Sap Course Information in Marathi सॅप कोर्स मराठी माहिती, सध्या विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करून आपल्या करियरला चांगली उभारी देण्याचा प्रयत्न करत असतात आणि एसएपी (SAP) हा देखील एक कोर्स आहे आणि हा कोर्स ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय अनुप्रयोगामध्ये रस आहे किंवा आवड आहे त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आज आपण या लेखामध्ये एसएपी या कोर्सविषयी माहिती घेणार आहोत. एसएपी एक टॅली सारखाच एक कोर्स आहे आणि याचे पूर्ण स्वरूप सिस्टम अॅप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डाटा प्रोसेसिंग (system application and products in data processing) असे आहे.
एसएपी हा एक असा कोर्स आहे जो आपल्या व्यासायीकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते किंवा त्यांना पुढे नेण्यासाठी तयार करत असते आणि त्यासाठी अनेक प्रकारचे वेगवेगळे अभ्यासक्रम देखील असतात आणि या प्रकारचा कोर्स करण्यासाठी संबधी व्यक्तीचे ग्रॅज्यूएशन हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण झालेले असले पाहिजे.
तसेच हा कोर्स बी. कॉम, बी. टेक किंवा बी. एस्सी झालेले पदवीधारक करू शकतात. चला तर खाली आपण एसएपी म्हणजे काय आणि एसएपी कोर्स म्हणजे काय या बद्दल सविस्तर माहिती घेवूया.
सॅप कोर्स मराठी माहिती – Sap Course Information in Marathi
कोर्सचे नवा | एसएपी ( SAP ) |
पूर्ण स्वरूप | सिस्टम अॅप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डाटा प्रोसेसिंग |
कोर्सचा कालावधी | एक महिना ते तीन महिने |
कोर्सची फी | दोन ते अडीच लाख रुपये |
एसएपी म्हणजे काय – sap meaning in marathi
एसएपी हि एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि हि जगातील सर्वात मोठी बिझिनेस सोल्युशन कंपनी आहे. त्यांचे सॉफ्टवेअर हे जगातील १८० देशामधील ३९ हजार कंपन्या वापरतात आणि जर आपल्याला या सॉफ्टवेअर विषयी माहिती घ्यायची असेल किंवा ते कसे काम करते या बद्दल शिकायचे असेल तर आपल्या एसएपी हा कोर्स करावा लागतो आणि हा कोर्स केल्यानंतर आपण मल्टीनॅशणल कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळू शकते.
एसएपी कोर्स विषयी महत्वाची माहिती – information about sap course in marathi
एसएपी हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे जगातील १८० देशांच्यामध्ये ३९ ते ४० हजार कंपन्या वापरतात आणि हे सॉफ्टवेअर असे आहे कि आपल्याला ते चालवण्याअगोदर त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते आणि या सॉफ्टवेअर विषयी प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एसएपी कोर्स आहेत.
आणि आपल्याल चांगल्या किंवा मल्टीनॅशणल कंपनीमध्ये जॉब करायचा असल्यास तुम्ही हा कोर्स कराच कारण जर तुमचा एसएपी हा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला चांगली कंपनी मध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकते. याचे पूर्ण स्वरूप सिस्टम अॅप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डाटा प्रोसेसिंग (system application and products in data processing) असे आहे.
आणि या कोर्सचा कालावधी हा १ महिना ते तीन महिने इतका असू शकतो आणि हा कोर्स करण्यासाठी तुम्ही विज्ञान किंवा वाणिज्य मधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलेले असले पाहिजे. काम, वेळ, व्यवस्थापन, पैसा आणि मनुष्यबळ यासह कंपनीची कार्ये आणि सर्व संसाधने स्वयंचलीत करण्यासाठी हे खूप उपयोगी ठरू शकते.
एसएपी हा कोर्स जरी कमी कालावधीचा साला तरी या कोर्ससाठी आपल्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च करावे लागतात परंतु हा कोर्स इतके पैसे घालून देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकतो.
एसएपी चे पूर्ण स्वरूप काय आहे – sap full form in marathi
एसएपी हे एक सॉफ्टवेअर आहे आणि याचे पूर्ण स्वरूप सिस्टम अॅप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डाटा प्रोसेसिंग ( system application and products in data processing ) असे आहे.
एसएपी सुरुवात कोठे व कोणी केली ?
एसएपी या सॉफ्टवेअरचा शोध किंवा सुरुवात हि १९७२ मध्ये डायटमार हॉप, क्लॉस त्शिरा, हॅन्स वर्नर हेक्टर, हॅसो प्लॅटनर आणि क्लॉस वेलनरथर यांनी केली आणि या सॉफ्टवेअरची सुरुवात हो सर्वप्रथम जर्मनी या देशामध्ये झाली.
एसएपी कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eligibility
कोणत्याही प्रकारचा कोर्स करण्यासाठी आपल्याला त्या संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि खाली आपण एसएपी हा कोर्स करण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पहाणर आहोत.
- एसएपी हा कोर्स करण्यासाठी त्या संबधीत विद्यार्थ्याला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलेले असले पाहिजे.
- त्याचबरोबर त्या संबधित विद्यार्थ्याला वाणिज्य किंवा विज्ञान शाखेमध्ये कमीत कमी ५० ते ५५ टक्के गुण मिळवून उतीर्ण झालेला असला पाहिजे तरच त्या विद्यार्थ्याला हा कोर्स करता येतो.
एसएपी या कोर्सचा अभ्यासक्रम – syllabus
एसएपी कोर्सचा अभ्यासक्रम हा प्रत्येक संस्थेचा सारखाच असतो परंतु त्यामध्ये काही छोटे छोटे फरक असतात. खाली आपण एसएपी कोर्सचा अभ्यासक्रम पाहणार आहोत.
क्र | अभ्यासक्रम किंवा विषय |
१ | विक्री आणि वितरण |
२ | आर्थिक लेखा आणि नियंत्रण |
३ | मटेरीयल मॅनेजमेंट |
४ | उत्पादन नियोजन |
५ | मानव संसाधन व्यवस्थापन |
६ | प्रोजेक्ट सिस्टीम |
एसएपी कोर्सची विशेष तथ्ये – facts
- एसएपी चे सीईओ ( CEO ) हे बिल मॅकडरमॉट हे आहेत.
- एसएपी हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे जगातील १८० देशांच्यामध्ये ३९ ते ४० हजार कंपन्या वापरतात.
- हा एक ते तीन महिन्याचा कोर्स आहे आणि हा कोर्स करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये फी आहे.
- एसएपी या सॉफ्टवेअरचा शोध किंवा सुरुवात हि १९७२ मध्ये जर्मन या देशामध्ये झाली.
- हा कोर्स बी.कॉम, बी. टेक किंवा बी. एस्सी झालेले पदवीधारक करू शकतात.
आम्ही दिलेल्या sap course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सॅप कोर्स मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sap course duration and fees in pune या sap full form in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sap course in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sap meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट