संत तुकाराम महाराज माहिती Sant Tukaram Information In Marathi

sant tukaram Information In Marathi  सृष्टीसौंदर्याने नटलेला, निसर्गाचा वरदहस्त असलेला आणि अशा सर्व बाजूंनी परमेश्वराची कृपा लाभलेल्या या भागाला आणखी श्रीमंत आणि समृद्ध करत वाहते ती म्हणजे ‘इंद्रायणी’. जी लोणावळ्यातून उगम पावून साधारण पन्नास एक मैल वाहत जाऊन भीमेला मिळते. तिचा हा प्रवास तसा छोटासाच; पण आपल्या ह्या छोट्याशा प्रवासात तिचा अवघा काठ पावन झाला आहे.

आणि अशा ह्या पावन तीरावर वसलेलं एक पुण्यभूमी म्हणजे ‘देहू’. इथे कर कटीवरी ठेवलेल्या सावळ्या  विठू रखुमाई चे सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोरून इंद्रायणी झुळूझुळू वाहताना बघून मन प्रसन्न होते. अशा ह्या पुण्यभूमी मध्ये अंबिले घराण्यात माघ शुद्ध ५, शके १५२८ (२२ जानेवारी १६०८) साली बोल्होबा आणि कनकाई च्या पोटी प्रेमळ भक्तिमार्गाची सोज्वळ पताका हाती घेवून लाखो लोकांना पांडुरंगाच्या भजनी लावणारे अलौकिक महापुरुष जन्माला आले. त्यांचे नाव म्हणजे ‘संत तुकाराम’.(sant tukaram mahiti Marathi)

sant-tukaram-information-in-marathi
Sant Tukaram Information In Marathi

तुकाराम महाराजांची कथा (sant tukaram maharaj information in marathi)

देहू या पावन क्षेत्री, एका थोर घराण्यात संत तुकारामांसारख्या विठ्ठल-भक्ताचा जन्म झाला. पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. संत तुकारामांच्या रोम रोमामध्ये पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागरथी स्वप्नी पांडुरंग अशी तुकारामांची अवस्था होती. मात्र, तुकाराम महाराज हे पहिले विठ्ठलभक्त नव्हते; तर त्यांना हा वारसा आपल्या पूर्वजांकडूनच मिळाला होता. संत तुकाराम महाराजांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई हे दोघेही मोठे विठ्ठलभक्त, पंढरपुरचे वारकरी, हरीनामाच्या स्मरणात व साधू-संतांच्या सेवेत आपले आयुष्य घालवत होते. महिन्याच्या वारीला पंढरपूरला याव, डोळे भरून पांडुरंगाला पहाव, चंद्रभागेत स्नान कराव, नगरप्रदक्षिणा घालावी हे वडिलांचे संस्कार मुलांना मिळाले होते. संत तुकारामांना दोन भावंडे होती सावजी आणि कान्होबा. तिघांनाही लहानपणापासून विठ्ठलभक्तीची आवड होती. त्यांच्या घरी शेती,गुरे, गायी, म्हशी होत्या. त्यांची राखण करण्यासाठी गडी-माणसेही होती. लहानपणीच संत तुकारामांनी नदी, नदीवर असलेला घाट, नदीच्या पाण्यात खेळणारी, मस्ती करणारी पोरे, बाजूला असलेली वड, पिंपळाची मोठमोठी झाडे या सगळ्यांशी त्यांची गाढ मैत्री झाली होती. तुकारामांचे वृक्षवेलींवर अतोनात प्रेम होतं; म्हणून तर त्यांनी पुढे –

            वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें |

            पक्षी ही सुस्वरें आळविती ||   

असा अभंग रचला.

संत तुकाराम हे संत शिरोमणी नामदेवांचे अवतार. संतश्रेष्ठ नामदेवांनी शतकोटी अभंग लिहण्याचा संकल्प केला होता. घरातील सगळे १४ माणसं रात्रंदिवस अभंग लिहायला बसले स्वतः पांडुरंग लिहायला बसला. ९६ कोटी अभंग लिहून पूर्ण झाले आणि ४ कोटी अभंग अपूर्ण राहिले. ते ४ कोटी अभंग पूर्ण करण्यासाठी नामदेवांचा अवतार म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू मध्ये जन्माला आले. संत तुकारामांचा जन्म झाला, थोडासा कळायला लागलं आणि वडील स्वर्गवाशी झाले. सगळ्या संसाराचा बोज तुकारामांच्या शिरावर आला. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई(आवली) हिच्याशी तुकारामांचा विवाह झाला. संत तुकारामांना चार अपत्ये होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. तुकारामांचा परंपरागत व्यवसाय सावकारी होता. व्यापार कसा करायचा, कसा पैसा मिळवायचा, वडिलांचा व्यवसाय कसा चालवायचा याचा अनुभव नव्हता. संत तुकारामांना मोहमाया आणि ऐश्वर्यामध्ये गुरपठायचा नव्हता कारण जर तसा झाला तर देवापर्यंत पोहचता येणार नाही. म्हणूनच त्यावेळी भयानक दुष्काळ पडला असता मूर्तिमंत वैराग्य जगद्गुरू संत तुकारामांनी सर्व गावातल्या लोकांना बोलावून आपली संपत्ती वाटून टाकली, लोकांना सावकारीच्या पाश्यातून मुक्त केले. जमिनीची गहानवटीची कागदपत्रे इंद्रायणी मध्ये टाकून दिली. कर्जदारांची कर्ज माफ करणारें जगातील संत तुकाराम हे पहिले संत होय. आणि म्हणूनच संत तुकारामांना तुका आकाशाएवढा असा म्हणतात,

            अणुरेणियां थोकडा |

            तुका आकाशाएवढा ||

आणि पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्पुरू लागली. संत तुकारामांना प्रापंचिक जीवनात विपत्तीचे खूप तडाखे सहन करावे लागले. खूप दुखे भोगावी लागली. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम चालू ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली आणि स्वतःचे खूप सारे साहित्य रचले. चिरंतनाचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. आणि तेथेच परमब्रम्हस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. संत तुकाराम हे साक्षात्कारी व निर्भीड लोककवी होते.

जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले || तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||

वाचा समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची माहिती

अशा प्रकारचे अभंग संत तुकारामांनी (sant tukaram in marathi) जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवून दिला. १७ व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. संत तुकारामांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून प्रबोधन करण्याचे काम केले. भागवत सांप्रदायाचा कळस होण्याचे महादभाग्य संत तुकारामांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. अभंगासोबत त्यांनी गवळणींही रचल्या. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकारामांची अभंगाची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखात कायम आहे.

तुकाराम महाराज जीवन चरित्र (Sant Tukaram Information In Marathi)

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट्ट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ जनसामान्यांना कळेल अशा बोली भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. गाथा बुडवली म्हणणार्यांना हजारोंच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी संत तुकारामांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे हे पाहून तुकाराम सुखावले. आणि रामेश्वर भट्ट यांनी संत तुकारामांची आरती लिहली. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे त्या काळातील लोकसंत होते.    

संत तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने समाजसुधारक आहेत. त्यांनी त्यांच्या साहित्यामधून समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रधा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामध्ये ते यशस्वी ठरले. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले. जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी संत तुकाराम यांनी आपल्या संसारातील सुख-दुखांचा त्याग केला. त्यांनी आपल्या अभंगवाणीने अखंड मानवजातीचा उध्दार केला आहे. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आपले आयुष्य परमार्थाकडे वळवले. समाजामध्ये कोणीही गरीब असू नये अशी त्यांची धारणा होती. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे ८ व्या पिढीतील नायक ठरले होते.  ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.

फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. आणि हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. 

तुकाराम महाराजांचे बारा अभंग (Sant Tukaram Abhang In Marathi)

खरच वारकरी थोर समाजसुधारक संत तुकाराम महाराज खूपच छान अस व्यक्तिमत्व होत ते आता नसलेतरीही त्याच्या कीर्ती आपल्यामध्ये जिवंत आहेत. लवकरच आम्ही आपल्यासाठी संत तुकाराम महाराजांचे बारा अभंग व त्यांचे अर्थ घेऊन येणार आहोत.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थोर वारकरी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant tukaram Information In Marathi in short या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant tukaram maharaj Information In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनराठी.नेट

2 thoughts on “संत तुकाराम महाराज माहिती Sant Tukaram Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!