संत गाडगे बाबा महाराजांची माहिती Sant Gadge Baba Information In Marathi

sant gadge baba information in Marathi ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला कर्मयोगी….संत गाडगेबाबा! गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते.(sant gadge baba in marathi)

संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली अमरावती जिल्ह्यातील कोतेगाव(शेंणगाव) येथे झाला होता. संत गाडगेबाबांचा पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट(धोबी) होते. त्याच्या आईचे नाव सखुबाई जानोरकर हे होते. त्यांचे बालपण हे त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामांकडेच गेले. त्यांच्या मामांची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच गुरे राखणे, शेतीवाडी करणे, नांगर चालविणे अशी कामे ते करत असत. डेबुजींचे लग्न लहानपणीच १८९२ साली झाले. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फार रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

sant-gadge-baba-information-in-marathi
sant gadge baba information in marathi

संत गाडगेबाबा महाराज संपूर्ण माहिती (sant gadge baba information in Marathi)

नाव डेबुजी झिंग्राजी जानोरकर
जन्म 23 फेब्रुवारी 1876
गाव अमरावती जिल्ह्यातील कोतेगाव(शेंणगाव)
आईसखुबाई जानोरकर
वडीलझिंगराजी जानोरकर
मृत्यू20 डिसेंबर 1956

अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे, डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात खराटा, दुसऱ्या हातात मडके असा गाडगेबाबांचा वेश असे. म्हणूनच लोक त्यांना “गाडगेबाबा” असे म्हणू लागले.

सामाजिक सुधारणा

२० व्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगेबाबा यांचे आहे. गाडगेबाबांनी त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रुढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. संत गाडगेबाबा हे सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा, आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. देवा धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका, गोधडेबुवा, चिंधेबुवा, लोटके महाराज या नावाने संत गाडगे महाराज प्रसिद्ध होते.

                  “तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी |”

असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. त्याचं कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांबिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत. गावात कोणाचे काही नडले, कोठेही काही काम करावयाचे असले कि, गाडगेबाबा स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी गावकऱ्यांना शिकवला.  

समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची माहिती 

समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असत. गाडगेबाबा म्हणजे चालती-बोलती पाठशाला होती.

“देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काडू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.

माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांकडून मिळत असलेल्या देणगीमधून नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा, अनाथ व अपंग लोकांसाठी अनाथालये व अन्नक्षत्रांची व्यवस्था केली, आश्रम, छोटी मोठी रुग्णालये, विद्यालये सुरु केली. नद्यांवर घाट बांधले.

‘महाराष्टातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहे.

गाडगेबाबा प्रबोधन काव्य

संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?

“संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश”

                                                           भुकेलेल्यांना = अन्न                                                           

                                                             तहानलेल्याना = पाणी                                                               

                                                            उगड्यानागड्यांना = वस्त्र                                                             

                                                      गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत                                                  

                                                             बेघरांना = आसरा                                                                    

                                                 अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार                                                   

                                                               बेकारांना = रोजगार                                                                   

                                                      पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय                                                      

                                                      गरीब तरुण-तरुणींचे = लग्न                                                          

दुखी व निराशांना = हिंमत   

गोरगरीबाना = शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे | हीच खरी भक्ती व देवपूजा आहे ||

लोकजागृतीसाठी कीर्तनाचा मार्ग

“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला”

हे गाडगेबाबांचे आवडते भजन होते. त्यांच्या जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात, ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात’

महारष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ असे म्हटले जाते.                                                           

“मी कुणाचा गुरु नाही व माझा कुणी शिष्य नाही” असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन या गावापासून सुरु केले. येथे त्यांनी ‘लक्ष्मीनारायणाचे’ मंदिर बांधले.

  • १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
  • १९१७ मध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली.
  • १९२५ मध्ये मुर्तीजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.
  • ८ फेब्रुवारी १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व धर्मशाळा स्थापन केल्या.
  • १९३२ मध्ये ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरु केले.
  • १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
  • १९५४ ला मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलच्या रोग्याच्या नातेवाईकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.

गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गाडगेबाबांना गुरुस्थानी मानत असत.

संत तुकारामांची माहिती 

संत गाडगेबाबांचे विचार (sant gadge baba in marathi)

एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना, समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा राग आला आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेवून धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, “बिचाऱ्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता? त्याला हे कुठं माहित आहे कि, माणसाचा देव दगड असतो म्हणून ?”

संत गाडगेबाबांचा मृत्यू

२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव येथे संत गाडगेबाबांचा मृत्यू झाला. गाडगेनगर, अमरावती येथे संत गाडगेबाबांच स्मारक आहे.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

संत ज्ञानेश्वरांची माहिती 

मित्रानो तुमच्याकडे जर थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant gadge baba information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gadge maharaj information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant gadge baba in marathi essay language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!