राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची माहिती Sant Tukdoji Maharaj Information In Marathi

sant tukdoji maharaj information in marathi चिखलातून कमळाचा जन्म होतो. कमळ आपल्या शत-शत सुगंधित पाकळ्यांनी आसमंत दरवळून टाकते, तसेच विसाव्या शतकात एका झोपडीत जन्माला आलेले आणि आपल्या सत्कार्याच्या कीर्तीचा सुगंध जगभर पसरविणारे संत तुकडोजी महाराज. समाजोद्धारातून भारतोद्धाराकडे झेपावणाऱ्या तुकडोजीने आपल्या विचार कार्याचे माणिक मोती दुनियाभर विस्तारले. “राष्ट्रसंत तुकडोजी” या नावाने उदयाला आलेले ‘विश्वशांती’ चे नवे वादळ जगभर पसरले. राष्ट्रसंतानी जगाला मानव धर्माचे खरे वेडच लावले.

सद्गुरू गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज sant tukdoji maharaj म्हणजे विसाव्या शतकातील समाज प्रबोदनाचे सूर्य-चंद्र होत. गाडगेबाबा अक्षरशत्रू तर राष्ट्रसंत अक्षरांची खैरात करणारे प्रतिभा संपन्न कवी. बाबांची आणि राष्ट्रसंतांची समाज प्रबोधनाची नाळ एकच होती.

sant-tukdoji-maharaj-information-in-marathi
sant tukdoji maharaj information in marathi/sant tukdoji maharaj

संत तुकडोजी महाराज जीवन परिचय sant tukdoji maharaj information in marathi

मूळनावमाणिक बंडोजी इंगळे
जन्म३० एप्रिल १९०९, यावली जि. अमरावती
साहित्यग्रामगीता, अनुभव सागर भजनावली,सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
गुरूआकडोजी महाराज
भाषाहिंदी, मराठी
वडीलबंडोजी
आईमंजुळाबाई
(मृत्यू) निर्वाण११ ऑक्टोबर १९६८, मोझरी, जि. अमरावती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याश्या गावी ई.स. ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांचे मुळनाव माणिक बंडोजी इंगळे होते. त्यांचे वडील बंडोजी गणेशपंत इंगळे आणि आई मंजुळा. ते ब्रम्हभट वंशातले होते. त्यांना शाळेत घातल तर ‘शाळा कोण करी | जावे नदीचीया तीरी’ असा प्रकार, पण परीक्षेत मात्र पास. ‘एकांती ध्यान नी लोकांती कविता कीर्तन’ हा त्यांचा बालचंद होता. पोहणे, अश्वारोहण, कुस्त्या यासारख्या नव्या कला निर्भयतेने ते आत्मसात करी. वरखेड येथे ४ थी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. प्रतिकूल परिस्थितीचे अनेक चटके त्यांनी लहानपणी सहन केले. त्याबद्दल त्यांनी म्हंटले आहे कि,sant tukdoji maharaj information in marathi

माझी जन्मयात्रा ऐकताना कोणी |हसतील मनी नवलाने ||                       

हीन मी जातीचा, भाट गा कुळीचा |घरीचा मुळीचा भिकारी मी ||                     

घरी पिता काम करी काम शिपियाचे |त्यावरी आमुचे पोट चाले ||                                   

तुकड्यादास म्हणे शिकलोसे जरा |मराठी तिसरा चोथा वर्ग ||

बालपणीच मातेबरोबर गृहत्याग करण्याची वेळ आली आणि ते त्यांच्या मामाकडे श्रीक्षेत्र वरखेडला राहायला आले. तेथे नाथपंथी विदेही संत आकडोजी महाराज यांच्या सहवासात त्याचं अंतरंग खुललं. त्यांचे गुरु आकडोजी महाराजांनी त्यांचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले. गुरुच्या आज्ञेनुसार ते स्वकाव्य गाऊ लागले. त्यातूनच त्यांनी पुढे असंख्य अभंग, भजने रचली.

ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती, राष्ट्र उन्नती, सर्वधर्मसमभाव, उद्योगशीलता इत्यादी विषय त्यांनी आपल्या कीर्तनातून, भाषण-प्रवचनातून प्रखरतेने मांडले.

१५ नोव्हेंबर १९२१ रोजी कार्तिक पौर्णिमेच्या मध्यानास तुकडोजी महाराजांचे सद्गुरू आकडोजी महाराज समाधिस्त झाले. गुरुविरहाने तुकड्यादासांचे मन अधिकच विरक्त झाले आणि त्यांनी तपश्चर्येसाठी अरण्याची वाट धरली.

सालबर्डी (जि. बैतुल), रामटेक, नारायण टेकडी, कपूर बावडी (जि. नागपूर), रामदिघी, सातबहिनी डोंगर, ताडोबा, गोंदोडा(जि. चंद्रपूर) आदि अरण्यात हिंस्र श्र्वापदांच्या सानिध्यात संचार करत त्यांनी तपसाधना केली.    

समाजकार्य / समाजप्रबोधन

भारत देश हा खेड्यांचा देश असल्यामुळे जर सर्वप्रथम खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास आपोआप होईल अशी विचारसरणी तुकडोजी महाराजांची होती. विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या आणि विशेषतः आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला.

खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा |                                      

झटू सर्व भावे करू स्वर्ग गाव |

 • ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. अनेकांत एकत्व शोधताना खेड्यांमध्ये या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

गांव हा विश्वाचा नकाशा |                                    

गावावरून देशाची परीक्षा |                                        

गावाचि भंगता अवदशा |                                      

येईल देशा ||

 • अनिष्ठ रूढी परंपरा, जातीभेद, अंधश्रध्दा ई. समाजविघातक गोष्टीवर त्यांनी टीका केली.
 • सर्वधर्मसमभाव हेही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी त्यांनी सामुदायिक / सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
 • महिलोनत्ती हाही त्यांच्या विचाराविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्राव्यवस्था ही स्त्रियांवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
 • देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृत कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन संत तुकडोजी महाराजांनी केले. त्यांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेद केला.
 • महाराष्ट्रातील विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी, त्यांनी महाराष्टातच नव्हे तर संपूर्ण भारतभर अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते.
 • १९३५ मध्ये अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे.
 • १९५५ मध्ये त्यांनी जपानमध्येही जाऊन सर्वांना विश्वबंदुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी त्यांना अटक झाली होती. स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी रचलेले पद “आते ही नाथ हमारे” स्फुर्तीगान ठरले होते.
 • १९६२ ला चीन युद्ध व १९६५ ला पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा सैन्यास धीर देण्यासाठी स्वतः सीमेवर जाऊन वीरगीते गाईली व सैन्याचे धैर्य वाढविले.
 • १९६६ मध्ये प्रयाग येथे भरविण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्षस्थान तुकडोजी महाराजांनी भूषविले.

साहित्यरचना (तुकडोजी महाराजांनी कोणते ग्रंथ लिहिले?)

ऐहिक आणि पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिन्दी भाषेतही विपुल लेखन केले.

 • ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्राम विकासावरील ४१ अध्याय, ४६७५ ओव्या असलेला काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ त्यांनी मराठी संस्कृतीला दिलेला अमोल ठेवा आहे. राष्ट्रसंतानी आपल्या ग्रामगीतेतून समाज परिवर्तनाचा एक सुंदर नकाशाच भारतापुढे ठेवला. अतिशय सुलभ अशा ओव्यांमध्ये असलेली ग्रामगीते केवळ अध्यात्मिकच नव्हे तर भौतिकदृष्ट्या सुखी होण्याचा मार्ग दाखविते.

संत देहाने भिन्न असती | परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती |    

साधने जरी नाना दिसती | तरी सिद्धांतमति सारखी ||

 • लहरकी बरखा हे त्यांनी लिहिलेले हिंदी मधील पुस्तकही प्रसिद्ध आहे.
 • खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या समाज प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी म्हणलेल्या खंजिरी भजने ऐकून देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना “राष्ट्रसंत” ही पदवी बहाल केली.
 • व्यायामाचे महत्त्व सांगण्याकरिता तुकडोजीनी “आदेश रचना” हा ग्रंथ लिहिला.
 • सन १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी तुरुंगवास भोगताना तुकडोजी महाराजांनी “सुविचार स्मरणी” हा ग्रंथ लिहिला.
 • अनुभव सागर भजनावली, राष्ट्रसंतांची अमृतधारा ( भाग १,२,३), राष्ट्रीय भजनावली, सेवास्वधर्म ही त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.

संत तुकडोजी महाराज यांच्या कविता

“कशाला कशी जातो रें बाबा, कशाला पंढरी जातो ?”

“राजास जि महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ||”

संत तुकडोजी महाराज भजन संग्रह

संत तुकडोजी महाराजांचे हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकवले जाते

                  हर देश में तू …

हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एकही है |                            

तेरी रंगभूमी यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है || धृ ||                          

सागर से उठ बादल बनके, बादल से फटा जल हो कर के |                                

फिर नहर बनी  नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एकही है || १ ||                

चिटी से भी अनु- परमानुबना, सब जीव जगत का रूप लिया |                         

कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा, तू एकही है || २ ||                        

यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया |                            

तुकड्या कहें कोई न और दिखा, बस! मी और तू सब एकही है || ३ ||

मृत्यू

आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर १९६८) रोजी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील “गुरुकुंज” या आश्रमामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांचे महानिर्वाण झाले. त्यांची समाधी मोझरी येथे आहे. त्यांच्या स्मृर्तीपृत्यार्थ १९२५ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठास “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे.

आम्ही दिलेल्या rashtra sant tukdoji maharaj information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज rashtrasant tukadoji maharaj yanchi mahiti  यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant tukdoji maharaj information in marathi short या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tukdoji maharaj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant tukdoji maharaj abhang in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!