बैला बद्दल माहिती Ox information in Marathi

Ox information in Marathi आपल्या सर्वांना माहितच आहे कि बैल हा एकमेव प्राणी आहे जो शेतकऱ्याला शेतामध्ये मदत करतो म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा वाघ म्हटले जाते आणि असेही म्हटले जाते कि त्याचा शेतामध्ये पिकलेल्या धान्यामध्ये वाटा असतो. बैल हा शेतकऱ्याचा एकदम जवळचा आणि जिवाभावाचा सोबती असतो. बैलाचा वापर शेतामध्ये मशागत करण्यासाठी, नांगरण करण्यासाठी, शेतातील निघालेले पिक घरी नेण्यासाठी आणि ओढकाम करण्यासाठी अश्या वेगवेगळ्या कारणांसाठी बैलाचा उपयोग करून घेतला जातो त्याचबरोबर बैल हा घोड्यासारखा वेगाने धावू शकतो त्यामुळे बैलांच्याही शर्यती घेतल्या जातात. खिलार जातीचा बैल ओढकामे करण्यासाठी तसेच तो चांगल्याप्रकारे धावू हि शकतो काही बैलांना शर्यतीमध्ये उतरवण्यासाठी प्रशिक्षण हि दिले जाते. चांगल्या खिलार जातीची जनावरे सोलापूर, पंढरपूर, पुसेगाव, आटपाडी आणि अकलूज येथे मिळतात. बैला बद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सन साजरा केला जातो त्याला बैल पोळा असे म्हणतात. (bail in marathi)

याचबरोबर कुत्रा या प्रामाणिक प्राण्याबद्दल वाचा 

ox-information-in-marathi
ox information in marathi

बैलाचे वर्णन (Description of the ox) (OX Information In Marathi)

बैलाचे वर्णन करायचे म्हंटले तर शेतीच्या कामासाठी मदत करणारा बैल मुख्यत्वे आकाराने मोठा, चार पाय, दोन डोळे, दोन कान, एक तोंड आणि एक नाक, चेहरा आखूड, मानेखाली पोळी, मध्यम कुबडी, घट्ट त्वचा , दोन मोठे शिंग, पांढरा रंग, एक शेपूट आणि शेपटीचा गोंडा काळ्या रंगाचा

बैलाचा आहार ( ox diet )

बैल हा शाकाहारी प्राणी असल्यामुळे त्याला गवत, शेतातील हिरवा पाला, मक्याची आणि ज्वारीची हिरवी आणि वाळलेली वैरण, धान्य या प्रकारचा आहार बैलाला घालतात.

बैल पोळा सन

कृषिप्रधान संस्कृतीतील एक महत्वाचा सन म्हणजे बैल पोळा आणि बैल पोळा हा सन आपल्यासाठी सैदैव कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक सन आहे जो महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये केला जातो. पण हा सन प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. बैल पोळ्याला कर्नाटकामध्ये कर्नाटकी ‘बेंदूर’ असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये हा सन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बैल पोळ्याला शेतकऱ्यांचा सन म्हणून हि ओळखले जाते. हा सन श्रावण महिन्यामध्ये पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो आणि या दिवशी बैलांचा थाट असतो. या सणाच्या आधल्या दिवशी बैलांना नदीवर किवा ओढ्यावर नेले जाते आणि त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते आणि मग त्यांच्या पाठीवर नक्षीची झूल घालतात, डोक्याला बाशिंग, गळ्यात फुलांचा हर, पायात चांदीचे किवा करदोड्याचे तोडे घालतात. तसेच पुरणपोळीचा नैवैध दाखवला जातो आणि त्यांना ज्वारीचा किचडा हि करून घातला जातो आणि खेड्यामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात तसेच बैल जोड्यांचे वाजंत्री, ढोल, ताशे वाजवत गावभर मिरवणूक हि काढली जाते. अश्या प्रकारे शेतकरी आनंदाने हा सन साजरा करतो.

 विविध बैलांच्या जाती (different ox breeds )

आपण वरती प्रस्तावने मध्ये पहिलेच आहे कि बैल माणसांना कोणकोणत्या प्रकारे मदत करतो आणि बैलांच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या कामासाठी कश्या वापरल्या जातात. भारतीय बैलांच्या वेगवेगळ्या जाती खाली दिल्या आहेत.

खिलार ( khilar ox information in Marathi )

चांगल्या खिलार बैलांची जात महाराष्ट्रातल्या सोलापूर, सीतापुर पंढरपूर, पुसेगाव, आटपाडी, औंध, कारागामी आणि अकलूज या भागामध्ये मिळतात. या जातीची जनावरे ताकदवान, वेगवान  आणि चपळ असल्यामुळे त्याचा उपयोग शर्यतीमध्ये केला जातो. हि जात हल्लीकर सारखीच असते तसेच लांब शिंगे आणि राखाडी पांढरा रंग असतो.

अमृतमहल (amrutmahal)

अमृतमहल हा जातीचे बैल आकाराने मोठे, चेहरा आखूड पण गाल फुगलेले, मानेखालाच्या पोळीचा आकार लहान , खांदा मोठा आणि करड्या रंगाचा असतो आणि अमृतमहल या जातीचा बैल कर्नाटकामध्ये चिक्कमंगळुरू आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो. या बैलाची शिंगे लांब आणि टोकदार असतात आणि या बैलांचा रंग राखाडी असतो.

हल्लीकर (hallikar)

हल्लीकर हि जात कर्नाटक भागामधल्या विजयनगर मध्ये आढळते. गडद राखाडी रंग, लांब शिंगे, ठळक कपाळ आणि मजबूत पाय पण मध्यम आकाराचा असे या हल्लीकर बैलाचे वर्णन आहे.

पुलिकुलम ( pulikulam ox information in Marathi)

या प्रकारच्या जाती तामिळनाडू मधील मदुराई जिल्ह्यातील कुंबम  खोऱ्यामध्ये आढळतात. लहान आकाराचा, गडद राखाडी रंगाचा,  सुविकसित कुबडी असणारा असे या पुलिकुलम बैलाचे वर्णन आहे. पुलिकुलम या बैलाचा शक्यतो वापर नांगरणीसाठी केला जातो. या जातीचा बैल वेगवान नसल्यामुळे याला शर्यतीमध्ये उतरवता येत नाही. पुलिकुलम या बैलाला जलीकट्टू जल्लीकट्टू माडु किवा किडाई माडु असेही म्हणतात.

कांगायाम ( kangayam )

कांगायाम बैलाला कोंडनाड किवा कोन्गु असेही म्हंटले जाते. या बैलांच्या जाती कोयंबटूर जिल्ह्यातील कांगायाम, पेरुंदडूरे आणि धरापूर या भागामध्ये आढळतात. आकाराने मोठे तसेच मोठा पोळा आणि लांब आणि सरळ शिंगे पण किंचित वक्र असतात.

अलंबडी ( alambadi )

ह्या बैलाचाही रंग गडद राखाडी रंगाचा असतो आणि त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. हा बैल तामिळनाडूतील धर्मापुरी जिल्ह्यातील अलंबडी येथे आढळतात. हे बैल दिसायला जवळ जवळ हल्लिकर बैलासारखे असतात. या बैलांना बिटास असेही म्हणतात.

कृष्णा ( krishna ox information in Marathi))

कार्नाटकातील कृष्णा नदीच्या भागात आणि महाराष्ट्राच्या डोंगराळसीमाभागात या बैलांच्या जाती आढळतात. हे बैल पांढऱ्या रंगाचे , शरीराने मोठे, शिंगे मध्यम आकाराचे आणि पोळा लहान असतो. या बैलाचा उपयोग शेतातील कामांसाठी होतो.

बरगुर ( bargur )

बरगुर बैल हा तामिळनाडू मधील ईरोड जिल्ह्यातील भवानी तालुक्यात डोंगराळ भागात आढळतो आणि डोंगराळ भागात काम करण्यासाठी विकसित झालेला आहे. हा बैल पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचा  असतो.

कंकरेज ( kankrej )

कंकरेज बैल हे गुजरात आणि राजस्थान मध्ये आढळतात. या बैलाला वेगवान आणि सामर्थ्यवन जात म्हणून ओळखले जाते. या जातीच्या बैलाला मोठी आणि नागमोडी शिंगे असतात. कंकरेज बैलाला वाडियार किवा वागेड या नावानेही ओळखले जाते.

वेगवान धावणाऱ्या घोड्याबद्दलची माहिती पहा 

बैलांचा वापर ( uses of ox )

सध्याच्या परीस्थिती बघायला गेले तर आता सर्वच शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करतात तसेच शेतातील माल घरी नेण्यासाठी ट्रॅकटरचा वापर करतात पण ज्यावेळी हि साधने नव्हती त्या काळात बैलांचा वापर शेतीची मशागत करण्यासाठी केला जायचा. त्याच्या प्रचंड ताकदीमुळे शेतकरी बैलांचा वापर मोठ्या नांगरांसारखी अवजड उपकरणे, वैयक्तिक वाहतूक खेचणारी गाड्या किंवा व्यापाऱ्यांसाठी सामानाची किवा वस्तूंची वाहतूक करण्यासाठी आणि लष्करी वाहतुकीसाठी केला जात होता. काही शेतकरी अजूनही बैलाचा वापर शेती करण्यासाठी करतात कारण काही शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे परवडत नाहीत त्यामुळे ते बैलांचाच वापर करतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा बैल प्राणी कसा आहे त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. ox information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही ox information in Marathi / ox animal information in marathi राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. तसेच या लेखाचा वापर करून आपण essay on bullock in marathi असा देखील करू शकता. या माहिती काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!