Poha Recipe in Marathi – Pohe Recipe in Marathi कांदा पोहे रेसिपी मराठी पोहे हि रेसिपी भारतामध्ये प्रसिध्द असलेला एक पदार्थ आहे जो लोक नाश्ता म्हणून खातात. पोहे हा सर्वात सोपा आणि कमी वेळेत तयार होणारा सकाळच्या नाश्त्याचा प्रकार आहे. पोहे हि रेसिपी जरी भारतामध्ये सर्व ठिकाणी प्रसिध्द असली तरी हा पदार्थ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. पोहे आपण केंव्हाही बनवू शकतो जसे कि सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर देखील कांदे पोहेच बनवले जातात.
जरी सध्याच्या जगामध्ये वेगवेगळे पदार्थ रोज तयार होते असले तरी भरतीय पाक संस्कृतीमध्ये कांदे पोह्याला अनन्य साधारण महत्व आहे. भारतीय लोकांना कांदेपोहे या पदार्थाची इतकी सवय झालेली आहे कि त्यांच्या सकाळचा नाश्ता कांदेपोहे खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही.
कांदे पोहे हा पदार्थ तेलामध्ये मोहरी, कडीपत्ता, मिरची, हळद, मीठ आणि साखर याची फोडणी देवून त्यामध्ये भिजवलेल पोहे घालून ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करून ते २ ते ३ मिनिटे वाफवून सरळच सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह केला जातो. चला तर मग पाहूयात महाराष्ट्रामध्ये तसेच देशाच्या काही इतर भागामध्ये बनवला जाणारा पोहे हा पदार्थ कसा बनवायचा.
कांदा पोहे रेसिपी मराठी – Poha Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
फोडणीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
पोहे : पोहे हा या रेसिपी मधील महत्वाचा घटक आहे जो बाजारामध्ये अगदी सहजपणे मिळू शकतो. पोहे रेसिपी बनवताना पोहे भिजवून घालावे लागतात.
कांदे : कांद्यामुळे पोह्याला एक वेगळीच चव येते. आपण पोह्यामध्ये जितका जास्त कांदा वापरलं तितकेच पोहे स्वादिष्ट बनतात आणि पोहे खातेवेली कांदा तोंडात गेला कि एक वेगळाच स्वाद लागतो.
- नक्की वाचा: आप्पे रेसिपी मराठी
मिरची, हळद आणि मीठ : हळद, मिरची आणि मीठ हे देखील पोह्यामधील महत्वाचे साहित्य आहे कारण यामुळे पोह्याला चव येते.
कांदे पोहे बनवण्यासाठी खूप सोपे असतात आणि कमी वेळेमध्ये होतात आणि महाराष्ट्रामध्ये तसेच भारताच्या इतर काही भागामध्ये हा पदार्थ लोक आनंदाने बनवतात आणि आवडीने खातात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
फोडणीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
- २ वाटी पोहे.
- १ मोठा कांदा ( चौकोनी आणि उभा चिरलेला ).
- २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- ७ ते ८ कडीपत्याची पाने.
- १/२ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे.
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १ मोठा चमचा खवलेले ओले खोबरे.
- चिरलेली कोथींबीर.
- १ मोठा चमचा.
- पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम २ वाटी पोहे घ्या आणि ते चांगले निवडून घ्या.
- मग एक कांदा घ्या आणि तो चौकोनी चिरून घ्या त्याचबरोबर हिरव्या मिरच्या चिरून घ्या, कडीपत्त्याची पाने काढून घ्या.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि हे मिश्रण २ ते ३ सेकंद हलवा आणि मग त्यामध्ये कांदा घाला आणि तो चांगला ३ ते ४ मिनिटे भाजा.
- कांदा टाकल्यानंतर थोड्याच वेळाने भाजलेले शेंगदाणे टाका आणि ते देखील कांद्यासोबत आणि थोडे चांगले भाजून घ्या.
- कांदा भाजण्याच्या ३ ते ४ मिनिटाच्या प्रक्रियेमध्ये आपण निवडून ठेवलेले पोहे एक भांड्यामध्ये घ्या आणि ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यामधील पूर्ण पाणी काढून टाका.
- मग त्यामध्ये हळद आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि मग त्यामध्ये भिजवलेले पोहे आणि त्यावर थोडी साखर घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि कढईवर झाकण घालून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्यावे आणि ते डायरेक्ट सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून त्यावर लिंबूची फोड ठेवून सर्व्ह करा.
पोहे हा पदार्थ वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जातात त्यामधील एक प्रकार म्हणजे दडपे पोहे. आता आपण दडपे पोहे कसे बनवायचे याबद्दल माहिती घेवूयात.
- नक्की वाचा: इडली रेसिपी मराठी
- पाव किलो पोहे.
- १ ओल्या नारळाचा खीस.
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
- ५ ते ७ कडीपत्ता पाने.
- १ मध्यम कांदा ( चिरलेला ).
- १ टोमॅटो ( चिरलेला ).
- १ चमचा जिरे.
- १ चमचा मोहरी.
- १ मोठा चमचा तेल.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- १/४ चमचा हिंग.
- २ ते ३ चमचे लिंबू रस.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- कोथिंबीर.
- दडपे पोहे बनवताना सर्वप्रथम एक हवाबंद डबा घ्या आणि त्यामध्ये खिसलेल्या नारळाचा एक पातळ थर घाला आणि मग त्यावर पोहे घाला मग त्यावर परत ओल्या खिसलेल्या खोबऱ्याचा थर घाला मग त्यावर आणि पोह्याचा थर घाला आणि मग त्यावर ओल्या खिसलेल्या खोबऱ्याचा थर घाला असे पोह्याचे आणि खोबऱ्याचे एकूण पाच थर घाला आणि डब्याचे झाकण बंद करून एक तास ते दीड तास तसेच ठेवा.
- त्यामुळे पोहे चांगले भिजतील.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि हे मिश्रण २ ते ३ सेकंद हलवा आणि मग त्यामध्ये कांदा घाला आणि तो चांगला ३ ते ४ मिनिटे भाजा.
- आता त्यामध्ये टोमॅटो घाला आणि ते चांगले एकत्र करा. मग त्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि मग त्यामध्ये दडपून ठेवलेले पोहे खोबऱ्या सोबत घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- आता पोह्यामध्ये लिंबूचा रस आणि साखर घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- दडपे पोहे सर्व्ह करताना त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
आता आपण ताक पोहे कसे बनवायचे हे पाहूयात.
- नक्की वाचा: कोथिंबीर वडी रेसिपी मराठी
- २ वाटी पोहे.
- १ मोठा कांदा ( चौकोनी आणि उभा चिरलेला ).
- २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- ७ ते ८ कडीपत्याची पाने.
- १/२ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे.
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १ वाटी ताक.
- एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि हे मिश्रण २ ते ३ सेकंद हलवा आणि मग त्यामध्ये कांदा घाला आणि तो चांगला ३ ते ४ मिनिटे भाजा.
- कांदा टाकल्यानंतर थोड्याच वेळाने भाजलेले शेंगदाणे टाका आणि ते देखील कांद्यासोबत आणि थोडे चांगले भाजून घ्या.
- मग त्यामध्ये हळद आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- त्यानंतर त्यामध्ये कोरडे पोहे घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- आता त्यावर थोडे तक शिंपडा आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि परत पोह्यावर ताक शिंपडा आणि त्यावर झाकण घालून पोहे ३ ते ४ मिनिटे वाफवून घ्या. ( टीप : ३ ते ४ मिनिटांनी गॅस बंद करा )
- मग त्यामध्ये लगेच साखर ( चवीनुसार ) घाला आणि पोहे चांगले मिक्स करा आणि ते झाकून ठेवा.
- तुमचे ताक पोहे सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.
टिप्स ( tips )
- कांदेपोहे करतेवेळी आपण फोडणीमध्ये लिंबूचा रस घालू शकतो किंवा सर्व्ह करतेवेळी लिंबूची फोड दिली तर चालते.
- कांदे पोह्यामध्ये चिरलेला टोमॅटो देखील वापरला तर चालतो.
- पोहे धुतल्यानंतर १ ते २ मिनिटे चांगले भिजू द्या.
आम्ही दिलेल्या poha recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कांदा पोहे रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pohe recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kanda poha recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kande pohe recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट