताच पद्मिनी राणी सकट इतर स्त्रियांनी अग्नी कुंडामध्ये उड्या घातल्या. ही कथा होती राणी पद्मिनी च्या आत्मसन्मानाची व आत्मसमर्पणाची. अल्लाउद्दीन खिलजीच्या नीच वृत्तीमुळे व वासना धुंद मनामुळे राणी पद्मिनी व तिच्या हजारो दासी आगीत जळून भस्म झाल्या.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या rani padmavati history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राणी पद्मावती इतिहास मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of padmavati in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि rani padmavati information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट