Sheep information in Marathi मेंढी हा एक पाळीव प्राणी आहे आणि या प्राण्याचे वैज्ञानीक नाव ओवीस अरीज (ovis aries) असे आहे. मेढ्यांचा उपयोग त्यांचे लोकर काढून घेण्यासाठी किवा दुध काढून घेण्यासाठी आणि त्यांच्या मांस चा उपयोग आहारामध्ये केला जातो. आशिया आणि युरोप मध्ये मेढ्यांचे जास्त प्रमाण आढळते. मेंढ्या पाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अंगावरची केसाळ कातडी ज्याला ‘लोकर’ म्हणतात हि लोकर आपण मेंढीच्या शरीरावरून काढून घेतली कि ती आणि परत येते आणि मेंढीपासून मिळणारे हे एक महत्वाचे उत्पादन आहे . मेंढीची लोकर उत्पादन करण्याची क्षमता त्यांच्या जातीवर असते चांगल्या जातीच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात लोकर उत्पन्न करतात तर ज्या मेंढ्यांची जात जास्त प्रमाणात लोकर उत्पन्न करू शकत नाहीत ती मेंढरे मांसासाठी वापरले जातात. मेंढी शकाहारी प्राणी आहे जो गवत आणि धान्य या प्रकारचा आहार खातो. नर मेंढ्यांना ‘मेंढ्या’ मादी मेंढ्यांना ‘कोसरे’ असे म्हणतात तसेच त्यांच्या पिल्लांना ‘कोकरे’ म्हणतात.
मेंढी माहिती (Sheep information in Marathi)
सदरच्या लेखात आपण मेंढी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा एक पाळीव प्राणी असून आपण यात मेंढी पालन असा व्यवसाय देखील करू शकतो. यामध्ये विजापुरी मेंढी हि जादा प्रचलित मेंढी आहे. चला पुढे आणखी जाणून घेउयात.
मेंढी बद्दल काही तथ्ये ( facts about sheep )
- मेंढी ८ ते १० वर्ष जगू शकते.
- सशक्त आणि निरोगी मेंढीचे वजन ४० ते १८० किलो असू शकते.
- इंग्लिशमध्ये नर मेंढीला rams आणि मादी मेंढीला ewes म्हणतात.
मेंढीचे विविध प्रकार ( different types of sheep )
बघायला गेले तर मेंढ्यांचे १००० हून जास्त प्रकार आहेत त्यामधील काही प्रकारच्या मेंढ्या त्यांच्या लोकरसाठी प्रसिध्द आहेत तर काही मेंढ्या दुधासाठी प्रसिध्द आहेत. जगभरामध्ये मेंढ्यांना लोकरसाठी, दुधासाठी किवा त्यांच्या मांसासाठी पाळल्या जातात. मेंढ्यांचे काही प्रकार खाली दिलेले आहेत.
भारतातील काही मेंढ्यांच्या जाती ( types of sheep in india )
भारतामध्ये सुद्धा बऱ्याच जातीच्या मेंढ्या आहे आणि भारतातल्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या जातीच्या मेंढ्या आढळतात. त्यामधील काही मेंढ्यांचे प्रकार खाली दिलेले आहेत.
कोइमबतोरे ( coimbatore )
ह्या मेंढ्या भारतातील तमिळनाडू राज्यामधील कोइमबतोरे जील्यामध्ये आढळतात म्हणून या मेंढ्यांना कोइमबतोरे म्हणतात आणि या मेंढ्या खासकरून त्यांच्या लोकरीसाठी प्रसिध्द आहेत. या प्रौढ नर मेंढ्यांचे वजन २५ ते ३० किलो असते आणि प्रौढ मादी मेंढ्यांचे वजन १९ ते २० किलो असते. या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो आणि मानेपासून चेहऱ्यापर्यंत चा रंग लाप्कीरी किवा काळा असतो.
मंड्या ( mandya )
मंड्या या मेंढ्या कर्नाटका मध्ये आढळतात शक्यतो या मेंढ्यांचा रंग पांढराच असतो पण काही मेंढ्यांचा मानेपासून रंग तपकिरी असतो. नर मेंढीचे वजन ३४ किलो असते आणि मादी मेंढीचे वजन २४ किलो असते. या मेंढ्याच्या मांसाचा उपयोग आहारामध्ये केला जातो.
मारवाडी ( marwadi )
या मेंढ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रात आढळतात. या मेंढ्याचे वर्णन करायचे म्हंटले तर या मेंढ्यांना लांब पाया असतात आणि यांचा चेहरा काळ्या रंगाचा असतो. या मेंढ्याचे लोकर कारपेट बनवण्यासाठी वापरले जाते.
चेन्नई रेड ( chennai red )
चेन्नई रेड या मेंढ्या तामिळनाडू जिल्ह्यातील विल्लुपुरम, कांचीपुरम आणि चेन्नई या भागामध्ये आढळतात. या मेढ्यांना शक्यतो त्यांच्या मांसासाठी पाळले जाते. या नर मेंढ्यांचे वजन ३७ किलो असते आणि मादी मेंढ्यांचे वजन २५ किलो इतके असते.
निलगिरी ( neelagiri )
निलगिरी मेंढ्या ह्या तामिळनाडूमधील निलगिरी या जिल्ह्यामध्ये आढळतात म्हणून या मेंढ्यांना निलगिरी असे नाव पडले आहे. या मेंढ्यांना हि चांगल्या प्रमाणात लोकर असते. या मेंढ्या मध्यम आकाराच्या असून या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो. नर आणि मादी मेंढ्यांचे वजन सारखेच असते.
ट्रीची ब्लॅक ( trichy black )
या जातीच्या मेंढ्या तामिळनाडू मधील ट्रीची, धर्मापुरी आणि सालेम या भागात आढळतात. या मेंढ्या पूर्णपणे काळ्या रंगाच्या असतात आणि या मेंढ्यांना लोकरीसाठी पाळले जाते. या मेंढ्या आकाराने लहान असतात आणि नर मेंढ्यांना शिंगे असतात आणि मादी मेंढ्यांना शिंगे नसतात त्याचबरोबर नर मेंढ्यांचे वजन २५ ते २६ किलो इतके असते आणि मादी मेंढ्यांचे वजन १८ ते १९ किलो इतके असते.
नाली ( nali )
या जातीच्या मेंढ्या तपकिरी रंगाच्या असतात आणि या मेंढ्यांची त्वचा साधारण फिकट गुलाबी रंगाची असते. या मेंढ्या त्यांच्या लोकरीसाठी प्रसिध्द आहेत या मेंढ्यांचे लोकर वर्षातून दोन वेळा काढले जाते.
मग्रा ( magra )
मगर या मेंढ्या मध्यम आकाराच्या असतात. या मेंढ्याचा रंग तपकिरी असतो आणि चेहर्याचा रंग पांढरा असतो आणि त्यांची त्वचा साधारण फिकट गुलाबी रंगाची असते आणि या मेंढ्यांचे कान लहान असते आणि यांची शेपूटही मध्यम लांबीची आणि बारीक असते. या मेंढ्या लोकरीसा ठी प्रसिध्द आहे ज्याचा उपयोग कारपेट बनवण्यासाठी होतो.
जैसलमेरी ( jaisalmeri )
या जातीच्या मेंढ्या राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या मेंढ्या उंच आणि बलवान असतात. या मेंढ्या लोकरसाठी पाळल्या जातात या लोकरी पासून कारपेट बनवले जाते तसेच या मेंढ्यांचे मांस आहारामध्ये वापरले जाते.
७ प्रसिध्द मेंढ्यांचे प्रकार ( famous 7 types of sheep )
मेरीनो ( merino )
मेरीनो मेढ्यांचा वापर शक्यतो त्यांचे लोकर काढण्यासाठीच केला जातो कारण त्या लोकरीसाठी प्रसिध्द आहेत. या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात लोकर असते आणि या लोकरीचा उपयोग कपडे तसेच लहान मुलांच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. ह्या जातीच्या मेंढ्या १२ व्या शतकात स्पेन मध्ये उदयास आल्या.
तुरकॅना ( turcana )
तुरकॅना मेंढी शक्यतो पांढऱ्या, राखाडी किवा काळ्या रंगाची असते आणि मेंढ्यांना १२ ते ३४ सेंटी मीटर लांब केस असतात. या मेंढीला पर्वतातील राणी असेहि म्हंटले जाते. या जातीच्या मेंढ्या अल्बानिया, रोमानिया, पोलंड, मोल्डाविया, क्रोटिया आणि बाल्कन देशामध्ये आढळतात. या मेंढ्यांच्या लोकर चा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे कारपेट बनवण्यासाठी होतो तसेच या मेंढीचा उपयोग दुध काढण्यासाठी आणि या मेंढीचे मांस हि आहारामध्ये वापरले जाते.
डॉरसेट ( dorset )
या प्रकारच्या मेंढ्या त्यांच्या दुधासाठी आणि मांसासाठी प्रसिध्द आहेत आणि म्हणूनच या मेंढ्यांना बाजारामध्ये खूप मागणीही आहे. या मेंढ्यांची उत्पत्ती ऑस्ट्रोलिया १९३८ ते १९५४ च्या दरम्यान झाली. या मेंढीला शिंगे नसतात.
लीन्कॉल्न ( lincoln )
लीन्कॉल्न मेंढ्या या त्यांच्या लांब असणाऱ्या लोकरीसाठी ओळखली जाणारी मेंढी आहे म्हणून या मेंढ्यांना लीन्कॉल्न लॉन्गवूल मेंढी असेही म्हणतात. या मेंढीचे लोकर लांब तसेच खडबडीत असते. या जातीच्या नर मेंढीचे वजन १२० ते १६० किलो आणि मादी मेंढीचे वजन ९० ते १२० किलो इतके असते.
डॉरपर ( dorper )
डॉरपर मेंढी हि साउथ आफ्रिकन जात आहे. ब्लॅकहेड पर्सिअन मेंढी आणि डॉरसेट या दोन जातीच्या मेंढ्या एकत्र करून डॉरपर हि जात तयार केली आहे. हि मेंढी १९५० मध्ये उदयास आली आणि मेढी त्याच्या मांसासाठी प्रसिध्द आहे.
सफफोल्क ( suffolk )
सफफोल्क मेंढी हि ब्रिटीश जात आहे या मेंढीला मध्यम लोकर असते आणि हि मेंढी मांसासाठी प्रसिध्द आहे. या मेंढीला शिंगे नसतात. ह्या जातीची मेंढी सउथडाऊन मेंढी आणि नॉरफोल्क मेंढी एकत्र करून तयार केली आहे.
हंपशायर ( hampshire )
हंपशायर हि मेंढी मध्यम आकाराची असते आणि या मेंढ्यांना शिंगे नसतात. हि जात युनायटेड किंगडम ची जात आहे आणि हि जात १८२९ मध्ये उदयास आली. हंपशायर या मेंढीला हंपशायर डाऊन शिप असेही म्हणतात.
इतर मेंढ्यांच्या जाती
कॉर्रीयेडले ( corriedale )
कॉर्रीयेडले ह्या जातीच्या मेंढ्या लोकर आणि मांसासाठी हि वापरल्या जातात. या मेंढ्या न्यूझीलंड मध्ये आढळतात. या मेंढ्या लीसेस्टर आणि लीन्कॉल्न या जाती एकत्र करून बनवलेली मेंढी आहे.
रॉमनी ( romney )
रॉमनी या मेंढ्यांना रॉमनी मार्श मेंढ्या सेही म्हटले जाते. या जातीच्या नर मेंढ्यांचे वजन १०५ ते ११० किलो असते आणि मादी मेंढ्यांचे वजन ८० ते ८५ किलो असते. या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात लोकर असते. या मेंढीला शिंगे नसतात.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा मेंढी हा पाळीव प्राणी कसा आहे त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. sheep information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही information on sheep in marathi language / information about sheep in marathi राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. या माहिती काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट