रवा केक रेसिपी मराठी Rava Cake Recipe in Marathi

Rava Cake Recipe in Marathi रवा केक रेसिपी मराठी केक कोणाला आवडत नाही, केक हा सर्वांचा खूप आवडता पदार्थ आहे आणि लहान मुलांचा तर एक प्रिय पदार्थ म्हणून ओळखला जातो. केक म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी येतेच आणि केक हा असा पदार्थ आहे जो बहुतेक लोकांना खूप म्हणजे खूप प्रिय असतो आणि काही लोकांना त्याचे जरी नाव ऐकले तरी तो खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणूनच आज या लेखामध्ये आम्ही झटपट बनणारा रवा केक पाहणार आहोत. सध्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात आणि वाढदिवसाला केक कट केले जातात, तसेच लग्नाचा वाढदिवसाला केक कट केला जातो.

किंवा रिसेप्शन पार्टी मध्ये देखील केक कट केला जातो आणि म्हणून आपल्याला केक घराच्या घरी करायला आले तर आपले काम किती सोपे होईल म्हणूच आज अगदी सोपा, घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनणारा रवा केक कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात.

rava cake recipe in marathi
rava cake recipe in marathi

रवा केक रेसिपी मराठी – Rava Cake Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ४० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास
पाककलाभारतीय

रवा केक म्हणजे काय ?

रवा केक म्हणजे बारीक रवा, मैदा, दही, तेल, दुध आणि इतर साहित्य एकत्र करून ते चांगले एकजीव करून ते बॅटर एका भांड्यामध्ये घालून तो ओव्हन मध्ये किंवा कुकर मध्ये भाजून घ्यावा लागतो.

रवा केक कसा बनवायचा – how to make rava cake recipe in marathi

रवा केक हा खूप सोपा आहे आणि काहीही चूक न होता हा केक बनतो त्यामुळे सर्वच लोकांना रवा केक कसा बनवायचा याबद्दल उत्सूकता असते म्हणूनच आज आपण अगदी मऊ आणि चविष्ट रवा केक घराच्या घरी कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. आज या केक रेसिपी मध्ये आपण रवा केक कुकरमध्ये कसा भाजायचा ते पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ४० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास
पाककलाभारतीय

रवा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make rava cake recipe

रवा केक बनवण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असल्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. आता आपण पाहूयात रवा केक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

 • दीड वाटी बारीक रवा.
 • अर्धी वाटी दही.
 • अर्धी वाटी मैदा.
 • अर्धी वाटी तेल.
 • १ वाटी दुध.
 • १ वाटी पिठी साखर.
 • अर्धा चमचा बेकिंग पावडर.
 • अर्धा चमचा बेकिंग सोडा.
 • १ चमचा वेलची पावडर किंवा कोणत्याही फ्लेवरचे इसेन्स ( आवडीनुसार ).
 • तुटी फ्रुटी ( आवश्यकतेनुसार ).

रवा केक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make rava cake recipe 

 • रवा केक बनवताना केक बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रथम जमवून घ्या.
 • मग आता एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि मग त्यामध्ये अर्धी वाटी दही घाला आणि ते चांगले फेटा, त्यामधील सर्व गाठी चांगल्या फुटल्या पाहिजेत.
 • आता फेटलेल्या दह्यामध्ये आपण वाटून घेतलेली १ वाटी पिठी साखर घाला आणि ते चांगले मिक्स करा ( टीप : तुम्हाला जर जास्त गोड किंवा कमी गोड आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार पिठी साखरेचे प्रमाण ठरवू शकता).
 • साखर दह्यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत हलवत राहा आणि साखर दह्यामध्ये चांगली मिक्स झाली कि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घाला आणि ते तेल देखील चांगले मिक्स करा.
 • तेल कोणत्याही मिश्रणात लगेच एकजीव होत नाही त्यामुळे तेल मिश्रणात एकजीव करण्यासाठी आपल्या ते मिश्रण थोड्या वेळासाठी फेटावे लागेल.
 • आपल्याला जर तेलाचा थर वरती दिसत नसेल तर तेल पूर्णपणे एकजीव झालेले असते आता त्यामध्ये अर्धी वाटी मैदा आणि दीड वाटी रवा एकत्र मिक्स करा आणि ते सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.
 • रवा आणि मैदा घातल्यामुळे मिश्रण थोडे घट्ट होते आणि हा घट्ट पणा कमी करण्यासाठी या मिश्रणात अर्धी वाटी दुध घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या आणि बॅटर चांगले एकसारखे बनवा.
 • हे मिक्स केलेले बॅटरवर झाकण घालून ते १० ते १५ मिनिटे चांगले भिजू द्या.
 • १० ते १५ मिनिटांनी हे बॅटर उघडून त्यामध्ये राहिलेले दुध, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि वेलची पावडर घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
 • तसेच केक बॅटर मध्ये आवश्यक तेवढी तुटी फ्रुटी घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
 • त्यानंतर केक भाजण्यासाठी कुकरची रिंग आणि शिट्टी काढा आणि त्यामध्ये एक पसरत वाटी ठेवा ज्यावर केकचे भांडे सहज बसेल.
 • आणि हा कुकर मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवा.
 • केकच्या भांड्याला आतून लोणी किंवा बटर लावा आणि मैदा भुरभुर ज्यामुळे केक चिकटणार नाही.
 • आता केकचे बॅटर त्या भांड्यामध्ये ओता आणि त्यामधील हवा निघून जाण्यासाठी ते भांडे जमिनीवर २ ते ३ वेळा टॅप करा.
 • मग ते भांडे त्या वाटीवर ठेवून कुकरचे झाकण लावा.
 • आणि केक मद आचेवर १० मिनिटे आणि मध्यम आचेवर २५ ते ३० मिनिटे भाजा.
 • केक भाजतेवेली मध्यम आचेवर केक २० ते २५ मिनिटे भाजल्यानंतर केकेमध्ये मधल्या भागात टूथपिक किंवा सुरु घालू बघा सुरी किंवा टूथपिक स्वच्छ निघाली तर आपला केक भाजलेला असतो आणि जर सुरीला किंवा टूथपिकला पीठ लागले असेल तर आपल्याला केक अजून थोडा वेळ भाजावा लागेल.
 • केक भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यातील केकचे भांडे बाहेर काढा आणि त्याच्या कडा सुरीने सैल करून ठेवा.
 • आणि केक गार झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढा.
 • तुमचा अगदी मऊ आणि चविष्ट रवा केक तयार झाला.

टिप्स ( Tips )

 • केकचे बॅटर ज्या भांड्यामध्ये घालणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण मैदा भुरभूरण्या ऐवजी बटर पेपर घालू शकतो.
 • केक मध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरण्याऐवजी आपण इनो देखील वापरू शकतो.
 • जर तुम्हाला तुटी फ्रुटी आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये ड्राय फ्रुट्स चे तुकडे टाकू शकता.
 • केक भाजताना गॅसची आच मोठी करू नये ती मध्यम असावी नाहीतर आपला केक करपण्याची शक्यता असते.
 • जर तुम्हाला केकवर आयसिंग करायला आवडत असेल तर रवा केकवर देखील आपण आयसिंग करू शकतो.
 • या केकमध्ये देखील तुम्ही तुमच्या आवडीचे इसेन्स वापरू शकता जसे कि व्हॅनीला, बटर स्कॉच, मॅगो आणि चॉकलेट.

आम्ही दिलेल्या rava cake recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रवा केक रेसिपी मराठी rava cake recipe in marathi without oven बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rava cake recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rava cake in cooker madhurasrecipe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chocolate rava cake recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!