रेणुका देवीची माहिती Renuka Devi Story in Marathi

renuka devi story in marathi – yellamma devi story in marathi रेणुका देवीची माहिती, रेणुका देवीची कथा मराठी, आज आपण या लेखामध्ये दक्षिण भारतामध्ये म्हणजेच विशेषता कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या भागामध्ये लोकप्रिय असणाऱ्या रेणुका देवी म्हणजेच यल्लमा देवीचा इतिहास पाहणार आहोत. यल्लमा देवीला दिनदुबळ्यांची देवी आणि गरिबांची देवी म्हणून ओळखले जाते आणि हि हिंदू देवता आहे आणि हिची पूजा हिंदू लोक करतात. रेणुका देवीला विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची आई म्हणून देखील ओळखले जाते. रेणुका देवीला यल्लमा, एलाई अम्मान, पद्मिक्षी रेणुका, दयामव्वा, दुग्गव्वा, मेरीकंबा आणि एकविरा अशी नावे दिलेली आहेत.

आणि काही ठिकाणी या देवीला जगदंबा म्हणून देखील पूजले जाते. रेणुका देवीला यल्लमा देवी हे नाव एका कथेवरून पडले आणि हि कथा अशी आहे कि परशुरामाने जमदग्नीला त्याच्या आईच्या आयुष्यासाठी विचारले आणि परशुराम असे म्हणाले कि कृपया माझ्या आईला परत आणा आणि त्यावेळी परशुरामाच्या आदेशाचे पालन केले परंतु त्याने चुकून चुकीचे डोके चुकीच्या शरीराला जोडले आणि अश्या प्रकारे यल्लमा जन्माला आली. चला तर आता यल्लमा देवी विषयी आणखीन माहिती घेवूया.

renuka devi story in marathi
renuka devi story in marathi

रेणुका देवीची माहिती – Renuka Devi Story in Marathi

देवीचे नावरेणुका देवी
भागदक्षिण भारतामध्ये या देवीला खूप पूजले जाते.
रेणुका देवीचे पतीजमदग्नी
मुलेवसुमंत, वसू, सुशेन, विश्वावसु, परशुराम,

यल्लमा देवीची अनेक नावे ?

रेणुका देवीला यल्लमा, एलाई अम्मान, पद्मिक्षी रेणुका, दयामव्वा, दुग्गव्वा, मेरीकंबा आणि एकविरा अशी नावे दिलेली आहेत आणि काही ठिकाणी या देवीला जगदंबा म्हणून देखील पूजले जाते.

रेणुका देवीचा विवाह कोणाशी झाला ?

ऋषी जमदग्नी हा सूर्यवंशातील राजा होता जे प्रसेनजीत यांच्याकडे गेले जे रेणुका देवींचे वडील होते आणि त्यांनी त्यांच्या कन्येचा हात मागितला म्हणजेच रेणुका देवीचा हात मागितला आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि त्या जोडप्याला वसुमंत, वसू, सुशेन, विश्वावसु, परशुराम हि मुले झाली.

रेणुका देवीला का मारण्यात आले ?

यल्लमा देवी पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती त्यावेळी ती नदीवर असणाऱ्या एका गंधर्वाकडे आकर्षित झाली आणि तेव्हा ती यामुळे वाळूचे भांडे बनवण्याची शक्ती गमावली आणि हे ज्यावेळी जमदग्नीला रेणुका च्या मनात अशुध्द विचार आल्याचे समजले आणि त्यावेळी त्याने परशुरामाला रेनुकाचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला.

रेणुका देवीचा जन्म कसा झाला ?

रेणुका देवी हि महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशाच्या राज्याची कन्या होती आणि त्या राज्याचे नाव रेणू राजा असे होते आणि रेणुका देवी बद्दल असे देखील म्हटले जाते कि हि कृतयुगातील पार्वतीचा अवतार मानली जाते. प्रश्नेजीत हा सूर्यवंशी इक्ष्वाकु घराण्यातील शासक होता आणि हा राजा आपल्या वर्चस्वासाठी प्रसिध्द देखील होता परंतु तीन बायका करून देखील त्याला बाल झाले नाही आणि यामुळे तो दुखी होता.

त्याने त्याच्या दरबारातील पुरोहितांच्या सूचनेनुसार संतत्तीसाठी पवित्र अग्नीविधी केला. अग्नीच्या ज्वालामधून सोन्यासारखे चमकणारे बाळ उत्क्रांत झाले आणि त्यामुळे राजा खूपच आनंदित झाला आणि राजाला असे वाटले कि हे बाळ आपल्याला देवीचे वरदान आहे म्हणून त्याने त्या बाळाचे नाव रेणुका ठेवले. ती अग्नीतून जन्माला आली म्हणून तिची अग्निजा म्हणून देखील स्तुती केली गेली.

रेणुका देवीचा इतिहास – history of renuka devi in marathi

पहिली पौराणिक कथा – renuka devi katha in marathi

पौराणिक कथेनुसार रेणुका देवीचा इतिहास हा अनोखा आहे. रेणुका देवी हि रेणू राज्याची मुलगी होती म्हणजेच ती एक राजकन्या होती आणि तिचा विवाह जमदग्नी नावाच्या एका शक्तिशाली ऋषीशी झाला म्हणजेच तो सत्यवती आणि गाधी राज्याची मुलगा होता. विवाहानंतर तिच्या म्हणजेच रेणुका देवीच्या पतीच्या ( जमदग्नी ) भक्तीमुळे आणि पावित्रेतेने तिने दररोज वाळूने एक नवीन भांडे तयार करण्याची शक्ती प्राप्त केली होती.

एक दिवशी रेणुका माता म्हणजेच यल्लमा देवी पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती त्यावेळी ती नदीवर असणाऱ्या एका गंधर्वाकडे आकर्षित झाली आणि तेव्हा ती यामुळे वाळूचे भांडे बनवण्याची शक्ती गमावली. जेंव्हा हे जमदग्नीला कळाले त्यावेळी क्रोधीत झालेल्या जमदग्नीने म्हणजेच रेणुका देवीच्या पतीने रेणुका देवीला घरातून बाहेर काढले.  मग तिच्या पतीने तिला घरातून बाहेर काढल्या नंतर ती घनदाट जंगलामध्ये गेली आणि त्या ठिकाणी ती ध्यान करू लागली.

ती घनदाट जंगलामध्ये ध्यान करत असताना तिच्या समोर एकनाथ आणि जोगिनाथ आले आणि त्यावेळी तिने आपल्या पतीला म्हणजेच जमदग्नीला शांत करण्याचा सल्ला मागितला परंतु त्यामुळे जमदग्नी आणखीनच क्रोधीत झाला आणि त्याने आपल्या मुलांना तिचे मस्तक कापून टाकण्याची आज्ञा दिली पण त्या मुलांनी हे करण्यास नकार दिल्यानंतर मुलांना जाळून टाकले.

पण तेथे उपस्थित नसलेल्या परशुरामाला जो रेणुका देवीचा आणि जमदग्नीचा मुलगा होता याला हे सर्व समजल्या नंतर त्याने आपल्या आईच्या बेवफाईसाठी आपल्या आयीच शिरच्छेद केला. ह्यावेळी जमदग्नीला हे समजले कि परशुरामाने आपल्या आज्ञेचे पालन केले आणि त्यामुळे तो समाधानी आणि आनंदी झाला आणि त्याने परशुरामाला एक वरदान दिले आणि परशुरामांना या वरदानाद्वारे आपल्या आईचे आणि भावांचे जीवन परत आणले.  यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे रेणुका देवीचा आत्मा विस्तारला आणि ती देवी म्हणून उभी राहिली.

दुसरी पौराणिक कथा – yellamma devi story in marathi

रेणुका देवीला यल्लमा देवी हे नाव एका कथेवरून पडले आणि हि कथा अशी आहे कि परशुरामाने जमदग्नीला त्याच्या आईच्या आयुष्यासाठी विचारले आणि परशुराम असे म्हणाले कि कृपया माझ्या आईला परत आणा आणि त्यावेळी परशुरामाच्या आदेशाचे पालन केले परंतु त्याने चुकून चुकीचे डोके चुकीच्या शरीराला जोडले आणि अशा प्रकारे यल्लमा जन्माला आली.

आम्ही दिलेल्या renuka devi story in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रेणुका देवीची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yellamma devi story in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि atm information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!