Skiing Game Information in Marathi स्कीइंग खेळाविषयी माहिती आपण कित्येक वेळा चित्रपटामध्ये तसेच काही व्हिडिओ मध्ये पाहतो कि एकादी व्यक्ती बर्फाच्छादित प्रदेशामध्ये टेकड्यांवर पायाखाली एक बोर्ड वापरून एक खेळ खेळताना दिसतात या खेळला स्कीइंग खेळ म्हणतात. स्कीइंग हा एक खेळ आहे जो बर्फाच्छादित टेकड्यांवरून स्की बोर्डावर स्थिर राहून बोर्डद्वारे टेकड्यांवर पुढे सरकने हे या खेळाचा मुख्य हेतू आहे आणि स्कीइंग हा खेळ खेळताना हेल्मेट घालणे आवश्यक असते. आणि युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, दक्षिण अमेरिकन अँडीज आणि पूर्व आशियाच्या काही भागामध्ये हा खेळ खेळला जातो.
कारण त्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहेत आणि तेथे स्कीइंगची सुविधा आहे. ऑस्ट्रेलियातील किआंद्रा, स्विस आल्प्स आणि उत्तर अमेरिका या देशांमध्ये इ.स १८६१ मध्ये बहुतेक या खेळाची सुरुवात झाली असावी. स्कीइंग हा एक मनोरंजक खेळ आहे तसेच हा एक प्रकारचा स्पर्धात्मक खेळ आहे.
या खेळामध्ये खास डिझाइन केलेले बूट वापरतात आणि हे बूट बर्फाच्या वर प्रवास करण्यासाठी त्यांचा वापर करतात. अनेक प्रकारच्या स्पर्धात्मक स्कीइंग स्पर्धांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशनने मान्यता दिली आहे.
स्कीइंग खेळाविषयी माहिती – Skiing Game Information in Marathi
स्कीइंग म्हणजे काय ?
स्कीइंग हे करमणूक, खेळ आणि वाहतुकीचा मार्ग ज्यामध्ये स्की नावाच्या लांब आणि सपाट धावपटूंच्या जोडीचा वापर करून बर्फावरून फिरले जाते आणि हि पट्टी शूज किंवा बूट यांना जोडलेले किंवा बांधलेले असते. स्पर्धात्मक स्कीइंग मध्ये अल्पाइन, नॉर्डिक आणि फ्रीस्टाइल या सारख्या प्रकारांचा समावेश होतो.
स्कीइंग या खेळाचा इतिहास – history of skiing game
स्कीइंग हा खेळ अगदी पूर्वीच्या काळापासून खेळला जातो आणि स्कॅन्डिनेव्हियन शेतकरी, शिकारी आणि योद्धे संपूर्ण मध्ययुगात स्कीचा नियमित वापर करत होते. पूर्वीच्या काळी स्कीचा वापर लोक शिकार करण्यासाठी किंवा युद्धाच्या वेळी वापरत होते. एकदा स्वीडिश सैन्याच्या युनिट्सने स्कीइंग ह्या खेळाचे प्रशिक्षण घेवून त्याच्यावर स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि हे बहुतेक १८ व्या शतकामध्ये झाले होते.
म्हणजेच या खेळाची स्पर्धात्मक सुरुवात १८ व्या शतकापासून झाली असावी. इ. स. १८४० मध्ये नॉर्वेच्या टेलीमार्क प्रांतात लाकूडकाम करणाऱ्यांनी कॅम्बर्ड स्की विकसित केली होती. त्यानंतर १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये या खेळाची इतकी लोकप्रियता वाढली कि २० व्या शतकात म्हणजेच आज हा खेळ इतका महत्वाचा खेळ झाला आहे, कि हा मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक स्वरूपामध्ये खेळला जातो.
- नक्की वाचा: ओल्यम्पिक खेळाची माहिती
स्कीइंग चे प्रकार
स्कीइंग चे मुख्यता ३ प्रकार आहेत ते म्हणजे मनोरंजक स्कीइंग, बॅक कंट्री स्कीइंग आणि फ्रीस्टाइल स्कीइंग इ, या सराव प्रकारांची सविस्तर माहिती आपण खाली पाहू.
मनोरंजक स्कीइंग – recreational skiing
दरवर्षी स्कीइंग करणारे अनेक लोक असतात त्यांना स्कीइंग करणे आवडते आणि ते आपले मनोरंजन व्हावे ह्या हेतून स्कीइंग करतात. जर तुम्ही बर्फाच्छादित प्रदेशात सुट्टीची मजा लुटण्यासाठी गेला असाल, तर तेथे हौशी लोकांच्यासाठी स्कीइंग ची व्यवस्था असू शकते आणि तेथे ज्यांना स्कीइंगची आवड आहे आणि ज्यांना स्कीइंग करायला येते ते लोक त्यांच्या मनोरंजनासाठी करू शकतात.
बॅक कंट्री स्कीइंग – back country skiing
बॅक कंट्री हा एक स्कीइंग चा प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये बर्फाच्छादित प्रदेशातील रीसॉर्टच्या सीमेच्या आत किंवा बाहेर, जंगलांमध्ये आणि टेकडी भागामध्ये स्कीईंग केले जाते ज्याला बॅक कंट्री स्कीइंग म्हणतात.
फ्रीस्टाइल स्कीइंग – freestyle skiing
फ्रीस्टाइल स्कीइंग हा स्कीइंगचा एक प्रकार आहे ज्यामध्ये दोन विषयांचा समावेश होतो आणि ते म्हणजे एरियल आणि मोगल्स. त्याशिवाय आजच्या काळात फ्रीस्टाइल स्कीइंगमध्ये स्कीक्रॉस, हाफ – पाइप आणि स्लोप स्टाइलचा समावेश झाला आहे. या प्रकारचे स्कीइंग हे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळले जाते.
स्कीइंग या खेळाचे नियम – rules of skiing game
- स्कीइंग करण्यासाठी अनेक लोक येतात त्यामुळे जर तुम्ही स्कीइंग करत असाल तर तुम्ही तुमच्या पुढे असणाऱ्या लोकांना स्कीइंगसाठी मार्गाचा अधिकार आहे त्यामुळे त्यांना टाळण्याची जबाबदारी तुमची असते.
- स्कीइंग करताना नेहमी नियंत्रणात रहा आणि इतर लोक किंवा वस्तू थांबवू किंवा टाळण्यास सक्षम बना.
- उतारावरून जात असताना स्वताला पूर्णपणे नियंत्रित करून जा.
- स्कीइंग च्या वाटेवर असणाऱ्या सर्व चिन्हाच्या कडे किंवा सूचनांच्या लक्ष द्या किंवा त्याचे निरीक्षण करा आणि त्यामुळे तुम्हाला सुरक्षित स्कीइंग करायला मिळेल.
- या खेळामध्ये कोणतीही लिफ्ट वापरण्यापूर्वी, तुमच्याकडे सुरक्षितपणे लोड, राइड आणि अनलोड करण्याचे ज्ञान आणि क्षमता असणे आवश्यक आहे.
स्कीइंग या खेळाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about skiing game
- स्की हा शब्द नॉर्वेजियन शब्द ‘स्कीड’ वरून आला आहे ज्याचा अर्थ लाकडाचा तुकडा असा होतो.
- दरवर्षी ३५० मिलियन लोक स्की रीसॉर्ट ला किंवा स्की खेळायच्या भागामध्ये भेट देतात.
- इ. स. १८४० मध्ये नॉर्वेच्या टेलीमार्क प्रांतात लाकूडकाम करणाऱ्यांनी कॅम्बर्ड स्की विकसित केली होती.
- स्कीइंग हा एक खेळ आहे जो बर्फाच्छादित टेकड्यांवरून स्की बोर्डावर स्थिर राहून बोर्डद्वारे टेकड्यांवर पुढे सरकने हे या खेळाचा मुख्य हेतू आहे.
- स्कीइंग हे मूळतः बर्फाच्छादित डोंगराळ भागात राहणार्या स्थानिकांसाठी वाहतुकीचे साधन होते.
- युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, दक्षिण अमेरिकन अँडीज आणि पूर्व आशियाच्या काही भागामध्ये हा खेळ खेळला जातो.
- इ.स १८७९ मध्ये स्वीडनमध्ये पहिली रेकॉर्ड डाउनहिल स्कीइंग शर्यत झाली.
- अल्पाइन स्कीइंगने इ. स. १९३६ च्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये पहिले पदार्पण केले आणि जर्मनमध्ये जन्मलेला फ्रांझ फनूर हा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला.
- स्पर्धात्मक स्कीइंग मध्ये अल्पाइन, नॉर्डिक आणि फ्रीस्टाइल या सारख्या प्रकारांचा समावेश होतो.
- चीनमध्ये ५००० वर्षांपूर्वीची प्राचीन चित्रे सापडली आहेत जी स्कीइंगचे चित्रण करतात.
- इ.स १९३६ मध्ये ऑलिम्पिकमध्ये अल्पाइन स्कीइंगचा प्रथम परिचय झाला.
आम्ही दिलेल्या skiing game information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर स्कीइंग खेळाविषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या skiing information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of skiing game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये skiing game information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट