Rasmalai Cake Recipe in Marathi रसमलाई केक रेसिपी मराठी केक म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि जर रसमलाई केक असेल तर काही सांगायचे कामच नाही. रसमलाई केक हा एक लोकप्रिय केक आहे जो कोणत्याही कार्यक्रमाची रंगत वाढवतो. आज आपण या लेखामध्ये रसमलाई केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. केक हा लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडतो आणि रसमलाई केक खाण्यासाठी तर काही लोक वेढे होतात. वाढदिवसाला केक कट केले जातात, तसेच लग्नाचा वाढदिवसाला केक कट केला जातो किंवा रिसेप्शन पार्टी मध्ये देखील केक कट केला जातो.
आणि म्हणून आपल्याला रसमलाई केक घरच्या घरी बनवायला आला तर आपले काम किती सोपे होईल आणि आपल्याला हवे तेंव्हा आपण रसमलाई केक बनवू शकतो, आपल्याला बेकरीतून केक विकत आणण्याची गरज भासणार नाही. चला तर आता आपण रसमलाई केक कसा बनवायचा ते पाहूयात.
रसमलाई केक रेसिपी मराठी – Rasmalai Cake Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
भाजण्यासाठी लागणार वेळ | २५ ते ३० मिनिटे |
आयसिंगसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास १० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | थोडीसी अवघड |
रसमलाई केक रेसिपी – rasmalai cake recipe
केक हे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची रंगत वाढवतात आणि आणि त्यामध्ये रसमलाई केक म्हंटले तर काय विषयच नाही. कारण रसमलाई केक हा खूप छान बनतो आणि लागतो. रसमलाई केक हा आपण वाढदिवसासाठी, साखरपुडा समारंभाला, रिसेप्शनला बनवून आपण कार्यक्रमाची शान वाढवू शकतो. चला तर मग आता आपण रसमलाई केक कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
भाजण्यासाठी लागणार वेळ | २५ ते ३० मिनिटे |
आयसिंगसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास १० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | थोडीसी अवघड |
रसमलाई केक बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून आणावे लागते. चला आता आपण रसमलाई केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.
- २ वाटी मैदा.
- १ वाटी तूप / लोणी किंवा बटर.
- १ वाटी साखर ( बारीक केलेली / पिठी साखर ).
- १ वाटी लोणी.
- २ अंडी.
- १ मोठा कप दुध.
- १/२ चमचा खायचा सोडा.
- १/२ चमचा बेकिंग सोडा.
- १ चमचा व्हॅनीला इसेन्स.
- २ वाटी व्हीप क्रीम.
- रेडीमेड रसमलाई ( पिवळ्या रंगाची रसमलाई वापरा ).
- सर्वप्रथम अंडी घ्या आणि ती फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या
- मग त्यामध्ये साखर आणि मैदा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि आता लोणी किंवा बटर घाला आणि चांगले एकजीव करून घ्या किंवा फेटून घ्या.
- आपल्या केकच्या बॅटरची थोडे पातळ होण्यासाठी त्यामध्ये लागेल तेवढे दुध घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या ( केकच्या बॅटर जास्त पातळहि नको आणि जास्त घट्ट हि नको ).
- आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
- त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही.
- आता केकच्या बॅटरमध्ये व्हॅनीला इसेन्स आणि साधा सोडा आणि बेकिंग सोडा खाला ते चांगले एकत्र करा आणि लगेचच केक ज्या भांड्यामध्ये भाजणार आहात त्यामध्ये ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
- कुकर गॅसवर मोठ्या आचेवर गरम करा आणि त्यामध्ये केक बॅटरचे भांडे ठेवा.
- कुकरचे झाकण घालून १० ते १५ मिनिटे केक मोठ्या आचेवर भाजा आणि त्यानंतर २५ ते ३० मिनिटे मंद आचेवर केक भाजा.
- ३० मिनिटांनी झाकण उघडून पहा आपला केक फुगला असेल. त्यामध्ये चाकू घालून बघा चाकुला जर पीठ लागले नाही तर आपला केक बेक झालेला असतो.
- आता थोड्या वेळाने केकचे भांडे कुकर मधून काढून केकच्या कडा सैल करा आणि केक हलक्या हाताने एक प्लेटमध्ये काढा.
- आता त्या केकचे गोल तीन भाग करा कारण आपण आता थर लावून आयसिंग करणार आहोत.
- मग केक बेसला खाली थोडी क्रीम लावा आणि त्याच्यावर केकचा एक कट केलेला भाग ठेवा आणि त्याला रस मलाई मध्ये असणारे दुध लावा आणि त्यावर क्रीम लावून घ्या.
- परत एक केकचा भाग त्यावर ठेवा आणि त्याला रसमलाई दुध लावून घ्या आणि मग क्रीम लावा.
- आणि परत त्यावर केकचा शेवटचा म्हणजेच तिसरा भाग ठेवा आणि त्याला देखील रसमलाई दुध लावून घ्या आणि आता संपूर्ण केकला क्रीम लावून घ्या आणि त्याला तुम्हाला हवे तसे सजवा आणि मग त्यावर रसमलाईचे गोळे ठेवून सजवा.
- तुमचा रसमलाई केक तयार झाला.
टिप्स (Tips)
- जसे आपण व्हॅनीला इसेन्स वापरून केक बनवला तसेच आपण इतर कोणतेही आपल्या आवडीचे इसेन्स वापरून केक बनवू शकतो.
- केक भाजताना भांड्यामध्ये आपण लोणी लावून पिठी भुरभुरन्या ऐवजी ज्या भांड्यामध्ये केक भाजणार आहोत त्या भांड्यामध्ये बटर पेपर वापरू शकतो.
- केक बनवण्यासाठी जी रसमलाई वापरणार आहात ती ताजी असावी आणि त्यामध्ये रबडी देखील असावी आणि शक्यतो पिवळ्या रंगाची रसमलाई वापरा.
- रसमलाई केक हा फ्रीजमध्ये ठेवा. तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर जास्त वेळ चांगला राहतो.
आम्ही दिलेल्या rasmalai cake recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रसमलाई केक रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rasmalai cake recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of rasmalai cake in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rasmalai cake recipe in marathi WIKIPEDIA Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट