नेमबाजी/शूटिंग खेळाची माहिती Shooting Information in Marathi

Shooting Information in Marathi shooting नेमबाजी हा एक खेळ असून याला मराठीमध्ये नेमबाजी म्हणतात. नेमबाजी हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जातो आणि हा खेळ जगभरातील प्रसिध्द खेळांपैकी एक आहे. नेमबाजी म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी प्रक्षेपणासाठी नेम धरून मारणे किवा शूट करण्याची स्पर्धा. प्राचीन काळी नेमबाजी दगड किवा धनुष्य आणि बाण वापरून नेमबाजी करत होते. बंदूकांचा वापर करून नेमबाजी ची सुरुवात सामान्यता आधुनिक काळात बंदुकांच्या विकासासह १५ व्या आणि १६ व्या शतकात युरोपमध्ये त्याची झाली. नेमबाजी या खेळाला ऑलिम्पिक खेळामध्येहि खूप महत्वाचे स्थान आहे आणि नेमबाजीचे ऑलिम्पिक अथेन्स १८९६ पासून सुरु झाले.

त्यानंतर ऑलिम्पिक गेम्स मेक्सिको १९६८ पासून स्त्रिया देखील नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागल्या. शूटिंगमध्ये गन आणि गनपाऊडर सारख्या शोधांचा समावेश होता ज्यांचा शोध आधुनिक युगात खेळांमध्ये लागला होता म्हणूनच या खेळाला आधुनिक खेळ असल्याचे म्हटले जाते. बहुतेक देश ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये भाग घेतात, परंतु नेमबाजी या खेळाला सहभागी देशांच्या संख्येत दुसरे स्थान आहे.

shooting information in marathi wikipedia
shooting information in marathi wikipedia

नेमबाजी खेळाची माहिती – Shooting Information in Marathi

नेमबाजी म्हणजे काय ? 

नेमबाजी म्हणजे रेंज शस्त्राने (रेंज शस्त्र म्हणजे बंदूक, धनुष्य, दगड, स्लिंगशॉट) प्रक्षेपण सोडण्याची कृती किंवा प्रक्रिया याला आपण नेमबाजी म्हणतात. नेमबाजीचा वापर हा शिकार करण्यासाठी, शेतामध्ये, युध्दामध्ये तसेच नेमबाजीच्या खेळाच्या स्पर्धेमध्ये केला जातो. नेमबाजी करत असलेल्या व्यक्तीला नेमबाज ( shooter ) म्हणतात.

ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजी कार्यक्रम – olympic events 

ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजी कार्यक्रम म्हणजे पिस्तूल, रायफल आणि शॉटगन या तीन शाखांच्या एकूण १५ कार्यक्रमांचा समावेश असतो. ऑलिम्पियन सहा पुरुष स्पर्धा, सहा महिला स्पर्धा आणि तीन मिश्र संघात भाग घेतात. ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजीच्या कार्यक्रमांची माहिती खाली तक्त्यामध्ये मंडळी आहे.

नेमबाजी कार्यक्रमांचा किवा स्पर्धेचा तक्ता

शाखामहिलांच्या स्पर्धापुरुषांच्या स्पर्धामिश्र संघ स्पर्धाएकूण स्पर्धा
रायफल५० मीटर रायफल ३ पदे आणि १० मीटर एयर रायफल५० मीटर रायफल ३ पदे आणि १० मीटर एयर रायफल१० मीटर एयर रायफल
पिस्तूल२५ मीटर पिस्तूल आणि १० मीटर एयर पिस्तूल२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल आणि १० मीटर एयर पिस्तूल१० मीटर एयर पिस्तूल
शॉटगनट्रॅप स्कीटट्रॅप स्कीटट्रॅप

नेमबाजी खेळाचे नियम – rules for shooting game 

बंदुकीच्या सुरक्षेविषयी काही नियम

 • बंदुकीचे टोक नेहमीच एक सुरक्षित दिशेला ठेवा.
 • बंदुकीमध्ये योग्य दारुगोळा वापरा.
 • नेमबाजीपूर्वी बॅरेल अडथळ्यांविषयी साफ आहे याची खात्री करा.
 • प्रत्यक्षात वापरात नसताना बंदुक खाली करणे आवश्यक आहे.
 • आपण वापरत असलेल्या बंदुकची यांत्रिक आणि हाताळणीची वैशिष्ट्ये जाणून घ्या.
 • जर ट्रिगर खेचले जाते तेव्हा आपली बंदूक गोळीबार करण्यात अयशस्वी झाल्यास बंदूक काळजीपूर्वक हाताळा.
 • नेमबाजी करताना नेत्र आणि कान संरक्षण नेहमी घाला.
 • आपली गन बदलू नका किंवा सुधारू नका, आणि गन नियमितपणे सर्व्ह करा.
 • नक्की वाचा: धनुर्विद्या खेळाची माहिती 

ऑलिम्पिक खेळाबद्दल काही नियम

 • सर्वाधिक पात्रता मिळवणारे आठ नेमबाज अंतिम फेरीत प्रवेश करतात.
 • या स्पर्धेमध्ये ४५ नेम असतात आणि त्यामधील १५ गुडघे टेकलेल्या स्थितीत, १५ प्रवण ( झोपून ) स्थितीत आणि राहिलेले १५ स्थायी ( उभे राहून ) स्थितीत मारावे लागतात.
 • गुडघे टेकलेल्या स्थितीतील नेम पाच मालिकांमध्ये खेळले जातात ते प्रत्येकि २०० सेकंदाच्या वेळेमध्ये खेळले जातात.
 • प्रवण स्थितीतील नेम सुध्दा पाच मालिकांमध्ये खेळले जातात ते प्रत्येकि १५० सेकंदाच्या वेळेमध्ये खेळले जातात.
 • स्थायी स्थितीतील नेम सुध्दा पाच मालिकांमध्ये खेळले जातात ते प्रत्येकि २५० सेकंदाच्या वेळेमध्ये खेळले जातात.
 • नेमबाजांच्या स्टँडपासून ५० मीटर दूर लक्ष्य ठेवले जाते.
 • लक्ष्य १० रिंगमध्ये विभागले गेले आहे.
 • रिंग डायमेटर १०.४ मिमी किंवा सुमारे ०.४१ इंच असते.
 • स्मॉल बोर सिंगल लोड रायफल ५.६ मिमी किंवा ०.२२ इंच कॅलिबरमध्ये असते.
 • रायफल चे जास्तीत जास्त एकूण वजन 8 किलो असू शाकते आणि स्टॉकमध्ये हुक टाइप बट बटणासह अॅडजस्ट समाविष्ट केले जाते.
 • स्थायी स्थितीत विश्रांतीचा वापर केला जाऊ शकतो.

नेमबाजीचे प्रकार – types of shooting game 

शारिरीक स्थितीवरून पडलेले प्रकार

 • गुडघे टेकलेल्या स्थितीत ( kneeling position ) : या स्पर्धेमध्ये ४५ नेम असतात आणि त्यामधील १५ गुडघे टेकलेल्या स्थितीत मधील असतात. गुडघे टेकलेल्या स्थितीतील नेम पाच मालिकांमध्ये खेळले जातात ते प्रत्येकि २०० सेकंदाच्या वेळेमध्ये खेळले जातात.
 • प्रवण ( झोपून ) स्थितीत ( prone position ) : प्रवण स्थितीमध्ये ४५ पैकी १५ नेम खेळले जातात. प्रवण स्थितीतील नेम सुध्दा पाच मालिकांमध्ये खेळले जातात ते प्रत्येकि १५० सेकंदाच्या वेळेमध्ये खेळले जातात.
 • स्थायी ( उभे राहून ) स्थितीत ( standing position ) : स्थायी स्थितीमध्ये ४५ पैकी १५ नेम खेळले जातात. स्थायी स्थितीतील नेम सुध्दा पाच मालिकांमध्ये खेळले जातात ते प्रत्येकि २५० सेकंदाच्या वेळेमध्ये खेळले जातात. स्थायी स्थितीत विश्रांतीचा वापर केला जाऊ शकतो.

बंदुकीवरून पडलेले प्रकार

 • रायफल नेमबाजी ( rifle shooting ) : रायफल नेमबाजीच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण पाच स्पर्धा असतात आणि नेमबाज ला ५० आणि १० मीटरच्या अंतरावर नेम धरावा लागतो. महिला, पुरुष आणि मिश्र संघ समाविष्ट असतो.
 • पिस्तुल नेमबाजी ( pistol shooting ) : पिस्तुल नेमबाजीच्या ऑलिम्पिकमध्ये सुध्दा एकूण पाच स्पर्धा असतात. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल आणि १० मीटर एयर पिस्तूल चा समावेश असतो.
 • शॉटगण नेमबाजी ( shotgun shooting ) : या प्रकारच्या नेमबाजीमध्ये नेमबाजाला जे लक्ष्य सध्याचे असते ते हवेमध्ये टाकले जाते आणि नेमबाजाला त्यावर नेम धरून मारावे लागते. या मध्ये दोन प्रकार मोडतात आणि ते म्हणजे स्कीट ( skeet ) आणि ट्रॅप ( trap ).

नेमबाजी संबधित पुरस्कार – awards 

नेमबाजी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार देवून सन्मान केला जातो त्यामधील काही पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार.

अर्जुन पुरस्कार :

अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी ओळखण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयामार्फत देण्यात येतात. यामध्ये पाच लाख रुपये आणि अर्जुनाचा पितळेचा पुतळा आणि एक पुस्तक देण्यात येते.

पद्मभूषण पुरस्कार :

पद्मभूषण हा भारतरत्न आणि पद्मविभूषण नंतर भारतीय प्रजासत्ताकातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने याची घोषणा केली जाते. हे राष्ट्रपतींनी मार्च किवा एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जातो.

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार :

राजीव गांधी खेळ रत्न हा भारतातील युवा कामकाज व क्रीडा मंत्रालयाने क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात आलेला सर्वोच्च सन्मान आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या नावावर हा पुरस्कार ठेवण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये ७५०००० रुपये दिले जातात.

द्रोणाचार्य पुरस्कार :

या पुरस्काराची सुरुवात १९८५ मध्ये झाली आणि द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेसाठी भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने प्रदान केलेला पुरस्कार आहे. या पुरस्कारामध्ये द्रोणाचार्य यांचा कांस्य पुतळा, सन्मानपत्र आणि ३००००० रुपये दिले जातात.

आम्ही दिलेल्या shooting information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर नेमबाजी या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about shooting game in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि shooting game information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू shooting information in marathi language नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!