Rasmalai Recipe in Marathi रसमलाई रेसिपी मराठी रसमलाई हा एक गोड पदार्थ आहे. जो जास्ती गोड खाणाऱ्या लोकांच्या आवडत्या यादीतील एक आहे आणि हि डीश देखील एक बंगाली डिश आहे जी संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ली जाते. रसमलाई म्हणजे पनीर चांगले मळून त्याचे गोळे बनवले जातात आणि ते साखरेच्या पाण्यामध्ये शिजवले जातात आणि दुधापासून बनवलेली बासुंदी किंवा रबडी मध्ये घालून सर्व्ह केले जातात. कित्येक लोकांना असे वाटते कि रसमलाई हा पदार्थ घरी बनवण्यासाठी कूप अवघड आहे आणि म्हणून ते रसमलाई कधी घरी बनवत नाहीत ते दुकानात विकत आणतात पण आपल्याला देखील बाहेरच्या सारखी रसमलाई घरी बनवता येते. म्हणूनच आज आपण या लेखामध्ये रसमलाई रेसिपी कशी बनवायची याबद्दल पाहणार आहोत.
रसमलाई रेसिपी मराठी – Rasmalai Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
बासुंदी / रबडी बनवण्यासाठी लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
रसगुल्ला बनवण्यासाठी लागणारा वेळ | ५० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास ५० मिनिटे |
पाककला | भारतीय |
रसमलाई हा एक गोड पदार्थ आहे जो जास्ती गोड खाणाऱ्या लोकांच्या आवडत्या यादीतील एक आहे आणि हि डीश देखील एक बंगाली डिश आहे जी संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ली जाते. आता आपण रसमलाई कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत. रसमलाई हि रेसिपी तीन कृती वापरून केली जाते प्रथा कृती रसगुल्ला बनवणे, त्यानंतर रबडी बनवणे आणि शेवटी मुख्य रसमलाई रेसिपी.
- नक्की वाचा: गुलाब जामून रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
बासुंदी / रबडी बनवण्यासाठी लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
रसगुल्ला बनवण्यासाठी लागणारा वेळ | ५० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास ५० मिनिटे |
पाककला | भारतीय |
रसमलाई बनवण्यासाठी दुध, पनीर, साखर, मैदा, सुखा मेवा यासारखे काही साहित्य लागते आणि ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. आता आपण पाहूयात रसमलाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- नक्की वाचा: रसगुल्ला रेसिपी मराठी
- १ लिटर दुध.
- २ चमचे खवा.
- १ चमचा काजू पावडर.
- ३ ते ४ केशर धागे.
- १ चमचा वेलची पावडर.
- २ ते ३ मोठे चमचे साखर.
- १ चमचा बदामचे काप.
- १/२ चमचा पिस्ता तुकडे.
- १ लिटर दुध ( ताजे आणि घट्ट ).
- दीड वाटी साखर.
- २ लिंबूचा रस.
- १ ते २ चमचे मैदा ( आवश्यकतेनुसार ).
- १/२ चमचा वेलची पावडर.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घालून त्यामध्ये केसर भीजत ठेवा.
- त्यानंतर एक खोल भांडे घ्या आणि ते भांडे गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून त्यामध्ये दुध घाला आणि ते दुध चांगले उकळून घ्या.
- दुध उकळले कि गॅस आच मध्यम करा आणि दुध चांगले ढवळत रहा.
- बासुंदी / रबडी बनवतेवेळी आपल्याला सतत चमच्याने दुध ढवळत राहावे लागते.
- हि प्रक्रिया जो पर्यंत दुध घट्ट होत नाही आणि दुधाला मलई येत नाही तो पर्यंत करा.
- दुध आटवत असताना मध्यम आचेवर एक लहान कढई ठेवून त्यामध्ये थोडे तूप घाला आणि ते तूप गरम झाले कि त्यामध्ये बदाम, पिस्ता घालून तो सुकामेवा तळून घ्या. गॅस बंद करून तो तळलेला सुका मेवा एक प्लेटमध्ये काढून घ्या.
- आता दुधामध्ये खवा व काजू पावडर घ्या आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. काजू पावडर घातल्यानंतर बासुंदी / रबडी मध्ये काजूच्या पावडरच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
- आता या मिश्रनामध्ये साखर घाला आणि ती चांगली विरघळूपर्यंत दुध मंद आचेवर ढवळत रहा.
- आता आपली बासुंदी / रबडी ८० टक्के तयार झाली, आता त्यामध्ये केशरचे पाणी, वेलची पावडर आणि तळलेला सुका मेवा टाका आणि हे सर्व बासुंदीमध्ये / रबडीमध्ये चांगले मिक्स करा.
- आता गॅस बंद करा कारण तुमची स्वादिष्ट बासुंदी / रबडी तयार झाली.
- बासुंदी / रबडी थोडी गार झाल्यानंतर ती फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवा.
- नक्की वाचा: बालुशाही रेसिपी
रसगुल्ला या कृतीमध्ये घराच्या घरी पनीर कसे बनवायचे ते देखील सांगितले आहे. चला तर मग आपण रसगुल्ला कसा बनवायचा ते पाहूयात.
- सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि ते भांडे थोडे पाण्याने धुवून घ्या आणि दूध घातल्यावर गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यावर दूध गॅसवरून खाली उतरा आणि थोडे थंड होऊ द्या.
- हे दुध ८० ते ७० टक्के गार झाले कि त्यामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा म्हणजेच एक एक चमचा घाला आणि मिक्स करा,
- दूध चांगले वेगळे होईपर्यंत लिंबाचा रस घाला आणि मिक्स करत रहा, दूध चांगले फुटले की लिंबाचा रस घालणे थांबवा आणि घट्ट झालेल्या दुधातील पाणी गाळून घ्या.
- आता एक स्वच्छ पांढरे कापड घ्या आणि चाळणीवर कापड पसरून खाली एक भांडे ठेवा, फाटलेले दूध कापडावर ओता. फाटलेल्या दुधाचे पाणी खाली ठेवलेल्या भांड्यात येईल आणि पनीर / पनीर कपड्यातच राहील.
- आता त्यावर चेन्यावर थोडेसे पाणी ओता म्हणजे त्यामधील लिंबूच्या रसाचा चव देखील कमी होईल.
- मग तो पनीर कापडामध्ये बांधा आणि तो हाताने पिळा त्यामुळे चेण्यामध्ये असणारे पाणी निघून जाईल.
- पनीर एका प्लेटमध्ये काढा आणि हाताने आणि बोटांनी पनीर चांगला फोडून घ्या आणि मग आपल्या तळ हाताने पनीर चांगला एकत्र करा आणि त्याला एकदम मऊ आणि गुळगुळीत करा.
- पाणी इतके मऊ करा कि त्याचा गोळा केल्यानंतर त्याला कोठेही क्रॅक्स दिसू नयेत.
- आता त्यामध्ये थोडासा मैदा घाला आणि ते चांगले मिक्स करून मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला वरून थोडे प्रेस करा.
- मग एक भांड्यामध्ये २ वाटी पाणी, १/२ चमचा वेलची पावडर आणि १/२ वाटी साखर घाला आणि ते मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा. हे मिश्रण उकळले कि त्यामध्ये रसगुल्ले गोळे घालून ते अर्धा तास शिजवून घ्या ( टीप : भांड्यामध्ये जितके गोळे मावतात तितकेच गोळे शिजवून घ्या जास्त गोळे असतील तर २ ते ३ बॅच मध्ये शिजवून घ्या ).
- आता ते रसगुल्ले साखरेच्या पाण्यामध्ये थोडे गार होऊ द्या.
- आता आपण सर्प्रथम बनवलेली आणि फ्रीजमध्ये गार केलेली घ्या.
- आणि रसगुल्ला गोळे थोडे गार झाले कि ते गोळे एक एक करून तळ हातावर घ्या आणि हळुवार हाताने त्यामधील पाणी पिळून काढा आणि ते रबडी किंवा बासुंदीमध्ये घाला आणि ते गोळे चांगले मिक्स करा.
- मग ते १ ते २ तास फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवा.
- रसमलाई बनवण्यासाठी आपण रसगुल्ला अधल्यादिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
- त्याचबरोबर तुम्ही रसमलाई रेसिपी बनवण्यासाठी बाजारातून विकत आणलेला रसगुल्ला देखील वापरू शकता.
आम्ही दिलेल्या rasmalai recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रसमलाई रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या homemade rasmalai recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rasmalai recipe in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bengali rasmalai Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट