Samudra Kinara Essay in Marathi – Me Pahilela Samudra Kinara Essay In Marathi समुद्र किनारा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये समुद्र किनारा या विषयावर निबंध लिहिणार आहोत. समुद्र किनारा हा नैसर्गिक सुंदरता आहे आणि सुंदर सुर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळणारे, मऊ वाळूची जमीन आणि आणि समोर अथांग समुद्र अनुभवायला मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे समुद्रकिनारे आणि समुद्रकिनारे हे अनेक पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत आणि ज्यांना विश्रांतीची गरज आहे त्यांच्यासाठी समुद्र किनारे एक परिपूर्ण स्वर्ग आहे.
समुद्र किनारी फिरायला जाने किंवा त्या ठिकाण वेळ घालवणे म्हणजे मनाला अनादी करणे कारण समुद्र किनाऱ्यावरील नजरा पाहून मन अगदी भारावून जातो आणि डोळ्याचे पारणे फिटते. समुद्र किनाऱ्यावर समुद्रातून जोरात येणाऱ्या लाटा ह्या किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि त्या आणि त्या शांत पणे येऊन त्या परत समुद्रामध्ये जातात आणि हे सतत होत असल्यामुळे ते समुद्र किनाऱ्यावर बसून पाहणी करण्याची एक वेगळीच मजा असते.
तसेच समुद्र किनारी एकदम मऊ वाळू पसलेली असते आणि तसेच समुद्र किनारी बसून सूर्यास्त पाहण्याची देखील वेगळीच मजा आहे. समुद्र किनारा म्हणजे अनेक लोकांना ज्या ठिकाणी आरामदायी आणि शांत वाटते असे ठिकाण.
समुद्र किनारा मराठी निबंध – Samudra Kinara Essay in Marathi
मी पाहीलेला समुद्र किनारा मराठी निबंध – Me Pahilela Samudra Kinara Essay In Marathi
समुद्र किनाऱ्या बद्दल सांगायचे म्हटले तर समुद्र हा अमर्याद आणि विशाल असतो आणि समुद्रातून येणाऱ्या लाटांना थांबवण्याची शक्ती मात्र समुद्र किनाऱ्याकडे असते तसेच आपल्यामधील कित्येक लोकांना समुद्र किनारा आवडतो तसेच समुद्र किनाऱ्यावर आल्यावर शांत वाटते तसेच विश्रांती तसेच आपण आपल्या सर्व आठवणी, दुख, कामाचे टेन्शन ह्या सर्व समस्या विसरून या नयनरम्य दृश्याचा आनंद घेत असतो. आपल्याला जशी समुद्र किनाऱ्यावर विश्रांती मिळते तसेच समुद्राचे देखील समुद्र किनारा हे विश्रांतीचे शेवटचे ठिकाण असते.
भारताला समुद्र किनारा हा आपल्या देशाला तिन्ही बाजूनी वेढलेला आहे आणि आणि भारतातील समुद्र किनारा पाहण्यासाठी भारताच्या बाहेरील देखील लोक येतात. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, ओडीसा, पश्चिम बंगाल, तामिळ नाडू, पदुचेरी हि राज्ये किनारपट्टीला जोडलेली राज्य आहेत.
तसेच महाराष्ट्रामध्ये कोकण भागाला अतिशय उत्तम किनारा लाभला आहे आणि कोकण किनारपट्टी हि भारतामध्ये पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे कारण त्या ठिकाणी असणारी घनदाट जंगल आणि समुद्र किनारा. कोकण समुद्र किनाऱ्याला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. रत्नागिरी, वेंगुर्ला, पणजी हि काही समुद्र किनाऱ्याजवळ असणारी कोकणातील गावे आहेत. जरी भारताच्या तिन्ही बाजूला समुद्राने वेढले असले तरी पश्चिमेकडील समुद्र किनारा लोकांना खूप आकर्षित करतो आणि एक आकर्षक समुद्र किनारा लाभलेले भारतातील एक ठिकाण म्हणजे गोवा.
गोवा हे भारतातील प्रसिध्द पर्यटन ठीकानापैकी एक असून हे येथे असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांच्या मुले खूप लोकप्रिय आहे. या शहराला पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे त्यामुळे गोवा या शहराला विलक्षण सुंदर वालुकामय समुद्रकिनारे लाभले आहेत. गोवा या शहराला १३१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी असून गोवा प्रत्येक पर्यटकांच्या प्रवासासाठी महत्वाचे ठिकाण आहे.
गोव्याला हा समुद्र किनारा म्हणजे हे एक नैसर्गिक सौंदर्याच लाभले आहे आणि या अश्या समुद्र किनाऱ्यावर आपण जरी निळ्याभोर समुद्राचा आणि सुर्यास्ताचा आनंद घेत असलो तरी आता आपण समुद्र किनार्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टीव्हीटी देखील केल्या जातात. गोव्यामध्ये अनेक समुद्र किनारे आहे आणि प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर आपण काही ना काही वेगळे करू शकतो. गोव्यामधील काही प्रसिध्द समुद्र किनारे आता मी सांगणार आहे.
ते म्हणजे मोरजीमचा समुद्र किनारा, कॅंडोलिमचा समुद्र किनारा, कळंगुट समुद्र किनारा, अंजुना समुद्र किनारा, कोल्वा चा समुद्र किनारा, वागातोर समुद्र किनारा, बागा समुद्र किनारा, अगोंडा समुद्र किनारा, आरम्बोल समुद्र किनारा, बटरफ्लाय समुद्र किनारा, मोबोर समुद्र किनारा अश्या प्रकारचे अनेक सुंदर सुंदर समुद्र किनारे गोव्याला लाभलेले आहेत आणि या सुंदर समुद्र किनाऱ्यांच्यामुळे अनेक पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात.
देशामध्येतील आणि देशाबाहेरील पर्यटकांना जरी गोव्यामधील समुद्र किनारे आवडत असले तरी मला रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हा समुद्र किनारा खूप आवडतो या समुद्र किनाऱ्याला गणपतीपुळे समुद्र किनारा असे नाव हे तेथे असणाऱ्या मंदिरावरून पडले आहे. गणपतीपुळे हा एक सुंदर आणि शांत असा समुद्र किनारा आहे आणि या ठिकाणी एक गणपतीचे मंदिर आहे.
जे खूप लोकप्रिय आहे आणि या मंदिरामध्ये आणि हा समुद्र किनारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात तसेच या किनाऱ्यावर पांढऱ्या रंगाची वाळू आहे आणि येथून आपण सुर्यास्ताचा आनंद चांगल्या प्रकारे घेवू शकतो आणि म्हणूनच हा किनारा माझा आवडता किनारा आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक समुद्र किनारे आहेत तसेच देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये असंख्य समुद्र किनारे असतील.
काही समुद्र किनारे असे असतात ज्या ठिकाणी साहसी समुद्रातील खेळ असतात आणि त्यामध्ये आपल्याला सहभागी होता येते आणि अश्या प्रकारच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक तरुण आकर्षित होतात कारण तेथे साहसी खेळ खेळता येतात.
वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काईट सर्फिंग, स्पीड बोट राइड्स, बनाना राईड्स, पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग, स्केटबोर्डिंग, आणि पॅराग्लायडिंग या सारख्या वॉटर राईड्स आपल्याला समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर करायला मिळतात. त्याचबरोबर असे समुद्र किनारे देखील असतात ज्या ठिकाणी आपल्याला शांत वातावरण मिळते तसेच आपल्याला सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येतो. जसे कि समोर पाण्याने भरलेला समुद्र त्यामधील निळसर लाटा आणि संध्याकाळच्या वेळी काही सूर्याची मनमोहक दृश्ये दिसतात.
आम्ही दिलेल्या samudra kinara essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर समुद्र किनारा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mala avdlela samudra kinara essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay on samudra kinara in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट