एसबीआय वैयक्तिक कर्ज SBI Personal Loan Information in Marathi

sbi personal loan information in marathi एसबीआय वैयक्तिक कर्ज, आज लोक अनेक कारणांच्यासाठी कर्ज घेतात जसे कि शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, व्यवसाय सुरु करण्यासाठी घेतात आणि या प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती वैयक्तीक कर्ज (Personal loan) घेऊ शकतो. वैयक्तीक कर्ज म्हणजे जे आपल्याला बॅंकेकडून कर्ज स्वरूपामध्ये ठराविक रक्कम मिळते आणि हे मिळालेले कर्ज आपण वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरू शकतो, जसे कि शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, घरासाठी आणि अश्या अनेक कारणांच्यासाठी वापरू शकतो.

एसबीआय (SBI) या बॅंकेविषयी कोणाला माहित नाही असे नाही तर या बँके विषयी सर्वांना माहित आहे आणि हि बँक सुध्दा स्वताच्या ग्राहकांना वैयक्तीक कर्ज देते आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये एसबीआय बँकेची वैयक्तिक कर्ज योजना कशी आहे, ते देण्याची प्रक्रिया कशी आहे आणि त्यासाठी कोणता आणि कसा अर्ज करावा लागते, तसेच कर्जाचे रेट्स कसे आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे वैयक्तिक कर्ज एसबीआय देते या सर्व गोष्टी खाली आपण जाणून घेणार आहोत.

sbi personal loan information in marathi
sbi personal loan information in marathi

एसबीआय वैयक्तिक कर्ज – SBI Personal Loan Information in Marathi

कर्जाचा प्रकारएसबीआय वैयक्तीक कर्ज (SBI personal loan)
कर्जाचा कालावधी५ वर्ष
कर्ज रक्कम३० हजार ते २५ लाखांपर्यंत
व्याज दर११ टक्के ते १४ टक्के

वैयक्तीक कर्ज म्हणजे काय ?

वैयक्तीक कर्ज म्हणजे जे आपल्याला बॅंकेकडून कर्ज स्वरूपामध्ये ठराविक रक्कम मिळते आणि हे मिळालेले कर्ज आपण वेगवेगळ्या कारणांच्यासाठी (शिक्षण, व्यवसाय, घर) वापरू शकतो आणि हा एक सुलभ कर्ज प्रकार आहे असे वाटते कारण या प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याहि प्रकारची सुरक्षितता देण्याची गरज नसते.

एसबीआय वैयक्तीक कर्जाविषय महत्वाची माहिती – sbi personal loan details in marathi

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय हि बँक जे लोक नोकरी करतात किंवा ज्यांचा स्वयंरोजगार आहे अश्या लोकांना कर्ज देते आणि हे ३० हजार पासून २५ लाखांच्या पर्यंत कर्ज देते आणि काही वेळा या कर्जाची रक्कम प्रकारावर बदलली जाऊ शकतो आणि या बँकेचा कर्ज देण्याचा कालावधी हा ५ वर्षाचा असतो.

जर एखाद्या व्यक्तीला शिक्षणासाठी आर्थिक मद हवी असेल, व्यवसायासाठी आर्थिक मदत, आरोग्य संबधीत उपचार काण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक मदत, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, गाडी घेण्यासाठी आर्थिक मदत आणि परदेशी प्रवास करण्यासाठी आर्थिक मदत अश्या अनेक कारणांच्यासाठी संबधित व्यक्ती एसबीआयचे वैयक्तीक कर्ज निवडू शकते.

एसबीआय वैयक्तीक कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या संबधित व्यक्तीला कोणत्याही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असले तर त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तसेच जर एखाद्या व्यक्तीला एसबीआय वैयक्तीक कर्ज घ्यायचे असेल, तर त्या व्यक्तीला देखील काही पात्रता निकषांची पूर्तता करावी लागते. चला तर खाली आपण एसबीआयचे वैयक्तीक कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष काय आहेत ते पाहूया.

  • जर एखाद्या व्यक्तीला एसबीआयचे वैयक्तीक कर्ज घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीचे महिन्याचे उत्पन्न हे १५ ते २० हजार पर्यंत असले पाहिजे.
  • त्या व्यक्तीला संबधित कामामधील अनुभव हा २ वर्ष इतका असला पाहिजे.
  • त्या संबधित व्यक्तीचे वय हे कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ५८ वर्ष इतके असावे लागते त्याच व्यक्तीला एसबीआयचे वैयक्तीक कर्ज मिळू शकते.

एसबीआय वैयक्तीक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा आणि आवश्यक कागदपत्रे – how to apply for loan and documents

अर्ज कसा करावा

  • एसबीआयच्या वैयक्तीक कर्जासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता.
  • प्रथम तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट भेट द्या.
  • मग वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पर्याय दिसेल द्या पर्यायावर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला त्या पर्यायावर नेले जाईल.
  • आता तुम्हाला त्या ठिकाणी एक अर्ज मिळेल त्या अर्जामधील सर्व आवश्यक तपशील भरायची आणि तो अर्ज सबमिट करायचा.
  • अर्ज बँकेला मिळाल्यानंतर तुमच्या अर्जाचे मूल्यमापन केले जाते आणि मग पुढची कर्जाची प्रक्रिया केली जाते.

कागदपत्रे – documents

एसबीआयचे वैयक्तीक कर्ज घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागत ती  कोणकोणती आहेत ती आपण खाली पाहूया.

  • ओळखीचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड).
  • जर व्यक्ती पगारदार असेल तर त्याला फॉर्म १६ सहा पगार स्लीप देखील जोडावी लागते आणि त्या व्यक्तीचा स्वयंरोजगार असेल तर त्या व्यक्तीला नवीनत्तम बँक स्टेटमेंट जोडावे लागते.
  • शेवटचे ३ महिन्याचे बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक.
  • स्वाक्षरी केलेला अर्ज आणि प्रक्रिया शुल्क.

एसबीआय वैयक्तीक कर्ज प्रकार – types

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय हि बँक वेगवेगळ्या प्रकारे कर्ज देते आणि ते प्रकार म्हणजे एक्सप्रेस एलिट (Xpress Elite), एसबीआय पेन्शन कर्ज, स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस क्रेडीट.

स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस क्रेडीट

स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस क्रेडीट हा वैयक्तिक कर्जाचा असा कर्ज प्रकार आहे जो आपल्याला ज्या वेळी हवा आहे त्यावेळी अगदी सुलभपणे मिळू शकतो.

अचानक उद्भवलेल्या गरजा जसे कि शैक्षणिक खर्च किंवा आरोग्य विषयक खर्चाची गरज जर एखाद्या व्यक्तीला पूर्ण करायची असेल तर ती व्यक्ती स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस क्रेडीट या प्रकारचा अवलंब करू शकते. या प्रकारचे कर्जे ११.३५ टक्के ते १४.७५ टक्के व्याजदर दिला जातो आणि हे कर्ज ६ वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते.

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन कर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन कर्ज हे मुख्यता पेन्शन धारकांना दिले जाते आणि हे अश्या पेन्शन धारकांना दिले जाते जे केंद्र सरकार कडून किना राज्य सरकार कडून पेन्शन घेतात आणि अश्या लोकांना हे कर्ज तातडीने मिळते आणि या कर्जाचा व्याजदर ११ टक्के ते १२ टक्के पर्यंत असू शकतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस एलिट

स्टेट बँक ऑफ इंडिया हि बँक पगारदारांना किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना देखील कर्ज देते आणि तसेच एसबीआयच्या या प्रकारामध्ये देखील असेच आहे म्हणजेच ज्या व्यक्तीचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पगार खाते आहे अश्या व्यक्तींना हि बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस एलिट हि कर्ज योजना पुरवते.

ज्यामुळे त्यांना सहजपणे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी मदत होते. या प्रकारामध्ये २५ हजार पासून १५ लाखांच्या पर्यंत कर्ज मिळते परंतु त्या संबधित व्यक्तीचे महिन्याचे उत्पन्न १५ ते २० हजार पर्यंत असले पाहिजे आणि कर्जाचा कालावधी ५ महिने ते ६ वर्ष इतके असते.

आम्ही दिलेल्या sbi personal loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एसबीआय वैयक्तिक कर्ज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sbi personal loan details in marathi या Sbi personal loan information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sbi personal loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Sbi personal loan information in marathi online Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!