Ravindra Jadeja Information in Marathi रवींद्र जडेजा मराठी माहिती, क्रिकेट हा खेळ कोणाला माहित नाही असे नाही तर हा खेळ जगातील अनेक लोकांना चांगला परिचित आहे आणि आपल्या भारतामध्ये तर या खेळला खूप महत्व आहे आणि हा खेळ लहान मुलांच्या पासून ते मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना क्रिकेट आवडते आणि सर्वजण क्रिकेट हा खेळ आवडीने पाहतात तसेच खेळतात देखील आणि आपल्या देशाच्या टीममध्ये देखील अनेक खेळाडू आपली कामगिरी चांगल्या प्रकारे करतात आणि त्यामधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा आणि आज आपण या लेखामध्ये रवींद्र जडेजा विषयी माहिती पाहणार आहोत.
रविद्र जडेजा हा एक क्रिकेट मधील लोकप्रिय खेळाडू आहे आणि या खेळाडूची ओळख क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे. रवींद्र जडेजा या खेळाडूचा जन्म ६ डिसेंबर १९८८ मध्ये गुजरात मधील नवग्रामगढ या ठिकाणी झाला. वयाच्या खूप कमी वयामध्ये तो क्रिकेट खेळू लागला आणि त्याने २००९ मध्ये श्रीलंके विरुध्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाची सुरुवात त्याने केली आणि मग तो टी २० खेळ देखील खेळू लागला.
तसेच या खेळाडून २०१२ मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळला. रवींद्र जडेजा या खेळाडूने वनडे सामन्यामध्ये आजपर्यंत २००० हून अधिक धावा बनवल्या आहेत. चला तर मग पुढे आपण रवींद्र जडेजा ह्या क्रिकेट खेळाडूविषयी सविस्तर माहिती खाली घेवूया.
रवींद्र जडेजा मराठी माहिती – Ravindra Jadeja Information in Marathi
नाव | रवींद्र जडेजा |
ओळख | भारतीय क्रिकेटपटू |
जन्म | ६ डिसेंबर १९८८ |
जन्म ठिकाण | गुजरात मधील नवग्रामगढ |
वडील आणि आई | अनिरुध्दसिंह जडेजा आणि लता जडेजा. |
रवींद्र जडेजा याचे प्रारंभिक जीवन – early life
रविद्र जडेजा यांचा जन्म जन्म ६ डिसेंबर १९८८ मध्ये गुजरात मधील नवग्रामगढ या ठिकाणी झाला आणि त्यांचे पूर्ण नाव रवींद्रसिंह अनिरुध्दसिंह जडेजा असे आहे. रविद्र जडेजा यांचे वडील हे सेक्युरिटी गार्ड होते आणि त्यांची आई नर्सिंगचे काम करत होत्या.
रवींद्र जडेजा यांच्या वडिलांची अशी इच्छा होती कि त्यांनी आर्मी मध्ये जावे आणि म्हणून त्यांना आर्मीच्या शाळेमध्ये देखील टाकले होते परंतु त्यांना क्रिकेटमध्येच आपले करियर करायचे होते आणि या साठी त्यांच्या आईचा त्यांचा चांगलाच पाठींबा होता.
परंतु त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर मात्र त्यांना असे वाटू लागले कि क्रिकेटमध्ये करियर करण्याचे स्वप्न अपुरेच राहणार परंतु त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले आणि ते सध्या अष्टपैलू खेळाडूपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१७ मध्ये रीवा सोळंखी होच्याशी लग्न केले आणि ती इंगीनियर आहे आणि त्यांना एक लहान मुलगी देखील आहे.
रवींद्र जडेजा यांची खेळामधील कामगिरी
- रवींद्र जडेजा या खेळाडूने २०१२ मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळला.
- २०१२ ते २०१३ या काळामध्ये इंग्लंडविरुध्दच्या स्वदेशी मालिकेमध्ये त्यांची लाल बॉल क्रिकेटची सुरुवात झाली. २०१३ च्या सुरुवातीला जेंव्हा ऑस्ट्रोलीयन भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांना कायमच टीममध्ये ठेवण्यात आले.
- तसेच रविद्र जडेजा यांनी त्या मालिकेत प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसह भूमिका बजावली.
- रवींद्र जडेजा यांनी अंतरराष्ट्रीय वनडे मध्ये ८ फेब्रुवारी २००९ मध्ये पदार्पण केले आणि अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यामध्ये त्यांनी १३ डिसेंबर २०१२ मध्ये प्रवेश केला तसेच त्यांनी अंतरराष्ट्रीय टी २० मध्ये एकूण ४९ सामने खेळले आणि त्यामध्ये ३९ विकेट्स घेतले होते. तसेच अंतरराष्ट्रीय वनडे त्यांनी एकूण १६५ सामने खेळले होते आणि त्यामध्ये त्यांनी १८६ विकेट्स आणि २२९६ धावा बनवल्या होत्या.
- २०१३ मध्ये झालेल्या वनडे खेळामध्ये रवींद्र जडेजा हा खेळाडू चांगल्या क्रमांकावर होता आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर ते गोलंदाजीमध्ये अव्वल होते.
- तसेच २०१७ मध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय कसोटी खेळामध्ये देखील तो गोलंदाज म्हणून अव्वल कामगिरी करण्यासाठी ते यशस्वी ठरले होते.
रवींद्र जडेजा विषयी काही विशेष तथ्ये
- रवींद्र जडेजा या खेळाडूने एफसी ( FC ) क्रिकेटमध्ये एकूण ३ शतके बनवली होती आणि जी भारतातील खेळाडूंच्यासाठी संयुक्तपणे सर्वात जास्त होती.
- रविद्र जडेजा यांच्या वडिलांना आपला मुलगा आर्मी मध्ये जावा असे वाटायचे म्हणून त्यांनी रवींद्र जडेजा यांना आर्मी स्कूल मध्ये घातले होते परंतु त्यांना क्रिकेटमध्ये करियर करायचे होते आणि यासाठी त्यांच्या आईचा त्यांना पाठींबा होता.
- त्याचबरोबर चेन्नई सुपरकिंग्ज कडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम रवींद्र जाडेज्याच्या नावावर आहे.
- २०१३ मध्ये कपिल देव, मनिंदर सिंग आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर आयसीसी ( ICC ) एकदिवसीय क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा रवींद्र जडेजा हा चौथा भारतीय गोलंदाज आहे.
- २०२० मध्ये रवींद्र जडेजा हा खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर ३ फॉरमॅटमध्ये वैयक्तिकरित्या ५० सामने खेळणारा फक्त तो ३ भारतीय खेळाडू बनला.
- रवींद्र जडेजा हा खेळाडू २०२१ मध्ये आयपीएल मध्ये एका षटकात ३६ धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
- रवींद्र जडेजा हा खेळाडू आयपीएल ( IPL ) क्षेत्रामध्ये २००० धावा करणारा आहे.
- रवींद्र जडेजा यांना जड्डु या नावाने देखील ओळखले जाते आणि त्यांचा बारा ( १२ ) हा अंक भाग्यवान अंक आहे.
- २००५ मध्ये रवींद्र जडेजा हे भारताच्या टीममधून विश्वचषकामध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळी भारतीय टीम विश्वचषक जिंकण्यास देखील यशस्वी झाली होती.
आम्ही दिलेल्या ravindra jadeja information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रवींद्र जडेजा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ravindra jadeja biography in marathi या ravindra jadeja wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ravindra jadeja in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ravindra jadeja information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट