शिर्डी साई बाबा इतिहास मराठी Shirdi Sai Baba History in Marathi

shirdi sai baba history in marathi – sai baba information in marathi language शिर्डी साई बाबा इतिहास मराठी, शिर्डी हे भारतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.‌ दरवर्षी असंख्य लोक शिर्डी येथील साईबाबा यांना भेट देतात. कोणी म्हणतो साईबाबा एक संत होते तर कोणी म्हणतं साईबाबा गुरू होते. असं म्हणणं आहे साई बाबा देव होते पण खरंतर साईबाबा एक भारतीय फकीर होते. त्यांच्याकडे असणाऱ्या शक्तींचा त्यांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही परंतु त्यांनी जे काही लोक कल्याणासाठी चमत्कार केले त्यावरून लोकांनी त्यांना देवासमान मानले आणि महाराष्ट्रात शिर्डी मध्ये वास्तव्य करून बाबांनी सर्वांना श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला ज्यांने अनेकांचे आयुष्य मार्गी लावले.

महाराष्ट्रातील शिर्डी येथे साईबाबांचे भव्यदिव्य असे मंदिर आहे. साई बाबांचा जन्म कोठे व कधी झाला यावर वेगवेगळी मते मांडली गेली आहेत. साईबाबा यांचे भक्त फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत आणि त्यांच्या जन्मा विषयी जगभरातून दावे करण्यात आले आहेत. परंतु अजूनही प्रमाणिक व खरे पुरावे कोणीही सादर करू शकले नाही आहेत आणि स्वतः साईबाबांनी देखील आपल्या जन्म स्थळाबाबत कधीही उल्लेख केला नाही. साईबाबा मोमीन वंशीय मुस्लीम होते अशी मान्यता आहे.

shirdi sai baba history in marathi
shirdi sai baba history in marathi

शिर्डी साई बाबा इतिहास मराठी – Shirdi Sai Baba History in Marathi

Sai Baba Information in Marathi Language

साईबाबा यांनी आपल्या चमत्कारांनी अनेकांचे जीवन सुधारले त्यांचे असंख्य भक्त आहेत त्यांच्या भक्त समुदायात प्रामुख्याने हिंदू व मुस्लीम धर्मीयांचे लोक अधिक आहेत. साईबाबांनी स्वतः कधीही कोणत्याही प्रकाराचा धर्मभेद केला नाही तर ते स्वतः धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण होते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्या पासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर अहमदनगर शहरापासून ८३ किलोमीटर अंतरावर शिर्डी वसलेले आहे.

ज्यावेळी साईबाबांनी शिर्डीत पाऊल ठेवले तेव्हा तेथील धरती पवित्र झाली आणि तेथे साईबाबांचे भव्य असे साई मंदिर उभारले.  बाबांसाठी सर्वजण सारखेच होते. त्यांनी कधीही गरीब, श्रीमंत, हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही. साईबाबांचे जन्मस्थळ व त्यांची जात यावरून आजही अनेक वेगवेगळी मते मांडली जातात परंतु साईबाबांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा कुठेही उल्लेख केला नाही.

धर्मनिरपेक्षतेची शिकवण जगाला देत सबका मालिक एक आणि अल्लाह मालिक हे साईंचे बोल होते. अंतर्ज्ञानी साईबाबा यांना सर्व प्रकाराचा रिद्धी व अष्टौ सिद्धी प्राप्त होत्या. शिर्डी मध्ये ज्यावेळी साई बाबांचे आगमन झाले त्यावेळी त्यांनी कोणालाही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली नाही. शिवाय त्यांनी लोकांच्या घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह केला त्यांची वस्त्र व त्यांचा पोशाख त्यांच साध राहणीमान पाहून बऱ्याच लोकांनी त्यांची थट्टामस्करी केली परंतु साईबाबांनी नेहमी सर्वांना समानतेची वागणूक दिली.

सबका मालिक एक हे वाक्य नेहमी साईबाबांच्या मुखी असायचे. साईबाबा यांच्याकडे अलौकिक शक्ती होती त्यांनी त्यांच्या या शक्तीचा वापर प्रसिद्धीसाठी कधीच केला नाही. तर त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीब, दीनदुबळे यांची सेवा करण्यात घालवले. साईबाबा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचे जेव्हा ते शिर्डीत आले तेव्हा सुरुवातीस बऱ्याच लोकांनी त्यांना हडतूड वागणूक दिली.

अनेकदा गावातील काही मुलांनी साईबाबांना दगड मारले परंतु बाबांनी कधीही त्यांना चुकीची वागणूक दिली नाही तर स्वतः साईबाबा नेहमी त्या मुलांसोबत खेळायचे यावेळी साईबाबा शिर्डीत आल्यावर मंदिरात थांबले त्यावेळी देखील तेथील पुजाराने त्यांना हाकलून दिले. इतकं सगळं होऊन देखील साईबाबांनी कधीही स्वतःच्या अवताराबद्दल लोकांना माहिती दिली नाही.

परंतु जसे साई बाबा गोरगरिबांना मदत करू लागले तसं तसं साईबाबांच्या दैवी शक्तीची लोकांना जाणीव झाली लोकं साईबाबांना देवासमान वागणूक देऊ लागले परंतु तरीही साई बाबांचा स्वभाव कधीच बदलला नाही. जात पात, धर्म भेद, श्रीमंत-गरीब याकडे साईबाबांनी कधीच लक्ष दिले नाही त्यांनी प्रत्येकाला समान वागणूक दिली. कोणीही कितीही साईबाबांना झिडकारले किंवा कोणीही त्यांच्याशी कसेही वागले तरी त्यांनी कधीही कोणाचा अपमान केला नाही किंवा कोणाचे वाईट चिंतले नाही.

प्रेम, शमा, इतरांना मदत करणे, दान करणे, समाधान, आंतरिक शांतता ही साईबाबांची शिकवण होती. शिर्डीत असताना साईबाबा एका जीर्ण झालेल्या मशिदीत राहायचे त्या मशिदीला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले होते यावरून लक्षात येते की साईबाबांनी कधीही धर्मभेद केला नाही तर त्यांनी हिंदू व मुस्लिम या दोन धर्मीय लोकांना एकत्रित आणले.

साईबाबांच्या मते देवाला धर्म नसतो म्हणूनच सबका मालिक एक हे त्यांचे ब्रीदवाक्य होते‌. आज शिर्डीत येणारे अनेक भक्तगण विविध धर्मीयांचे आहेत आणि तिथे कोणताही मतभेद केला जात नाही. ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले असायचे. कोण कस आहे कोण कसं वागतंय, याच्यापेक्षा त्यांनी नेहमी एका माणसाने दुसऱ्या माणसाला चांगली वागणूक द्यावी याची शिकवण त्यांनी आपल्या भक्तांना दिली.

साई बाबांना कोण गुरु म्हणतात, तर कोण संत म्हणतं, तर कोणासाठी ते भगवान शिव यांचा अवतार आहेत, तर कोणासाठी ते भगवान कृष्ण यांचा अवतार. इतर कोणाला ते सद्गुरू वाटतात परंतु साईबाबांनी कधीही लोकांना मी संत आहे, मी गुरु आहे, मी देव आहे असे कधीच सांगितले नाही. शिर्डीतून साईबाबांनी आपल्या भक्तांना श्रद्धा सबुरी असा महामंत्र दिला.

श्रद्धा म्हणजे जर एखादं कार्य करायचं असेल तर त्या कामावर श्रद्धा असावी म्हणजेच विश्वास असावा आणि जर ते कार्य सिद्धीस नेण्यास मनुष्याच्या अंगी नेहमी सबुरी असणे गरजेचे आहे सबुरी म्हणजे धीर होय. आपला आपल्या कामावर विश्वास व श्रद्धा असेल आणि आपण सबुरीने म्हणजेच धीराने हे काम पूर्ण केलं तर या कामात आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल असा महान संदेश साईबाबांनी जगाला दिला. ज्या साईबाबांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण जगाला दिली तेच जग आज साईबाबा हिंदू होते की मुस्लिम या गोष्टीवरून वाद घालत आहे.

साईबाबांनी शिर्डी मध्ये अनेक चमत्कार करून दाखवले. साईबाबा भिक्षा मागून एका वाण्याच्या दुकानातून तेल आणून नेहमी दिवे लावायचे. त्यांना प्रकाशाची भरपूर आवड होती परंतु एकदा वाण्याने तेल देण्यास नकार दिल्यानंतर साई बाबांनी दिव्यांमध्ये चक्क पाणी टाकून त्यातून ज्योत पेटवून दाखवली त्यानंतर ज्यांनी-ज्यांनी साईबाबांना वाईट वागणूक दिली ते सर्व साई बाबांना शरण गेले.

शिर्डीमध्ये साईबाबांचे दिव्य मंदिर असून रोज पहाटे-पहाटे साईबाबांची काकड आरती होते. शिर्डीत असताना साईबाबांची मिरवणूक देखील काढली जायची त्या वेळी तेथील पुजारी म्हाळसापती यांनी जेव्हा पहिल्यांदा साईबाबा यांना बघितले तेव्हा त्यांना आओ साई अशी हाक मारली आणि तेव्हापासून ती शिर्डीचे साईबाबा झाले. साई चा अर्थ फकीर की यवनी संत असा आहे.

शिर्डी मध्ये साई बाबा प्रकट होण्यापूर्वी शिर्डीचे वर्णन करायचे झाले तर सर्वत्र दाट जंगल, रातकिड्यांची किरकिर, रस्ते नाहीत, सापकिरड्याची भीती अशा अपरिचित व लहान आणि दुर्लक्षित केलेल्या गावाचे साईंनी रूपांतर एका उत्तम राज्यामध्ये केल. साईंनी गावांमध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे केंद्र आणली. पाणी नसणाऱ्या भागांमध्ये पाणी आणले असे अनेक वेगवेगळे बदल साईंने शिर्डीमध्ये केले. जे कधीही घडू शकले नसते. आज शिर्डी हे स्थळ जगभरामध्ये साईबाबांच्या कीर्ती मुळे प्रसिद्ध आहे.

आठवड्या मधील गुरुवार हा साई बाबांचा विशेष वार मानला जातो या दिवशी भक्तजन उपास-तापास धरतात व मोठ्या भक्तिभावाने साईबाबांची पूजा करतात. साईबाबांनी आपल्या भक्तजनांना अकरा वचन दिले हे अकरा वचन जर आपण अतिशय भक्ती आणि शुद्ध अंतकरणाने जपले तर साईबाबा त्या व्यक्तीच्या सर्व समस्या सोडवतात आणि त्यांचे रूपांतर एका आदर्श व्यक्ती मध्ये करतात असा विश्वास आहे. मुस्लिम धर्मातही सूफी संतान मध्ये साईबाबांना मानाचे स्थान आहे.

साईबाबांचे अनेक मुस्लीम भक्त देखील आहेत तसेच त्यांचे हिंदू धर्मीय भक्त देखील आहेत. साईबाबा त्यांच्या भक्तांची जात किंवा धर्म बघत नाहीत त्यांची निस्सीम भक्ती बघतात. साईबाबांची अकरा वचने जे पूर्ण करून पाळतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी उरत नाही.

साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना एका मुस्लीम फकिराच्या हवाली केले होते तेव्हापासूनच साईबाबा या फकीरा सोबत वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करत शिर्डीत पोहोचले. शिर्डीत काही काळ वास्तव्य करून साईबाबा तीन वर्षासाठी गायब झाले आणि तीन वर्षांनी पुन्हा शिर्डीत प्रकट झाले आणि त्यांनी पुढे तिथेच कायमचे वास्तव्य केलं असे मानले जाते. १५ ऑक्टोंबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी साईबाबांचे शिर्डी मध्ये निधन झाले.

आम्ही दिलेल्या shirdi sai baba history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिर्डी साई बाबा इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sai baba information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि sai baba history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sai baba history in marathi barth date Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!