शिरा रेसिपी मराठी Shira Recipe in Marathi

Shira Recipe in Marathi – Sheera Recipe in Marathi शिरा रेसिपी मराठी शिरा हा एक गोड पदार्थ असून हा खूप लोकांना आवडणारा एक सोपा पदार्थ आहे. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत कित्येक लोक आवडीने खातात आणि या पदार्थाची विशेषता म्हणजे हा बनवण्यास खूप सोपा आहे आणि आगदी कमी वेळेमध्ये बनवता येतो. जर आपल्याला गोड पदार्थ खावू वाटल्यास शिरा हा एकमेव पदार्थ आहे जो आपण लगेच बनवून खावू शकतो. हा पदार्थ शक्यतो भारतामध्ये लोक नाश्त्यासाठी खातात तर काही ठिकाणी या डिशचा जेवणामध्ये देखील समावेश असतो.

आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात त्यामधील एक पूजा म्हणजे सत्यनारायण आणि या पूजेला शिऱ्याचा नैवैद्य हा महत्वाचा मानला जातो. घरी शिरा बनवण्यासाठी आपल्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही म्हणून आज या लेखामध्ये आपण शिरा हि रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात.

Shira Recipe in Marathi
Shira Recipe in Marathi

शिरा रेसिपी मराठी – Shira Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ७ ते ८ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१२ ते १३ मिनिटे
पाककृतीभारतीय

शिरा कसा बनवतात – how to make Sheera Recipe in Marathi

शिरा हा असा एक गोड पदार्थ आहे जो अगदी सोप्या पध्दतीने बनवता येतो आणि खूप कमी वेळामध्ये होतो. आता आपण शिरा कसा बनवायचा आणि शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ७ ते ८ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१२ ते १३ मिनिटे
पाककृतीभारतीय

शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shira 

शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्द असते त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये जावे लागत नाही. खाली शिरा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी दिलेली आहे.

  • १ वाटी रवा.
  • १ वाटी साखर.
  • २ वाटी पाणी किंवा दुध.
  • १/२ वाटी तूप.
  • १ चमचा वेलची पावडर.
  • बेदाणे ( आवश्यकतेनुसार ).
  • काजू ( आवश्यकतेनुसार ).

शिरा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shira 

  • सर्वप्रथम कढईमध्ये तूप घाला आणि ते मध्यम आचेवर गरम करा एकदा तूप गरम झाले कि त्यामध्ये १ वाटी रवा घाला व रवा गुलाबी रंगामध्ये बदलू पर्यंत चांगला भाजा.
  • रवा छान गुलाबीसर भाजला कि त्यामध्ये गरम पाणी किंवा गरम दुध घाला आणि रवा आणि दुध/ पाणी चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेवून त्या मिश्रणाला चांगली वाफ आणा.
  • त्याला चांगली वाफ आली कि त्यामध्ये साखर, वेलची पूड, बेदाणे आणि काजू घाला आणि ते चांगले एकजीव करा व गॅस बंद करा.
  • आपला शिरा खाण्यासाठी तयार झाला.

आंब्याचा शिरा कसा बनवायचा – mango sheera recipe in marathi

शिरा हा पदार्थ आपण वेगवेगळ्या पध्दतीने बनवतो जसे कि ड्राय फ्रुट शिरा किंवा प्रसादाचा शिरा तसेच आपल्या आंब्याचा शिरा देखील बनवता येतो आणि हा शिरा आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजेच आंब्याच्या सिजन मध्येच बनवू शकतो कारण या शिऱ्यामध्ये ताज्या आंब्याचा गाभा किंवा रस वापरला जातो.

आंब्याचा शिरा देखील खूप सोपा असतो आणि हा शिरा बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते देखील आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते पण आपल्याला आंबा फक्त बाजारातून विकत आणावा लागतो. चला तर आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहूयात.

आंब्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mango shira 

  • १ वाटी रवा.
  • १ वाटी साखर.
  • २ वाटी पाणी किंवा दुध.
  • १/२ वाटी तूप.
  • १/२ चमचा वेलची पावडर.
  • १ वाटी आंब्याचा रस.
  • ३ ते ४ केशर धागे.
  • १/२ छोटी वाटी काजू आणि बदाम तुकडे.
  • थोडेसे बेदाणे.

आंब्याचा शिरा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make mango shira 

  • सर्वप्रथम रवा मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि तो भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि ते चांगले तळून घ्या आणि ते कढई मधून काढा.
  • आता कढईमध्ये आणखी थोडेसे तूप घाला आणि त्यामध्ये भाजलेला रवा घाला आणि तूप आणि रवा एकत्र होईपर्यंत मिश्रण परतावा.
  • आत गॅसची आच मंद करा आणि त्यामध्ये केशर घातलेले आणि गरम केलेले दुध घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करा आणि हे मिश्रण एकजीव करतेवेळी त्यामध्ये गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.
  • मग त्यामध्ये अमाब्याचा रस घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या आणि कढईला झाकण घालून ते २-३ मिनिटे वाफवून घ्या त्यामुळे रवा चांगला फुलेल.
  • आता या मिश्रणात साखर, वेलची पूड आणि आणि तळलेले काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करा.
  • आणि शिरा ५ ते ६ मिनिटासाठी झाकून ठेवा त्यामुळे त्यामधील साखर विरघळेल.
  • शिरा सर्व्ह करताना चांगला मिक्स करून सर्व्ह करा.

प्रसादाचा शिरा कसा बनवतात – how to make prasad sheera recipe in marathi

आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात त्यामधील एक पूजा म्हणजे सत्यनारायण आणि या पूजेला शिऱ्याचा नैवैद्य हा महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आता आपण प्रसादाचा शिरा कसा बनवतात हे पाहणार आहोत.

प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make prasadacha shira 

  • १ वाटी रवा.
  • १ वाटी साखर.
  • २ वाटी पाणी किंवा दुध.
  • १/२ वाटी तूप.
  • १/२ चमचा वेलची पावडर.
  • काजू तुकडे ( आवश्यकतेनुसार ).
  • बेदाणे ( आवश्यकतेनुसार ).
  • १ मध्यम आकाराचे केळ ( पिकलेले ).

प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make prasadacha shira 

  • प्रसादाचा शिरा बनवतेवेळी सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तूप घाला.
  • आणि त्यामध्ये काजू आणि बेदाणे टाका आणि ते तळून घ्या आणि कढईतून बाजूला काढा.
  • आता त्या तुपामध्ये त्यामध्ये रवा घाला आणि तो रवा लालसर रंग येईपर्यंत भाजा. मग त्यामध्ये उकळलेले दुध किंवा पाणी घाला आणि त्याला २ ते ३ मिनिटे वाफवा त्यामुळे रवा चांगला फुलेल.
  • मग यामध्ये साखर, वेलची पावडर, तळलेले काजू आणि बेदाणे आणि केळीचे काप घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या. मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • आणि तो शिरा ४ ते ५ मिनिटे झाकून ठेवा त्यामुळे त्यामधील साखर विरघळेल.
  • तुमचा प्रसादाचा शिरा तयार झाला.

आम्ही दिलेल्या shira recipe in marathi by madhura माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिरा रेसिपी मराठी माहिती gulacha shira recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या prasad sheera recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mango sheera recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये badam shira recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!