सापशिडी खेळ माहिती मराठी Snake and Ladder Information in Marathi

snake and ladder information in marathi सापशिडी खेळ माहिती मराठी, आपण घरी बसून अनेक प्रकारचे बोर्ड गेम खेळतो त्यामध्ये बुध्दीबळ, मराठी व्यापार, कॅरम आणि सापसीडी या सारखे अनेक खेळ खेळतो आणि आज आपण या लेखामध्ये त्यामधील सापसीडी या घरगुती किंवा बोर्ड गेम विषयी माहिती घेणार आहोत. सापसीडी या खेळाविषयी कोणाला माहिती नाही असे नाही कारण हा खेळ सर्वांच्या परिचयाचा आहे आणि हा खेळ जवळजवळ सर्वांनी खेळलेला एक बैठा खेळ आहे.

जो आपण घरामध्ये बसून एका बोर्डच्या सहाय्याने खेळू शकता आणि या खेळला इंग्रजीमध्ये स्नेक अँड लँडर (snake and ladder) असे म्हणतात. साप आणि शिडी हा खेळ सध्या देखील प्रसिध्द असला तरी हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक लोकप्रिय खेळ आहे.

हा खेळ खेळण्यासाठी एक प्रकारचा बोर्ड डिझाईन केलेला आहे आणि यामध्ये ग्रीड केलेलं चौरस असतात तसेच त्यावर साप आणि शिड्यांची चित्रे देखील असतात आणि खेळाडूला त्या घरातून पुढे जाण्यासाठी ठोकळा वापरतात त्यावर १ ते ६ पर्यंत डॉटचे नंबर असतात ज्याला आपण डाय या नावाने देखील ओळखले जाते.

snake and ladder information in marathi
snake and ladder information in marathi

सापशिडी खेळ माहिती मराठी – Snake and Ladder Information in Marathi

साप आणि शिडी या खेळाचा इतिहास – history

साप आणि शिडी या खेळाचा शोध हा प्राचीन भारतातील आहे असे म्हटले जाते म्हणजेच हा खेळ खूप पूर्वीपासून भारतामध्ये खेळला जातो आणि काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि हा खेळ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून खेळा जातो. ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले म्हणजेच १९ व्या शतकामध्ये राज्य केले त्यावेळी ब्रिटिशांनी या खेळाची सुधरीत आवृत्ती हि इंग्लंड मध्ये नेली होती.

साप आणि शिडी या खेळातील मुख्य उद्देश – main object

साप आणि शिडी हा खेळ एक मनोरंजक खेळ आहे जो आपण घरामध्ये बसल्या बसल्या खेळू शकतो आणि या खेळाचा मुख्य उद्देश हा आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकू पुढे जाते त्याच्या अगोदर शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणे अंतिम चौरसापर्यंत पोहोचणे.

साप आणि शिडी या खेळाचे महत्व – importance

  • हा खेळ असाच फक्त मनोरंजनासाठी किंवा टाईमपाससाठी खेळला जात नाही तर हा खेळ मुलांच्यासाठी एक नैतिक मार्गदर्शन असते यामध्ये शिडी असलेले चौरस हे सद्गुणांचे नेतृत्व करतात म्हणजेच ते चांगले गुण आणि कर्म असेल तर व्यक्ती यशस्वी होतो तर साप असणारे चौरस हे वाईट गुणांचे किंवा गोष्टींचे प्रतिनिधित्व करते.
  • हा खेळ मुलांनी सतत खेळल्यामुळे त्यांना गणिताच्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत होते.
  • त्याचबरोबर हा खेळ खेळाडूमधील सामाजिक कौशल्ये आणि परस्परसंवादाला चालना देण्यासाठी आहे.

साप आणि शिडी हा खेळ कसा खेळतात – how to play

साप आणि शिडी हा खेळ सर्वांच्या परिचयाचा आहे आणि हा कसा खेळायचा हे देखील सर्वांना माहित आहे तरी देखील खाली आपण हा सामान्य आणि अगदी सोपा खेळ कसा खेळायाचा ते पाहणार आहोत.

  • आपल्याला साप आणि शिडी हा खेळ खेळण्यासाठी साप शिडी बोर्ड, डाय आणि टोकन असणे आवश्यक आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी कमीत कमी दोन खेळाडू आवश्यक असतात.
  • हा खेळ खेळताना प्रथम खेळाडूंना आपली टोकन सुरवातीच्या चौकोनामध्ये म्हणजेच डाव्या कोपऱ्यातील पहिला चौकोनामध्ये ठेवावे.
  • आता पुढे ते दय रोल करतात आणि त्यांनी डाय रोल केल्या नंतर जो नंबर पडतो त्यावर त्यांचे टोकन पुढे हलवतात किंवा पुढे नेतात म्हणजेच डाय दोन पडला असेल तर ते दोन घरे पुढे जातात तर डाय ६ नंबर पडला असेल तर ते ६ घरे पुढे जातात आणि त्यांना परत एकदा डाय रोल करण्याची संधी देखील मिळते.
  • यामध्ये असे नियम आहे कि जर खेळाडू टोकन हलवत असताना तो सापाच्या तोंडावर आपला तर तो सरळ खाली येतो आणि जर शिडीच्या खालच्या टोकावर आला तर तो सीडी वरून सरळ वर जातो.
  • जो खेळाडू अंतिम टोकावर किंवा अंतिम चौरसावर जातो तो खेळाडू विजेता ठरतो.

साप आणि शिडी या खेळाविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • साप आणि शिडी हा खेळ जगभरातील एक सामान्य बोर्ड गेम म्हणून ओळखला जातो.
  • साप आणि शिडी हा खेळ खेळण्यासाठी कमीत कमी २ खेळाडूंची गरज असते आणि जास्तीत जास्त ४ खेळाडू हा खेळ खेळू शकतात त्यापेक्षा आधील खेळाडू हा खेळ खेळू शकत नाहीत परंतु या खेळामध्ये दोन खेळाडू असतील तर ह्या खेळाची रंगत चांगली वाढते.
  • साप आणि शिडी ह्या खेळाचा शोध भारतात लागला आहे आणि ह्या खेळाचा शोध १३ व्या शतकातील संत ज्ञानदेव लावला असे म्हणतात किंवा हा खेळ त्यांनी तयार केला असे म्हणतात.
  • या बोर्डमध्ये अनेक साप आणि शिड्या असतात ज्या वेगवेगळ्या चौरासांना जोडलेल्या असतात.
  • प्रत्येक खेळाडूच्या ओळखीसाठी वेगवेगळ्या रंगाचे तोकाब वापरले जाते आणि ह्या टोकनचा रंग निवडण्याची संधी असते.
  • एखाद्या खेळाडूचे टोकन सापाच्या तोंडावर गेल्यानंतर ते खाली सापाच्या शेपटीवर येते.
  • आज या खेळला साप आणि शिडी या नावाने ओळखले जात असले तरी या खेळला प्राचीन भारतात मोक्षपाटमू किंवा मोक्षपट म्हणून ओळखले जात होते आणि हे मोक्षपट हे या खेळाचे प्राचीन आहे.
  • अनेक इतिहासकारांच्या मते हा खेळ १३ व्या शतकामध्ये अस्तित्वात आला आहे.

आम्ही दिलेल्या snake and ladder information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सापशिडी खेळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या snake and ladder game information in marathi या Snake and ladder information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about snakes and ladders in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sapsidi information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!